Monday, July 6, 2026
Home Blog Page 126

फलटणनिवडणूक2025 | आरक्षण सोडतीने राजकीय चित्र स्पष्ट

0
फलटणनिवडणूक2025 | आरक्षण सोडतीने राजकीय चित्र स्पष्ट

फलटण :- फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २७ सदस्यपदांची आरक्षण सोडत आज प्रांतधिकारी प्रियांका आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडली. या सोडतीमुळे आगामी निवडणुकीचे राजकीय चित्र अधिक स्पष्ट झाले असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, तर काही इच्छुकांना आरक्षणामुळे धक्का बसला आहे.

या वेळी तहसीलदार डॉ. अभिजित जाधव आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांची उपस्थिती होती. नगरपरिषदेची लोकसंख्या ५२,११८ असून, एकूण १३ प्रभागांमधून २७ नगरसेवक निवडले जाणार आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी ५ जागा, ओबीसीसाठी ७ जागा व महिलांसाठी एकूण १४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

विशेष बाब म्हणजे, नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित असल्यामुळे त्या पदासाठी चुरस अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.

   प्रभागनिहाय आरक्षणाचे तपशील:

प्रभाग क्र. १: अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण
प्रभाग क्र. २: अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३: अनुसूचित जाती, सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्र. ४: ओबीसी (महिला), सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५: अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण
प्रभाग क्र. ६: ओबीसी, सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्र. ७: सर्वसाधारण (महिला), सर्वसाधारण
प्रभाग क्र. ८: ओबीसी, सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्र. ९: ओबीसी (महिला), सर्वसाधारण
प्रभाग क्र. १०: ओबीसी (महिला), सर्वसाधारण
प्रभाग क्र. ११: ओबीसी, सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्र. १२: अनुसूचित जाती, सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्र. १३ (तीन सदस्य):

  • ओबीसी (महिला)
  • सर्वसाधारण (महिला)
  • सर्वसाधारण

फलटण_निवडणूक2025 : नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज जाहीर!

0
फलटण_निवडणूक2025 : नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज जाहीर!

फलटण – येत्या २०२५ मध्ये होणाऱ्या फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी एक महत्त्वाचा टप्पा आज पूर्ण होणार आहे. नगरपरिषदेच्या सदस्यपदांसाठी आरक्षणाची सोडत बुधवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनच्या पाठीमागील इमारतीत (बीएसएनएल ऑफिसजवळ) आयोजित करण्यात आला असून, याबाबतची माहिती मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ३ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार ही आरक्षण सोडत होणार आहे. या सोडतीनंतर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीचे आराखडे स्पष्ट होणार असल्याने संपूर्ण शहराचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे.

मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी शहरातील सर्व नागरिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच पत्रकार यांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

‘खरं स्वातंत्र्य मिळालं…’ घटस्फोटानंतर दुधाची आंघोळ, केक कापून साजरा केला आनंदी दिवस

0
‘खरं स्वातंत्र्य मिळालं…’ घटस्फोटानंतर दुधाची आंघोळ, केक कापून साजरा केला आनंदी दिवस


प्रत्येकाच्या जीवनात लग्न हा अतिशय खास क्षण असतो. लग्नाचा उत्सव साजरा केला जातो. पण तुम्ही कधी घटस्फोट साजरा करताना पाहिले आहे का? असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एका तरुणाची आई त्याला दुधाने आंघोळ घालते आणि नंतर तो तरुण “हॅपी डिव्होर्स” असे लिहिलेला केक कापतो.

Add Zee News as a Preferred Source

या व्हिडिओला आधीच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांनी विविध प्रकारच्या कमेंट्स दिल्या आहेत. बहुतेक कमेंट्स टीकात्मक आहेत, परंतु काहींनी या सेलिब्रेशनचे कौतुकही केले आहे. त्या तरुणाने केकवर असेही लिहिले आहे की त्याने त्याच्या माजी पत्नीला 120 ग्रॅम सोने आणि 18 लाख रुपये रोख दिले आहेत.

