Friday, June 26, 2026
Home Blog Page 26

मौजे बीबी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; आयु. सोमीनाथ घोरपडे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

0
मौजे बीबी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; आयु. सोमीनाथ घोरपडे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

मौजे बीबी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; आयु. सोमीनाथ घोरपडे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

फलटण (प्रतिनिधी) :विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मौजे बीबी येथे सिद्धार्थ तरुण मंडळ, भीमनगर बिबी यांच्या वतीने भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) चे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांचे “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे या देशाच्या जडणघडणीमध्ये योगदान” या विषयावर झालेले प्रभावी व्याख्यान होय.

या व्याख्यानासाठी ग्रामस्थ, बौद्ध उपासक-उपासिका तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

आपल्या व्याख्यानात सोमीनाथ घोरपडे यांनी बाबासाहेबांच्या बहुआयामी कार्याचा सखोल आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, “बाबासाहेबांनी केवळ एका समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण देशाच्या उन्नतीसाठी कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची जाण ठेवून कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे.”

औद्योगिक व आर्थिक धोरणांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, सार्वजनिक क्षेत्राच्या विकासासाठी बाबासाहेबांनी महत्त्वपूर्ण दिशा दिली. Reserve Bank of India, Life Insurance Corporation of India यांसारख्या संस्थांच्या उभारणीमागील दूरदृष्टी त्यांनी स्पष्ट केली. खाणी, विमा व पायाभूत उद्योगांच्या राष्ट्रीयीकरणाची संकल्पना मांडून त्यांनी देशाच्या आर्थिक विकासाचा पाया मजबूत केला.

जल व ऊर्जा क्षेत्रातील योगदान अधोरेखित करताना त्यांनी नमूद केले की, Central Water Commission यांसारख्या संस्थांची पायाभरणी बाबासाहेबांच्या विचारातून झाली. दामोदर व हिराकूड प्रकल्प तसेच १९४८ साली केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या स्थापनेद्वारे राष्ट्रीय विद्युत ग्रीडची संकल्पना साकार झाली.

शेतकरी व कामगारांसाठीच्या लढ्याचा उल्लेख करताना त्यांनी १९३८ मधील खोतीप्रथा विरोधातील आंदोलन, “कसेल त्याची जमीन” ही संकल्पना, तसेच कुळ कायदा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे महत्त्व स्पष्ट केले. कामगार मंत्री म्हणून ८ तासांचा कामाचा दिवस, पगारी रजा, महागाई भत्ता व कामगार हक्कांचे संरक्षण यांसारखे ऐतिहासिक निर्णय बाबासाहेबांनी घेतले, असे त्यांनी सांगितले.
तसेच लाहोर येथील जातपात तोडक मंडळाच्या प्रसंगाचा संदर्भ देत “Annihilation of Caste” या ग्रंथाच्या निर्मितीची पार्श्वभूमीही त्यांनी उलगडली.

सोमीनाथ घोरपडे यांनी आपल्या भाषणात माता रमाई यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख करत सांगितले की, त्यांच्या त्यागामुळेच बाबासाहेब घडू शकले. महिलांनी माता रमाई, राजमाता अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन नीतिमान जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सोमीनाथ घोरपडे यांनी सर्व उपस्थित बौद्ध उपासक उपासिका व सिद्धार्थ तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना इथून पुढील काळामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या फोटो सोबत सम्राट अशोकांचा फोटो सन्मानपूर्वक पूजा साहित्य मध्ये लावण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनांमध्ये बौद्ध धर्माच्या प्रचार – प्रसार कार्यामध्ये व एकंदरीत भारताच्या जडणघडणीमध्ये सम्राट अशोकाचे योगदान सांगितले.

या जयंती महोत्सवानिमित्त आयु. शशी जगताप यांनी स्व. विलास जगताप यांच्या स्मरणार्थ उपस्थितांना स्नेहपूर्वक अन्नदान केले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, बिबी यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला.

या कार्यक्रमास बाळासाहेब काकडे, गणेश काकडे, राज काकडे, अविनाश काकडे, प्रदीप काकडे, दादा गायकवाड, सूरज सातपुते तसेच सिद्धार्थ तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी, बौद्ध उपासक-उपासिका, बालक-बालिका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन राज काकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी सिद्धार्थ तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव 2026 भव्य उत्साहात संपन्न

0
फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव 2026 भव्य उत्साहात संपन्न

फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव 2026 भव्य उत्साहात संपन्न

फलटण :- फलटण शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आयोजित जयंती महोत्सव 2026 अत्यंत भव्य, देखणा आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. अध्यक्ष हरिष काकडे (आप्पा) यांच्या कुशल नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते, ज्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

बारामती पुलापासून पंचायत समिती फलटणपर्यंत तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि पुढे महावीर स्तंभ परिसरात उभारण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेत होती. शहरातील प्रत्येक गल्ली-बोळ उजळून निघाला होता.

यावर्षीचे प्रमुख आकर्षण म्हणजे आंबेडकर चौकात उभारण्यात आलेली कोलंबिया युनिव्हर्सिटी लायब्ररीची भव्य प्रतिकृती, जिथे बाबासाहेबांनी शिक्षण घेतले होते. त्यासोबत तथागत भगवान बुद्धांची मूर्ती आणि आकर्षक सजावट यामुळे परिसर अधिकच देखणा झाला होता.

जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीतून बाबासाहेबांच्या महान कार्याचा प्रभाव जनतेसमोर प्रभावीपणे मांडण्यात आला. त्यांच्या कायदेविषयक योगदानामुळे महिलांना मिळालेला सन्मान, तसेच त्यांच्या पत्रकारितेच्या वारशाचेही उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले.

महोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक, मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे उत्तम आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांमुळे शहरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.

या यशस्वी आयोजनामागे हरिष काकडे (आप्पा), शशीकांत अहिवळे, सुजल गायकवाड, स्वप्निल काकडे, आदर्श अहिवळे, साहिल अहिवळे, संघर्ष अहिवळे,देवराज अहिवळे. साईराज कांबळे संघराज अहिवळे, रोनित अहिवळे, अमर अहिवळे, प्रेम अहिवळे, विराज घोडके, अनिकेत अहिवळे, निसर्ग अहिवळे, साईराज कांबळे, संविधान काकडे तसेच संपूर्ण जयंती समिती सदस्यांचे अथक परिश्रम, जिद्द आणि उत्कृष्ट टीमवर्क कारणीभूत ठरले.

तसेच माजी नगरसेवक सनीदादा अहिवळे, नगरसेवक सचीन (सर) अहिवळे यांचे विशेष सहकार्य लाभले. शक्ती भोसले, चेअरमन सुधीर अहिवळे, सुनिलनाना अहिवळे, सनी काकडे, अमर सोरटे, विशाल पाटील , जयकुमार रणदिवे, विकी काकडे, अशय अहिवळे, दया पडकर, सागरदादा सोरटे, सिद्धार्थ अहिवळे, प्रजन्य अहिवळे, संग्राम अहिवळे, रोहित गायकवाड, प्रणव जीवन काकडे, उमेश कांबळे, विशाल काकडे, कुणाल काकडे, बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते, कपील काकडे, गणेश अहिवळे, महादेव गायकवाड, सनी मोरे, विकी बोके, अमोल अहिवळे, सुशांत अहिवळे, मिलिंद भोसले, किरण सर अहिवळे तसेच विविध मित्र मंडळांचे मोलाचे योगदान लाभले.

भीमाई मित्र मंडळ, पंचशील मित्र मंडळ, रमाई मित्र मंडळ, आपलं भीम नगर आणि भीम योद्धा मित्र मंडळातील कार्यकर्त्यांनी रात्रभर मेहनत घेऊन सजावट व झेंडे लावण्याचे कार्य पार पाडले.

एकूणच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव 2026 हा फलटण शहरासाठी प्रेरणादायी, आदर्श आणि कायम स्मरणात राहणारा उत्सव ठरला.

