Thursday, August 6, 2026
Home Blog Page 615

Cabinet Decisions: १ एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी FASTag अनिवार्य, फास्ट टॅग स्टिकर ऑनलाईन किंवा ऑफलाईन कसं घ्यायचं? वाचा

0
Cabinet Decisions: १ एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी FASTag अनिवार्य, फास्ट टॅग स्टिकर ऑनलाईन किंवा ऑफलाईन कसं घ्यायचं? वाचा


Fastag Mandatory for All Vehicles : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात राज्य सरकारने मोठा निर्णय घेत १ एप्रिल २०२५ पासून सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग (Fastag Sticker) सक्तीचे केले आहे. टोलनाका पार करण्यासाठी सर्व वाहनांवर फास्ट टॅग लावणे अनिवार्य झाले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता टोलनाक्यावरील वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत मिळणार आहे. राज्यातील चारचाकी वाहनधारकांसाठी हा खूप मोठा निर्णय आहे. 



Source link

लवकरच लागू होणार आठवा वेतन आयोग? आगामी अर्थसंकल्पात घोषणेची शक्यता

0
लवकरच लागू होणार आठवा वेतन आयोग? आगामी अर्थसंकल्पात घोषणेची शक्यता



8th Pay Commission: 8 व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसंदर्भात एक नवीन अपडेट समोर येत आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केंद्रीय कर्मचारी संघटनेने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे. 



Source link

असं काय घडलं की स्वतःच्या मुलाच्या लग्नपत्रिकेत रमेश भाटकर यांचं नाव टाकलं गेलं नाही? वाचा किस्सा

0
असं काय घडलं की स्वतःच्या मुलाच्या लग्नपत्रिकेत रमेश भाटकर यांचं नाव टाकलं गेलं नाही? वाचा किस्सा


Actor Ramesh Bhatkar : रमेश भाटकर हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक अत्यंत प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेता होते. त्यांच्या अभिनयाची खास शैली आणि विविध भूमिकांमुळे ते प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय झाले. ‘माहेरची माणसे’, ‘दुनिया करी सलाम’, ‘अष्टविनायक’, ‘हॅलो इन्स्पेक्टर’, ‘दामिनी’, ‘कमांडर’ आणि इतर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या, ज्या खूप गाजल्या. त्यांच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पडली होती. पण, त्यांच्या करकीर्दीदरम्यान त्यांच्यावर एक गंभीर आरोप झाला होता, ज्यामुळे त्यांच्या आणि कुटुंबाच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. इतकंच काय तर, त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या पत्रिकेवर बापाचं नाव देखील लावण्यात आलं नाही.



Source link

Mumbai: गुपचूप पाठीमागून आला अन् तरुणीचे केस कापून पळून गेला; मुंबईतील दादर येथील घटना, गुन्हा दाखल

0
Mumbai: गुपचूप पाठीमागून आला अन् तरुणीचे केस कापून पळून गेला; मुंबईतील दादर येथील घटना, गुन्हा दाखल


Mumbai News: मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर अज्ञात व्यक्तीने महाविद्यालयीन तरुणाचे केस कापून पळ काढल्याची संतापजनक घटना सोमवारी घडली. या घटनेने २०१७ च्या चोटी कटवाच्या भीतीच्या आठवणींना उजाळा दिला, ज्याने हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानसह उत्तर भागातील महिलांमध्ये दहशत पसरवली होती. या भागांत महिलांचे केस कापल्याची अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या.



Source link

Delhi Elections : दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा; ईव्हीएमवरील संशयावर काय म्हणाले निवडणूक आयुक्त?

0
Delhi Elections : दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा; ईव्हीएमवरील संशयावर काय म्हणाले निवडणूक आयुक्त?


आम आदमी पक्षाच्या आरोपांना उत्तरं 

राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षाच्या आरोपांनाही उत्तरं दिली. मतदार यादीतून नावं वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी खोडून काढला. मतदार यादीतून नावं वगळताना किंवा त्यात भर घालताना योग्य ती प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडण्यात आली असून, कोणत्याही प्रकारच्या फेरफाराला वाव नाही, असं राजीव कुमार यांनी सांगितलं.

‘मतदार यादीच्या घोळाविषयीच्या चर्चा अजूनही सुरू आहेत. मात्र या प्रक्रियेत सुमारे ७० पायऱ्या आहेत… मतदार यादी, निवडणूक प्रक्रिया, ईव्हीएम, मतदान केंद्रे, फॉर्म १७ (सी) आणि मतमोजणी केंद्रे, जिथं राजकीय पक्ष आणि उमेदवार आमच्यासोबत उपस्थित असतात. जेव्हा जेव्हा मतदार याद्या तयार होतात, नियमित बैठका घेतल्या जातात, फॉर्म ६ शिवाय ते होऊ शकत नाही, प्रत्येक भागाला बीएलए नियुक्त करण्याचा अधिकार आहे. जे काही दावे आणि आक्षेप घेतले जातात, ते एकाच वेळी प्रत्येक राजकीय पक्षाला दिले जातात; मसुदा संकेतस्थळावर टाकला जातो. जोपर्यंत फॉर्म ७ तयार होत नाही, तोपर्यंत डिलीट करणं शक्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.



Source link

Thane: ठाण्यात महिलांची दादागिरी; पाळीव कुत्रा भुंकल्यानं मालकाला घरात घुसून मारलं, गुन्हा दाखल

0
Thane: ठाण्यात महिलांची दादागिरी; पाळीव कुत्रा भुंकल्यानं मालकाला घरात घुसून मारलं, गुन्हा दाखल


Thane News: ठाण्यात रविवारी रात्री धक्कादायक घटना घडली. कुत्रा भुंकला म्हणून महिलांनी त्याच्या मालकाला घरात घुसून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. पीडित व्यक्तीच्या फिर्यादीवरून १० महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ठाणे पोलीस अधिक तपास करीत आहेत.



Source link

Jui Gadkari: जुई गडकरीच्या फोटाचा गैरवापर, संताप व्यक्त करत म्हणाली “असे दुसऱ्याचे फोटो…”

0
Jui Gadkari: जुई गडकरीच्या फोटाचा गैरवापर, संताप व्यक्त करत म्हणाली “असे दुसऱ्याचे फोटो…”


आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गैरवापर कसा केला जाऊ शकतो याचे एक उदाहरण म्हणजे डीप फेक टेक्नॉलॉजी. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एखाद्या व्हिडीओमध्ये दुसऱ्या व्यक्तीचा हुबेहुब चेहरा आणि आवाज बदलण्याचटा चमत्कार करता येतो. सर्वसामान्य माणसांना हे व्हिडीओ आणि फोटो खरे वाटू लागले आहेत. ‘एआय’चा अनेक क्षेत्रात सदुपयोग आहे, पण अनेकजण या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापरही करताना दिसून येतात. अभिनेत्री जुई गडकरी या डीप फेक टेक्नॉलॉजीची शिकार झाली आहे. तिने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली आहे.



Source link

Nithin Kamath Net Worth: एकेकाळी महिन्याला 8 हजार कमवणारा कसा बनला 394320000000 रुपयांचा मालक

0
Nithin Kamath Net Worth: एकेकाळी महिन्याला 8 हजार कमवणारा कसा बनला 394320000000 रुपयांचा मालक


Nithin Kamath Net Worth: अलिकडच्या काही वर्षांमध्ये भारतीय उद्योजकांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामध्ये नितीन कामथ यांच्यासह अनेक मोठ-मोठ्या उद्योजकांचा समावेश आहे. अशातच आता नितीथ कामथ हे सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. कोण आहेत नितीन कामथ आणि त्यांची नेटवर्थ किती? जाणून घ्या सविस्तर 

कोण आहेत नितीन कामथ? 

नितीन कामथ यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1979 रोजी कर्नाटकातील शिमोगा येथे झाला आहे. त्यांचे वडील हे कॅनरा बँकेत एक्झिक्युटिव्ह होते. 1996 मध्ये त्यांनी बंगलोर येथे स्थायिक होण्यापूर्वी भारतभर प्रवास केला. जिथे त्यांनी त्यांचे माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 17 व्या वर्षी स्टॉक मार्केटमध्ये व्यापार करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी काही दिवसांनंतर कॉल सेंटरमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या भावासोबत 2010 मध्ये झिरोधाची स्थापना केली. 

नितीन कामथ यांची नेटवर्थ 

मार्च 2022 ला झिरोधाचा महसूल 82 टक्क्यांनी वाढला. तसेच या कालावधीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 87 टक्क्यांनी वाढ झाली. परिणामी झिरोधाचे सह-संस्थापक नितीन कामत आणि निखिल कामत यांनी अधिकृतपणे 2023 च्या फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. नितीन कामथ भारतातील 1104 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

नितीन यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत त्यांच्या झिरोधा कंपनीच्या भांडवलातून आहे. फोर्ब्स इंडियाच्या मते नितीन कामथ यांची एकूण संपत्ती 2023 पर्यंत 2.7 अब्ज डॉलर असल्याचा अंदाज आहे. तर 2025 मध्ये नितीन कामथ यांची नेटवर्थ 460 कोटी अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 39432 कोटी 09 लाख 30 हजार रुपये इतकी नेटवर्थ आहे. 

 
अंबानींशी स्पर्धा

झिरोधाने AMC व्यवसायासाठी संपत्ती व्यवस्थापन कंपनी Smallcase सोबत हातमिळवणी केलीये. या व्यवसायात भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्याशी स्पर्धा केली आहे. मुकेश अंबानी यांची कंपनी Jio Financial Services ने जगातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी 
BlackRock सोबत हातमिळवणी केली आहे.





Source link

नाशिक हादरले! घरात मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असतांना आई वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन्…

0
नाशिक हादरले! घरात मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असतांना आई वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन्…


Nashik News : नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील झाडाला एका महिलेने गळफास घेत जीवन संपवलं होतं. ही घटना ताजी असतांना आता एका जोडप्याने राहत्या घरी विष प्राशन करून जिवन संपवलं आहे. विशेष म्हणजे या जोडप्याच्या मुलाची लग्नाची तयारी घरी सुरू होती. मात्र, त्या पूर्वीच दोघांनी जिवन संपवलं आहे. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं हे समजू शकले नाही.



Source link

राजकारणाने जातीत विष पेरले: माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे

0
राजकारणाने जातीत विष पेरले: माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे


‘पूर्वी ग्रामीण भागात जातींचा उल्लेख सहजतेने व्हायचा. त्यात कुणालाही वाईट वाटत नव्हते. नात्यांमध्ये सहजता आणि नैसर्गिकता होती. गुण्यागोविंदाने सुरू असलेल्या या नात्यांत विष पेरण्याचे काम राजकारणाने केले’, अशी खंत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनी व्यक्त केली.



Source link