Monday, July 6, 2026
Home Blog Page 124

पूज्य भंते काश्यप यांचा कोळकी बुद्ध विहार येथे मंगलमय वातावरणात मागील तीन महिन्यांपासून सुरू असणारा वर्षावास समारोप

0
पूज्य भंते काश्यप यांचा कोळकी बुद्ध विहार येथे मंगलमय वातावरणात मागील तीन महिन्यांपासून सुरू असणारा वर्षावास समारोप

फलटण प्रतिनिधी :- भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने शाहू,फुले, आंबेडकर सभागृह, बुद्ध विहार येथे गेल्या तीन महिन्यांपासून वर्षावास काळात पूज्य भंते काश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचा संस्कार वर्ग घेण्यात आला. या उपक्रमातून स्थानिक महिलांमध्ये बौद्ध धम्माविषयीची जाणीव, श्रद्धा आणि आचारधर्म दृढ होताना दिसून आला.

या वर्गाचा प्रारंभ तीन महिन्यांपूर्वी झाला तेव्हा अनेक महिलांना त्रिसरण पंचशील आणि सूत्रपठन याविषयी प्राथमिक ज्ञानही नव्हते. परंतु भंते काश्यप यांनी अत्यंत संयमाने, विनम्रतेने आणि नियमितपणे रोज सायंकाळी 4 ते 5 या वेळेत वर्ग घेतला. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे महिलांनी सूत्र पठण आत्मसात केले आणि त्रिसरण-पंचशील यांचे अर्थ समजून घेतले.

भंते काश्यप यांनी या काळात केवळ पठण शिकवले नाही, तर बौद्ध धम्मातील संस्कार, सदाचार, आणि नैतिक मूल्ये याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी धम्म म्हणजे केवळ पूजाअर्चा नव्हे, तर जीवन जगण्याची पद्धत आहे हे महिलांच्या मनात घट्ट रुजवले.

दररोजच्या सूत्र पठणाच्या सरावामुळे आज या सर्व महिलांना संपूर्ण सूत्र पठण मुखोद्गत झाले आहे. त्यामुळे त्या रोज बुद्ध विहारात एकत्र येऊन सामूहिकरित्या सूत्र पठण करतात. या माध्यमातून महिलांमध्ये शिस्त, एकता आणि बौद्ध संस्कारांची भावना दृढ झाली आहे.

कोळकी येथील बुद्ध विहारात या काळात भंते काश्यप यांनी सतत उपस्थित राहून आपली सेवा दिली. त्यांनी महिलांना केवळ धम्माचे सैद्धांतिक ज्ञान दिले नाही, तर ते आचारात आणण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेक महिला आज बौद्ध धम्माच्या मूल्यांनुसार सदाचारी जीवन जगत आहेत.

भंते काश्यप यांचा हा उपक्रम महिलांच्या बौद्धिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा एक सुंदर आदर्श ठरला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण झालेली ही नवचळवळ ग्रामीण समाजातील बौद्ध संस्कारांना नवसंजीवनी देणारी ठरली आहे. यावेळी जेष्ठ समाजसेविका कांताताई काकडे, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी चित्रा गायकवाड, सुनिता चंदन काकडे, विद्या मोहन खंडारे, परिमिता सुनील कांबळे, लक्ष्मीबाई विकास आढाव, आरती विशाल पाटील, व इतर महिला यांनी नियमित उपस्थित राहून धम्म श्रवण केला. अस्मिता प्रवीण घोडके, रजनी सुहास माने, अलिशा शुभम अहिवळे, रुचिता चंदन काकडे, संतोष देवकर, जय संतोष देवकर यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका नियमित संस्कार वर्गासाठी उपस्थित होते. या सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी पूज्य भंते काश्यप जी यांच्या प्रति मंगल कामना करत व त्यांना पंचांग प्रणाम करत अतिशय मंगलमय व आनंददायी वातावरणामध्ये वर्षावासाची समाप्ती केली. यावेळी बोलताना महिला उपासकांनी हा संस्कार वर्ग असाच सुरू ठेवण्याचा संकल्प केला.पूज्य भंते काश्यप जी यांना धम्म प्रसार व प्रसारासाठी मंगलमय व आरोग्यदायी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
त्यांच्या या सत्कर्मामुळे केंद्रीय पदाधिकारी तथा राज्याचे संघटक सातारा व पुणे जिल्ह्याचे प्रभारी, समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले सर, भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका शाखेचे सन्माननीय अध्यक्ष आयु.महावीर भालेराव सर, महासचिव बाबासाहेब जगताप सर, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर, कार्यालयीन सचिव तथा बौद्धाचार्य आयु.चंद्रकांत मोहिते सर, संस्कार सचिव आयु. बजरंग गायकवाड सर, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु.रामचंद्र मोरे सर, संघटक आनंद जगताप यांच्यासह सर्व तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी भंते काश्यप यांच्याप्रति त्रिवार वंदन केले.मागील तीन महिन्यांपासून पूज्य भंते काश्यप जी यांनी शाहू फुले आंबेडकर सभागृह बुद्ध विहार कोळकी फलटण या ठिकाणी आपला वर्षावास पूर्ण करून त्याचा समारोप इथेच केल्याबद्दल पूज्य भंते काश्यप जी यांच्या प्रति मंगल मैत्रीची भावना व्यक्त केली. त्यांनी अशाच पद्धतीने बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मंगलमय आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या.

भंते काश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांमध्ये बौद्ध संस्कारांचा जागर — वर्षावास काळातील प्रेरणादायी उपक्रम

0
भंते काश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांमध्ये बौद्ध संस्कारांचा जागर — वर्षावास काळातील प्रेरणादायी उपक्रम


फलटण | प्रतिनिधी.  भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने शाहू,फुले, आंबेडकर सभागृह, बुद्ध विहार येथे गेल्या तीन महिन्यांपासून वर्षावास काळात पूज्य भंते काश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचा संस्कार वर्ग घेण्यात आला. या उपक्रमातून स्थानिक महिलांमध्ये बौद्ध धम्माविषयीची जाणीव, श्रद्धा आणि आचारधर्म दृढ होताना दिसून आला.

या वर्गाचा प्रारंभ तीन महिन्यांपूर्वी झाला तेव्हा अनेक महिलांना त्रिसरण पंचशील आणि सूत्रपठन याविषयी प्राथमिक ज्ञानही नव्हते. परंतु भंते काश्यप यांनी अत्यंत संयमाने, विनम्रतेने आणि नियमितपणे रोज सायंकाळी ५ ते ६ या वेळेत वर्ग घेतला. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे महिलांनी सूत्र पठण आत्मसात केले आणि त्रिसरण-पंचशील यांचे अर्थ समजून घेतले.

भंते काश्यप यांनी या काळात केवळ पठण शिकवले नाही, तर बौद्ध धम्मातील संस्कार, सदाचार, आणि नैतिक मूल्ये याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी धम्म म्हणजे केवळ पूजाअर्चा नव्हे, तर जीवन जगण्याची पद्धत आहे हे महिलांच्या मनात घट्ट रुजवले.

दररोजच्या सूत्र पठणाच्या सरावामुळे आज या सर्व महिलांना संपूर्ण सूत्र पठण मुखोद्गत झाले आहे. त्यामुळे त्या रोज बुद्ध विहारात एकत्र येऊन सामूहिकरित्या सूत्र पठण करतात. या माध्यमातून महिलांमध्ये शिस्त, एकता आणि बौद्ध संस्कारांची भावना दृढ झाली आहे.

कोळकी येथील बुद्ध विहारात या काळात भंते काश्यप यांनी सतत उपस्थित राहून आपली सेवा दिली. त्यांनी महिलांना केवळ धम्माचे सैद्धांतिक ज्ञान दिले नाही, तर ते आचारात आणण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेक महिला आज बौद्ध धम्माच्या मूल्यांनुसार सदाचारी जीवन जगत आहेत.

भंते काश्यप यांचा हा उपक्रम महिलांच्या बौद्धिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा एक सुंदर आदर्श ठरला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण झालेली ही नवचळवळ ग्रामीण समाजातील बौद्ध संस्कारांना नवसंजीवनी देणारी ठरली आहे. यावेळी जेष्ठ समाजसेविका कांताताई काकडे, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी चित्रा गायकवाड, सुनिता चंदन काकडे, विद्या मोहन खंडारे, परिमिता सुनील कांबळे, लक्ष्मीबाई विकास आढाव, आरती विशाल पाटील, व इतर महिला यांनी नियमित उपस्थित राहून धम्म श्रवण केला. अस्मिता प्रवीण घोडके, रजनी सुहास माने, अलिशा शुभम अहिवळे, रुचिता चंदन काकडे, संतोष देवकर, जय संतोष देवकर यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका नियमित संस्कार वर्गासाठी उपस्थित होते.
त्यांच्या या सत्कर्मामुळे केंद्रीय पदाधिकारी तथा राज्याचे संघटक सातारा व पुणे जिल्ह्याचे प्रभारी, समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले सर, भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका शाखेचे सन्माननीय अध्यक्ष आयु.महावीर भालेराव सर, महासचिव बाबासाहेब जगताप सर, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर, कार्यालयीन सचिव तथा बौद्धाचार्य आयु.चंद्रकांत मोहिते सर, संस्कार सचिव आयु. बजरंग गायकवाड सर, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु.रामचंद्र मोरे सर, संघटक आनंद जगताप यांच्यासह सर्व तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी भंते काश्यप यांच्याप्रति त्रिवार वंदन केले.

मतदार यादीतील गोंधळाचा उमेदवारांना फटका; निवडणुकीवर बहिष्काराची शक्यता?

0
मतदार यादीतील गोंधळाचा उमेदवारांना फटका; निवडणुकीवर बहिष्काराची शक्यता?

फलटण, ता. १२ ऑक्टोबर –स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असतानाच फलटण नगरपरिषद क्षेत्रात मतदार यादीतील मोठ्या गोंधळामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतदार यादीतील चुकीच्या नोंदींमुळे इच्छुक उमेदवारांची डोकेदुखी वाढली असून, या गोंधळामुळे शहरात नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

इच्छुक उमेदवारांनी जेव्हा मतदार यादीच्या प्रती अभ्यासासाठी घेतल्या, तेव्हा अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. अनेक मतदारांची नावे त्यांच्या मूळ प्रभागाऐवजी इतर प्रभागांमध्ये स्थानांतरित झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही प्रकरणांमध्ये असेही आढळले की, ज्यांचा त्या भागाशी कोणताही संबंध नाही, अशा बाहेरगावच्या लोकांची नावेही यादीत आढळली.

या संदर्भात काही उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता, अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “चुकीच्या प्रभागात गेलेल्या नावांची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येईल. आधारकार्ड पाहूनच अंतिम निर्णय घेतला जाईल.” मात्र ही प्रक्रिया वेळखाऊ असून, एका मतदाराची पडताळणीसाठी किमान १० ते १५ मिनिटे लागतात. हजारो नावांच्या दुरुस्तीचा विचार करता, संपूर्ण यादी सुधारण्यासाठी सहा महिने लागण्याची शक्यता आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही स्थिती अत्यंत गंभीर मानली जात आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेवरच संशय घेतला जात असून, नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्यान, या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उद्या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत जर समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचाही निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

5 इंटरनॅशनल आणि 18 डोमॅस्टिक; भारतातील ‘या’ एका राज्यात आहेत एकूण 23 विमानतळं; राज्याचे नाव जाणून शाॉक व्हाल

0
5 इंटरनॅशनल आणि 18 डोमॅस्टिक; भारतातील ‘या’ एका राज्यात आहेत एकूण 23 विमानतळं; राज्याचे नाव जाणून शाॉक व्हाल


List of airports in Uttar Pradesh : कोणत्याही देशाची प्रगती त्याच्या पायाभूत सुविधांवरून ओळखली जाते.  चांगले महामार्ग, एक्सप्रेसवे आणि रेल्वे, आंतरराष्ट्रीय बंदरे आणि विमानतळांसह, हे देखील आर्थिक प्रगतीचे लक्षण मानले जातात.  भारतात नुकतेच दोन नवीन विनातळांचे उद्घाटन जाले आहे. यापैकी एक विमानतळ महाराष्ट्रातील नवी मुंबई शहरात बांधण्यात आले आहे.  भारतात एकूण 487 विमानतळ आहेत.  यापैकी 34 आंतरराष्ट्रीय विमानतळ, 10 सीमाशुल्क विमानतळ, 81 देशांतर्गत विमानतळ आणि 23 संरक्षण हवाई क्षेत्रे विमानतळांचा समावेश आहे. पण, भारतातील एक राज्यात तब्बल 23 विमानतळं आहेत. यापैकी  5 इंटरनॅशनल आणि 18 डोमॅस्टिक एअरपोर्ट आहेत. जाणून घेऊया हे राज्य कोणते?
 

Add Zee News as a Preferred Source

भारतात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ उत्तर प्रदेशात आहेत. उत्तर प्रदेशात एकूण पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. उत्तर प्रदेशातील विमानतळांमध्ये वाराणसीतील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ, लखनऊमधील चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ, कुशीनगरमधील कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अयोध्यामधील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ यांचा समावेश आहे. ही सर्व विमानतळे कार्यरत आहेत, म्हणजेच येथून उड्डाणे चालतात. ती सर्व भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालवली जातात.

उत्तर प्रदेशातील आंतरराष्ट्रीय विमानतळांची यादी

1. २०१२ पूर्वी उद्घाटन झालेले लखनौमधील चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी एक प्रमुख केंद्र आहे.
2. सध्या महाकुंभमेळा सुरू असलेल्या वाराणसीमध्ये देखील एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. २०१२ पूर्वी उद्घाटन झालेले लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ हे एक प्रमुख धार्मिक केंद्र आहे.
3. कुशीनगरमध्ये एक आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील आहे – कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ. त्याचे उद्घाटन २०२१ मध्ये झाले. ते बौद्ध पर्यटनाला प्रोत्साहन देते आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते.
4. महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्येत आहे. त्याचे उद्घाटन २०२३ मध्ये झाले. भगवान रामाचे जन्मस्थान एक पवित्र शहर मानले जाते.
5. जेवरमध्ये नुकतेच नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनआयए) चे उद्घाटन करण्यात आले. ते देशातील सर्वात मोठे विमानतळ असेल.

उत्तर प्रदेशातील देशांतर्गत विमानतळ

आग्रा विमानतळ घरगुती  
आझमगड विमानतळ 
बरेली विमानतळ 
चित्रकूट विमानतळ 
गाझियाबाद, हिंडन विमानतळ 
गोरखपूर विमानतळ 
झाशी विमानतळ घरगुती 
कानपूर विमानतळ 
ललितपूर विमानतळ 
मेरठ विमानतळ घरगुती 

FAQ

1 भारतात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या राज्यात आहेत?
भारतात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ उत्तर प्रदेश राज्यात आहेत. येथे एकूण ५ आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.

2 उत्तर प्रदेशात एकूण किती विमानतळ आहेत?
उत्तर प्रदेशात एकूण २३ विमानतळ आहेत. यापैकी ५ आंतरराष्ट्रीय आणि १८ देशांतर्गत विमानतळ आहेत.

3 भारतात एकूण किती विमानतळ आहेत?
भारतात एकूण ४८७ विमानतळ आहेत. यापैकी ३४ आंतरराष्ट्रीय विमानतळ, १० सीमाशुल्क विमानतळ, ८१ देशांतर्गत विमानतळ आणि २३ संरक्षण हवाई क्षेत्रे विमानतळांचा समावेश आहे.

 





Source link

🏃‍♂️ “आपली फलटण मॅरेथॉन 2025” ला दमदार सुरुवात – उत्स्फूर्त प्रतिसादात चार टप्यांत यशस्वी आयोजन!

0
🏃‍♂️ “आपली फलटण मॅरेथॉन 2025” ला दमदार सुरुवात – उत्स्फूर्त प्रतिसादात चार टप्यांत यशस्वी आयोजन!

फलटण –जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण रोबोटिक सेंटर आणि डॉ. प्रसाद जोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आपली फलटण मॅरेथॉन 2025” स्पर्धेला रविवारी (दि. 12 ऑक्टोबर) भव्य उत्साहात सुरुवात झाली. राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांनी सजाई गार्डन, फलटण येथे उपस्थित राहून मॅरेथॉनचा शुभारंभ केला आणि सर्व स्पर्धकांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

या मॅरेथॉनमध्ये २१ किमी, १० किमी, ५ किमी आणि ३ किमी अशा चार टप्यांमध्ये स्पर्धा पार पडली, ज्याला फलटणकर नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. सर्व वयोगटातील नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आरोग्य व सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घडवले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रसाद जोशी, डॉ. शरद धायगुडे, डॉ. सुनीता निंबाळकर, डॉ. वल्लभ कुलकर्णी, डॉ. योगेश बागल, अझरुद्दीन मुजावर, सुरेश कुलकर्णी (जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण) आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या वेळी आमदार सचिन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर आणि उत्साही फलटणकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही मॅरेथॉन आरोग्य जनजागृतीसह फलटण शहराच्या सामाजिक एकोपा आणि उत्साही वृत्तीचे प्रतीक ठरली.

सेवाभाव, नेतृत्व आणि जिद्द यांचा संगम – शक्ती भोसले यांचा वाढदिवस उत्साहात

0
सेवाभाव, नेतृत्व आणि जिद्द यांचा संगम – शक्ती भोसले यांचा वाढदिवस उत्साहात

फलटण | 12 ऑक्टोबर 2025 : फलटण शहरातील एक प्रेरणादायी युवा चेहरा, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ठसा उमठवणारे शक्ती उर्फ अशोक भोसले यांचा वाढदिवस आज  मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मैदानावर चमकणारा खेळाडू, समाजासाठी झटणारा कार्यकर्ता आणि राजकारणात सेवा हेच ध्येय मानणारा नेता म्हणून त्यांची ओळख प्रस्थापित झाली आहे.

राजकारणात सेवा, क्रीडाक्षेत्रात गौरव

शक्ती भोसले हे माजी विधानपरिषदेचे सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे विश्वासू समर्थक असून, त्यांनी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. रघुनाथराजे आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे यांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवत, सकारात्मक राजकारणाचा मार्ग स्वीकारला आहे.

त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे, शक्ती भोसले यांना फलटण नगरपालिकेच्या भावी नगरसेवक पदासाठी उत्सुकता आणि पाठिंबा मिळत आहे.

🏏 क्रिकेटच्या मैदानातून समाजसेवेपर्यंतचा प्रवास

मुधोजी महाविद्यालयाचे क्रिकेट संघ नेते म्हणून त्यांचे योगदान लक्षणीय राहिले आहे. कोल्हापूर विद्यापीठाचे नेतृत्व करताना त्यांनी फलटणचे नाव अनेक वेळा उज्ज्वल केले. त्यांच्या मते, “खेळातून केवळ शरीरसंपदा नव्हे, तर नेतृत्वगुण, संघभावना आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव विकसित होते.”

🤝 तरुणांसाठी प्रेरणास्थान

त्यांचे वडील मुन्ना शेख हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे सक्रिय नेते आहेत. सामाजिक ऐक्य आणि कार्यकर्त्यांचा सन्मान हीच परंपरा शक्ती भोसले यांनी पुढे चालवली आहे.

शक्ती भोसले हे तरुणांच्या अडचणींवर थेट संवाद साधतात, तातडीने मदत करतात, आणि विकासाच्या नव्या कल्पना मांडतात. त्यांच्या कार्यशैलीत प्रामाणिकपणा, विचारात स्पष्टता आणि व्यक्तिमत्त्वात सौजन्य आहे.

🌟”एक हातात बॅट, दुसऱ्या हातात समाजसेवेची ज्योत”

शक्ती उर्फ अशोक भोसले यांचे आयुष्य म्हणजे जिद्द, आत्मविश्वास आणि सेवाभावाचे उत्तम उदाहरण. मैदानावरचा संयमी खेळाडू आणि समाजासाठी सतत झटणारा नेता म्हणून ते आज फलटणच्या नव्या पिढीचे मार्गदर्शक ठरले आहेत.

📍 शुभेच्छा कार्यक्रम –

स्थळ : माता भीमाईनगर, मंगळवार पेठ, फलटण
वेळ : सकाळी 11.00 वाजल्यापासून

प्रारूप मतदार यादीवर हरकत दाखल करताय? रहिवासी पुरावा सोबत जोडणं आवश्यक!

0
प्रारूप मतदार यादीवर हरकत दाखल करताय? रहिवासी पुरावा सोबत जोडणं आवश्यक!

फलटण :- फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकत व सूचना दाखल करताना नागरिकांनी आपल्या अर्जासोबत स्थळ पाहणीसाठी सक्षम रहिवासी पुरावा जोडणं अनिवार्य आहे, असं आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलं आहे.

प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांकडून हरकती दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असून, नगरपरिषदेचे प्रशासन त्या हरकतींवर जागेवर जाऊन पाहणी करणार आहे. मात्र, केवळ पुराव्यासह आलेल्या हरकतीच विचारात घेतल्या जातील व त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असंही जाधव यांनी स्पष्ट केलं.

हरकत दाखल करण्याची अंतिम मुदत – सोमवार, १३ ऑक्टोबर
नागरिकांनी ही अंतिम तारीख लक्षात ठेवून योग्य त्या पुराव्यांसह आपली हरकत वेळेत दाखल करावी, असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

फलटण शहरातील पोलीस प्रशासनात मोठा बदल!

0
फलटण शहरातील पोलीस प्रशासनात मोठा बदल!

फलटण प्रतिनिधी –फलटण शहर पोलीस ठाण्याच्या कार्यशैलीत मोठा फेरबदल होत असून, निष्क्रियतेचा ठपका लागलेले पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची अखेर तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.

गेल्या काही महिन्यांपासून शहरात वाढलेले अवैध धंदे, मटका-जुगार, चक्री व्यवसाय, आणि कायदा-सुव्यवस्थेचे बिघडलेले चित्र यामुळे नागरिक त्रस्त होते. विविध माध्यमांतून पोलीस निरीक्षक शाह यांच्यावर आरोप झाल्यानंतर ही बदली केल्याचे बोलले जात आहे.

सध्या नव्याने पदभार स्वीकारणारे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, त्यांच्यासमोर वाढती गुन्हेगारी, वाहतूक कोंडी, घरफोडी, छेडछाड व फसवणुकीसारख्या गंभीर गुन्ह्यांवर लगाम घालण्याचे मोठे आव्हान आहे.

शहरातील कायदा-सुव्यवस्थेला पूर्ववत करण्यासाठी व जनतेचा विश्वास परत मिळवण्यासाठी ही बदली ठरणार का प्रभावी, हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

‘आमच्या मित्राला…’ भारत दौऱ्यावर आलेल्या तालिबानच्या मंत्र्याने थेट पाकिस्तानला दिला इशारा, ‘खेळ खेळणं बंद करा, अन्यथा…’

0
‘आमच्या मित्राला…’ भारत दौऱ्यावर आलेल्या तालिबानच्या मंत्र्याने थेट पाकिस्तानला दिला इशारा, ‘खेळ खेळणं बंद करा, अन्यथा…’


लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांनी कित्येक वर्षं अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर केला आहे. याच भूमीवरुन त्यांनी अनेक दहशतवादी कृत्यं केली. परंतु तालिबानने गेल्या चार वर्षांत सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे, असा दावा तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी केला आहे. ते भारत दौऱ्यावर असून, त्यांनी पाकिस्तानला शांततेच्या मार्गाचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

“त्यांच्यापैकी एकही अफगाणिस्तानात नाही. अफगाणिस्तानात एक इंचही जमीन त्यांच्या नियंत्रणाखाली नाही. ज्या अफगाणिस्तानविरुद्ध आम्ही (224मध्ये) कारवाई केली होती तो आता बदलला आहे,” असं उत्तर त्यांनी पाकिस्तानी दहशतवादी गटांनी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून कारवाया केल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं. 

यावेळी त्यांनी पाकिस्तानला एक संदेशही दिला आहे. “शांततेसाठी अफगाणिस्तानने जसं केलं तशा प्रकारे इतर देशांनीही अशा दहशतवादी गटांविरुद्ध कारवाई करावी,” असं ते म्हणाले आहेत. 

मुत्ताकी यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्यांच्या भारत दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील राजकीय संबंध नव्याने प्रस्थापित होत आहेत. नवी दिल्ली आता काबूलमधील त्यांचे तांत्रिक मिशन अपग्रेड करेल, असे जयशंकर यांनी मुत्ताकी यांच्याशी झालेल्या भेटीत सांगितले. तसंच शेजारील देशाच्या प्रगतीत आम्हाला रस असल्याचं सांगितले.

पत्रकार परिषदेत मुत्ताकी यांनी काबूलमध्ये अलीकडेच झालेल्या बॉम्बस्फोटाच्या वृत्तांवरही भाष्य केले आणि पाकिस्तानवर हे कृत्य घडवून आणल्याचा आरोप केला. “सीमेजवळ दुर्गम भागात हल्ला झाला आहे. पाकिस्तानचे हे कृत्य आम्हाला चुकीचं वाटते. अशा प्रकारे समस्या सोडवता येत नाहीत. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. त्यांनी स्वतःहून त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. 40 वर्षांनंतर अफगाणिस्तानात शांतता आणि प्रगती आहे. कोणालाही त्यामुळे समस्या नसावी. अफगाणिस्तान आता एक स्वतंत्र राष्ट्र आहे. जर आपल्याकडे शांतता असेल तर लोकांना त्रास का होतो?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे.

अफगाणिस्तानच्या धाडसाची परीक्षा घेऊ नये असा इशाराही त्यांनी दिला आहे. “जर कोणाला हे करायचे असेल (अफगाणिस्तानला त्रास देऊ इच्छित असेल), तर त्यांनी सोव्हिएत युनियन, अमेरिका आणि नाटो यांना विचारावं. ते स्पष्ट करतील की अफगाणिस्तानशी खेळ खेळणं चांगलं नाही,” असं ते म्हणाले. काबुललाही इस्लामाबादशी चांगले संबंध हवे आहेत, परंतु ते एकतर्फी असू शकत नाहीत, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. 

भारताच्या संबंधांवर बोलताना त्यांनी अफगाणिस्तानात अलिकडेच झालेल्या भूकंपानंतर प्रथम प्रतिसाद देणाऱ्या भारत सरकारचे कौतुक केले. “अफगाणिस्तान भारताकडे जवळचा मित्र म्हणून पाहतो. अफगाणिस्तान परस्पर आदर, व्यापार आणि लोकांमधील संबंधांवर आधारित संबंध इच्छितो. आम्ही सामंजस्याची सल्लागार यंत्रणा तयार करण्यास तयार आहोत, जी आमचे संबंध मजबूत करण्यास मदत करेल,” असं त्यांनी सांगितलं आहे.

त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या अतिरिक्त शुल्काचाही उल्लेख केला आणि भारत आणि अफगाणिस्तानमध्ये अधिक सहकार्याची गरज असल्याचे सांगितले. भारत आणि अफगाणिस्तानने अमेरिकेसोबत संयुक्त चर्चा केली पाहिजे. आपण दोघांनीही या मार्गाचा वापर करणं आवश्यक आहे. आम्हाला व्यापाराचे महत्त्व समजते, जो वाढला आहे आणि सर्व व्यापार मार्ग खुले असले पाहिजेत. जर हा मार्ग बंद झाला तर त्याचा भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापारावर परिणाम होतो,” असं तालिबानच्या मंत्र्याने सांगितले.





Source link

Cancer Causing Food : शरीरात कॅन्सर ‘या’ 6 पदार्थांमुळे पसरतो, WHO चा इशारा, आता करा बंद नाहीतर…

0
Cancer Causing Food : शरीरात कॅन्सर ‘या’ 6 पदार्थांमुळे पसरतो, WHO चा इशारा, आता करा बंद नाहीतर…


 

Add Zee News as a Preferred Source

कर्करोग हा आज जगातील सर्वात गंभीर आजारांपैकी एक बनला आहे. कर्करोगात, शरीराच्या पेशी असामान्यपणे वाढू लागतात. वैज्ञानिक संशोधनातून असे दिसून आले आहे की 80 ते 90% कर्करोग बाह्य घटकांशी जोडलेले असतात. सर्वात मोठे दोषी आपली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी आहेत.

काही खाण्याच्या सवयी आणि पदार्थ कर्करोगाचा धोका वाढवू शकतात. उदाहरणार्थ, प्रक्रिया केलेले मांस, तळलेले आणि जळलेले पदार्थ, जास्त साखर आणि परिष्कृत कार्बोहायड्रेट्स आणि जास्त प्रमाणात जळलेले किंवा शिजवलेले पदार्थ खाल्ल्याने कर्करोगाचा धोका वाढतो.

जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) असा विश्वास आहे की दररोज खाल्लेल्या काही पदार्थांमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. चला कर्करोगाचा धोका वाढवणारे पदार्थ आणि त्यामागील वैज्ञानिक कारणे शोधूया.

मांसाहार पदार्थ 

WHO (संदर्भ) नुसार, प्रक्रिया केलेले मांस हे एक प्रकारचे मांस आहे जे जास्त काळ टिकण्यासाठी विविध घटकांसह मिसळले जाते. यामध्ये हॉट डॉग, सलामी, सॉसेज आणि बीफ जर्की सारखे मांस समाविष्ट आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की या पद्धती वापरून मांस जतन करताना कार्सिनोजेन्स तयार होतात. म्हणूनच प्रक्रिया केलेले मांस जास्त प्रमाणात सेवन केल्याने कोलन कर्करोग, पोटाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

तेलकट पदार्थ 

बटाट्यांसारखे पिष्टमय पदार्थ खूप जास्त तापमानात तळले जातात तेव्हा ते अ‍ॅक्रिलामाइड नावाचे हानिकारक रसायन तयार करतात. या पदार्थात डीएनए खराब करण्याची आणि पेशी नष्ट करण्याची क्षमता असते. फ्रेंच फ्राईज आणि बटाट्याच्या चिप्स सारख्या स्नॅक्समध्ये विशेषतः भरपूर प्रमाणात हे पदार्थ असतात. संशोधनानुसार, जास्त तळलेले पदार्थ केवळ कर्करोगाचा धोका वाढवत नाहीत तर लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या आजारांना देखील कारणीभूत ठरतात. हे दोन्ही रोग शरीरात जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण वाढवून कर्करोगाचा धोका वाढवतात.

अधिक शिजवलेले पदार्थ 

जेव्हा मांस किंवा पिष्टमय पदार्थ खूप जास्त तापमानात शिजवले जातात, जसे की बार्बेक्यू, ग्रिलिंग किंवा उच्च-तापमान पॅन-फ्रायिंग, हानिकारक कार्सिनोजेन्स (एचसीए आणि पीएएच) तयार होतात. ही रसायने पेशींच्या डीएनएला नुकसान करतात आणि हळूहळू कर्करोगाचा धोका वाढवू शकतात. बटाट्यांसारखे पदार्थ देखील जास्त शिजवलेले किंवा जाळले असता अ‍ॅक्रिलामाइड तयार करू शकतात. सुरक्षित राहण्यासाठी, उच्च-तापमानात तळण्याऐवजी कमी-तापमानात स्वयंपाक, वाफवणे, मंद स्वयंपाक किंवा प्रेशर कुकिंग वापरणे चांगले.

दुग्धजन्य पदार्थ ृ
दूध, दही आणि चीज सारखे दुग्धजन्य पदार्थ नेहमीच आरोग्यदायी मानले जातात, परंतु काही संशोधनातून असे दिसून आले आहे की जास्त प्रमाणात सेवन केल्याने प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढू शकतो. कारण दुग्धजन्य पदार्थ शरीरात IGF-1 (इंसुलिनसारखे वाढ घटक) पातळी वाढवतात. हे घटक प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशींची संख्या वाढविण्यास आणि त्यांच्या वाढीस गती देण्यास मदत करू शकते. जरी या विषयावर सर्व संशोधन सुसंगत नसले तरी, मर्यादित प्रमाणात दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे हा एक सुरक्षित पर्याय असू शकतो यावर तज्ञ सहमत आहेत.

गोड पदार्थ 

आजच्या आहारात साखर आणि रिफाइंड कार्ब्सचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये गोड पेये, केक, पेस्ट्री, पांढरी ब्रेड, पांढरा तांदूळ आणि डोनट्स सारखे पदार्थ समाविष्ट आहेत. या पदार्थांचे जास्त सेवन केल्याने लठ्ठपणा आणि टाइप २ मधुमेहाचा धोका वाढतो. या दोन्ही आजारांमुळे शरीरात जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण वाढतो, ज्यामुळे कर्करोगाचा धोका देखील वाढू शकतो. विशेषतः महिलांमध्ये, मधुमेह आणि लठ्ठपणा स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका दुप्पट करतो. म्हणूनच तज्ञ साखर आणि रिफाइंड कार्ब्सऐवजी संपूर्ण धान्य, तपकिरी तांदूळ, ओट्स आणि फळे आणि भाज्या वापरण्याची शिफारस करतात.

अल्कोहोल 
मद्यपान केल्यावर, शरीर अल्कोहोलचे रूपांतर एसीटाल्डिहाइड नावाच्या रसायनात करते, जे एक कार्सिनोजेन आहे. हे डीएनएला नुकसान पोहोचवते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते, ज्यामुळे कर्करोग निर्माण करणाऱ्या पेशींशी लढण्याची क्षमता कमी होते. अल्कोहोल, विशेषतः महिलांमध्ये, इस्ट्रोजेनची पातळी वाढवते, ज्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. नियमित मद्यपान करणाऱ्यांना यकृताचा कर्करोग, तोंड आणि घशाचा कर्करोग आणि पचनसंस्थेच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link