Monday, July 6, 2026
Home Blog Page 128

आठवड्याच्या बाजारात मुसळधार पावसाची अचानक हजेरी!

0
आठवड्याच्या बाजारात मुसळधार पावसाची अचानक हजेरी!

फलटण :- फलटण शहरात रविवारी दुपारी आलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण बाजारपेठेला अक्षरशः गाठले. आठवडा बाजार भरात असतानाच पावसाने अचानक जोर पकडल्याने विक्रेते आणि ग्राहकांमध्ये मोठी धांदल उडाली.

भाजीपाला, कपडे, किराणा साहित्य विक्रेत्यांना आपापला माल वाचवण्यासाठी धावपळ करावी लागली. काहींना नुकसानही सहन करावं लागलं. शहरातील काही भागांत पाण्याचा निचरा न झाल्याने बाजारपेठ चिखलमय झाली, तर काही ठिकाणी पाण्याचे तळे साचले.

रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला असून वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.

मी म्हणल तेच खरं असं उद्धव ठाकरे वागतात; देसाईंनी सांगितला MVA च्या मुख्यमंत्रीपदाचा किस्सा

0



Shambhuraj Desai : उद्धव ठाकरे हे मी म्हणल तेच खरं असं वागत आहेत. कारण आपल्यातले लोक विचलित होऊन शिंदे यांच्या शिवसेनेत जाऊ नये यासाठी शिवसेनेच्या चिन्हाबाबत ते असे विधान करत आहेत असल्याचे मत मंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवर हे राज्य चालते. पक्षाच्या चिन्हाचे सर्व अधिकार हे घटनेच्या नियमानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत असे देसाई म्हणाले. जाणीवपूर्वक उद्धव ठाकरेंच्या जवळच्या लोकांनीच मुख्यमंत्री पदासाठी त्यावेळी महाविकास आघाडीची स्थापना करायला लावली, असा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. 

ज्या सरकार बरोबर आम्ही लढलो त्यांच्यासोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी सरकार बनवले

शिवसेना पक्षाच्या चिन्हा विरोधात काही लोकांनी न्यायालयात जाण्याचा प्रयत्न केला मात्र न्यायालयाने देखील यामध्ये कोणताही हस्तक्षेप केला नाही. असे असताना मी म्हणल तेच खरं असं उद्धव ठाकरे म्हणत असतील तर ते योग्य नाही असे शंभूराज देसाई म्हणाले. मुख्यमंत्री म्हणून काम केलेले उद्धव ठाकरे हे आपल्यातील काही लोक विचलित होऊन शिंदेंच्या शिवसेनेत येऊ नये म्हणून असे वक्तव्य उद्धव ठाकरे करत आहेत. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळाले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आम्हा सर्व आमदारांकडे बोट दाखवून यांच्यापैकी मला एक मुख्यमंत्री करायचा आहे असं सांगितलं होतं. त्यानंतर स्वतः आठ दिवसात मुख्यमंत्रीपद घेतलं. आता ते जरी म्हणत नसतील माझ्या स्वप्नात मुख्यमंत्री पदाचा विचार नव्हता. मग त्यांनी असं बोलायची गरज नव्हती. ज्या सरकार बरोबर आम्ही लढलो त्यांच्यासोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी सरकार बनवले हा विपर्यास आहे असे देसाई म्हणाले.

निवडणूक एका बाजूला लढवायची आणि मुख्यमंत्रीपद दुसऱ्या सरकारकडून घ्यायचे

निवडणूक एका बाजूला लढवायची आणि मुख्यमंत्रीपद दुसऱ्या सरकारकडून घ्यायचे. जाणीवपूर्वक त्यांच्या जवळच्या लोकांनीच मुख्यमंत्री पदासाठी त्यावेळी महाविकास आघाडीची स्थापना करायला लावली, असा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. दरम्यान, आता शंभूराज देसाई यांच्या या टीकेवर शिवसेना ठाकरे गट काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई

 

आणखी वाचा



Source link

पोर्शे प्रकरणातील अग्रवालांच्या हॉटेलचं सील काढण्यास कोणाचा दबाव; हवालदांरेचं म्हणणं काय?

