Monday, July 6, 2026
Home Blog Page 127

आई हा केवळ शब्द नाही, ती संपूर्ण जीवनाची भावना आहे” – महेंद्र गायकवाड

0
आई हा केवळ शब्द नाही, ती संपूर्ण जीवनाची भावना आहे” – महेंद्र गायकवाड

“आई हा केवळ शब्द नाही, ती संपूर्ण जीवनाची भावना आहे” – महेंद्र गायकवाड
फलटण : “आई हा केवळ शब्द नाही, ती संपूर्ण जीवनाची भावना आहे,” असे भावनिक प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा, बारामती शाखेचे संस्कार सचिव महेंद्र गायकवाड (मामा) यांनी केले. ते कालकथित पुष्पावती सर्जेराव भालेराव यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी आपल्या बहिणीच्या आठवणीत ते अतिशय भावुक झाले. त्यांनी कवी फ. मु. शिंदे यांच्या ‘आई’ या कवितेतील ओळी उद्धृत करत सांगितले की – “आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. म्हणजेच जिथे आई असते, तिथे जीवन, हालचाल, ऊब आणि संवाद असतो.
आई नसलेलं घर म्हणजे ओसाड वाडा. पण जिथे आई असते, तिथे प्रत्येक कोपऱ्यात हसू, काळजी, प्रेम आणि आपलेपणा भरलेला असतो.”गायकवाड म्हणाले, “त्या उक्तीप्रमाणे माझी बहीण संपूर्ण आयुष्य जगली. अपार कष्ट, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर तिनं आपल्या मुलांना घडवलं. तिच्या जाण्याने कुटुंबाची आणि समाजाची प्रचंड हानी झाली आहे.”

श्रद्धांजली आणि आदरांजलीचा अर्थ –
कार्यक्रमात भंते काश्यप जी यांनी श्रद्धांजली आणि आदरांजलीचा अर्थ स्पष्ट करताना सांगितले की –“श्रद्धांजली म्हणजे आपल्यातून निघून गेलेल्या व्यक्तीप्रति मनःपूर्वक आदर, कृतज्ञता आणि प्रेमभाव व्यक्त करून त्याला श्रद्धेने वंदन करणे.तर आदरांजली म्हणजे त्या व्यक्तीला सन्मानाने प्रणाम करून त्याच्या कार्याला नतमस्तक होणे. जर आदराने वंदन करायचे असेल तर ती ‘आदरांजली’ आणि श्रद्धेने वंदन करायचे असेल तर ती ‘श्रद्धांजली’ होय.परंतु ही श्रद्धा आणि हा आदर केवळ शब्दांत नसावा, तर तो कृतीत आणि जीवनमूल्यांमध्ये दिसायला हवा,” असे ते म्हणाले. कार्यक्रमात उपस्थित सर्व वक्त्यांनी समाजाला दिशा देणाऱ्या मातांना वंदन केले. कर्मयोगी संत गाडगेबाबा, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, तसेच जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या महामाया माता गौतमी या मातांना नमन करून त्यांच्या कार्याची उजळणी करण्यात आली. या मातृशक्तीच्या परंपरेत कालकथित पुष्पावती सर्जेराव भालेराव यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आणि उपस्थितांनी त्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली अर्पण केली. “आई म्हणजे त्याग, समर्पण आणि प्रेरणा” पतीच्या निधनानंतरही पुष्पावती भालेराव यांनी अपार जिद्दीने आपल्या तीन मुलांना महावीर भालेराव (भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका अध्यक्ष), सतीश भालेराव (अण्णा) – साहित्यिक, विचारवंत, आणि भगिनी पंचशिला साबळे(आक्का)यांना शिक्षण, संस्कार आणि माणुसकीचे मूल्य दिले.“आई म्हणजे त्याग, प्रेम आणि प्रेरणेचं मूर्तिमंत उदाहरण आहे,” असे मत उपस्थित मान्यवरांनी एकमुखाने व्यक्त केले.

या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार विभाग उपाध्यक्ष बजरंग गायकवाड सर यांनी वृद्ध आई-वडिलांप्रती कर्तव्यभाव व्यक्त करून भालेराव कुटुंबाच्या सामाजिक, धार्मिक योगदानविषयी मांडणी केली. आईच्या स्वभावातील वैशिष्ट्य आणि समाजाप्रती कुटुंबाप्रती असणारी समर्पित भावना यावर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ज्ञान, ज्ञानातून श्रद्धा, श्रद्धेतून धम्माचरण आणि धम्म आचरणातून दुःखमुक्तीकडे वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी केले.

