राज्यातील राजकीय रंगत पुन्हा वाढणार! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू – आरक्षण सोडतीत धक्कादायक निर्णय

0
18
राज्यातील राजकीय रंगत पुन्हा वाढणार! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू – आरक्षण सोडतीत धक्कादायक निर्णय

बारामती :- राज्यात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज नगरपरिषद व नगरपंचायत नगराध्यक्ष पदांसाठी आरक्षण सोडत घेण्यात आली. यामध्ये अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले.

विशेषतः बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी यंदा सर्वसाधारण प्रवर्गातील पुरुषांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. बारामतीत २०१६ नंतर तब्बल ९ वर्षांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता येथील राजकारणात नवा रंग चढण्याची शक्यता आहे. प्रस्थापित नेते आणि नवखे उमेदवार यांच्यात चुरस तीव्र होणार आहे.

दुसरीकडे, नव्याने स्थापन झालेल्या माळेगाव नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक होत असून, येथे नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांच्या योजना बदलण्याची वेळ आली आहे. तथापि, OBC महिलांना या माध्यमातून राजकीय संधी मिळणार आहे, याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जात आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक निवडणुकाही वेग घेत आहेत. परिणामी, अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडून अधिकृत उमेदवारीसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.