0



सातारा : पुण्यातील पोर्शे कार (pune porsche car) अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडिल विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर (Satara) कनेक्शन समोर आल्यानंतर खडबडून जागं होत प्रशासनाने त्यांच्या महाबळेश्वर येथील हॉटेलवर कारवाई केली होती. तब्बल 150 कोटीहून अधिक रुपयांची प्रॉपर्टी आणि आठ ते दहा एकरवरील शासकीय मिळकतीमध्ये 30 वर्षाच्या भाडेपट्ट्यानं रहिवास वापराकरता घेतलेल्या जागेमध्ये पंचतारांकित हॉटेल (Hotel) उभारण्यात आलं होतं. येथील MPG club हे हॉटेल सील करत अनधिकृत पद्धतीने केलेलं बांधकाम पाडून या हॉटेलमधला बार देखील प्रशासनाने सील केला होता. मात्र, आता या हॉटेलचं सील काढण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे, तसेच राजकीय दबावातूनच हे सील काढण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर करण्यात आलेल्या कारवाईला जवळपास एक-दीड वर्ष उलटून गेल आहे. मात्र, सातारा जिल्हा प्रशासनान अगदी गुप्त पद्धतीने आदेश काढत हे हॉटेल पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात दिल आहे. शासकीय मिळकतीमध्ये भाडेपट्ट्याने असलेली या अग्रवाल कुटुंबाची जागा पुन्हा शासनाने माघारी घ्यावी, अशी मागणी तेव्हापासून होत होती. सर्व नियम धाब्यावर बसवून प्रशासनाची फसवणूक करत उभारलेल्या या हॉटेलचं सील काढून ते पुन्हा अग्रवाल कुटुंबालाच का देण्यात आलं? याबाबत उलट सुलट चर्चा सध्या सुरू झालेली आहे. मोठा राजकीय दबाव जिल्हा प्रशासनावर आणि जिल्हाधिकारी यांच्यावर होता, असं सुद्धा बोलले जातंय. जर, राजकीय दबाव होता तर कोणत्या नेत्याचा होता हे सुद्धा समोर यावं असं तक्रारदार अभय हवालदार यांचे म्हणणे आहे.

आदेशात नेमकं काय म्हटलंय

मागील काही दिवसांपूर्वी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी या हॉटेलचे सील उघडण्याच्या आदेश दिले आहेत. त्यामध्ये या प्रॉपर्टीमधला वाणिज्य वापर तात्काळ बंद करावा आणि मिळकतीचा वापर केवळ मूळ जिमखाना या प्रयोजनासाठीच करावा असं सुद्धा या आदेशात म्हटल आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला वादींना वापरात बदल करायचा असल्यास त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागांची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे सुद्धा यात म्हटलं आहे. त्यामुळे यामध्ये पुढील काही काळात अग्रवाल कुटुंबाला 30 वर्ष भाडेतत्वावर शासकीय जागेवर वाणिज्य वापर करता येईल की काय याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष?

दरम्यान, सातारा जिल्हा प्रशासनान अगदी गुप्त पद्धतीने आदेश काढत हे हॉटेल पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात दिले. त्यामुळे सर्व नियम धाब्यावर बसवून प्रशासनाची फसवणूक करत उभारलेल्या या हॉटेलचं सील काढून ते पुन्हा अग्रवाल कुटुंबालाच का देण्यात आलं याबाबत उलट सुलट चर्चा सध्या सुरूत्यामुळे सातारा जिल्हाधिकारी यावर काय भूमिका घेणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! राज ठाकरे थेट मातोश्रीवर; आधी कार्यक्रमात भेटले, संजय राऊत अन् उद्धव ठाकरेंशी हसत-खेळत गप्पा

आणखी वाचा



Source link

आर्थिक अडचणीत सापडलेल्या पिंकी पवार यांना मोठा दिलासा; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मदतीने मिळाले ₹३.९० लाखांचे सहाय्य