फलटणमध्ये भीमजयंतीचा जल्लोष; रामराजे नाईक निंबाळकर यांचे अभिवादन

0
फलटणमध्ये भीमजयंतीचा जल्लोष; रामराजे नाईक निंबाळकर यांचे अभिवादन

फलटणमध्ये भीमजयंतीचा जल्लोष; रामराजे नाईक निंबाळकर यांचे अभिवादन

फलटण : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. शहरातील विविध सामाजिक संघटना, युवक मंडळे आणि नागरिकांच्या सहभागातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
या मिरवणुकीत सातारा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित राहून बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला आणि विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले.
मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांनी आणि आकर्षक सजावटीच्या देखाव्यांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. युवकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत बाबासाहेबांच्या विचारांची जागरूकता समाजात पसरवण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमामुळे फलटण शहरात सामाजिक एकतेचा आणि प्रेरणादायी वातावरणाचा प्रत्यय आला. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भीमजयंती साजरी केली.

फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्नेहभोजन व अभिवादन कार्यक्रम उत्साहात

0
फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्नेहभोजन व अभिवादन कार्यक्रम उत्साहात

फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्नेहभोजन व अभिवादन कार्यक्रम उत्साहात


फलटण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात नगरसेवक विकास वसंतवराव काकडे (सर) यांच्या वतीने आयोजित स्नेहभोजन व अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम २५ वर्षांपासून सातत्याने राबवला जात आहे.

कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. फलटण शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

विधान परिषदेचे मा. सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे ही  अभिवादनासाठी कायम उपस्थिती लावतात ,फलटण कोरेगाव विधानसभेचे माजी आमदार दिपक चव्हाण हे उपस्थिती असतात. तसेच सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर यांनीही २५ वर्षाच्या परंपरेनुसार उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले. फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनीही सदिच्छा भेट देत कार्यक्रमात सहभाग घेतला.

नगरसेवक विकास काकडे यांनी “समाजाचे आपण काही देणे लागतो” या भावनेतून हा उपक्रम राबवत असतात समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा हा प्रेरणादायी प्रयत्न असून, यामुळे सामाजिक एकोपा आणि बंधुभाव अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवर:
आस्था टाईम्सचे संपादक दादासाहेब चोरमले (पत्रकार ), नगरसेवक संदीप चोरमले, विजयकुमार पाटील मुख्याध्यापक (वडले ), नगरसेवक विशाल तेली,  किशोर ताळरकर, नगरसेवक पप्पू शेख, नगरसेविका स्मिता शहा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शैक्षणिक क्षेत्रातील उपस्थिती:
महामुलकर सर (प्राचार्य), रूपननवर सर (प्राचार्य), येवलेकर सर (प्राचार्य), अरुण काकडे सर (प्राचार्य), सुधीर अहिवळे सर ( प्राचार्य ) बोराटे सर (मुख्याध्यापक), जगदाळे सर (प्राचार्य), रेपाळ सर तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी उपस्थित होते. तसेच विविध समाजातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते .

शुभेच्छा देणारे:
नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर जि.प. सदस्या वैशालीताई कांबळे , नगरसेवक पांडुरंग (आबा ) गुंजवटे, मा नगरसेवक किशोरभैय्या नाईक निंबाळकर , मा नगरसेवक अनुप शहा ,नगरसेविका शिदाली शहा  नगरसेवक पंकज पवार नगरसेविका कविता मदने ,

हा उपक्रम सामाजिक एकात्मतेचा आदर्श निर्माण करणारा ठरत असून, सर्व स्तरातील नागरिकांना एकत्र आणण्याचे तसेच मंगलमैत्री निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे.

राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६ साठी सूरज रतन जगताप यांची निवड

0
राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६ साठी सूरज रतन जगताप यांची निवड

राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६ साठी सूरज रतन जगताप यांची निवड

साहस Times : नवी मुंबई (घणसोली) येथील सामाजिक कार्यकर्ते सूरज रतन जगताप यांची राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६ साठी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ही निवड तेजस सेवा प्रतिष्ठान, संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) या शासनमान्य संस्थेच्या वतीने करण्यात आली असून, त्यांच्या उत्कृष्ट धम्मकार्य, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक योगदानाची दखल घेत ही प्रतिष्ठित सन्मानाची घोषणा करण्यात आली आहे.
हा पुरस्कार समारंभ दिनांक ६ जून २०२६, रोजी संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर (महाराष्ट्र) येथे “संविधान अमृत महोत्सव” या विशेष कार्यक्रमात सकाळी १० वाजता आयोजित करण्यात येणार आहे. भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे.
याच दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याने या सन्मानाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
या निवडीबद्दल सूरज रतन जगताप यांनी तेजस सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. रवींद्र घोसाळे व संपूर्ण निवड समितीचे मनःपूर्वक आभार मानले असून, भविष्यातही समाजसेवा व धम्मकार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