केक कापून सेलिब्रेशन

व्हिडिओची सुरुवात एका महिलेने तिच्या मुलाला दुधाने आंघोळ घालताना होते. या प्रक्रियेला अभिषेक म्हणतात आणि ती शुद्धीकरणाचे प्रतीक मानली जाते. तरुणाचे दुधाने आंघोळ त्याच्या लग्नाचा शेवट आणि त्याच्या अविवाहित जीवनाची नवीन सुरुवात म्हणून देखील दाखवले जाते.

दूधाने आंघोळ करण्याच्या विधीनंतर, त्या तरुणाने “हॅपी डिव्होर्स” असे लिहिलेला चॉकलेट केक कापला. मोठ्या आनंदाने, त्याने केक कापला आणि त्याच्या कुटुंबासह आनंद साजरा केला. त्याने कॅप्शन दिले, “कृपया आनंदी राहा आणि स्वतःचा आनंद साजरा करा आणि दुःखी होऊ नका. मी 120 ग्रॅम सोने किंवा 18 लाख रुपये रोख घेतलेले नाहीत. मी घटस्फोटित आहे, आनंदी आहे आणि मुक्त आहे. माझे जीवन, माझे नियम, घटस्फोटीत आहे आणि आनंदी आहे.”

टीका आणि बरीच प्रशंसा मिळाल्यानंतर, त्या तरुणाने तोच व्हिडिओ पुन्हा पोस्ट केला आणि त्याला पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले. घटस्फोटाच्या आघाताने झगडणाऱ्यांना या व्हिडिओने नक्कीच विचार करण्याची एक नवीन दिशा दिली आहे.





Source link

“फिक्स नगराध्यक्ष!” – सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल; अनिकेतराजे नाईक निंबाळकरांचे नाव चर्चेत

0
“फिक्स नगराध्यक्ष!” – सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल; अनिकेतराजे नाईक निंबाळकरांचे नाव चर्चेत

फलटण :- फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण ‘खुले’ जाहीर होताच, शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः नाईक निंबाळकर घराण्यातील दोन प्रमुख गटांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आता अधिक ठोस वाटू लागली आहे.

राजे गटाकडून या पदासाठी श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचे नाव पुढे आले असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर ‘फिक्स नगराध्यक्ष’ म्हणत त्यांचे फोटोसह पोस्ट्स मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत.

अनिकेतराजेंना यापूर्वी नगरसेवक म्हणून अनुभव असून, ते गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची सलग तीन दशकांपासून फलटण नगरपालिकेवर असलेली सत्ता पुढेही कायम राहावी, यासाठी राजे गटाने रणनीती आखायला सुरुवात केली आहे.

निवडणुकीला अद्याप दोन महिने बाकी असले तरी जनतेत चर्चेला जोर आला आहे – “नगराध्यक्ष कोण?” आणि त्यात अनिकेतराजेंचे नाव आघाडीवर आहे, हे निश्चित!

फलटणच्या नगराध्यक्षपदासाठी ‘समशेरसिंह नाईक निंबाळकर’ ठरलेले नाव?

0
फलटणच्या नगराध्यक्षपदासाठी ‘समशेरसिंह नाईक निंबाळकर’ ठरलेले नाव?

कार्यकर्त्यांचा जल्लोष, सोशल मीडियावर ‘Fix नगराध्यक्ष’चे पोस्ट्स व्हायरल!

फलटण :- फलटण नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुले झाल्यानंतर दोन्ही प्रमुख गटांमध्ये हालचालींना वेग आला आहे.

विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील राजे गटाकडून माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांचे नाव चर्चेत असतानाच, भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील खासदार गटाकडून माजी नगरसेवक समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव कार्यकर्त्यांनी स्वतःहून पुढे आणले आहे.

आरक्षण खुले होताच सोशल मीडियावर ‘Fix नगराध्यक्ष – समशेरसिंह नाईक निंबाळकर’ या पोस्ट्सचा अक्षरशः पूर आला. कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. कार्यकर्त्यांच्या मनोभावनेला प्रतिसाद देत समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी वैयक्तिकरित्या सर्व गटांच्या कार्यकर्त्यांची गाठीभेट घेऊन त्यांची मनोगते जाणून घेतली.

समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा नगरपालिका कारभाराचा दीर्घ अनुभव, विरोधात असूनही केलेले प्रभावी काम, आणि दुसरा सक्षम पर्याय नसल्याचे चित्र पाहता, खासदार गटाकडून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

फलटण पंचायत समितीच्या राजकारणात ‘नवीन समीकरणांची’ सुरुवात

0
फलटण पंचायत समितीच्या राजकारणात ‘नवीन समीकरणांची’ सुरुवात

फलटण :- सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आज (दि. ७ ऑक्टोबर) पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये फलटण पंचायत समितीचे सभापतीपद ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला’ (OBC महिला) या गटासाठी राखीव जाहीर झाले आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील राजकीय चित्रच बदलले असून, अनेक दिग्गज इच्छुकांचे समीकरणे ढासळले आहेत.

फलटण पंचायत समितीमध्ये यंदा १६ सदस्यांची निवड होणार आहे. सभापतीपदाचे महत्त्व लक्षात घेता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली होती. मात्र, आरक्षणामुळे अनेकांचे स्वप्न अपूर्ण राहिले असून, आता नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील एकूण ११ पंचायत समित्यांसाठी आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली असून, यामुळे जिल्ह्यातील राजकारणाचा वेग आणखी वाढला आहे. पुढील टप्प्यात सदस्यपदासाठीच्या आरक्षणावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

कफ सिरप ठरतोय जीवघेणा, अशावेळी सर्दी खोकल्यासाठी किचनमधील ‘हे’ पदार्थ देतील आराम

0
कफ सिरप ठरतोय जीवघेणा, अशावेळी सर्दी खोकल्यासाठी किचनमधील ‘हे’ पदार्थ देतील आराम


Home Remedies for Cold And Cough Relief: मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळं तब्बल 18 चिमुकल्यांनी प्राण गमावले आहेत. संपूर्ण भारतात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तसंच, बालकांच्या मृत्यूनंतर नागरिकांमध्ये चिंतादेखील वाढली आहे. तसंच, सध्या वातावरणात बदल होतोय. आता पावसाळा संपून ऑक्टोबर हिटची जाणीव व्हायला लागली आहे. अशावेळी वातावरण बदलाचा परिणाम आपसूकच आरोग्यावर होतो.

Add Zee News as a Preferred Source

वातावरण बदलामुळं खोकला, गळ्यात खवखव अशा समस्या निर्माण होतात. अशावेळी खोकल्याचे औषध घेण्याचा सल्ला दिला जातो. गळ्यात खवखव, सर्दी -शिंका आणि सातत्याने रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होतो. त्यामुळं अनेकजण खोकल्याचे औषध घेतात. मात्र तुम्ही खोकल्याचे औषध न घेता नैसर्गिक व घरगुती उपायदेखील करु शकता. ज्यामुळं  सर्दी- खोकल्यावर आराम मिळेल. 

आयुर्वेदात काही उपाय खूपच गुणकारी आहेत. जे तुमच्यासाठी फारच फायदेशीर ठरू शकतात. तसंच, तुमची रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढू शकते. 

सर्दी-खोकल्यापासून आराम देणारे उपाय ( Home Remedies to Get Rid of Cough And Cold)

आलं आणि मधाचे मिश्रण

आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात आणि मध खशाला आराम देते. तुम्ही एक चमचा आल्याचा रस घेऊन त्यात एक चमचा मध मिसळा. दिवसातून 2-3 वेळा हे मिश्रण घेतल्याने घशातील खवखव आणि खोकला बरा होतो. 

तुळस आणि काळीमिरीचा चहा

तुळशीच अँटी बॅक्टेरीयल गुण असतात आणि काळीमिरीत कफ बाहेर काढण्यास मदत करते. 5-6 तुळशीची पाने, 2-3 काळीमीरी वाटून त्याची पावडर, एक कप पाण्यात उकळून आणि गाळुन घेऊन गरम गरम प्या. हा चहा शरीराला उष्णता देतो तसंच, सर्दी बरी करण्यास मदत करतो. 

लसणाचे सेवन

लसणात अँटी व्हायरल आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात. एका लसूण पाकळी कच्च चावून किंवा तुपात तळून खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि व्हायरसपासून लढण्यास मदत मिळते. 

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या

घसा खवखवत असेल किंवा सूज आली असेल सगळ्यात असरदार उपाय म्हणजे मिठाच्या पाण्याच्या गुळण्या. एक ग्लास गरम पाण्या अर्धा चमचा मीठ टाकून दिवसातून दोनदा गुळण्या करा. 

हळदीचे दूध

हळदीच्या दुधात अँटी सेप्टिक गुण असतात तसंच, दूध शरीरात उष्णता ठेवते. हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळते. एक ग्लास गरम दुधात अर्धा चमचा हळद मिसळून रात्री झोपण्याआधी प्या. या उपायाने खोकला कमी होतो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)





Source link

आई हा केवळ शब्द नाही, ती संपूर्ण जीवनाची भावना आहे” – महेंद्र गायकवाड

0
आई हा केवळ शब्द नाही, ती संपूर्ण जीवनाची भावना आहे” – महेंद्र गायकवाड

“आई हा केवळ शब्द नाही, ती संपूर्ण जीवनाची भावना आहे” – महेंद्र गायकवाड
फलटण : “आई हा केवळ शब्द नाही, ती संपूर्ण जीवनाची भावना आहे,” असे भावनिक प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा, बारामती शाखेचे संस्कार सचिव महेंद्र गायकवाड (मामा) यांनी केले. ते कालकथित पुष्पावती सर्जेराव भालेराव यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी आपल्या बहिणीच्या आठवणीत ते अतिशय भावुक झाले. त्यांनी कवी फ. मु. शिंदे यांच्या ‘आई’ या कवितेतील ओळी उद्धृत करत सांगितले की – “आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. म्हणजेच जिथे आई असते, तिथे जीवन, हालचाल, ऊब आणि संवाद असतो.
आई नसलेलं घर म्हणजे ओसाड वाडा. पण जिथे आई असते, तिथे प्रत्येक कोपऱ्यात हसू, काळजी, प्रेम आणि आपलेपणा भरलेला असतो.”गायकवाड म्हणाले, “त्या उक्तीप्रमाणे माझी बहीण संपूर्ण आयुष्य जगली. अपार कष्ट, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर तिनं आपल्या मुलांना घडवलं. तिच्या जाण्याने कुटुंबाची आणि समाजाची प्रचंड हानी झाली आहे.”

श्रद्धांजली आणि आदरांजलीचा अर्थ –
कार्यक्रमात भंते काश्यप जी यांनी श्रद्धांजली आणि आदरांजलीचा अर्थ स्पष्ट करताना सांगितले की –“श्रद्धांजली म्हणजे आपल्यातून निघून गेलेल्या व्यक्तीप्रति मनःपूर्वक आदर, कृतज्ञता आणि प्रेमभाव व्यक्त करून त्याला श्रद्धेने वंदन करणे.तर आदरांजली म्हणजे त्या व्यक्तीला सन्मानाने प्रणाम करून त्याच्या कार्याला नतमस्तक होणे. जर आदराने वंदन करायचे असेल तर ती ‘आदरांजली’ आणि श्रद्धेने वंदन करायचे असेल तर ती ‘श्रद्धांजली’ होय.परंतु ही श्रद्धा आणि हा आदर केवळ शब्दांत नसावा, तर तो कृतीत आणि जीवनमूल्यांमध्ये दिसायला हवा,” असे ते म्हणाले. कार्यक्रमात उपस्थित सर्व वक्त्यांनी समाजाला दिशा देणाऱ्या मातांना वंदन केले. कर्मयोगी संत गाडगेबाबा, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, तसेच जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या महामाया माता गौतमी या मातांना नमन करून त्यांच्या कार्याची उजळणी करण्यात आली. या मातृशक्तीच्या परंपरेत कालकथित पुष्पावती सर्जेराव भालेराव यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आणि उपस्थितांनी त्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली अर्पण केली. “आई म्हणजे त्याग, समर्पण आणि प्रेरणा” पतीच्या निधनानंतरही पुष्पावती भालेराव यांनी अपार जिद्दीने आपल्या तीन मुलांना महावीर भालेराव (भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका अध्यक्ष), सतीश भालेराव (अण्णा) – साहित्यिक, विचारवंत, आणि भगिनी पंचशिला साबळे(आक्का)यांना शिक्षण, संस्कार आणि माणुसकीचे मूल्य दिले.“आई म्हणजे त्याग, प्रेम आणि प्रेरणेचं मूर्तिमंत उदाहरण आहे,” असे मत उपस्थित मान्यवरांनी एकमुखाने व्यक्त केले.