0
आर्थिक अडचणीत सापडलेल्या पिंकी पवार यांना मोठा दिलासा; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मदतीने मिळाले ₹३.९० लाखांचे सहाय्य

पुणे – गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या पिंकी चैतन्य पवार (वय २६) यांच्यावर करण्यात येणाऱ्या महागड्या शस्त्रक्रियेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यांच्या उपचारासाठी लागणाऱ्या ४.४० लाख रुपयांपैकी तब्बल ३.९० लाख रुपयांची वैद्यकीय मदत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मिळाली आहे.

बाणेर रोड येथील ए.वाय.एम.एस. रुग्णालयात पिंकी पवार यांच्यावर अत्यावश्यक शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. मात्र पवार कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याने हा खर्च उचलणे त्यांना शक्य नव्हते.

या पार्श्वभूमीवर मोहोळ यांच्या ‘वैद्यकीय मदत कक्षाशी’ संपर्क साधण्यात आला. ‘आरोग्य सेवकां’नी रुग्णालय प्रशासनाशी समन्वय साधत पवार यांच्या आर्थिक अडचणीची माहिती दिली. यानंतर रुग्णालयाच्या प्रस्तावानुसार ३.९० लाख रुपयांची सवलत निश्चित झाली.

या मदतीमुळे पवार कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून आवश्यक उपचार तातडीने सुरू करता आले.

दैनंदिन ऑनलाइन कामांच्या भरमसाट ओझ्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण धोक्यात

0
दैनंदिन ऑनलाइन कामांच्या भरमसाट ओझ्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण धोक्यात

दैनंदिन ऑनलाइन कामांच्या भरमसाट ओझ्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण धोक्यात

जेजुरी  :-जेजुरी परिसरातील प्राथमिक शाळांतील शिक्षकांना आता फक्त वर्गात शिकवणेच नव्हे, तर १०० ते १५० प्रकारच्या ऑनलाइन माहितीचे ‘भराव’ पूर्ण करणे हेही रोजचेच काम झाले आहे. शिक्षण विभागाच्या विविध योजनेतून, संस्थांमार्फत, व डॉटमार्फत सतत येणाऱ्या आकस्मिक मागण्या, रिपोर्ट्स, यादी व एक्सेलशीट्स भरताना शिक्षकांचा बहुतांश वेळ मोबाईल-लॅपटॉपमध्येच जातोय.

दररोज सकाळी वर्ग सुरू करण्याआधीच WhatsApp वर लिंक धडकते. ती वेळेत भरली नाही तर फोन येतो. वर्गात विद्यार्थी बसलेले असतात पण शिक्षक मात्र मोबाइल स्क्रीनवर अडकलेले असतात. महिन्यातील १७–१८ दिवस शिक्षकांना अशा आकस्मिक सूचना भरण्याच्या फेऱ्या पडतात.

“शिकवतोय की माहिती भरतोय?” – शिक्षकांचा संतप्त सवाल

पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अक्षरनारायण कांबळे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “ऑनलाइन कामांच्या बोजामुळे शिक्षणाचा मूळ उद्देशच बाजूला पडतोय. प्रशासनाने यावर तातडीने निर्बंध घालायला हवेत.”

पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप कदम यांनी सांगितले की, शिक्षकांनी यापूर्वीही कामकाजाच्या अतिरेकाविरोधात मोर्चा काढला होता. पण त्यानंतर कामे कमी होण्याऐवजी अधिकच वाढली.

१०० ते १५० प्रकारची माहिती – कुठे जातंय शिक्षण?

शिक्षक संघटनेचे आयुक्त विनोद चव्हाण यांनी सांगितले की,
“निपुण भारत, निपुण मूल्यांकन, दिक्षा अॅप, माय भारत, शालेय पोषण आहार, पालकसभा, परीक्षा केंद्र व्यवस्थापन, साक्षरता मोहीम, विविध पोर्टल्स आणि योजनेअंतर्गत माहिती मागवली जाते. ती वारंवार मागितली जाते. त्यामुळे वर्गशिक्षणावर थेट परिणाम होतो.”