फलटणमध्ये तरुणाचा खून; तिघा संशयितांना अटक

0
फलटणमध्ये तरुणाचा खून; तिघा संशयितांना अटक

फलटण :- फलटण तालुक्यातील ढवळपाटी, वाखरी परिसरात 10 एप्रिल 2026 रोजी पहाटे सुमारे 1.20 वाजता घडलेल्या घटनेत 18 वर्षीय सोमनाथ संदीप जाधव याचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मि-याचीवाडी कमानीजवळ ही घटना घडली.
या प्रकरणी संदीप उमाजी जाधव (रा. मि-याचीवाडी, ता. फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, सोमनाथ हा एका अल्पवयीन मुलीशी मोबाईलवरून सोशल मीडियाद्वारे संवाद साधत असल्याच्या रागातून आरोपींनी त्याच्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तसेच उचलून आपटत त्याचा खून केला.
या प्रकरणी आदित्य विजय शिंदे (वय 23), तेजस उर्फ चिक्या शिवाजी लोखंडे (वय 24) आणि प्रद्युम्न उर्फ पिंट्या पांडुरंग लोखंडे (वय 22), सर्व रा. ढवळ, ता. फलटण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले होते; मात्र पोलिसांनी तातडीने तपास करून त्यांना अटक केली.
आदित्य शिंदे याला 11 एप्रिल रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच उर्वरित दोन्ही आरोपींना 13 एप्रिल रोजी अटक करण्यात आली असून त्यांना 14 एप्रिल रोजी न्यायालयात हजर करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या नेतृत्वात पार पडली. या तपासात उपनिरीक्षक दिपक पवार, महिला उपनिरीक्षक ज्योती चव्हाण तसेच पोलीस कर्मचारी नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, वैभव सुर्यवंशी, तुषार नलवडे, हणमंत दडस आणि शिवराज जाधव यांनी सहभाग घेतला.

समतानगर (विडणी) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी!

0
समतानगर (विडणी) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी!

समतानगर (विडणी) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी!

फलटण (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त समता नगर (विडणी) येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा (पूर्व) यांच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.

यावेळी शाखेचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे सर यांनी बाबासाहेबांच्या बहुआयामी कार्यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, “बाबासाहेबांनी केवळ एका समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण देशाच्या उन्नतीसाठी कार्य केले आहे. त्यामुळे त्यांनी देशाला काय दिले हे समजून घेणे आणि त्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अत्यंत गरजेचे आहे.”

घोरपडे यांनी पुढे बाबासाहेबांच्या औद्योगिक आणि आर्थिक धोरणांवर प्रकाश टाकताना सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रातील औद्योगिकीकरणाचा पुरस्कार करत त्यांनी Reserve Bank of India, Life Insurance Corporation of India यांसारख्या संस्थांच्या उभारणीची दिशा दिली. तसेच खाणी, विमा व पायाभूत उद्योगांच्या राष्ट्रीयीकरणाची संकल्पना मांडून देशाच्या आर्थिक विकासाला बळ दिले.

जल व ऊर्जा क्षेत्रातील योगदान अधोरेखित करताना त्यांनी नमूद केले की, बाबासाहेबांच्या दूरदृष्टीतून Central Water Commission यांसारख्या संस्थांची पायाभरणी झाली. दामोदर व हिराकूड यांसारख्या जलविद्युत प्रकल्पांमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून, १९४८ साली केंद्रीय विद्युत प्राधिकरण स्थापनेच्या माध्यमातून देशाच्या ‘राष्ट्रीय विद्युत ग्रिड’चा पाया रचला गेला.

