Monday, July 6, 2026
Home Blog Page 125

Diwali 2025 : ‘या’ तेलामुळे रक्ताच्या नसा कधीच बंद पडणार नाही, हार्ट अटॅकचा धोका राहील दूर, FSSAI ने सांगितलं कस वापराल?

0
Diwali 2025 : ‘या’ तेलामुळे रक्ताच्या नसा कधीच बंद पडणार नाही, हार्ट अटॅकचा धोका राहील दूर, FSSAI ने सांगितलं कस वापराल?


Best Cooking Oil  : दिवाळीचा फराळ म्हटलं की, चकली, करंज्या, शंकरपाळ्या, शेव, चिवडा असे पदार्थ आलेच. अन् हे पदार्थ तेलाशिवाय विचारच करु शकत नाही. दिवाळीनंतर अनेकांना हृदयाच्या आरोग्याशी संबंधित आजारांचा त्रास होतो. अशावेळी दिवाळीच्या सुरुवातीलाच FSSAI ने दिलेल्या पद्धतीप्रमाणे तेलाचा वापर करुन फराळ बनवा. म्हणजे फराळाचा मनमुराद आनंद लुटता येतो. 

Add Zee News as a Preferred Source

खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर करडी नजर ठेवणाऱ्या देशातील सर्वात मोठी संस्था FSSAI नुसार, अनेक लोक खाद्यपदार्थाच्या तेलांवर लक्ष ठेवत नाही. किती तेलाचा वापर करायला हवं, कोणतं तेल आरोग्यासाठी सर्वात चांगलं आहे, कोणत्या तेलात अन्नपदार्थ तयार करावेत. तसेच चुकीच्या पद्धतीने तेल शरीरात गेल्यास ते विष बनू शकतं अशावेळी काय टाळाल. पाहा A to Z माहिती. 

तेलाची मर्यादा 

रोजच्या जेवणात आपण तेलाचा वापर किती करत आहोत, याची नोंद ठेवणे गरजेचे आहे. जेवण बनवताना तेलाचा काय वापर केला जातो तसेच महिन्याला आपल्याला किती तेल लागतं याची नोंद ठेवावी. जास्त तेलामुळे फक्त वजन वाढत असं नाही तर त्यामुळे इतर आरोग्याच्या समस्या देखील डोकं वर करतात. 

पॅकेज तेलाचा वापर करा 

सुटं तेल वापरणं टाळा. स्वच्छतेच्या बाबतीत सुटं तेलं तेवढं खरं उतरत नाही. यामुळे पॅकेज तेलाचाच वापर करावा. रिफाइंड, सूर्यफूलाचे, सोयाबीन आणि तिळाच्या तेलाचा वापर आरोग्यासाठी सर्वोत्तम असतो. चुकीच्या पद्धतीच्या तेलामुळे कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होतो आणि हॉर्ट अटॅकचा धोका टळतो. 

पदार्थ तळताना तेल किती गरम करावे?

प्रत्येक तेलाचा एक स्मोक पॉइंट असतो. एका निश्चित तापमानानंतर तेल जळायला लागतं आणि त्यातील पोषक तत्व कमी होतात. हे तेल शरीरासाठी घातक असतं. दिवाळीत फराळ तळत असताना या चुका अनेकदा होण्याची शक्यता असते. अशावेळी तेल योग्य प्रमाणातील आचेवर गरम करावे आणि पदार्थ तळून घ्यावा. 

अधिक तेलाचा वापर टाळा 

शक्य झाल्यास दिवाळीत अधिक तेलाचा वापर टाळा. यासाठी तेलकट पदार्थ न बनवता ते बेक करा किंवा कमी तेलाचा वापर करा. दिवाळीत हाय ब्लड प्रेशर, हॉर्ट अटॅक, फॅटी लिवरची समस्या असणाऱ्या लोकांना धोका अधिक असतो. त्यामुळे दिवाळीत फराळ बनवताना आणि खाताना सावध राहा. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची बहार

0
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची बहार

फलटण (प्रतिनिधी) – श्री सद्‌गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मंगळवार, दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती महाराजा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटीचे व्हा. चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

🔸 राज्यस्तरीय भजन महोत्सव स्पर्धा

शनिवार, दिनांक 11 ऑक्टोंबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत राज्यस्तरीय भजन महोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महिला भजनी मंडळ, बाल भजनी मंडळ व पुरुष भजनी मंडळ यांचा समावेश असून, विजेत्या मंडळांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमाला वारकरी संघटनेचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

स्पर्धा दररोज सकाळी 7.30 ते सायं. 7.00 या वेळेत महाराजा मंगल कार्यालयात पार पडणार आहे.

🔹 14 ऑक्टोंबर – सामाजिक उपक्रमांचा दिवस

वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 14 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ‘जिजाई’ बंगला, लक्ष्मीनगर, फलटण येथे शुभेच्छा स्वीकारण्यात येणार आहेत. याच दिवशी अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत:

रक्तदान शिबिर – महाराजा मंगल कार्यालयात आयोजित, रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू
वडजल ग्रामपंचायतीस Water ATM मशीनचे सुपूर्दगी
वडजल येथे वृक्षारोपण कार्यक्रम, सायंकाळी 6.30 वाजता
समूह सभासदांना लाभांश वितरण
कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस व बक्षीस वाटप

या सर्व उपक्रमांमध्ये नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी व फलटणकरांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री सद्गुरु हरिबुवा महाराज पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले व महाराजा मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटीचे व्हा. चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी केले आहे.

गरोदरपणात शारीरिक संबंध ठेवू शकतो का? याचा नात्यावर काय परिणाम होतो? एक्सपर्ट काय सांगतात…

0
गरोदरपणात शारीरिक संबंध ठेवू शकतो का? याचा नात्यावर काय परिणाम होतो? एक्सपर्ट काय सांगतात…


गरोदरपणाचा काळ हा फक्त त्या स्त्रीसाठीच नाही तर पुरुषासाठी देखील तितकाच महत्त्वाचा असतो. या काळात शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरावर बदल होत असतो. अशावेळी अनेक प्रश्न मनात असतात. त्यातील अतिशय महत्त्वाचा आणि बहुतांश जोडीदारांना पडणारा प्रश्न म्हणजे गरोदरपणाच्या 9 महिन्याच्या काळात शरीर सबंध ठेवायचे का? यावर डॉ. सबीहा इनामदार यांनी याबाबत योग्य मार्गदर्शन केलंय. 

Add Zee News as a Preferred Source

गरोदरपणात शारीरिक संबंध ठेवण्यावर अनेक मर्यादा असतात. पेनिटेट्री सेक्स करण्याला या काळात अनेक बंधन असू शकतात. जर प्रेग्नेन्सी हाय रिस्क असेल तर शारीरिक संबंध ठेवणे टाळा. हाय रिस्क प्रेग्नेन्सी म्हणजे 
सर्वाकल इनसफिशियन्सी 
प्लासन्टा प्रिवी आहे. 
ब्लिडींग
पाण्याची गळती 
बीपी असेल 
यासारख्या बाबींचा धोका असेल तर शारीरिक संबंध ठेवणं धोक्याचं असू शकेल. 

पण जर गर्भधारणा ही लो रिस्क म्हणजे कोणताही त्रास गरोदरपणात होत नसेल तर तुम्ही या 9 महिन्याच्या काळातही शारीरिक संबंधांचा आनंद घेऊ शकतो. पण एक्सपर्ट यासोबतच सांगतात की, गरोदरपणाच्या या 9 महिन्याच्या काळात नॉन पेनिटेट्री सेक्सचा देखील आनंद घेणं गरजेचं आहे.

नॉन-पेनेट्रेटिव्ह सेक्सचे प्रकार काय?

काही लोकप्रिय प्रकार:चुंबन घेणे
परस्पर हस्तमैथुन: एकमेकांना हाताने उत्तेजित करणे.
मौखिक सेक्स: जीभ आणि ओठांचा वापर करून उत्तेजना.
मसाज: इरोजेनस झोनवर तेल लावून मसाज.
रोलप्लेचा या ठिकाणी वापर केला जाऊ शकतो. 
शरीरावर स्पर्श: एकमेकांच्या संवेदनशील भागांना हलकेच स्पर्श करणे.

शेवटच्या महिन्यात सेक्स केल्याने प्रसूती व्यवस्थित होते का?

या काळात घरातील वृद्ध महिला किंवा त्यांच्या आजूबाजूच्या लोक अनेकदा असे सुचवतात की “शेवटच्या महिन्यात वैवाहिक संबंध प्रसूती सुलभ करतात.” काहींना ही पारंपारिक पद्धत वाटते, तर काहींना त्याबद्दल संकोच वाटतो. पण प्रश्न उद्भवतो: गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात लैंगिक संबंध खरोखरच प्रसूतीस मदत करतात का? की ते फक्त एक मिथ्य आहे?

या काळात, प्रोस्टॅग्लॅंडिन नावाचे पदार्थ गर्भाशय ग्रीवा मऊ करण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे प्रसूती प्रक्रिया सुलभ होते. शिवाय कामोत्तेजनामुळे गर्भाशयाचे सौम्य आकुंचन होऊ शकते, जे नैसर्गिक प्रसूती सुरू करण्यास मदत करू शकते. स्त्रीला भावनिकदृष्ट्या आराम वाटतो, ज्यामुळे हार्मोनल संतुलन राखले जाते.

कंडोम वापरण्याचा देतात सल्ला 

डॉ. सबिहा या काळात शारीरिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर करण्याचा सल्ला आवर्जून देतात. कारण या काळात महिलेच्या योनी मार्गावर इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते. गरोदरपणात हा धोका जास्त असू शकतो. 

गरोदरपणात एकमेकांपासून दूर का जातात? 

गरोदरपणाच्या काळात जोडीदार एकमेकांपासून दूर जाण्याची दाट शक्यता असते. कारण या काळात जोडीदारांमध्ये कोणताही शारीरिक संबंध राहत नाही. या काळात एकमेकांची ओढ कमी होते. अशावेळी जोडीदार आपल्यापासून लांब जाण्याची दाट शक्यता असते. एक्सपर्ट सांगतात की, अशावेळी तुम्ही नॉन पेनेट्रेटिव्ह पद्धतीने एकमेकांजवळ राहू शकतात. 

FAQ 

गर्भावस्थेदरम्यान सेक्स सुरक्षित आहे का?
हो, निरोगी गर्भावस्थेत सेक्स सुरक्षित असतो आणि बाळाला इजा होत नाही. योनीत प्रवेश करणारा लिंग किंवा सेक्स टॉय गर्भापर्यंत पोहोचू शकत नाही. सेक्स किंवा ऑर्गॅझममुळे गर्भपात किंवा अकाली प्रसूती होण्याचा धोका वाढत नाही.

कधी सेक्स टाळावा?
डॉक्टर किंवा मिडवाइफने सांगितल्यास टाळा, जसे की योनीतून रक्तस्त्राव, एम्निऑटिक द्रव गळणे, गर्भाशयग्रीवेची कमकुवतता, प्लॅसेंटा प्रेव्हिया (प्लॅसेंटा गर्भाशयग्रीवेवर), पूर्वीची अकाली प्रसूती किंवा STI असल्यास. अशा स्थितीत सेक्समुळे गर्भाशय संकुचन होऊ शकते, जे धोकादायक ठरू शकते.

गर्भावस्थेदरम्यान सेक्सचे फायदे काय?
सेक्स जोडप्यांमधील भावनिक जवळीक वाढवतो आणि आनंददायी असू शकतो. काही स्त्रियांना गर्भावस्थेत लैंगिक इच्छा वाढते, ज्यामुळे नातेसंबंध मजबूत होतात. तसेच, वेगवेगळ्या पोजिशन्सचा प्रयोग करता येतो.





Source link

फलटण : पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यपदांसाठी आरक्षण सोडतीची तारीख जाहीर

0
फलटण : पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यपदांसाठी आरक्षण सोडतीची तारीख जाहीर

फलटण: फलटण पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी सदस्यपदांची आरक्षण सोडत सोमवार, दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता सजाई गार्डन मंगल कार्यालय, जाधववाडी (फलटण) येथे होणार आहे. याबाबतची माहिती तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील तरतुदीनुसार ही विशेष सभा आयोजित करण्यात येत आहे. या सोडतीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी जागा आरक्षणाद्वारे निश्चित केल्या जाणार आहेत.

दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्यपदांसाठीची आरक्षण सोडतही १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणार आहे. तसेच, जिल्ह्यातील इतर सर्व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीही त्याच दिवशी संबंधित तहसील कार्यालयांमध्ये पार पडणार आहेत.

तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी इच्छुक नागरिकांना वेळेवर आणि योग्य ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Mental Health : आरोग्याची ‘ती’ बाजू जी आपण अनेकदा विसरतो

0
Mental Health : आरोग्याची ‘ती’ बाजू जी आपण अनेकदा विसरतो


आपले मानसिक आरोग्य-आपले भावनिक आणि मानसिक कल्याण- निरोगी आणि परिपूर्ण जीवन जगण्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या सभोवतालच्या जगाचा आपण कसा विचार करतो, अनुभवतो आणि त्याला कसा प्रतिसाद देतो यावर मानसिक आरोग्याचा प्रभाव पडतो. हे आपले नातेसंबंध, कामाच्या ठिकाणी आपली कामगिरी आणि आव्हानांचा सामना करण्याच्या आपल्या क्षमतेवर परिणाम करते. तरीही, आपल्या अस्तित्वाचा इतका अविभाज्य भाग असूनही, तो आरोग्याच्या सर्वात दुर्लक्षित पैलूंपैकी एक आहे.

Add Zee News as a Preferred Source

मानसिक आरोग्य का महत्त्वाचे?