“मोबाईलवर माहिती भरताना विद्यार्थी दुर्लक्षित” – शिक्षकांचा आक्रोश

पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष दया गायकवाड म्हणाले,
“वर्गात मुलं बसलेली असतात, पण आम्ही मोबाईलवर माहिती भरत बसतो. वेळेत भरलं नाही तर व्हॉट्सअॅपवर सतत सूचना येतात. यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय.”

तालुका निरीक्षक समितीचे अध्यक्ष सुनील कुंजीर यांनी प्रशासनाकडे ठोस उपाययोजनेची मागणी केली आहे.

मुख्य मागणी : शिक्षणावर लक्ष केंद्रित होण्यासाठी अनावश्यक ऑनलाइन कामांवर नियंत्रण आणा!

प्रामाणिकपणाचा प्रेरणादायी नमुनाः फलटणच्या एसटी चालकाने परत केले अडीच लाखांचे दागिने

0
प्रामाणिकपणाचा प्रेरणादायी नमुनाः फलटणच्या एसटी चालकाने परत केले अडीच लाखांचे दागिने

फलटण :- प्रामाणिकपणा म्हणजे काय याचे जिवंत उदाहरण फलटण एसटी आगारातील चालक अक्षय राजेंद्र जाधव यांनी घालून दिले आहे. प्रवाशाने बसमध्ये विसरलेली अडीच लाख रुपयांची सोन्याची पर्स सापडल्यावर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ती आगार प्रशासनाकडे सुपूर्द केली. त्यांच्या या प्रामाणिक कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

साताऱ्याहून फलटणकडे येणाऱ्या एसटी बसमध्ये एक प्रवासी आपली सोन्याचे दागिने असलेली पर्स विसरून गेला होता. बस फलटण आगारात पोहोचल्यानंतर चालक अक्षय जाधव यांना ही पर्स सापडली. तपासणी केली असता त्यामध्ये सोन्याचा नेकलेस आणि अंगठी आढळली. दागिन्यांची किंमत सुमारे ₹2.5 लाख इतकी होती.

यासंदर्भात तत्काळ माहिती देत, चालकाने ती पर्स आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. नंतरच्या चौकशीत दागिने संजय संपतराव भोईटे (रा. हिंगणगाव, ता. फलटण) यांचे असल्याचे निष्पन्न झाले. स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे, वाहतूक निरीक्षक संजय नाळे, सुरक्षारक्षक गुंजवरे, आणि पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत दागिने मूळ मालकाला परत देण्यात आले.

ही घटना समजताच प्रवाशाने चालकाचे मनःपूर्वक आभार मानले. एसटी विभागाने अक्षय जाधव यांचा सत्कार केला असून आगार प्रमुख मुला मॅडम, मुखदेव अहिवळे, धीरज अहिवळे व इतर मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

आजच्या काळात जिथे प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला आहे, तिथे अक्षय जाधव यांचे कृत्य हे संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

पोर्शेकार अपघात प्रकरणातील अग्रवालांचं महाबळेश्वरमधील हॉटेलचं सील उघडलं; मोठ्या राजकीय दबावानंत

0



सातारा: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबाचं (Porsche accident case Agarwal family) शासकीय जागेवर उभं असलेलं अनाधिकृत एमपीजी क्लब (MPG club) हॉटेल प्रशासनानं पुन्हा दिलं अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात दिलं असल्याची माहिती समोर आली आहे. मोठ्या राजकीय दबावानंतर या हॉटेलचे सील काढून हे  हॉटेल पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.( Seal of hotel in Mahabaleshwar opened)

Porsche accident case Agarwal family: सातारा जिल्हा प्रशासनान अगदी गुप्त पद्धतीने काढला आदेश

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर कनेक्शन समोर आल्यानं यानंतर खडबडून जागं होतं प्रशासनाने कारवाई केली होती. शासकीय मिळकतीमध्ये तीस वर्षाच्या भाडेपट्ट्यानं रहिवास वापराकरता घेतलेल्या जागेमध्ये पांचतारंकित उभं असलेलं हे एमपीजी क्लब (MPG club) हॉटेल सील करत अनधिकृत पद्धतीने केलेलं बांधकाम पाडून या हॉटेलमधला बार सुद्धा सील केला होता. याला जवळपास एक वर्ष उलटून गेलं आहे. मात्र सातारा जिल्हा प्रशासनान अगदी गुप्त पद्धतीने आदेश काढत हे हॉटेल पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात दिला आहे. 

Porsche accident case Agarwal family: राजकीय दबाव कोणत्या नेत्याचा होता

 शासकीय मिळकतीमध्ये भाडेपट्ट्याने असलेली या अग्रवाल कुटुंबाची जागा पुन्हा शासनाने माघारी घ्यावी अशी मागणी तेव्हापासून होत होती. सर्व नियम धाब्यावर बसवून प्रशासनाची फसवणूक करत उभारलेल्या या हॉटेलचं सील काढून ते पुन्हा अग्रवाल कुटुंबालाच का देण्यात आलं? याबाबत उलट सुलट चर्चा सध्या सुरू झालेली आहे. मोठा राजकीय दबाव जिल्हा प्रशासनावर होता असं सुद्धा बोलले जातंय. जर राजकीय दबाव होता तर कोणत्या नेत्याचा होता हे सुद्धा समोर यावं असं लोकांचं म्हणणं आहे. 

Porsche accident case Agarwal family: शासकीय जागेत चुकीच्या नियमबाह्य पद्धतीने…

सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी या हॉटेलचे सील उघडण्याच्या आदेश दिले आहेत, यामध्ये या प्रॉपर्टीमधला वाणिज्य वापर तात्काळ बंद करावा आणि मिळकतीचा वापर केवळ मूळ जिमखाना या प्रयोजनासाठीच करावा असं सुद्धा या आदेशात म्हटलं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला वादींना वापरात बदल करायचा असल्यास त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागांची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे सुद्धा यात म्हटलं आहे. यामुळे यामध्ये पुढील काही काळात अग्रवाल कुटुंबाला 30 वर्ष भाडेतत्वावर शासकीय जागेवर वाणिज्य वापर करता येईल की काय याबाबत शंका व्यक्त केली जातीये. महाबळेश्वरमधील शासकीय जागेत चुकीच्या नियमबाह्य पद्धतीने चाललेल्या कामामुळे लिज प्रॉपर्टीची मागणी पाहणी करण्याची सुद्धा मागणी होताना पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा अग्रवाल परिवार चर्चेत आलं आहे.

आणखी वाचा



Source link

आईच्या स्मृती जपण्यासाठी भालेराव परिवाराचे विज्ञानवादी व पर्यावरणपूरक वृक्षारोपण

0
आईच्या स्मृती जपण्यासाठी भालेराव परिवाराचे विज्ञानवादी व पर्यावरणपूरक वृक्षारोपण

आईच्या स्मृती जपण्यासाठी भालेराव परिवाराचे विज्ञानवादी व पर्यावरणपूरक वृक्षारोपण

फलटण : भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आयुष्यमान महावीर सर्जेराव भालेराव व त्यांच्या परिवाराने मातोश्री पुष्पावती सर्जेराव भालेराव यांच्या निधनानंतर पर्यावरणपूरक व विज्ञानवादी पद्धतीने त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. विशेष म्हणजे लोक माणसांमध्ये अस्थि संकलन, विसर्जन विधी हा शनिवारी न करता इतर दिवशी करण्याची प्रथा प्रचलित असताना सुद्धा व त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नसताना सुरू असणाऱ्या अनिष्ट अवैज्ञानिक प्रथेला फाटा देऊन अस्थि संकलन, विसर्जन व पुण्यानुमोदनाचा विधी भालेराव परिवाराने शनिवार घेऊन समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे. पारंपरिक पद्धतीप्रमाणे अस्थी पाण्यात विसर्जन न करता, बौद्ध धम्माच्या पर्यावरणवादी दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या मातोश्रींच्या अस्थींचे संकलन करून स्मशानभूमी, राहते घर व शेतामध्ये बोधिवृक्ष, आंबा व बकुळी या वृक्षांचे रोपण केले.

