
मंडपेश्वर बौद्ध लेणी !
संसारिक जीवन त्यागलेल्या व बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी सर्वसंग परित्याग केलेल्या आदरणीय भिक्खूंना राहण्यासाठी व चारी दिशेने धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांना एक संघ दगडातून राहण्यालायक वास्तू निर्माण करण्याचे तंत्र बौद्ध स्थापत्य विशारदांनी विकसित केले होते. त्यालाच आपण “लेणी” असं संबोधीत करतो. आणि अशा अनेक लेण्या महाराष्ट्रात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आपल्याला पाहायला मिळतात, मुळातच लेण्या कोणासाठी होत्या तर सर्व संघपरित्याग केलेल्या व ज्यांचे संसारिक जीवन नव्हते अशा आदरणीय काशय वस्त्र परिधान केलेल्या आदरणीय भदतांच्यासाठी होत्या, प्रामुख्याने वर्षा ऋतुच्या काळात राहण्यासाठी हे स्थापत्य निर्माण करण्यात आले होते .
ही गरज त्यांची होती ज्यांचे संसारिक जीवन नव्हते, ज्यांचे घरदार नव्हते, अशा आदरणीय भिखु संघासाठीच निर्माण केले होते, ज्यांचे सांसारिक जीवन होते त्यांना असल्या वास्तूंची गरज नव्हती.
मंडपेश्वर बौद्ध लेणीही त्यापैकीच एक.
इसवी सनाच्या सहाव्या शतकात शास्त्रशुद्ध बौद्ध पद्धतीने निर्माण करण्यात आलेल्या या लेणी समूहाला आज अपभ्रंश झालेल्या नावाने ओळखले जाते, बौद्ध वास्तू कलेतील “मटप” या शब्दाचा अपभ्रंश “मंडप” व पुढे “मंडपेश्वर” असे नामकरण करून ती आपल्या घशात घालण्याचा प्रयत्न अनेक शतकांच्यापासून सुरू आहे.
ही लेणी बौद्ध लेणी आहे हे समजून घेण्यासाठी लेणीवर आज देखील अनेक पुरावे तिथे उपलब्ध आहेत, त्यापैकी काही पुरावे आपण समजून घेऊ.
अगदी साधे असलेले अष्टकोनी स्तंभ पुढे बौद्ध स्थापत्यकला विकसित झाल्यानंतर अलंकृत होत गेले , याचे पुरावे अनेक लेण्यातून उपलब्ध असलेल्या स्तंभातून कळून येतात, ते स्तंभ आपल्याला या लेणीतल्या स्तंभाशी सादरम्य साधताना दिसतात , मंडपेश्वर लेणीवरील उत्कृष्ट कलाकुसर असलेले अलंकृत स्तंभ त्यावर असलेले बौद्ध प्रतीक जी आपल्या मान्यतेचे नव्हते म्हणून अलंकृत असलेले स्तंभ पूर्णपणे सोलून काढले, पायरीच्या दोन्हीही बाजूस असलेले सिहं भग्न कारण्यात आले व त्यापैकीच एक भग्न सिहं आज उचलून बाहेरून आणून ठेवलेल्या नंदिच्या जवळ ठेवण्यात आला आहे.
मंडपेश्वर लेणीच्या पायरीच्या जवळ असलेली तसेच आतील भागात असलेली “चंद्रशीला” ही पुरेशी आहे हे समजण्यासाठी की ही लेणी बौद्ध लेणी आहे.
उपोरक्त पुराव्यांच्या व्यतिरिक्त असे अनेक पुरावे आजही लेणीच्या अंगाखाद्यावर आहेत जे हे सिद्ध करतात की मंडपेश्वर ही बौद्ध लेणी आहे.
१९ व्या शतकातील फोटोतून मंडपेश्वर लेणीवर आपल्याला ना तिथे शिवलिंग दिसत ना बाहेरील बाजूस असलेला नंदी दिसत, हे दोन्ही नंतरच्या काळात बाहेरून आणून ठेवले गेले आहेत, तसेच आतील भिंतीवर कसे कसे ओबडधोबड एक आकृती काढली गेली आहे.
ही लेणी इंग्रजी राजवटीत प्रार्थना गृह (Chapel) म्हणून वापरण्यात येत होती, त्याचे पुरावे देखील डाव्या बाजूच्या भिंतीत दिसून येतात
सूरज रतन जगताप, (लेणी अभ्यासक )






