फलटण नगराध्यक्षपद ‘सर्वसाधारण खुला’; निवडणूक चुरशीची होणार!

0
15
फलटण नगराध्यक्षपद ‘सर्वसाधारण खुला’; निवडणूक चुरशीची होणार!

फलटण (06 ऑक्टोबर 2025): मुंबईतील मंत्रालयात आज पार पडलेल्या आरक्षण सोडतीत फलटण नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी ‘सर्वसाधारण खुला’ प्रवर्ग जाहीर करण्यात आला. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत पार पडली. या निर्णयामुळे आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची आणि हायप्रोफाईल होणार, असा राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे.

नगराध्यक्षपद खुले झाल्याने अनेक मातब्बर नेते आणि इच्छुक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये राजे गटाकडून युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. तर भाजपा-महायुतीकडून समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि दिलीपसिंह भोसले ही नावे चर्चेत आहेत. सर्वसाधारण प्रवर्ग असल्यामुळे कोणत्याही बळकट महिला उमेदवारालाही संधी मिळू शकते.

🔸 राज्यातील २२६ नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर

आज पार पडलेल्या आरक्षण सोडतीमध्ये राज्यातील एकूण २२६ नगरपरिषद व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. अनुसूचित जाती महिला, इतर मागासवर्गीय (ओबीसी), आणि सर्वसाधारण महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर अध्यक्षपदे आरक्षित करण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे, एकूण ५०% जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

या आरक्षण प्रक्रियेमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना गती मिळणार असून, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

फलटण नगराध्यक्षपद ‘सर्वसाधारण खुला’ • स्पर्धा वाढणार अनिकेतराजे, समशेरसिंह, दिलीपसिंह यांची नावे चर्चेत राज्यातील ५०% अध्यक्षपदे महिलांसाठी आरक्षित २२६ नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या निवडणुकीस मार्ग मोकळा