या उपक्रमातून जलप्रदूषण टाळून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून दिला गेला. बुद्धांच्या शिकवणीत “प्रकृतीशी मैत्री” व “विज्ञानवादी आचरण” यांचा संदेश आहे. त्याच विचारांचा वारसा पुढे नेत भालेराव कुटुंबाने अस्थी विसर्जनाऐवजी वृक्षारोपण करून आईच्या स्मृतींना चिरंतन व जीवनदायी रूप दिले.

यावेळी बौद्ध धम्माचे धम्मगुरु भंते काश्यप जी यांनी बौद्ध धर्माच्या संस्कार विधीप्रमाणे गाथा पठण करून आशीर्वाद दिले.

या प्रसंगी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय, राज्य, जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच परिवारातील बंधू सतीश सर्जेराव भालेराव, भगिनी पंचशीला साबळे (आक्का), केंद्रीय व राज्य संघटक तथा पुणे व सातारा जिल्ह्याचे प्रभारी समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले,भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्ह्याच्या संस्कार सचिव व राज्याच्या संघटक आयुनि अविंदा वाघमारे मॅडम, समता सैनिक दलाच्या आयुनि अर्चना चव्हाण, लोणद शाखेच्या आयुनि सोनल खरात, खटाव तालुक्याचे आयु सुनील कदम केंद्रिय शिक्षक, भारतीय बौद्ध महासभा शाखा बारामती तालुका शाखेचे सचिव आयु महेंद्र गायकवाड(मामा),भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेचे महासचिव आयु.बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे, तालुका शाखेचे कार्यालय सचिव बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते,संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष आयु. संपत भोसले, संस्कार विभागाचे सचिव आयु.बजरंग गायकवाड, अमोल भोसले, प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष केशव ठोंबरे सर, हिशोब तपासनीस आयु.सतिश कांबळे सर, संघटक विजयकुमार जगताप,आनंद जगताप, स्वप्नील गायकवाड, ऍड.चंद्रशेअर मोरे, धम्मसेवक बौद्धाचार्य संजय प्रल्हाद घोरपडे सर, जेष्ठ समाज सेविका कांताताई काकडे, वंचित बहुजन आघाडी च्या महिला पदाधिकारी चित्राताई गायकवाड, लोक कलावंत तथा समता सैनिक दलाचे माजी पदाधिकारी लक्ष्मण निकाळजे, जिल्ह्याचे माजी हिशोब तपासणीस अविनाश जगताप, माजी फलटण तालुका अध्यक्ष शंकर कांबळे, व नातेवाईक, मित्रमंडळी उपस्थित होते.

हा उपक्रम केवळ आईच्या स्मृती जपण्यापुरता मर्यादित नसून समाजासाठी एक प्रेरणादायी संदेश आहे. “अस्थींचे विसर्जन नद्यात,कॅनॉल किंवा समुद्रात न करता वृक्षारोपणाद्वारे पर्यावरणाला जीवनदान द्या,” हा बौद्ध धम्माचा आधुनिक व विज्ञानाधिष्ठित संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.

भालेराव परिवाराचे हे पाऊल पर्यावरणप्रेम, विज्ञाननिष्ठा व बौद्ध धर्मातील करुणा या तिन्ही मूल्यांचा संगम ठरत आहे.

सातारा जिल्ह्यातील हजारो प्रशिक्षणार्थीचा सवाल आम्ही काय करायचं या प्रमाणपत्राचं?”

0
सातारा जिल्ह्यातील हजारो प्रशिक्षणार्थीचा सवाल आम्ही काय करायचं या प्रमाणपत्राचं?”

