Thursday, August 6, 2026
Home Blog Page 616

Mumbai Fire: मुंबईतील अंधेरी येथील निवासी इमारतीला आग; वृद्ध व्यक्तीचा होरपळून मृत्यू

0
Mumbai Fire: मुंबईतील अंधेरी येथील निवासी इमारतीला आग; वृद्ध व्यक्तीचा होरपळून मृत्यू


Mumbai Fire News: मुंबईतील अंधेरी येथील एका निवासी इमारतीच्या १३ व्या मजल्यावर सोमवारी रात्री भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाने या आगीला लेव्हल-II असे घोषित केले असून या घटनेत एका वृद्ध व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती दिली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून आगीचे नेमके कारण शोधले जात आहे.



Source link

AI मुळे १९ वर्षांपूर्वीच्या मर्डर मिस्ट्रीचं गुढ उकललं! अविवाहित आई जुळ्या मुलांची निर्घृणपणे करण्यात आली होती हत्या

0
AI मुळे १९ वर्षांपूर्वीच्या मर्डर मिस्ट्रीचं गुढ उकललं! अविवाहित आई जुळ्या मुलांची निर्घृणपणे करण्यात आली होती हत्या


AI Solve Murder Case : अविवाहित आई आणि तिच्या जुळ्या मुलांच्या हत्या  प्रकरणात लष्कराकच्या  दोन जवानांना अटक करण्यात आली आहे. हे हत्याकांड १९ वर्षांपूर्वी घडलं असून एआयमुळे या खुनाला वाचा फुटली आहे. पोलिसांनी एआयची मदत घेत या प्रकरणाचा छडा लावला. ही घटना केरळमधील कोल्लम येथील आहे. 



Source link

OTT Releases : जानेवारीचा दुसरा आठवडा मनोरंजनाचा! पाहा या आठवड्यात ओटीटीवर काय काय रिलीज होणार…

0
OTT Releases : जानेवारीचा दुसरा आठवडा मनोरंजनाचा! पाहा या आठवड्यात ओटीटीवर काय काय रिलीज होणार…


OTT Releases This Week : जानेवारीचा दुसरा आठवडा सिनेरसिकांसाठी अतिशय मनोरंजक असणार आहे. ६ जानेवारी ते १२ जानेवारी या कालावधीत नवे चित्रपट आणि वेब सीरिज चित्रपटगृहात तसेच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. एकीकडे सोनू सूदचा ‘फतेह’ आणि राम चरण आणि कियारा अडवाणीचा ‘गेम चेंजर’ चित्रपटगृहात धडकणार आहेत. तर, दुसरीकडे ओटीटीवर दोन नवे रिअॅलिटी शो, एक वेब सीरिज आणि एक चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चला एक नजर टाकुया या यादीवर… 



Source link

Pune Mumbai Expressway: आता २ तास आधीच पुण्याहून नवी मुंबई विमानतळावर पोहोचणार, ‘या’ रस्ताचं काम ९० टक्के पूर्ण

0
Pune Mumbai Expressway: आता २ तास आधीच पुण्याहून नवी मुंबई विमानतळावर पोहोचणार, ‘या’ रस्ताचं काम ९० टक्के पूर्ण


Pune to Navi Mumbai Travel Time: पुणे ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले असून आता पुण्याहून मुंबई गाठण्यासाठी लागणाऱ्या वेळत अर्ध्या तासाचे अंतर कमी होणार आहे. एवढेच नव्हेतर, या रस्त्यामुळे प्रवासी दोन तास आधीच पुण्याहून मुंबई विमानतळावर पोहोचतील. पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडमुळे प्रवाशांचा भरपूर वेळ वाचणार आहे.



Source link

Sana Khan : अभिनेत्री सना खानच्या घरी दुसऱ्यांदा हलला पाळणा! व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज

0
Sana Khan : अभिनेत्री सना खानच्या घरी दुसऱ्यांदा हलला पाळणा! व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज


Sana Khan Second Baby : सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बिग बॉस ६’ची स्पर्धक सना खान दुसऱ्यांदा आई झाली आहे. सना आणि तिचा पती अनस सय्यद यांनी त्यांच्या मुलाच्या आगमनानंतर सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. सनाने तिच्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलवर ही माहिती दिली. सना आणि अनस आधीपासूनच एका मुलाचे, सय्यद तारिक जमीलचे पालक आहेत. आता त्यांनी आणखी एका मुलाचे स्वागत केले आहे.



Source link

वडिलांसोबत शाळेत जात असतांना काळाची झडप ! पुणे जिल्ह्यातील शिक्रापुर येथे भीषण अपघातात २ मुलांसह वडिलांचा मृत्यू

0
वडिलांसोबत शाळेत जात असतांना काळाची झडप ! पुणे जिल्ह्यातील शिक्रापुर येथे भीषण अपघातात २ मुलांसह वडिलांचा मृत्यू


Shikrapur Accident : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे दुचाकी आणि डंपरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन चिमुकल्यांसह त्यांच्या वडिलांचा करुण मृत्यू झाला आहे. ही घटना शिक्रापूर चाकण मार्गावर पिंपळे जगताप या गावाजवळ घडली आहे. बाप लेकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हलहळ व्यक्त केली जात आहे.



Source link

Bipasha Basu Birthday : सावळी म्हणून अनेकांनी हिणवलं, बॉलिवूड गाजवून बिपाशा बसूनं सगळ्यांनाच गप्प केलं!

0
Bipasha Basu Birthday : सावळी म्हणून अनेकांनी हिणवलं, बॉलिवूड गाजवून बिपाशा बसूनं सगळ्यांनाच गप्प केलं!


Happy Birthday Bipasha Basu : बॉलिवूडच्या सुंदर सुंदरींपैकी एक असलेल्या बिपाशा बसूचा आज वाढदिवस आहे. तिचा जन्म ७ जानेवारी १९७९ रोजी दिल्लीत झाला. मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या बिपाशाला चित्रपटात येण्यापूर्वी डॉक्टर व्हायचे होते. बिपाशाने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला डॉक्टर बनायचे होते पण ती मॉडेलिंगच्या जगात आली आणि तिचे शिक्षण पूर्ण करू शकली नाही. तिच्या सावळ्या रंगामुळे बिपाशाला लहानपणी लोकांकडून खूप टोमणे ऐकावे लागले होते. 



Source link

भारतीय भूमीत दडलीयेत कैक रहस्य; तामिळनाडूत 3200 वर्षांपूर्वीचे पुरावे समोर आल्यानं सारे अवाक्, पाहा…

0
भारतीय भूमीत दडलीयेत कैक रहस्य; तामिळनाडूत 3200 वर्षांपूर्वीचे पुरावे समोर आल्यानं सारे अवाक्, पाहा…


Tamil Nadu Artifacts: हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात असणारी मानवी संस्कृती नेमकी कशी होती, या संस्कृतीची वैशिष्ट्य नेमकी काय होती इथपासून या संस्कृतीचे अनेक पुरावे मागील काही वर्षांमध्ये झालेल्या उत्खननातून समोर आले. त्यातच आता आणखी काही पुराव्यांची भर पडली आहे. जिथं, सिंधुच्या खोऱ्याच असणाऱ्या संस्कृतीसंदर्भातील अनेक धागेदोरे हाती लागले असल्याचा तर्क वर्तवला जात आहे.

तामिळनाडू पुरातत्वं विभागानं केलेल्या एका निरीक्षणपर अध्ययनातून समोर आलेल्या माहितीनुसार जवळपास 90 टक्के भित्तीचित्र सिंधुच्या खोऱ्यातील संस्कृतीशी मिळतीजुळती आहेत. यासंशोधनामुळं भारतातील गतकाळातील इतिहासाची उकल आणखी सखोल पद्धतीनं होत आहे हेच म्हणावं लागेल. 

तामिळनाडूच्या तुत्तुक्कुडी जिल्ह्यातील शिवगलाई इथं हे खोदकाम करण्यात आलंय जिथं उत्खननातून 700 हून अधिक असामान्य कलाकृती समोर आल्या. यामध्ये गोमेद, काळ्या आणि लाल रंगांची भांडी, मातीपासून तयार करण्यात आलेलं सूत कातण्याचं उपकरण, इंद्रगोप मनका, काचेच्या बांगड्या, शंख अशा गोष्टींचा समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या उत्खननामध्ये जमिनीत पुरले गेलेले 120 कलश सापडले असून, यामध्ये धान्याचा भुसा सापडला असून, कार्बन डेटिंगच्या माध्यमातून हे सर्व पुरावे साधारण 3200 वर्षांपूर्वीचे असल्याचं सांगितलं जात आहे. 

पुरावे आणि सिंधू संस्कृतीतील साम्य… 

सदर उत्खननातून करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार 140 पुरातत्वं क्षेत्रांतून मिळालेल्या 15500 भित्तीचित्रयुक्त भांड्यांचं डिजिटलीकरण करण्यात आलं. यामध्ये तुलनात्मक निरीक्षणातून असे संकेत मिळत आहेत की, सिंधूच्या खोऱ्यातील संस्कृती आणि दक्षिण भारतातील लोहयुगीन वस्त्यांमध्ये सांस्कृतिक आणि आर्थिक देवाणघेवाण झाली असाली. हे पुरावे पूर्णपणे सिद्ध झाले नसले तरीही शोध मात्र त्याच दिशेनं खुणावतो आहे. 

शिवगलाई इथं सापडलेल्या वस्तू आणि त्यातून केल्या जाणाऱ्या विश्लेषणानुसार ही संस्कृती अत्यंत प्राचीन असण्यासोबतच त्यामध्ये उन्नत तंत्रज्ञान आणि कलात्मक विकासही जोडला गेला होता. शिवाय या संस्कृतीचा इतर संस्कृतींशी संवादपर संबंधही येत होता. 





Source link

पुरुषांसोबत ठेवायचा संबंध, मन भरल्यावर ११ जणांची केली हत्या, मृतदेहावर लिहायचा ‘धोकेबाज’, ‘गे’ किलरची धक्कादायक कहाणी

0
पुरुषांसोबत ठेवायचा संबंध, मन भरल्यावर ११ जणांची केली हत्या, मृतदेहावर लिहायचा ‘धोकेबाज’, ‘गे’ किलरची धक्कादायक कहाणी


Punjab Crime Gay serial killer : तुम्ही अनेक भयानक, रानटी गुन्हेगारांच्या गोष्टी ऐकल्या असतील. त्यांच्या अनेक क्रूर गोष्टी देखील तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, पंजाबमध्ये पोलिसांनी एका क्रूर गे सीरियल किलरला अटक केली आहे. या ‘गे’ किलरने तब्बल ११ जणांसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवून त्यांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. हत्या केल्यानंर आरोपी हा त्यांची माफी मागून त्यांच्या अंगावर ‘धोकेबाज’ लिहायचा.



Source link

Maharashtra Weather Update : पुण्यात थंडीचा कडाका वाढला!राज्यात तापमानात होणार घट, IMD ने काय दिला इशारा ?

0
Maharashtra Weather Update : पुण्यात थंडीचा कडाका वाढला!राज्यात तापमानात होणार घट, IMD ने काय दिला इशारा ?


Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा थंडीचा जोर वाढू लागला आहे. वाऱ्याची चक्राकार दिशा आणि अरबी समुद्रात आर्द्रता वाढत असल्याने तापमानात घट झाली आहे. किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने ही घट झाली आहे. त्यात राज्यावर चक्राकार वारे देखील सक्रिय झाले असून महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जिल्ह्यात किमान तापमानात १-२ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील काही दिवसांनत राज्यातील तापमान आणखी घट होणार असून ३-४ अंशांनी किमान तापमानात कमी होण्याची शक्यता हे.



Source link