ठाणे जिल्ह्याच्या संस्कार सचिव आणि राज्य संघटक आयुनि अविंदा वाघमारे मॅडम यांनी पुष्पावती भालेराव यांच्या कार्याची तुलना फुले–शाहू–आंबेडकर विचारधारेतील मातांच्या आदर्शाशी केली. खटाव तालुक्याचे केंद्रिय शिक्षक आयु. सुनील कदम यांनी कुटुंबाने पारंपारिक कर्मकांडाऐवजी धम्मसंस्कार विधी केल्याबद्दल प्रशंसा केली.
समता सैनिक दलाचे माजी पदाधिकारी आयु. लक्ष्मण निकाळजे यांनी जुन्या आठवणी उजळवत कुटुंबाच्या समाजोपयोगी कार्याचा उल्लेख केला.

गीत आणि कवितांमधून श्रद्धांजली – कार्यक्रमात “आई माझी मायेचा सागर” हे गीत बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते यांनी सादर केले.कवी फ. मु. शिंदे यांची ‘आई’ कविता महेंद्र गायकवाड यांनी सादर केली.तसेच “हंबरून वासराले चाटती जवा गाय” हे गीत फलटण तालुका महासचिव बाबासाहेब जगताप यांनी सादर करून उपस्थितांना भावूक केले.

या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय, राज्य, जिल्हा आणि तालुका पदाधिकारी, कुटुंबातील बंधू सतीश सर्जेराव भालेराव, भगिनी पंचशिला साबळे (आक्का), समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले, आयुनि अर्चना चव्हाण, आयुनि सोनल खरात, आयु. विठ्ठल निकाळजे, आयु. संपत भोसले, आयु. केशव ठोंबरे, आयु. सतीश कांबळे, संघटक विजयकुमार जगताप, आनंद जगताप, स्वप्नील गायकवाड, ऍड.चंद्रशेअर मोरे, बौद्धाचार्य संजय प्रल्हाद घोरपडे,जेष्ठ समाजसेविका कांताताई काकडे, लोक कलावंत लक्ष्मण निकाळजे, वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकारी चित्राताई गायकवाड, माजी तालुका अध्यक्ष शंकर कांबळे, तसेच नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंतिम आदरांजली कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी एक मिनिट मौन पाळून कालकथित पुष्पावती सर्जेराव भालेराव यांच्या प्रति मनःपूर्वक श्रद्धांजली आणि आदरांजली अर्पण केली.

गुंतवणुकीचं अमिष, कोट्यवधींचा गंडा – ‘ब्लॉक ऑरा’ प्रकरणातील फसवणूक उघड

0
गुंतवणुकीचं अमिष, कोट्यवधींचा गंडा – ‘ब्लॉक ऑरा’ प्रकरणातील फसवणूक उघड

बारामती : बारामती शहरात दीड वर्षात तीनपट परतावा देण्याचं आमिष दाखवत ‘ब्लॉक ऑरा’ नावाच्या कंपनीने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. अनेक गुंतवणूकदारांनी या कंपनीवर विश्वास ठेवून लाखो रुपये गुंतवले, पण नंतर मात्र फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.

गुंतवणूकदार एस. ए. काझी यांनी २०२२ मध्ये एमआयडीसी भागात नंदन पवार या व्यक्तीमार्फत ‘ब्लॉक ऑरा’ कंपनीची माहिती घेतली. “दीड वर्षात तीनपट परतावा” मिळेल, असे सांगत त्यांना रॉयल इन हॉटेलमध्ये आयोजित सेमिनारसाठी बोलावण्यात आलं. या सेमिनारमध्ये रियाज पटेल, फिरोज मुलतानी, नितीन जगतीयानी यांनी स्वत:ला संचालक म्हणून ओळख देत मोठा परतावा कसा मिळेल हे समजावून सांगितले.

याच वेळी स्थानिक प्रतिनिधी म्हणून विजयकुमार गायकवाड, नंदकुमार दुधे, प्रणव दुधे, अनिल जगताप, राजेंद्र कुंभार आणि नंदन पवार यांची ओळख करून देण्यात आली. गुंतवणुकीसाठी या लोकांशी संपर्क ठेवावा असे सुचवले गेले.

काझी यांनी पैसे गुंतवल्यानंतर वेबसाईटवर सुरुवातीला रक्कम वाढताना दिसली. मात्र काही महिन्यांनंतर अधिक पैसे गुंतवण्याचा आग्रह सुरु झाला. दुसरा युजर-आयडी काढा, पुन्हा गुंतवा अशी मागणी झाली. यानंतर वेबसाईटच अचानक बंद पडली. सुरूवातीला तांत्रिक अडचणी सांगण्यात आल्या, पण नंतर संपर्कच तुटला.

फसवणूक लक्षात आल्यानंतर काझी यांनी बारामती शहर आणि तालुका पोलिस ठाण्यात तक्रार केली, मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. अप्पर पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही दोन वर्षांपासून न्याय मिळालेला नाही.

या प्रकारामुळे फसवणूक करणाऱ्यांना खुलेआम वावरण्याची मुभा मिळाली असून, पोलिस यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये तीव्र नाराजी आहे.

राज्यातील राजकीय रंगत पुन्हा वाढणार! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू – आरक्षण सोडतीत धक्कादायक निर्णय

0
राज्यातील राजकीय रंगत पुन्हा वाढणार! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू – आरक्षण सोडतीत धक्कादायक निर्णय

बारामती :- राज्यात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज नगरपरिषद व नगरपंचायत नगराध्यक्ष पदांसाठी आरक्षण सोडत घेण्यात आली. यामध्ये अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले.

विशेषतः बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी यंदा सर्वसाधारण प्रवर्गातील पुरुषांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. बारामतीत २०१६ नंतर तब्बल ९ वर्षांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता येथील राजकारणात नवा रंग चढण्याची शक्यता आहे. प्रस्थापित नेते आणि नवखे उमेदवार यांच्यात चुरस तीव्र होणार आहे.

दुसरीकडे, नव्याने स्थापन झालेल्या माळेगाव नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक होत असून, येथे नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांच्या योजना बदलण्याची वेळ आली आहे. तथापि, OBC महिलांना या माध्यमातून राजकीय संधी मिळणार आहे, याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जात आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक निवडणुकाही वेग घेत आहेत. परिणामी, अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडून अधिकृत उमेदवारीसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मंडपेश्वर बौद्ध लेणी !

0
मंडपेश्वर बौद्ध लेणी !

मंडपेश्वर बौद्ध लेणी !

संसारिक जीवन त्यागलेल्या व बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी सर्वसंग परित्याग केलेल्या आदरणीय भिक्खूंना राहण्यासाठी व चारी दिशेने धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांना एक संघ दगडातून राहण्यालायक वास्तू निर्माण करण्याचे तंत्र बौद्ध स्थापत्य विशारदांनी विकसित केले होते. त्यालाच आपण “लेणी” असं संबोधीत करतो. आणि अशा अनेक लेण्या महाराष्ट्रात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आपल्याला पाहायला मिळतात, मुळातच लेण्या कोणासाठी होत्या तर सर्व संघपरित्याग केलेल्या व ज्यांचे संसारिक जीवन नव्हते अशा आदरणीय काशय वस्त्र परिधान केलेल्या आदरणीय भदतांच्यासाठी होत्या, प्रामुख्याने वर्षा ऋतुच्या काळात राहण्यासाठी हे स्थापत्य निर्माण करण्यात आले होते .
ही गरज त्यांची होती ज्यांचे संसारिक जीवन नव्हते, ज्यांचे घरदार नव्हते, अशा आदरणीय भिखु संघासाठीच निर्माण केले होते, ज्यांचे सांसारिक जीवन होते त्यांना असल्या वास्तूंची गरज नव्हती.

मंडपेश्वर बौद्ध लेणीही त्यापैकीच एक.
इसवी सनाच्या सहाव्या शतकात शास्त्रशुद्ध बौद्ध पद्धतीने निर्माण करण्यात आलेल्या या लेणी समूहाला आज अपभ्रंश झालेल्या नावाने ओळखले जाते, बौद्ध वास्तू कलेतील “मटप” या शब्दाचा अपभ्रंश “मंडप” व पुढे “मंडपेश्वर” असे नामकरण करून ती आपल्या घशात घालण्याचा प्रयत्न अनेक शतकांच्यापासून सुरू आहे.

ही लेणी बौद्ध लेणी आहे हे समजून घेण्यासाठी लेणीवर आज देखील अनेक पुरावे तिथे उपलब्ध आहेत, त्यापैकी काही पुरावे आपण समजून घेऊ.
अगदी साधे असलेले अष्टकोनी स्तंभ पुढे बौद्ध स्थापत्यकला विकसित झाल्यानंतर अलंकृत होत गेले , याचे पुरावे अनेक लेण्यातून उपलब्ध असलेल्या स्तंभातून कळून येतात, ते स्तंभ आपल्याला या लेणीतल्या स्तंभाशी सादरम्य साधताना दिसतात , मंडपेश्वर लेणीवरील उत्कृष्ट कलाकुसर असलेले अलंकृत स्तंभ त्यावर असलेले बौद्ध प्रतीक जी आपल्या मान्यतेचे नव्हते म्हणून अलंकृत असलेले स्तंभ पूर्णपणे सोलून काढले, पायरीच्या दोन्हीही बाजूस असलेले सिहं भग्न कारण्यात आले व त्यापैकीच एक भग्न सिहं आज उचलून बाहेरून आणून ठेवलेल्या नंदिच्या जवळ ठेवण्यात आला आहे.
मंडपेश्वर लेणीच्या पायरीच्या जवळ असलेली तसेच आतील भागात असलेली “चंद्रशीला” ही पुरेशी आहे हे समजण्यासाठी की ही लेणी बौद्ध लेणी आहे.

उपोरक्त पुराव्यांच्या व्यतिरिक्त असे अनेक पुरावे आजही लेणीच्या अंगाखाद्यावर आहेत जे हे सिद्ध करतात की मंडपेश्वर ही बौद्ध लेणी आहे.

१९ व्या शतकातील फोटोतून मंडपेश्वर लेणीवर आपल्याला ना तिथे शिवलिंग दिसत ना बाहेरील बाजूस असलेला नंदी दिसत, हे दोन्ही नंतरच्या काळात बाहेरून आणून ठेवले गेले आहेत, तसेच आतील भिंतीवर कसे कसे ओबडधोबड एक आकृती काढली गेली आहे.
ही लेणी इंग्रजी राजवटीत प्रार्थना गृह (Chapel) म्हणून वापरण्यात येत होती, त्याचे पुरावे देखील डाव्या बाजूच्या भिंतीत दिसून येतात

सूरज रतन जगताप, (लेणी अभ्यासक )

फलटणमध्ये पुन्हा एकदा राजकारण तापणार! नगराध्यक्ष पदासाठी नाईक-निंबाळकर घराण्यात थेट लढत होण्याची शक्यता

0
फलटणमध्ये पुन्हा एकदा राजकारण तापणार! नगराध्यक्ष पदासाठी नाईक-निंबाळकर घराण्यात थेट लढत होण्याची शक्यता

फलटण :- फलटण नगरपालिकेच्या निवडणुका अखेर पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया असल्यामुळे, या पदाचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे, फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी यंदा ‘खुले’ आरक्षण जाहीर झाले असून, त्यामुळे या पदासाठी स्थानिक राजकारणात दबदबा असलेल्या नाईक निंबाळकर घराण्यातीलच दोन दिग्गजांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राजे गटाकडून माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचे नाव चर्चेत असून, ते विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र आहेत. दुसरीकडे, खासदार गटाकडून माजी नगरसेवक समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव चर्चिले जात असून, ते माजी खासदार स्वर्गीय हिंदूराव नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र आणि सध्या भाजप खासदार असलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मोठे बंधू आहेत.

दोन्ही नेत्यांना नगरपालिका प्रशासनाचा भरपूर अनुभव असून, आगामी पाच वर्षांच्या दृष्टीने जनतेतून “अनुभवी नेतृत्वालाच संधी मिळावी” अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

आरक्षण जाहीर होताच शहरात आणि सोशल मीडियावर फक्त या दोन नावांचीच जोरदार चर्चा सुरु झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये चळवळ सुरू झाली असून, उमेदवारीची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

              संभाव्य थेट लढत:

  • 🔹 अनिकेतराजे नाईक निंबाळकर (राजे गट)
  • 🔹 समशेरसिंह नाईक निंबाळकर (खासदार गट)

फलटण नगराध्यक्षपद ‘सर्वसाधारण खुला’; निवडणूक चुरशीची होणार!