शेतकरी आणि कामगार वर्गासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या लढ्याचाही त्यांनी उल्लेख केला. १९३८ मध्ये खोतीप्रथेविरोधात २० हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढून अन्यायकारक प्रथा संपवण्याचा मार्ग मोकळा केला. पुढे जमीनदारी नष्ट करून “कसेल त्याची जमीन” ही संकल्पना रुजली. कुळ कायदा, कृषी उत्पन्न बाजार समित्या, तसेच Fertilizer Corporation of India सारख्या संस्थांमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला.
कामगार हक्कांसाठी बाबासाहेबांनी केलेल्या कार्यावर बोलताना घोरपडे म्हणाले की, १२ व १३ फेब्रुवारी १९३८ रोजी मनमाड येथे २०,००० रेल्वे कामगारांची परिषद भरवून त्यांनी कामगारांच्या प्रश्नांना आवाज दिला. कामगार मंत्री म्हणून त्यांनी ८ तासांचा कामाचा दिवस, महागाई भत्ता, पगारी सुट्टी, अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई आणि कामगार संघटनांना मान्यता असे ऐतिहासिक निर्णय घेतले.
यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील लाहोर येथील जातपात तोडक मंडळाच्या प्रसंगाचा उल्लेख करत Annihilation of Caste या क्रांतिकारी ग्रंथाच्या निर्मितीची पार्श्वभूमी उलगडून सांगितली.
यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आयु. रवींद्र मठपती सर म्हणाले की, समतानगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देत त्यांनी त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी समाजातील तत्कालीन जातिव्यवस्था, भेदाभेद आणि मनुवादी मानसिकतेचा परामर्श घेत डॉ. आंबेडकरांनी केलेल्या संघर्षाची माहिती दिली. तसेच त्यांच्या उच्च शिक्षणाच्या प्रवासाचा उल्लेख करत शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी तसेच देशाच्या जडणघडणीमध्ये डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या मोलाच्या योगदानावरही भाष्य केले. आपल्या भाषणात त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्याचा धावता आढावा घेतला आणि भीम जयंती साजरी करताना समाजाने घ्यावयाची जबाबदारी अधोरेखित केली. तसेच पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे, शिक्षणातूनच समाजाची प्रगती शक्य आहे, हा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.

तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर यांनी सर्व उपस्थितांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे या देशाच्या जडणघडणीमध्ये असलेले महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय मोठ्या प्रयत्नांनी समाजाला या टप्प्यावर आणले आहे. त्यांनी उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशाला एकसंध राखण्यामध्ये अलौकिक कार्य केले आहे. त्यामुळे त्याच मार्गावर चालताना आपण सर्वांनी बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेचा स्वीकार करून परिवर्तनवादी चळवळ पुढे नेणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी ‘सोनियाची उगवली सकाळ’ व ‘वाट महामानवांची’ ही गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी महासचिव आयु. बाबासाहेब जगताप यांनी महिलांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्यावर मार्गदर्शन केले. त्यांनी हिंदू कोड बिल संसदेत मांडण्यामागील भूमिका, त्यावरील विरोध आणि महिलांना समान हक्क व न्याय मिळावा यासाठी त्यांनी दिलेला केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा यावर प्रकाश टाकला. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय संविधान निर्मितीत घेतलेले कष्ट आणि समतामूलक संविधानाची भूमिका स्पष्ट केली. तसेच त्यांनी समतावादी व विज्ञाननिष्ठ बौद्ध धम्म स्वीकारून अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढींपासून दूर राहण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी ‘आले रे गेले किती’ हे भीमगीत सादर केले.

कार्यक्रमास जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र मठपती सर, शिक्षिका मोनाली वारे मॅडम तसेच अंगणवाडी सेविका काळोखे मॅडम विद्यार्थ्यांसह उपस्थित होत्या. तसेच न्यू पंचशील तरुण मंडळाचे कार्यकर्ते, उपासक-उपासिका तसेच बालक-बालिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत आयुनी अश्विनी मोरे यांनी ‘काळीज होतं रमाचं’ व ‘लेक सुभेदारचा’ ही गीते सादर केली. शाळेच्या विद्यार्थिनींनी ‘भीमाची लेक मी’ व ‘भीम सूर्य क्रांतीचा’ या गीतांवर उत्कृष्ट गायन केले. तसेच मोनाली वारे मॅडम यांनी ‘हीच आमुची प्रार्थना’ हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी भीमकन्या कु. समिधा घोरपडे हिने डॉ. आंबेडकरांना समर्पित कविता सादर केली. निलाक्षी जगताप व तनिष्का जगताप या भगिनींनी प्रेरणादायी विचार व काव्य सादर करून उपस्थितांना भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच प्रशिक मोरे, आरोही व ईश्वरी लोंढे यांनी भीमगीते सादर केली.

