आठवड्याच्या बाजारात मुसळधार पावसाची अचानक हजेरी!

0
14
आठवड्याच्या बाजारात मुसळधार पावसाची अचानक हजेरी!

फलटण :- फलटण शहरात रविवारी दुपारी आलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण बाजारपेठेला अक्षरशः गाठले. आठवडा बाजार भरात असतानाच पावसाने अचानक जोर पकडल्याने विक्रेते आणि ग्राहकांमध्ये मोठी धांदल उडाली.

भाजीपाला, कपडे, किराणा साहित्य विक्रेत्यांना आपापला माल वाचवण्यासाठी धावपळ करावी लागली. काहींना नुकसानही सहन करावं लागलं. शहरातील काही भागांत पाण्याचा निचरा न झाल्याने बाजारपेठ चिखलमय झाली, तर काही ठिकाणी पाण्याचे तळे साचले.

रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला असून वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.