Thursday, August 6, 2026
Home Blog Page 614

दादरच्या भाजी विक्रेत्याने कसा उघडकीस आणला टोरेस ज्वेलर्स फसवणूक घोटाळा? गुंतवले होते तब्बल ४ कोटी

0
दादरच्या भाजी विक्रेत्याने कसा उघडकीस आणला टोरेस ज्वेलर्स फसवणूक घोटाळा? गुंतवले होते तब्बल ४ कोटी


Torres Company Scam : मुंबईत लवकरच श्रीमंत होण्याच्या नादात तब्बल ३ लाख मुंबईकरांना तब्बल ३ हजार कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीच्या तिघांना अटक करण्यात आली आहे. यात एका रशियन व्यक्तिचा समावेश आहे. या कंपनीत अनेकांनी आपली जमापुंजी गुंतवली. अनेकांना २०० ते ५०० रुपयांचे हीरे ७ हजारांचे असल्याचे सांगून परतावा दिल्याच्या बहाण्याने फसवलं. हा सर्व फसवणुकीचा प्रकार दादर येथील एका भाजीपाला विक्रेत्याने उघडकीस आणला आहे. या व्यक्तिने तब्बल ४ कोटी रुपयांची गुंतवणूक या कंपनीत केली होती.



Source link

पुण्यातील आयटी कंपनीत थरार! सहकारी तरुणीला पार्किंगमध्ये गाठले आणि चाकूने वार करून संपवले!

0
पुण्यातील आयटी कंपनीत थरार! सहकारी तरुणीला पार्किंगमध्ये गाठले आणि चाकूने वार करून संपवले!


Pune Yerwada Crime news : पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. त्यात कोयता गँगने उच्छाद मांडला आहे. मंगळवारी पुण्यातील येरवडा येथील प्रसिद्ध आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये एका तरुणीवर किरकोळ कारणावरून कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेत या तरुणीचा मृत्यू झाला आहे. कंपनीच्या आवारात ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.



Source link

Entertainment News in Marathi Live: सलमान खानची बाल्कनीही झाली बुलेटप्रूफ! पण चाहते झाले निराश, आता भाईजानची झलक मिळणंही मुश्कील

0
Entertainment News in Marathi Live: सलमान खानची बाल्कनीही झाली बुलेटप्रूफ! पण चाहते झाले निराश, आता भाईजानची झलक मिळणंही मुश्कील


सलमान खानची बाल्कनीही झाली बुलेटप्रूफ! पण चाहते झाले निराश, आता भाईजानची झलक मिळणंही मुश्कील

सलमान खानची बाल्कनीही झाली बुलेटप्रूफ! पण चाहते झाले निराश, आता भाईजानची झलक मिळणंही मुश्कील
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Wed, 08 Jan 202503:22 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: सलमान खानची बाल्कनीही झाली बुलेटप्रूफ! पण चाहते झाले निराश, आता भाईजानची झलक मिळणंही मुश्कील

  • Salman Khan House Security : आता सलमान खानच्या घराला कोणी टार्गेट केलं, तरी त्याच्या घराच्या भिंतींचंही नुकसान होणार नाही. जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर आता त्याच्या घरात सुरक्षेच्या दृष्टीने अनेक बदल करण्यात आले आहेत.


Read the full story here





Source link

मूल होत नसल्यानं नवरा-बायकोनं उचललं टोकाचं पाऊल! लग्नाच्या वाढदिवशी नवे कपडे घालून घेतला गळफास

0
मूल होत नसल्यानं नवरा-बायकोनं उचललं टोकाचं पाऊल! लग्नाच्या वाढदिवशी नवे कपडे घालून घेतला गळफास


Nagpur Married Couple Suicide : नागपूर एका धक्कादायक घटनेने हादरले आहे. एका जोडप्याला लग्नाला अनेक वर्ष होऊन देखील मूल होत नसल्याने नवरा बायकोने टोकाचं पाऊल उचललं आहे. दोघांनी लग्नाच्या वाढदिवसादिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्या पूर्वी त्यांनी व्हिडिओ देखील काढला आहे. सोमवारी रात्री ही घटना शहरातील जरीपटका भागात मार्टिन नगरमध्ये घडली असून या मुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



Source link

पौष पौर्णिमेनिमित्त कोंढाणे बौद्ध लेणी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन

0
पौष पौर्णिमेनिमित्त कोंढाणे बौद्ध लेणी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन

फलटण :- भारतीय बौद्ध महासभा, कर्जत शाखा यांच्या वतीने पौष पौर्णिमेच्या निमित्ताने १३ जानेवारी २०२५ रोजी (सोमवार) सकाळी १०:३० वाजता कोंढाणे बौद्ध लेणी येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण:

सुत्त पठण: बौद्ध वंदनेचा विशेष सत्र.

मार्गदर्शन: सुप्रसिद्ध लेणी स्थापत्यकला आणि शिल्पकला अभ्यासक सुरज रतन जगताप सर (मुंबई) यांचे सखोल मार्गदर्शन.

सर्वांचे आवाहन: धम्म बांधव आणि उपासक-उपासिकांनी सफेद वस्त्र परिधान करून उपस्थित रहावे.

आयोजक:
भारतीय बौद्ध महासभा, शाखा कर्जत, विभाग क्र. ९
(स्थापक अध्यक्ष: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय सरक्षक: महाउपासिका मीराताई आंबेडकर)

कार्यक्रमाचे उद्दिष्ट:
या ऐतिहासिक लेण्यांच्या स्थापत्यकलेचा अभ्यास व बौद्ध धम्म विचारांचा प्रचार करणे. लेणीतील शिल्पकलेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे आणि धम्म बांधवांना एकत्र आणून धम्म वंदनेत सहभागी करून घेणे.

धम्म बांधवांना आवाहन:
पौष पौर्णिमेच्या पवित्र दिवशी लेण्याच्या पायथ्याशी येऊन धम्म विचारांचा प्रसार व लेण्याच्या वारशाचे महत्त्व जाणून घेण्याचा लाभ घ्यावा.

भैरवनाथ पॅनलचा विजय: सोनाली मदने निवडून उपसरपंच पदी 

0
भैरवनाथ पॅनलचा विजय: सोनाली मदने निवडून उपसरपंच पदी 

सासकल (ता. फलटण): मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 अंतर्गत, तहसिलदार फलटण यांच्या आदेशानुसार सासकल ग्रामपंचायतीच्या रिक्त उपसरपंच पदासाठी निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. निवडणुकीत ५ विरुद्ध ४ अशा मताधिक्याने भैरवनाथ पॅनलच्या सोनाली मंगेश मदने यांनी विजय मिळवला. ग्रामविकास गटाच्या नीलम वैभव सावंत यांचा पराभव करत, सोनाली मदने या सासकलच्या उपसरपंचपदी विराजमान झाल्या.

या निवडणुकीत सरपंच उषा राजेंद्र फुले अध्यासी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या, तर निवडणूक निरीक्षक म्हणून श्री. एन. बी. नाळे, मंडळ अधिकारी (कोळकी) यांनी जबाबदारी पार पाडली.

भैरवनाथ पॅनलच्या विजयामुळे सत्तारूढ गटाच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य हणमंतराव मुळीक, चांगुणाबाई मुळीक, लक्ष्मीबाई आडके, सोनाली मदने, राजेंद्र घोरपडे, मोहन मुळीक, लता मुळीक, नीलम सावंत आणि सरपंच उषा फुले उपस्थित होत्या.

या निवडीवेळी गावातील प्रमुख नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये मंगेश मदने, गोरख मुळीक, दिनेश मुळीक, विनायक मदने, कमलाकर आडके, सुधीर दळवी, तुषार मुळीक, अजित मुळीक, ज्ञानेश्वर मुळीक, ज्ञानेश्वर ह. मुळीक, वाल्मीक मदने, संदीप फडतरे, भीमराव खुडे, रमेश आडके, वैशाली रघुनाथ मुळीक, वैशाली सुनील मुळीक, ताराबाई नामदेव मुळीक, नीलकंठ मुळीक, शंकर गज्याबा मुळीक, शिवाजी मुळीक, दादासो ज्योतिराव मुळीक यांची उपस्थिती होती.