“प्रशिक्षण घेतलं, मेहनत केली, आता सरकारनं सोडलं हवालदिल !”

सातारा :- लाडका भाऊ योजना अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत गत विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना काढली त्यातील ही लाडका भाऊ योजना प्रशिक्षण म्हणून आम्हाला सहा महिने रोजगार दिला सहा महिन्यानंतर पाच महिने कालावधी वाढ दिले पण प्रशिक्षण झाले मात्र रोजगार नाही आता अकरा महिने पूर्ण कार्यकाळ आमचा झाला पण आता आम्हाला आहे हे सरकार घरचा रस्ता दाखवत आहे सर्व आस्थापनेतील प्रशिक्षणार्थींना कार्यमुक्त करत आहेत सर्व प्रशिक्षणार्थींच्या मनात एक सवाल आहे 11 महिने प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या प्रशिक्षणाचा करायचं काय जे प्रमाणपत्र मिळणार त्याचा फायदा काय महाराष्ट्रभरातून एक लाख 34 हजार प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत होते सातारा जिल्ह्यातून लगबग साडेतीन ते चार हजार प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत पण आता सर्वांना ज्या त्या आस्थापनेतूनकार्यमुक्त करत आहेत त्याच अनुषंगाने प्रशिक्षणार्थींचे विविध आंदोलन उपोषण चालू आहेत बेरोजगार होण्यापासून वाचण्यासाठी आपल्या स्वतःच्या बचावासाठी आणि हक्काचा रोजगारासाठी सातारा जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींनी सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजसाहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले सोबतच माननीय सौ श्रीमंत दमयंती राजे उदयनराजे भोसले महाराणी साहेब हे देखील उपस्थित होते प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या -१) शासकीय आस्थापनेत आहे त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यावा
२) नियमित वेळेवर विद्यावेतन व रोजगार उपलब्ध नंतर पगार मिळावा
३) प्रशिक्षणार्थींचे चार ते पाच महिन्यांचे विद्यावेतन थकित आहे विद्यावेतन लवकरात लवकर प्रशिक्षणार्थींना देण्यात यावे
निवेदन देताना सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते सोबतच सातारा जिल्हा प्रतिनिधी हिना पानसरे कराड तालुका अश्विनी माने जावली तालुका सुप्रिया पाडळे पाटण तालुका माधव देशपांडे फलटण तालुका आकाश गोळे वाई तालुका प्रथमेश अमराळे महाबळेश्वर तालुका रेखा खामकर मान तालुका प्रशांत भोसले कोरेगाव तालुका रेशमा नलवडे खंडाळा तालुका करिष्मा बनकर खटाव तालुका विष्णू काळे सातारा तालुका अश्विनी खुडे या सर्व तालुक्यातील हे युवा कार्य प्रशिक्षणार्थी उपस्थित होते

एन. रघुरामन यांचा कॉलम: आपण निदान रविवारी तरी कृतज्ञता साजरी करू शकतो का?

0
एन. रघुरामन यांचा कॉलम:  आपण निदान रविवारी तरी कृतज्ञता साजरी करू शकतो का?


55 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

“तू घरी आहेस का?’ शुक्रवारी, मी फोन उचलला आणि “नमस्कार, काकू,”म्हणणार होतो तेव्हा काकूने लगेच विचारले. क्षणभर मी घाबरलो आणि मला वाटले की, काहीतरी आपत्कालीन परिस्थिती आहे. मी हो म्हटल्याबरोबर तिने लगेच म्हटले, “तू पटकन तीन कप कॉफी बनवू शकतोस का? मी येत आहे आणि दहा मिनिटांत तिथे येईन’ असे म्हणून तिने फोन ठेवला. तिने माझे काही बोलण्याची वाटही पाहिली नाही. आठ मिनिटांपेक्षा कमी वेळात, ती किराणा सामानाच्या पिशव्या घेऊन माझ्या घरी आली आणि मला काही वस्तू फ्रिजरमध्ये ठेवण्यास सांगितले. मी विचारत होतो की काय चालले आहे. मग ती मला संपूर्ण कहाणी सांगू लागली. तिची किराणा दुकानातील मैत्रीण माझ्या घराजवळील रुग्णालयात दाखल होती आणि ती खरेदी करत असताना तिला कळले. तिला फ्लास्कमध्ये दोन कप कॉफी हवी होती आणि मी केली.

मी विचारले, “किराणा दुकानातील मैत्रीण?्’ कॉफीचा घोट घेत ती म्हणाली, “सहा महिन्यांपूर्वी, फक्त एका वस्तूसाठी खरेदी करत असताना, मला एक रिकामा कॅश रजिस्टर दिसला, पण मी काहीही करू शकण्यापूर्वी, माझी ही मैत्रीण – जी माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे – किराणा सामानाने भरलेली गाडी घेऊन आत आली. मी थांबलो आणि तिला आधी जाण्यास सांगितले. पण ती मागे हटली, माझ्याकडे फक्त एकच वस्तू असल्याने मी आधी जावे असा आग्रह धरत होती. मी नकार दिला आणि म्हणालो, की ती आधी जाईल, पण तिने मला अधिकाराने जाऊ दिले. मी तिचे आभार मानले आणि आम्ही गप्पा मारू लागलो, दुकानाच्या वैशिष्ट्यांवर चर्चा करू लागलो. आम्ही शुभेच्छांची देवाण-घेवाण केली आणि निघालो. पुढच्या महिन्यात आम्ही पुन्हा भेटलो आणि मला कळले की ती दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी खरेदी करते, कारण तिथे सहसा गर्दी कमी असते. खरेदी केल्यानंतर, आम्ही कॉफी घेतली आणि मला कळले की तिला दक्षिण भारतीय कॉफी आवडते.

गेल्या चार महिन्यांपासून त्या मैत्रिणी आहेत. माझ्या मामीला त्या शुक्रवारी दुकानात दिसल्या नाहीत म्हणून तिने तिला फोन केला. मग मला कळले की तिला माझ्या घराजवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माझ्या काकू म्हणाल्या, “त्या एका नात्यामुळे आमचे दिवस उजळले आणि कदाचित त्या क्षणी जग थोडे दयाळू झाले, असे आम्हाला दोघांनाही वाटले.

काकू गेल्यानंतर, माझ्यासाठी ते एक प्रकारचे बोधकथा होते. मला आठवले की १९९० च्या दशकात अमिताभ बच्चन “देऊ किंवा जाऊ’ असे कसे वाजवायचे. ते मला गाडी थांबवून त्यांची सेक्रेटरी रोझी सिंग राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये सोडायचे. मी त्या इमारतीला वारंवार जात असल्याने मी अमितजींना भेटायचो. रात्री उशिरापर्यंत काम केल्यानंतर ते रोझीला स्वतः घरी सोडत असत. त्या अरुंद इमारतीत – दोन्ही बाजूला गाड्या उभ्या असलेल्या – तो नेहमीच जागा शोधत असे आणि मला किंवा इतरांना जाऊ देत असे आणि जेव्हा मी त्याचे आभार मानत असे, तेव्हा तो नम्रपणे प्रतिसादात हात वर करत असे. तो जेव्हा जेव्हा असे करायचा तेव्हा मला असे वाटायचे की मी “कृतज्ञतेच्या उत्सवात’ प्रवेश केला आहे. मला दिवसेंदिवस बरे वाटते आणि आता मला इतरांना मदत करण्याची सवय लागली आहे.

म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला जाऊ देईल, तुमच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडेल, तुमचे कपडे प्रशंसा करतील, तुम्ही टाकलेले काहीतरी उचलतील, शेल्फमधून तुम्ही पोहोचू शकत नसलेले काहीतरी काढतील, सबवेवर बसायला जागा देतील – त्यांच्या डोळ्यात पाहा, स्मित करा आणि साधे “धन्यवाद’ म्हणा.



Source link