आपण अशा जगात जगतो जे तग धरण्याचा (resilience) गौरव करते, पण विश्रांती कशी घ्यावी हे क्वचितच शिकवते. अशा संस्कृतीत, जिथे उत्पादनक्षमता (productivity) ला महत्त्व दिलं जातं, पण मन:शांती अनेकदा दुर्लक्षित राहते. अनेक लोक अजूनही शांततेत पीडा सहन करतात.  भावनिक थकव्याला फक्त “ताण” समजून दुर्लक्ष करतात, किंवा स्वतःला सतत “मजबूत राहायलाच हवं” असं पटवून देतात. पण मानसिक आरोग्य हा आजाराचा अभाव नाही; तो भावनिक संतुलन, मानसिक स्थैर्य आणि स्वत:शी व इतरांशी जोडण्याची क्षमता असणे हे आहे.  जागतिक आकडेवारीनुसार, पाचपैकी एक व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात कधीतरी मानसिक आरोग्याचा आव्हान येतो. तरीही, कलंक आणि जागरूकतेचा अभाव अनेकांना आवश्यक मदत शोधण्यात अडथळा निर्माण करतो. चिंता, नैराश्य, मानसिक थकवा किंवा फक्त ओव्हरव्हेल्म झाल्यासारखे वाटणे. हे दुर्बलतेची लक्षणं नाहीत. हे स्वतःसाठी उपलब्ध असण्याची लक्षणे आहेत. त्याकडे दुर्लक्ष केल्याने ते नुसते निघून जात नाहीत; फक्त बरे होणे अधिक कठीण बनते.

जागरूकतेतील अंतर

मानसिक आरोग्याबद्दलच्या वाढत्या चर्चा असूनही, जागरूकता आणि स्वीकृती अजूनही मागे आहे. गैरसमज, सांस्कृतिक कलंक आणि मानसिक आरोग्य व्यावसायिकांपर्यंत मर्यादित पोहोच अनेकांना वेळेवर मदत घेण्यापासून रोखते. आपण अनेकदा ताप येण्यासाठी डॉक्टरकडे धावतो, परंतु जेव्हा आपले मन जड वाटते तेव्हा संपर्क साधण्यास संकोच करतो. हा संकोच गरजेच्या अभावामुळे नव्हे, तर भीतीमुळे उद्भवतो-न्याय होण्याची, गैरसमज होण्याची किंवा लेबल लावण्याची भीती. आता ती बदलण्याची वेळ आली आहे.

तुम्ही एकटे नाही

आपल्या आजूबाजूचा जग आजवर कधी नव्हता इतका अनिश्चित वाटतोय. संकटे, संघर्ष आणि नैसर्गिक आपत्तींच्या बातम्या आपल्या पडद्यांवर सतत झळकत असतात. आपण थेट त्यांचा भाग नसला तरी, या नकारात्मकतेचा आणि अस्थैर्याचा परिणाम आपल्या भावनांवर होतोच. आपण थकून जातो, रिकामे वाटते. ठीक नसणे हेही ठीकच आहे. मदत मागणे चुकीचे नाही. आणि बरे होण्यासाठी वेळ घेणेही योग्यच आहे.

शारीरिक आरोग्याच्या पलीकडे

खरे आरोग्य हे फक्त तुम्ही किती वेगाने धावू शकता किंवा तुमचा आहार किती पौष्टिक आहे यावर मोजले जात नाही. ते तुमचा दिवस संपल्यावर मन किती शांत आहे यात प्रतिबिंबित होते. खरा निरोगी माणूस तोच, जो शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही पातळ्यांवर संतुलित असतो. मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी नेहमीच मोठे बदल करावे लागतात असे नाही. अनेकदा ती सुरुवात होते छोट्या पण जाणीवपूर्वक केलेल्या कृतींनी:
• स्वतःशी संवाद साधण्यासाठी आणि श्वास घेण्यासाठी थोडा थांबणे.
• आपल्या भावनांबद्दल मोकळेपणाने बोलणे.
• आपल्या मन:शांतीचे रक्षण करणाऱ्या मर्यादा ठरवणे.
• आणि गरज भासल्यास, कुठलाही संकोच न बाळगता व्यावसायिक मदत घेणे.

तुमच्या मानसिक आरोग्याला कसे समर्थन द्याल

लहान कृती मोठा परिणाम घडवतात. भावनिक आरोग्याकडे जाण्यासाठी दररोजच्या काही सोप्या पायऱ्या येथे दिल्या आहेत:
1.बोलणे आणि जोडले राहणे – कुटुंबीय, मित्र किंवा विश्वासू व्यक्तीशी संपर्क साधा. मन मोकळं केल्याने स्पष्टता आणि दिलासा मिळतो.
2.मदत देणे आणि स्वीकारणे – इतरांसाठी उपस्थित राहणे आपलेही नातेसंबंध अधिक घट्ट करते.
3.आनंद देणाऱ्या गोष्टी करा – आवडीचे छंद, सर्जनशील कामे किंवा साध्या आनंददायी क्षणांचा आस्वाद घ्या.
4.सक्रिय राहा आणि पौष्टिक आहार घ्या – शारीरिक आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य यांचा परस्परांशी खोल संबंध आहे.
5.माहितीचा वापर नियंत्रित ठेवा – जास्त ताण देणाऱ्या माध्यमांपासून थोडा वेळ दूर राहा आणि माइंडफुलनेस जोपासा.

जाणीवेच्या दिशेने एक पाऊल

मानसिक आरोग्याविषयीचा संवाद आता शांततेतून संवेदनशीलतेकडे कलंकातून सहकार्याकडे नेण्याची वेळ आली आहे. आपण जितके जास्त बोलतो, तितके ते सामान्य होते. कारण चांगले मानसिक आरोग्य हे विशेषाधिकार नाही ते प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि स्वतःच्या मनाची काळजी घेणे हे स्वार्थीपण नाही ते आवश्यक आहे.

एक सामूहिक जबाबदारी

मानसिक आरोग्य ही फक्त व्यक्तीची नव्हे, तर कुटुंब, शाळा, कार्यस्थळे आणि संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. मोकळेपणाने संवाद साधण्यासाठी सुरक्षित जागा निर्माण करणे, व्यावसायिक मदत उपलब्ध करून देणे आणि सहानुभूती वाढवणे  या सगळ्यामुळे लोकांच्या आयुष्याच्या अनुभवात खरा फरक पडू शकतो. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त, हे लक्षात ठेवू या की मानसिक आरोग्य ही चैनीची गोष्ट नाही ती जीवनाची गरज आहे.

हा लेख नेहा रेगे, भाटवडेकर- इंडस्ट्रीयल सायकोलॉजिस्ट यांनी ‘झी 24 तास’साठी विशेष लिहिला आहे. 





Source link

मुंब्रात स्थानिक खेळाडूंकरिता जागतिक दर्जाची क्रिकेट अकादमी उभारणार

0
मुंब्रात स्थानिक खेळाडूंकरिता जागतिक दर्जाची क्रिकेट अकादमी उभारणार



मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांनुसार एक नवी क्रिकेट अकादमी उभारण्याच्या तयारीत आहे. ही अकादमी लवकरच मुंब्रा आणि ठाणे परिसरातील इच्छुक क्रिकेटपटूंकरिता खुली होणार आहे.

ही अकादमी मौलाना अबुल कलाम आझाद टीएमसी स्टेडियमजवळील पाच एकर जागेवर उभारली जाणार आहे. 

प्रस्तावित अकादमीत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील, ज्यामध्ये क्रिकेट मैदान, तसेच टेनिस कोर्ट, ड्रेसिंग रूम, स्विमिंग पूल आणि जिम यांचा समावेश असेल.

या अकादमीत या भागातील प्रतिभावान क्रिकेटपटूंना मोफत प्रशिक्षण दिले जाईल. अशा खेळाडूंना रणजी, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची इच्छा असली तरी महागड्या क्रिकेट अकादमींमध्ये प्रवेश घेणे परवडत नसते.

मुंब्रा येथील यासिन शेख सध्या मुंबई रणजी संघाच्या अंडर-19 संघात खेळत आहे. एमसीएला आशा आहे की या नव्या अकादमीमुळे अशेच आणखी अनेक प्रतिभावान खेळाडू घडतील.

ठाणे महानगरपालिकेने (TMC) या प्रकल्पास मंजुरी दिली असून, एमसीएला सुमारे ७.५ कोटी रुपयांच्या भाडेपट्टीवर ही जमीन दिली आहे.

तसेच एमसीएने नोंदणीसाठी ४० लाख रुपये आधीच खर्च केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा लवकरच पार पडणार आहे.

अहवालानुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात या प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या मंजूर केल्या आहेत.

तथापि, या प्रकल्पाच्या पूर्णतेची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. क्रिकेट अकादमी उभारण्याची कल्पना गेली २० वर्षांपासून प्रलंबित असल्याचे सांगितले जाते.



Source link

🏃‍♀️ ‘आपली फलटण मॅरेथॉन २०२५’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद! २२०० हून अधिक स्पर्धकांची नोंदणी, वृक्षारोपण व अवयव दान मोहिमेचा शुभारंभ

0
🏃‍♀️ ‘आपली फलटण मॅरेथॉन २०२५’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद! २२०० हून अधिक स्पर्धकांची नोंदणी, वृक्षारोपण व अवयव दान मोहिमेचा शुभारंभ

फलटण :  जोशी हॉस्पिटल प्रा. लि. व रोबोटिक्स सेंटर, फलटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘आपली फलटण मॅरेथॉन २०२५’ रविवार, १२ ऑक्टोबर रोजी आयोजित होत आहे. यंदाच्या मॅरेथॉनला तब्बल २२०० हून अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. यामध्ये ५०० पेक्षा अधिक वृद्ध सहभागी असल्याचे आयोजक डॉ. प्रसाद जोशी व डॉ. प्राची जोशी यांनी सांगितले.

गेली ८ वर्षे नियमितपणे होणाऱ्या या मॅरेथॉनचा उद्देश लोकांमध्ये व्यायामाची सवय लावणे आणि आरोग्यप्रेम वाढवणे हा असून यावर्षीपासून एक आगळी वेगळी मोहीम सुरु करण्यात आली आहे – अवयव दान जनजागृती व वृक्षारोपण- संवर्धन!

वृक्षदाते स्पर्धकांना फ्री प्रवेश!

यावर्षीच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी १००० विजेत्यांना देशी झाडांची रोपे देण्यात येणार असून ती सलग ३ वर्षे जतन केल्यानंतर पुढील मॅरेथॉनमध्ये त्यांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. अशा प्रकारे हिरवळ संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे.

👮‍♀️ मुख्य पाहुणे – मिरा बोरवणकर यांचे मार्गदर्शन

मॅरेथॉनचे उद्घाटन महाराष्ट्रातील पहिल्या महिला पोलीस आयुक्त मिरा बोरवणकर यांच्या हस्ते सकाळी ६ वाजता सजाई गार्डन, विमानतळ, फलटण येथून होणार आहे. त्या स्पर्धकांना मार्गदर्शन करतील आणि विजेत्यांना बक्षिसे प्रदान करतील.

🏅 बक्षिसे आणि मॅरेथॉन किट

  • प्रत्येक वयोगटात पुरुष व महिलांसाठी ३ बक्षिसे –
    🥇 पहिले – ₹१०,०००
    🥈 दुसरे – ₹७,०००
    🥉 तिसरे – ₹५,०००
  • फिनिशर मेडल आणि प्रत्येक रनरसाठी मॅरेथॉन किट
    ज्यामध्ये टाईम चीप बिब, टी-शर्ट, एनर्जी बार, टोपी आणि खास भेटवस्तू समाविष्ट आहे.

📦 किट वितरण – ९, १० व ११ ऑक्टोबर

सर्व नोंदणीकृत स्पर्धकांनी आपले मॅरेथॉन किट जोशी हॉस्पिटल, चौथा मजला, फलटण येथून सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत घेऊन जावे. स्पर्धेच्या दिवशी किट दिले जाणार नाही.

🧓🏻 वयोगटानुसार अंतरवाटप

वयोगट मॅरेथॉन अंतर १८-३० (जोश पूर्ण) १५ कि.मी. ३१-४५ (सळसळती तरुणाई) १० कि.मी. ४६-६४ (प्रगल्भ प्रौढ) ५ कि.मी. ६५ वर्षांवरील (अनुभवी ज्येष्ठ) ३ कि.मी. गुडघा शस्त्रक्रियेनंतरचे सहभागी १ कि.मी. वॉकेथॉन

यात विशेष म्हणजे ९०० रोबोटिक्स गुडघा शस्त्रक्रिया केलेल्या व्यक्तींनीही सहभाग नोंदवला आहे.

उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे दर स्थिरावले? ग्राहकांना किंचित दिलासा, वाचा 24 कॅरेटचा दर

0
उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे दर स्थिरावले? ग्राहकांना किंचित दिलासा, वाचा 24 कॅरेटचा दर


Gold Rate Today: सोनं-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याचे दर महागल्याने ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अनेकजण धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाला सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. मात्र सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

या वर्षात सोन्याच्या दरात मोठी उसळी घेतली आहे. 50 टक्क्यांपेक्षा अधिक उसळी घेतली आहे. अमेरिका फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. तसंच, कमकुवत अमेरिकी डॉलर, केंद्रीय बँकच्या खरेदीदारी व गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्समध्ये गुंतवणुकमुळं सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

आज सोन्याचे दर किंचितसे वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा 220 रुपयांची वाढ झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली असून 18 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची वाढ झाली असून 93,110 रुपयांवर पोहोचले आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या दरात होणारे चढ-उतार या व्यतिरिक्त येणाऱ्या काही महिन्यात सोन्याच्या किंमतीत तेजी असणार आहे. त्यामुळं 2025च्या अखेरीस 1,25,000 रुपये प्रति 10 ग्रॅम पार करु शकतो. तर चांदी 1,55,000 रुपये ते 1,60,000 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकते. 

आजचा सोन्याचा भाव काय?

– 10 ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,13, 800 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,23,150 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 93,110 रुपये

– 1 ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 11,380 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 12,415 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 9,311 रुपये

– 8 ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 91,040 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 99, 320 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 74, 488 रुपये

– मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर? (Today Gold Rate in Mumbai Pune)

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,13, 800 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,23,150 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 93,110 रुपये

FAQ

1) सोन्याचे दर का वाढत आहेत?

सोन्याचे दर वाढण्यामागे सणासुदीच्या काळातील वाढती मागणी, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, आणि फेडरल रिझर्व्हच्या अलीकडील निर्णयांचा प्रभाव आहे. स्पॉट गोल्ड 1.1 टक्क्यांनी वाढून $3,683.24 प्रति औंसवर बंद झाले आहे, तर या आठवड्यात सोन्याच्या किमतीत 11 टक्क्यांची वाढ झाली आहे.

2) सोन्याची गुंतवणूक का लोकप्रिय आहे?

सणासुदीच्या काळात आणि आर्थिक अनिश्चिततेच्या वेळी सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं. सातत्याने वाढणारे दर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चमक यामुळे अनेकजण सोन्याकडे गुंतवणुकीसाठी आकर्षित होत आहेत.

3) मुंबई आणि पुण्यातील सोन्याचे दर इतर शहरांपेक्षा वेगळे का असतात?

सोन्याचे दर स्थानिक मागणी, पुरवठा, कर, आणि स्थानिक बाजारपेठेतील मध्यस्थांच्या शुल्कांवर अवलंबून असतात. तथापि, सध्या मुंबई आणि पुण्यातील दर वर नमूद केल्यानुसार एकसमान आहेत.





Source link

मौजे सासकल येथे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथ वाचनाचा समारोप धम्मदीक्षेने संपन्न

0
मौजे सासकल येथे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथ वाचनाचा समारोप धम्मदीक्षेने संपन्न

मौजे सासकल येथे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथ वाचनाचा समारोप धम्मदीक्षेने संपन्न
मौजे सासकल (ता. फलटण) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या अखंड वाचनाचा समारोप अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला.

या अखंड वाचन प्रवासाची सांगता सोहळा धम्मदीक्षेच्या विधीने झाला. भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) चे अध्यक्ष आयुष्यमान नानासो मोहिते सर यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मदीक्षेचा सोहळा संपन्न झाला. सहभागी बांधवांनी भंते काश्यप यांचेकडून त्रिशरण पंचशील स्विकारून बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांप्रती निष्ठा व्यक्त करण्यात आली. यावेळी आयु.श्रीमंत घोरपडे यांनी 22 धम्म प्रतिज्ञा दिल्या.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) चे अध्यक्ष आयुष्यमान नानासो मोहिते सर यांनी पूज्य भंते काश्यप यांना वंदन करून सास्कल मधील सर्व बौद्ध उपासक उपासिका व कार्यकर्त्यांचा विशेष कौतुक केले. त्यांनी जिल्ह्याच्या पूर्व विभागाच्या वतीने सर्वांनाच अश्विनी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी धम्माच्या विचारानं हा वाचन प्रवास असा सुरू ठेवून भारतीय बौद्ध महासभेच्या ग्रामीण शाखेच्या माध्यमातून महिला व पुरुष शाखा लवकर लवकर स्थापन करण्याची सूचना दिली.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा फलटण शाखेचे अध्यक्ष आयु महावीर भालेराव यांनी सासकल मधील सर्व शीलवान श्रद्धावान उपासक व उपासिकांचे कौतुक केले व त्यांना अश्विन पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला धम्म म्हणजे मानवमुक्तीचा, समतेचा व विवेकाचा मार्ग असल्याचे आपल्याला दिसून आले आहे. आज संपूर्ण वातावरण बुद्धवंदनेने,धम्मगाथांनी आणि मैत्रीभावनेने उजळून निघाले आहे. सासकल खऱ्या अर्थानं धम्मभूमी आहे. इथूनच बुद्ध धम्माचे रोपटे संपूर्ण तालुका भर उगवण्यास सुरुवात झाली. याचं मूळ स्थान सासकल हेच आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये बौद्ध धम्मा चा विचार व संस्कार पोहोचवण्याचं काम भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सासकलमधील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केले. त्यांच्या कार्याला मी वंदन करतो. त्यांनी अशाच पद्धतीने आपला आदर्श इतर गावांना प्रेरणा देणारा करावा. मी सर्वांना आश्विन पौर्णिमेच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा.

भंते काश्यप जी म्हणाले की, “सासकल मधील अतिशय शिलवान आणि श्रद्धा संपन्न bउपासक उपासिका म्हणून ज्यांनी ज्यांनी हे पुण्य कर्म मागील तीन महिन्यांपासून पार पाडले. त्यांच्या धम्म कार्याला मी आशीर्वाद करतो! ज्या दोघींनी म्हणजे दिक्षा राजेंद्र घोरपडे व तिची सहकारी या दोघींना आशीर्वाद करतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेल्या अर्चनाताई व त्यांचा परिवार यांना ही धन्यवाद! यावेळी ज्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. ग्रंथाचे वाचन केले ते 22 प्रतिज्ञांचे पालन करतील असा विश्वास आहे.यावेळी भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुक्याचे वतीने भंते काश्यप जी यांना ‘ बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाची प्रत व चिवर दान करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी भोजनदान म्हणून आयुनी ज्योती नंदकुमार घोरपडे यांनी गोड बुंदी व शीलवान व श्रद्धावान उपासिका संजीवनी माणिकराव घोरपडे यांनी खीर दान केली.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्राचे राज्याचे संघटक, पुणे व सातारा जिल्हयाचे प्रभारी समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु.दादासाहेब भोसले,सातारा जिल्हाचे अध्यक्ष आयुष्यमान नानासाहेब मोहिते, महासचिव अरुण गायकवाड, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेचे अध्यक्ष आयुष्यमान महावीर भालेराव, महासचिव बाबासाहेब जगताप सर, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर,तालुका शाखेचे कार्यालय सचिव बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते, संस्कार विभागाचे सचिव आयु.बजरंग गायकवाड, संघटक विजयकुमार जगताप,आनंद जगताप, अरविंद निकाळजे सर, संग्राम निकाळजे, धम्मसेवक बौद्धाचार्य संजय प्रल्हाद घोरपडे सर, माजी हिशोब तपासणीस अविनाश जगताप, प्रा.मेश्राम सर, माझी प्राचार्य शिवाजी सावंत सर व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या उपस्थितीत होते.

अकलूज नगरपरिषदेतील आरक्षण सोडत जाहीर — महिलांना  ५०% प्रतिनिधित्व!

0
अकलूज नगरपरिषदेतील आरक्षण सोडत जाहीर — महिलांना  ५०% प्रतिनिधित्व!

अकलूज :- अकलूज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर १३ प्रभागांतील २६ जागांसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम उपविभागीय अधिकारी विजय पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली पारदर्शक व शांततापूर्ण वातावरणात पार पडला. लहान मुलींच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्याने या प्रक्रियेत पारदर्शकतेची पूर्णतः खात्री देण्यात आली.

🔹 महिलांना ५० टक्के आरक्षण

नगरपरिषद कायद्यानुसार १३ प्रभागांपैकी १३ जागा म्हणजेच ५०% जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये अनुसूचित जाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी विशेष आरक्षण दिले गेले आहे.

🔹 महत्त्वाचे प्रभाग झाले आरक्षित, बदलणार राजकीय समीकरणे

सोडतीनंतर अनेक महत्त्वाचे आणि राजकीयदृष्ट्या प्रभावशाली प्रभाग आरक्षित झाले असून, त्यामुळे सध्याच्या नगरसेवकांना आपल्या प्रभागांची फेरमांडणी करावी लागू शकते. अनेक इच्छुक उमेदवारांची गणिते बदलली असून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.

🔹 नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती (महिला) साठी आरक्षित

यंदा नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीतील महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे अकलूज नगर परिषदेला पहिली महिला नगराध्यक्षा मिळणार हे निश्चित आहे. पायल मोरे, रेश्मा गायकवाड, अनुराधा साठे व रेश्मा अडगळे या प्रमुख इच्छुक नावांची चर्चा रंगली आहे.

🔹 प्रभागनिहाय आरक्षण यादी — अनुसूचित जाती व मागास प्रवर्ग (महिला)

अनुसूचित जाती – महिला (३ प्रभाग) :

  • प्रभाग क्र. १०
  • प्रभाग क्र. ०२
  • प्रभाग क्र. ०७

नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला (४ प्रभाग) :

  • प्रभाग क्र. ०५
  • प्रभाग क्र. १२
  • प्रभाग क्र. ०८
  • प्रभाग क्र. ०६

उर्वरित जागांवर देखील महिला आणि विविध गटांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.