0
फलटण नगराध्यक्षपद ‘सर्वसाधारण खुला’; निवडणूक चुरशीची होणार!

फलटण (06 ऑक्टोबर 2025): मुंबईतील मंत्रालयात आज पार पडलेल्या आरक्षण सोडतीत फलटण नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी ‘सर्वसाधारण खुला’ प्रवर्ग जाहीर करण्यात आला. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत पार पडली. या निर्णयामुळे आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची आणि हायप्रोफाईल होणार, असा राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे.

नगराध्यक्षपद खुले झाल्याने अनेक मातब्बर नेते आणि इच्छुक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये राजे गटाकडून युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. तर भाजपा-महायुतीकडून समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि दिलीपसिंह भोसले ही नावे चर्चेत आहेत. सर्वसाधारण प्रवर्ग असल्यामुळे कोणत्याही बळकट महिला उमेदवारालाही संधी मिळू शकते.

🔸 राज्यातील २२६ नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर

आज पार पडलेल्या आरक्षण सोडतीमध्ये राज्यातील एकूण २२६ नगरपरिषद व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. अनुसूचित जाती महिला, इतर मागासवर्गीय (ओबीसी), आणि सर्वसाधारण महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर अध्यक्षपदे आरक्षित करण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे, एकूण ५०% जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

या आरक्षण प्रक्रियेमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना गती मिळणार असून, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

फलटण नगराध्यक्षपद ‘सर्वसाधारण खुला’ • स्पर्धा वाढणार अनिकेतराजे, समशेरसिंह, दिलीपसिंह यांची नावे चर्चेत राज्यातील ५०% अध्यक्षपदे महिलांसाठी आरक्षित २२६ नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या निवडणुकीस मार्ग मोकळा

मनोमिलन नाट्यावर रणजितसिंहांचा पडदा! ‘ज्यांनी शेतकऱ्यांना अडवले, त्यांच्यासोबत स्वप्नातही बसणार नाही’

0
मनोमिलन नाट्यावर रणजितसिंहांचा पडदा! ‘ज्यांनी शेतकऱ्यांना अडवले, त्यांच्यासोबत स्वप्नातही बसणार नाही’

फलटण :- फलटण तालुक्यात गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या मनोमिलन नाट्यावर अखेर माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट भूमिका घेऊन पडदा टाकला आहे. “ज्यांनी शेतकऱ्यांना अडवले, तालुक्याला मागे नेले, त्यांच्यासोबत स्वप्नातही बसणार नाही,” असा स्पष्ट शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

राजाळे येथे रविवारी झालेल्या सभेत बोलताना, रणजितसिंह म्हणाले, “जनतेने तीस वर्षांची सत्ता नाकारून आम्हाला संधी दिली आहे. ज्यांनी तालुक्याचा विकास थांबवला, त्यांच्यासोबत मनोमिलन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”

‘मनोमिलन’वर कार्यकर्त्यांचा स्पष्ट नकार

सभेत त्यांनी कार्यकर्त्यांना थेट विचारले, “मनोमिलन करायचं का?” यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमुखाने “नाही!” असा नारा दिला. यावरून तालुक्यातील जनतेचा सूर स्पष्टपणे रणजितसिंह यांच्या भूमिकेच्या पाठीशी असल्याचे दिसले.

‘सन्मान ठेवला, पण दुजोरा नाही’

रामराजे नाईक-निंबाळकर आणि रणजितसिंह यांच्यात झालेल्या भेटींविषयी विचारता, “विरोधक म्हणून त्यांनी काही काम सांगितले तर सन्मान ठेवायचा असतो,” असे म्हणत रणजितसिंह यांनी भेटींचे खंडन केले नाही, मात्र मनोमिलनाला दुजोरा देखील दिला नाही.

रामराजेंनी चेंडू टाकला होता…

यापूर्वी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी, “मनोमिलन दोन मनांचे असते. फलटणच्या विकासासाठी असेल तर मनोमिलन होईल,” असे वक्तव्य केले होते. मात्र रविवारी रणजितसिंह यांनी शांत पण ठाम शब्दांत “मनोमिलन सध्या तरी नाही,” असे जाहीर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

थोडक्यात:

  • रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी विरोधकांबरोबर मनोमिलनाला नकार दिला
  • कार्यकर्त्यांचा एकमुखाने विरोध
  • वीस दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम

चार्जरमुळे झाला भारतातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याबाबतचा खळबळजनक खुलासा! पहलगाम हल्ल्यातील भक्कम पुरावा

0
चार्जरमुळे झाला भारतातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याबाबतचा खळबळजनक खुलासा! पहलगाम हल्ल्यातील भक्कम पुरावा


Pahalgam Terrorist Attack : जम्मू आणि काश्मीकच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला होता. या हल्ल्यामध्ये सहभागी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आरोपींचा कसून शोध घेण्यात आला. यादरम्यान एक सामान्य दिसणारे फोनचे चार्जर अत्यंत महत्त्वाचा पुरवा ठरले आहे. या चार्जरमुळे जम्मू आणि काश्मीर पोलिसांना 22 एप्रिल 2025 मध्ये पहलगाम हल्ल्यामागे असलेल्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या एका ‘ओव्हरग्राउंड वर्कर’ (OGW) चा माग काढण्यास मदत झाल्याची बाब समोर आली आहे.

Add Zee News as a Preferred Source

मोहम्मद युसूफ कटारी (वय २६) याला सप्टेंबर महिन्यात अटक करण्यात आली होती. याने पहलगाममधील तीन दहशतवादी – सुलेमान उर्फ आसिफ, जिब्रान आणि हमजा अफगाणी यांना श्रीनगरजवळील झबरवान हिल्स येथे किमान चार वेळा भेटल्याचे समोर आले आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दहशतवाद्यांना महत्त्वपूर्ण लॉजिस्टीक समोर्ट, ज्यामध्ये एक स्मार्टफोन चार्जर दिले होते आणि अखेरीस त्या चार्जरमुळेच त्याला अटक करण्यात आली, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

प्रकरणाचा उलगडा कसा झाला?
ऑपरेशन महादेव मध्ये सापडलेल्या पुराव्यांचे सखोल फॉरेन्सिक अॅनालिसीस केल्यानंतर या प्रकरणात मोठ खुलासा झाला. जुलै महिन्यात श्रीनगरच्या झब्रावन रेंजच्या जवळ ऑपरेशन महादेव ही दहशतवादविरोधी शोध मोहिम राबवण्यात आळी होती. या मोहिमेत पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. या ऑपरेशनदरम्यान मिळालेल्या साहित्याची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी महत्वाची माहिती मिळाली होती. मिळालेल्या साहित्यामध्ये अर्धवट नष्ट झालेले अँड्रॉइड फोनचे चार्जर मिळाले होते. ते कोणीचे होते याचा माग काढण्यात आल्यानंतर पोलिस आरोपीपर्यंत पोहचले.

श्रीनगर पोलिसांनी या चार्जरचा मूळ मालक कोण होता ते शोधून काढले, ज्याने पुष्टी केली की त्याने फोन एका डिलरला विकला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला आणि काही काळात पोलिस कटारी पर्यंत पोहचले. अधिकाऱ्यांनी सांगितले की , कटारी हा केवळ एक पॅसिव्ह असोशिएट (passive associate) नव्हता, तर त्याचे काम त्याहूनही बरेच जास्त होते. त्याने या दहशतवाद्यांना डोंगराळ प्रदेशातून रस्ता दाखवण्याचे केले. तसेच, लपून बसलेले असताना त्यांना संपर्कात राहता यावे आणि आपले काम सुरू ठेवता यावे यासाठी लॉजिस्टिक पुरवठा केला, ज्यामध्ये या चार्जरचा देखील समावेश होता. कटारी हा डोंगराळ भागातील भटक्या समुदायातील मुलांना शिकवण्याचे काम करायाचा आणि दहशतवादी संघटनांसाठी तो महत्त्वाचा दुवा होता.

तपासात पुढे काय होणार?

सूत्रांच्या मते, हे प्रकरण लवकरच राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NAI) सोपवले जाऊ शकते. एनआयए पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागील व्यापक कटाची चौकशी करत आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय आणि इतर मदत केल्याच्या आरोपाखाली एनआयएने आधीच इतर दोघांना अटक केली आहे.
29 जुलै 2025 रोजी ऑपरेशन महादेव अंतर्गत करण्या आलेल्या कारवाईत दहशतवादी सुलेमान उर्फ ​​आसिफ , जिब्रान आणि हमजा अफगाणी यांना ठार मारण्यात आले.

 





Source link

रामराजे निंबाळकर आणि रणजितसिंह निंबाळकरांचं मनोमिलन होणार? रामराजेंच्या वक्तव्यानं चर्चाना उधाण

0



Ramraje Naik Nimbalkar : मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही. विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल. राजकारण करायचं असेल तर विचार करावा लागेल असे मत माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मात्र अलीकडच्या काळात दोघांच्याही मनोमिलनाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या मनोमिलनाच्या चर्चेवर प्रथमच रामराजेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

वरिष्ठांनी सांगितलं तर होईल, नाहीतर हे मनोमिलन होणार नाही

मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही. विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल. राजकारण करायचं असेल तर विचार करावा लागेल असे मत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. वरिष्ठांनी सांगितलं तर होईल. नाहीतर हे मनोमिलन होणार नाही. हा निर्णय लोकांच्या हातात आहे लोक ठरवतील, अशी प्रतिक्रिया देऊन रामराजे यांनी मनोमिलनाचा चेंडू रणजीत नाईक निंबाळकर यांच्याकडे ढकलला आहे. यामुळे रणजीत नाईक निंबाळकर यावर काय बोलतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

रणजितसिंह नाईक निंबाळकर मोडेल, वाकेल ते फक्त शेतकऱ्यांसाठी

फलटण येथे निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मनोमिलनाच्या वक्तव्याच्या चर्चेला पूर्णविराम लावला. तालुक्याच्या विकासासाठी रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण यांचा देखील सल्ला घेण्यात येईल पण राजकारण म्हणजे व्यवसाय नाही. मला कुणाला भेटायचे तर दहा वेळा चर्चेची दारे उघडी करू, पण ज्यांनी शेतकऱ्याला लाटण्याचा प्रयत्न केला अशा माणसांसोबत रणजीतसिंह नाईक निंबाळकर स्वप्नात सुद्धा बसणार नाहीत. रणजितसिंह नाईक निंबाळकर मोडेल, वाकेल ते फक्त शेतकऱ्यांसाठी, जहागीरदारांसाठी नाही असे निंबाळकर म्हणाले. तालुक्याला कर्तबदार आमदार मिळाला आहे त्यांच्या माध्यमातून विकास चालू आहे. त्यामुळे अशा अफवांना बळी पडू नका असेही ते म्हणाले.

विकासासाठी सल्ला घेऊ, आपल्याला बदला नको

विकासासाठी सल्ला घेऊ, आपल्याला बदला नकोय बदलाव तालुक्यात करायचा आहे.  त्यामुळं शेतकऱ्याला नडणाऱ्या लोकांसोबत दोस्ती करायची नाही, अनैसर्गिक युती किंवा अनैसर्गिक मनोमिलन या तालुक्यांमध्ये होणार नाही असे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगत मनोमिलनाच्या चर्चेला पूर्णविराम लावला आहे.

आणखी वाचा



Source link

फलटणसह राज्यभरात नगरसेवक पदांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

0
फलटणसह राज्यभरात नगरसेवक पदांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

फलटण :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. फलटण नगरपरिषदेसह महाराष्ट्रातील २४७ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींसाठी नगरसेवक पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी ३ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात आदेश जारी केला असून, याअंतर्गत नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर सदस्य पदांची (नगरसेवक) आरक्षण प्रक्रिया सुरू होत आहे.

असा असेल आरक्षण सोडतीचा संपूर्ण कार्यक्रम:

८ ऑक्टोबर २०२५ – जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिलांसाठी आरक्षणाची सोडत काढली जाईल.
९ ऑक्टोबर २०२५ – प्रारूप आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध. ९ ते १४ ऑक्टोबर – नागरिकांकडून हरकती व सूचना दाखल करता येतील. २४ ऑक्टोबर – विभागीय आयुक्त अंतिम निर्णय घेतील.
२८ ऑक्टोबर – अंतिम आरक्षणाची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल.

या आरक्षण प्रक्रियेवर अनेक इच्छुक उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. विशेषतः फलटण नगरपरिषदेसाठी प्रभाग आरक्षण काय निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.