या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार विभाग उपाध्यक्ष बजरंग गायकवाड सर यांनी वृद्ध आई-वडिलांप्रती कर्तव्यभाव व्यक्त करून भालेराव कुटुंबाच्या सामाजिक, धार्मिक योगदानविषयी मांडणी केली. आईच्या स्वभावातील वैशिष्ट्य आणि समाजाप्रती कुटुंबाप्रती असणारी समर्पित भावना यावर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ज्ञान, ज्ञानातून श्रद्धा, श्रद्धेतून धम्माचरण आणि धम्म आचरणातून दुःखमुक्तीकडे वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी केले.

ठाणे जिल्ह्याच्या संस्कार सचिव आणि राज्य संघटक आयुनि अविंदा वाघमारे मॅडम यांनी पुष्पावती भालेराव यांच्या कार्याची तुलना फुले–शाहू–आंबेडकर विचारधारेतील मातांच्या आदर्शाशी केली. खटाव तालुक्याचे केंद्रिय शिक्षक आयु. सुनील कदम यांनी कुटुंबाने पारंपारिक कर्मकांडाऐवजी धम्मसंस्कार विधी केल्याबद्दल प्रशंसा केली.
समता सैनिक दलाचे माजी पदाधिकारी आयु. लक्ष्मण निकाळजे यांनी जुन्या आठवणी उजळवत कुटुंबाच्या समाजोपयोगी कार्याचा उल्लेख केला.

गीत आणि कवितांमधून श्रद्धांजली – कार्यक्रमात “आई माझी मायेचा सागर” हे गीत बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते यांनी सादर केले.कवी फ. मु. शिंदे यांची ‘आई’ कविता महेंद्र गायकवाड यांनी सादर केली.तसेच “हंबरून वासराले चाटती जवा गाय” हे गीत फलटण तालुका महासचिव बाबासाहेब जगताप यांनी सादर करून उपस्थितांना भावूक केले.

या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय, राज्य, जिल्हा आणि तालुका पदाधिकारी, कुटुंबातील बंधू सतीश सर्जेराव भालेराव, भगिनी पंचशिला साबळे (आक्का), समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले, आयुनि अर्चना चव्हाण, आयुनि सोनल खरात, आयु. विठ्ठल निकाळजे, आयु. संपत भोसले, आयु. केशव ठोंबरे, आयु. सतीश कांबळे, संघटक विजयकुमार जगताप, आनंद जगताप, स्वप्नील गायकवाड, ऍड.चंद्रशेअर मोरे, बौद्धाचार्य संजय प्रल्हाद घोरपडे,जेष्ठ समाजसेविका कांताताई काकडे, लोक कलावंत लक्ष्मण निकाळजे, वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकारी चित्राताई गायकवाड, माजी तालुका अध्यक्ष शंकर कांबळे, तसेच नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंतिम आदरांजली कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी एक मिनिट मौन पाळून कालकथित पुष्पावती सर्जेराव भालेराव यांच्या प्रति मनःपूर्वक श्रद्धांजली आणि आदरांजली अर्पण केली.