मोनाली वारे मॅडम म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी आणि देशासाठी मोठे योगदान दिले आहे; परंतु विशेषतः महिलांसाठी त्यांनी केलेले कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. “आज आम्ही ज्या स्थानावर उभ्या आहोत, ते केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच शक्य झाले आहे. त्यामुळे आम्ही सर्व महिला त्यांच्या ऋणी आहोत,” असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमात बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करत समता, बंधुता आणि न्याय यांचा संदेश देण्यात आला. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांगोबा माळ (समतानगर) शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला. अंगणवाडीच्या सेविका मदतनीस व विद्यार्थीही या जयंती महोत्सवात सहभागी झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे यांनी केले. यावेळी शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थित सर्व उपासक-उपासिका, बालक-बालिका व ग्रामस्थांना जिलेबी व फरसाणाचे वाटप करण्यात आले. यावेळी समता नगर येथील उपासक उपासिका यांनी दर महिन्याच्या 14 तारखेला महामानवांच्या विचारांचे मंथन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले.

फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; रामराजे नाईक निंबाळकर यांचा समतेचा संदेश

0
फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; रामराजे नाईक निंबाळकर यांचा समतेचा संदेश

फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; रामराजे नाईक निंबाळकर यांचा समतेचा संदेश


फलटण  – १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फलटण शहरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
या निमित्ताने महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांना सामाजिक समतेचा आणि एकतेचा संदेश दिला आहे.
रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या संदेशात सांगितले की, “समतेचा विचार हा विकासाचा खरा पाया आहे. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा..!’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा क्रांतीमंत्र आपल्या सर्वांसाठी आजही तितकाच महत्त्वाचा आहे. समाजाच्या सर्व घटकांनी एकत्र येणे ही आजची गरज आहे.”
तसेच त्यांनी पुढे नमूद केले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, फलटण यांच्या स्तुत्य उपक्रमास सहकार्य करताना मला अभिमान आणि आनंद वाटतो. बहुजन समाजाची प्रगती ही केवळ एका व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण राष्ट्राच्या विकासाची पायाभरणी आहे.”
शिक्षण आणि संयम हीच खरी शक्ती असल्याचे अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, समाजात समता आणि न्यायाचा विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
“हा उत्सव केवळ आनंद साजरा करण्यापुरता मर्यादित नसून, तो विचार जागृतीचा आणि सामाजिक परिवर्तनाचा सोहळा आहे. चला, आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रगत आणि समतावादी समाज उभारण्याचा संकल्प करूया,” असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटणमध्ये विविध कार्यक्रम

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटणमध्ये विविध कार्यक्रम

फलटण :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या अभिवादन प्रसंगी डॉ. बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस उजाळा देण्यात आला.
या कार्यक्रमात सातारा जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या सामाजिक समतेचा, शिक्षणाचा आणि प्रगतीचा महान विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच भारतीय संविधानातील मूल्यांची जपणूक करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमामध्ये विविध मान्यवर, नागरिक आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

0
फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी


फलटण: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. यानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण व विनम्र अभिवादन करण्यात आले.
फलटण नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते महामानवाला आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देत त्यांनी दिलेल्या सामाजिक समता, शिक्षण आणि प्रगतीच्या विचारांना पुढे नेण्याचा तसेच संविधानातील मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या अभिवादन कार्यक्रमासाठी विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये बांधकाम सभापती सोमशेठ जाधव, भाजपा नेते जयकुमार शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक सुदाम (अप्पा) मांढरे, नगरसेवक रोहित नागटिळे, नियोजन समिती सभापती संदीप चोरमले, नगरसेवक अशोकराव जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते दत्तराज व्हटकर व अमोल सस्ते यांचा समावेश होता.
या सर्व मान्यवरांसह शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले.