- Marathi News
- Opinion
- Inactivity: The Unconventional Climate Change Solution | Reduce Greenhouse Gases
प्रा. चेतनसिंह सोळंकी, आयआयटी बॉम्बेत प्राध्यापक, संस्थापक, एनर्जी स्वराज फाउंडेशन19 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
तापमान वाढू लागते तेव्हा सर्वत्र झाडे लावा, हिरवळवाढवा, तेव्हाच उष्णता कमी होईल, ही चर्चा सुरू होते. हा विचार काही अंशी बरोबर आहे.पण पूर्ण सत्य नाही. आज आपण असह्य उष्णताअनुभवत आहोत. तिचे मुख्य कारण झाडतोड नाही, तरत्या हरितगृह वायू आहेत. ते आपण सतत आपल्यावातावरणात सोडत आहोत. हे वायू एका चादरीसारखेपृथ्वीला झाकून टाकतात आणि सूर्याची उष्णता बाहेरजाऊ देत नाहीत.
आज वातावरणातील कार्बन डायऑक् साइडचे प्रमाणसामान्य पातळीपेक्षा सुमारे ५३ टक्के अधिक आहे. याचाअर्थ पृथ्वीची उष्णता अडकवून ठेवण्याची क्षमता ५३टक्क्यांनी वाढली आहे. या अतिरिक्त उष्णतेमुळे पृथ्वीचेतापमान सतत वाढत आहे. सध्या या अतिरिक्त उष्णतेचेसर्वात मोठे कारण म्हणजे आपला ऊर्जेचा वापर, त्यातपेट्रोल, डिझेल, गॅस, वीज आणि रोजच्या वापरातीलवस्तूंचा समावेश आहे. सध्याच्या काळात एकूण कार्बनउत्सर्जनापैकी सुमारे ७५ टक्के हिस्सा याचाच आहे.जमिनीच्या वापरातील बदल, शेती आणि जंगलतोडयामुळेही कार्बन उत्सर्जन होते, पण हे सर्व मिळून सुमारे२५ टक्के असते. या २५ टक्क्यांमध्येही झाडांच्या तोडीमुळेहोणारे कार्बन उत्सर्जन फक्त सुमारे १० टक्केच आहे.
याचा सरळ अर्थ असा आहे की समस्येचा मोठा भागआपली जीवनशैली व उपभोगाशी जोडलेला आहे. हीचती जागा आहे. तेथे आपण वैयक्तिक, सामाजिक आणिराजकीय पातळीवर चूक करतो. झाडे लावणे निश्चितचआवश्यक आहे. पण ताे हवामान बदलावरील मूळ उपायनाही. आपला उपभोग असाच वाढत राहिला, तरकोट्यवधी अब्जावधी झाडेही ही समस्या संतुलित करूशकणार नाहीत.
आपल्याला एक अस्वस्थ करणारे, पण आवश्यक सत्यस्वीकारावे लागेल— आज मानवजात पृथ्वीच्याक्षमतेपेक्षा खूप जास्त संसाधनांचा वापर करत आहे.आपण असे जगत आहोत. जणू आपल्या जवळएकापेक्षा अधिक पृथ्वी आहेतय पण प्रत्यक्षात फक्तएकच आहे. या परिस्थितीत सर्वात पहिले आणि सर्वातप्रभावी पाऊल काय असू शकते? आपल्याला आपल्याऊर्जा आणि वस्तूंच्या वापरात जवळपास अर्धी कपातकरावी लागेल. आपल्या गरजा, इच्छांमध्ये संतुलननिर्माण करत नाही, तोपर्यंत कोणतीही मोहीमकायमस्वरूपी फलद्रुप होऊ शकत नाही. दुर्दैवानेसरकारांचा प्रत्येक प्रयत्न आणि कंपन्यांची प्रत्येकजाहिरात तुम्हाला जास्तीत जास्त उपभोगासाठी प्रोत्साहितकरते, आणि तुम्ही त्या दुष्टचक्रात अडकता. आपणअनेकदा म्हणतो— प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगलाअसतो. हवामान बदलाच्या संदर्भात ही गोष्ट आणखीअचूक ठरते. झाडे लावणे, सोलर पॅनल लावणे किंवाइलेक्ट्रिक वाहन स्वीकारणे— हे सर्व उपचाराचेकौतुकास्पद प्रयत्न आहेत. पण प्रतिबंध म्हणजेअनावश्यक उपभोग कमी करणे. ही बाब पूर्णपणे आपल्यास्वतःच्या निर्णयांवर अवलंबून आहे. आपण काय खरेदीकरतो, किती वापरतो, आणि काय सोडू शकतो— हेचमहत्त्वाचे आहे. हवामान सुधारासाठी सर्वात मोठे पाऊलम्हणजे इन-ॲक्टव्हिटी, म्हणजेच काही न करणे. याचाअर्थ अनावश्यक गोष्टी न खरेदी करणे, न वापरणे. याचापरिणाम खूप मोठा आहे. आपण आजही थांबलो नाही,तर इतिहास आपल्यालाही ‘एक हाेता डायनासोर..’यासारखे लक्षात ठेवेल. अनेक वर्षांनंतर पृथ्वीवर एकनवी प्रजाती येईल आणि म्हणेल, एकेकाळी पृथ्वीवरमाणसे राहत होती!
(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)





