फलटणसह राज्यभरात नगरसेवक पदांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

0
23
फलटणसह राज्यभरात नगरसेवक पदांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

फलटण :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. फलटण नगरपरिषदेसह महाराष्ट्रातील २४७ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींसाठी नगरसेवक पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी ३ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात आदेश जारी केला असून, याअंतर्गत नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर सदस्य पदांची (नगरसेवक) आरक्षण प्रक्रिया सुरू होत आहे.

असा असेल आरक्षण सोडतीचा संपूर्ण कार्यक्रम:

८ ऑक्टोबर २०२५ – जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिलांसाठी आरक्षणाची सोडत काढली जाईल.
९ ऑक्टोबर २०२५ – प्रारूप आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध. ९ ते १४ ऑक्टोबर – नागरिकांकडून हरकती व सूचना दाखल करता येतील. २४ ऑक्टोबर – विभागीय आयुक्त अंतिम निर्णय घेतील.
२८ ऑक्टोबर – अंतिम आरक्षणाची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल.

या आरक्षण प्रक्रियेवर अनेक इच्छुक उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. विशेषतः फलटण नगरपरिषदेसाठी प्रभाग आरक्षण काय निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.