नव-नियुक्त उपसरपंच सोनाली मदने यांना सरपंच उषा फुले, माजी सरपंच लक्ष्मण मुळीक, सोपान मुळीक, रघुनाथ मुळीक, नीलकंठ मुळीक, किरण घोरपडे, मोहनराव मुळीक (पाटील), दत्तात्रय दळवी, सुनील चांगण , विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तसा माजी सरपंच हणमंतराव मुळीक,भानुदास दिनकर घोरपडे, अनिल संपत मुळीक, सुरेश तुकाराम मुळीक यांनी या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले

Torres Scam : ‘टोरेस’ कडून हिरे आणि गुंतवणुकीच्या नावावर हजारो मुंबईकरांना कोट्यवधींचा गंडा, मालक दुबईला फरार!

0
Torres Scam : ‘टोरेस’ कडून हिरे आणि गुंतवणुकीच्या नावावर हजारो मुंबईकरांना कोट्यवधींचा गंडा,  मालक दुबईला फरार!


Torres Company Scam Update : मीरा-भाईंदरमध्ये इन्वेस्टमेंट स्कीममध्ये हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा फटका बसल्याचे प्रकरण समोर आले आहे. टोरेस कंपनीवर आरोप केला जात आहे की, त्याचा मालक लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन पसार झाला आहे. सोमवारी कंपनीचे मीरा-भाईंदर आउटलेट अचानक बंद झाले अन् कार्यालयाच्या बाहेर गुंतवणूकदारांच्या रांगा लागल्या. याबाबत कंपनीच्या कोणत्याही अधिकृत प्रतिनिधीशी संपर्क होऊ शकलेला नाही. दरम्यान कंपनी संबंधित एका महिलेने सांगितले की, कंपनीच्या वेबसाइटमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे लोकांना रिटर्न्स देण्यात अडचणी येत आहेत.



Source link

याला काय म्हणावं..! चोरी करण्यासाठी घरात घुसला, मात्र कोणतेच किमती सामान न मिळाल्याने महिलेचा मुका घेऊन पळून गेला

0
याला काय म्हणावं..! चोरी करण्यासाठी घरात घुसला, मात्र कोणतेच किमती सामान न मिळाल्याने महिलेचा मुका घेऊन पळून गेला


Mumbai crime : मुंबईतील मालाड परिसरातील कुरार येथे एक अजब प्रकार समोर आला आहे. येथील एका घरात चोर चोरी करण्याच्या उद्देशाने घुसला, मात्र घरात त्याला काहीच किमती सामान न मिळाल्याने त्याने घरातील महिलेचा मुका घेतला व घरातून कोणतीच वस्तू न घेता पळ काढला. पोलिसांनी या चोराला पकडले आहे.



Source link

राष्ट्रपतींसमोरच अभिनेत्याने मोडला नियम, राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना केली ‘ही’ विनंती

0
राष्ट्रपतींसमोरच अभिनेत्याने मोडला नियम, राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना केली ‘ही’ विनंती


बॉलिवूडमधील ‘जॉली एलएलबी’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. हा चित्रपट २०१३मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा दुसरा भाग पहिल्या भागाइतकाच लोकप्रिय झाला होता. या चित्रपटाने धमाकेदार बिझनेस केला असला तरी त्यात न्यायाधिशाची भूमिका अभिनेता सौरभ शुक्लाने साकारली होती. त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. ही व्यक्तिरेखा साकारल्याबद्दल सौरभ शुक्लाला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता. पण हा पुरस्कार स्वीकारताना अभिनेत्याने राष्ट्रपती प्रोटोकॉल मोडला होता.



Source link

जगातील सर्वात नशिबवान माणूस! रस्ता ओलांडताना काय झालं पाहाच

0
जगातील सर्वात नशिबवान माणूस! रस्ता ओलांडताना काय झालं पाहाच



Viral Video : अतिशय धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन बसच्यामध्ये एक व्यक्ती अक्षरशः अडकला होता. पुढे जे झालं ते अतिशय धक्कादायक आहे. 



Source link