गुंतवणुकीचं अमिष, कोट्यवधींचा गंडा – ‘ब्लॉक ऑरा’ प्रकरणातील फसवणूक उघड

0
गुंतवणुकीचं अमिष, कोट्यवधींचा गंडा – ‘ब्लॉक ऑरा’ प्रकरणातील फसवणूक उघड

बारामती : बारामती शहरात दीड वर्षात तीनपट परतावा देण्याचं आमिष दाखवत ‘ब्लॉक ऑरा’ नावाच्या कंपनीने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. अनेक गुंतवणूकदारांनी या कंपनीवर विश्वास ठेवून लाखो रुपये गुंतवले, पण नंतर मात्र फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.

गुंतवणूकदार एस. ए. काझी यांनी २०२२ मध्ये एमआयडीसी भागात नंदन पवार या व्यक्तीमार्फत ‘ब्लॉक ऑरा’ कंपनीची माहिती घेतली. “दीड वर्षात तीनपट परतावा” मिळेल, असे सांगत त्यांना रॉयल इन हॉटेलमध्ये आयोजित सेमिनारसाठी बोलावण्यात आलं. या सेमिनारमध्ये रियाज पटेल, फिरोज मुलतानी, नितीन जगतीयानी यांनी स्वत:ला संचालक म्हणून ओळख देत मोठा परतावा कसा मिळेल हे समजावून सांगितले.

याच वेळी स्थानिक प्रतिनिधी म्हणून विजयकुमार गायकवाड, नंदकुमार दुधे, प्रणव दुधे, अनिल जगताप, राजेंद्र कुंभार आणि नंदन पवार यांची ओळख करून देण्यात आली. गुंतवणुकीसाठी या लोकांशी संपर्क ठेवावा असे सुचवले गेले.

काझी यांनी पैसे गुंतवल्यानंतर वेबसाईटवर सुरुवातीला रक्कम वाढताना दिसली. मात्र काही महिन्यांनंतर अधिक पैसे गुंतवण्याचा आग्रह सुरु झाला. दुसरा युजर-आयडी काढा, पुन्हा गुंतवा अशी मागणी झाली. यानंतर वेबसाईटच अचानक बंद पडली. सुरूवातीला तांत्रिक अडचणी सांगण्यात आल्या, पण नंतर संपर्कच तुटला.

फसवणूक लक्षात आल्यानंतर काझी यांनी बारामती शहर आणि तालुका पोलिस ठाण्यात तक्रार केली, मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. अप्पर पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही दोन वर्षांपासून न्याय मिळालेला नाही.

या प्रकारामुळे फसवणूक करणाऱ्यांना खुलेआम वावरण्याची मुभा मिळाली असून, पोलिस यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये तीव्र नाराजी आहे.

राज्यातील राजकीय रंगत पुन्हा वाढणार! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू – आरक्षण सोडतीत धक्कादायक निर्णय

0
राज्यातील राजकीय रंगत पुन्हा वाढणार! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू – आरक्षण सोडतीत धक्कादायक निर्णय

बारामती :- राज्यात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज नगरपरिषद व नगरपंचायत नगराध्यक्ष पदांसाठी आरक्षण सोडत घेण्यात आली. यामध्ये अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले.

विशेषतः बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी यंदा सर्वसाधारण प्रवर्गातील पुरुषांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. बारामतीत २०१६ नंतर तब्बल ९ वर्षांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता येथील राजकारणात नवा रंग चढण्याची शक्यता आहे. प्रस्थापित नेते आणि नवखे उमेदवार यांच्यात चुरस तीव्र होणार आहे.

दुसरीकडे, नव्याने स्थापन झालेल्या माळेगाव नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक होत असून, येथे नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांच्या योजना बदलण्याची वेळ आली आहे. तथापि, OBC महिलांना या माध्यमातून राजकीय संधी मिळणार आहे, याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जात आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक निवडणुकाही वेग घेत आहेत. परिणामी, अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडून अधिकृत उमेदवारीसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.