Friday, September 11, 2026
Homeफलटणपालखी मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पालिकेची धडक मोहीम; शेवटचे अतिक्रमण हटेपर्यंत कारवाई सुरूच...

पालखी मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पालिकेची धडक मोहीम; शेवटचे अतिक्रमण हटेपर्यंत कारवाई सुरूच – नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर

पालखी मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पालिकेची धडक मोहीम; शेवटचे अतिक्रमण हटेपर्यंत कारवाई सुरूच – नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर


फलटण | प्रतिनिधी :-  श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातील पालखी मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यासाठी फलटण नगरपालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे. शहरातील शेवटचे अतिक्रमण हटेपर्यंत ही कारवाई अविरत सुरू राहणार असल्याचा निर्धार नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
पालिकेच्या या कठोर आणि नियोजनबद्ध मोहिमेचे शहरातील सुजाण नागरिकांकडून स्वागत केले जात असून, पालखी मार्ग मोकळा करण्याच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
भेदभावाशिवाय समान कारवाई
अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईबाबत बोलताना नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले की, “कायद्यासमोर सर्वजण समान आहेत. अतिक्रमण काढताना गरीब-श्रीमंत, छोटा-मोठा असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही. आमचे स्वतःचे अतिक्रमण आढळले तरी तेही प्रथम प्राधान्याने हटविले जाईल. पालखी मार्ग पूर्णपणे मोकळा करणे हेच प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”
प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क
ही मोहीम नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या थेट मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. मुख्याधिकाऱ्यांनी नियुक्त केलेले अधिकारी, पालिकेचे कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनाच्या कडक बंदोबस्तात शहरातील विविध भागांमधील बेकायदेशीर बांधकामे व अतिक्रमणे हटविण्याची कारवाई दररोज सुरू आहे.
पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांना कोणताही अडथळा येऊ नये आणि शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments