
आजघडीला आधार कार्ड प्रमाणेच पॅन कार्ड हे देखील नागरिकांसाठी सर्वात महत्वाचे डॉक्युमेंट आहे. पॅन आणि आधार कार्ड कोणत्याही आर्थिक कामासाठी आवश्यक असते, परंतु सध्या पॅन कार्डशी संबंधित एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आजघडीला आधार कार्ड प्रमाणेच पॅन कार्ड हे देखील नागरिकांसाठी सर्वात महत्वाचे डॉक्युमेंट आहे. पॅन आणि आधार कार्ड कोणत्याही आर्थिक कामासाठी आवश्यक असते, परंतु सध्या पॅन कार्डशी संबंधित एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Pune Pashan Crime पुण्यात पाषाण परिसरातील एका मुलींच्या शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या शाळेतील स्वच्छतागृहात चोरून मोबाइल ठेऊन मुलींचे व्हिडीओ शूटिंग केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी शाळेतील शिपायाला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसासह थंडी देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हिवाळ्यात स्वेटरसह छत्री देखील सोबत ठेवण्याची वेळ नागरिकांवर येणार आहे. विशेषत: मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील काही दिवस राज्यातील हवामान कोरडे राहून थंडी वाढण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भाजलेले हरभरे खाण्यास जेवढे स्वादिष्ट असतात, तेवढेच ते आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. प्रथिने, फायबर, आणि फॅटी अॅसिडने समृद्ध असलेल्या काळ्या हरभऱ्यामुळे अनेक आरोग्य समस्या दूर ठेवता येतात आणि वजनही नियंत्रणात राहते.
कोणते हरभरे जास्त फायदेशीर – भाजलेले की काबुली?
काळ्या हरभऱ्यामध्ये चण्याच्या तुलनेत प्रथिने आणि फायबर जास्त असते. याशिवाय, आयर्न, फोलेट, आणि अँटीऑक्सिडंट्स देखील मोठ्या प्रमाणात असतात. चण्यामध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स तुलनेने कमी असतात. मात्र, कोणतेही हरभरे मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास त्याचे फायदेच होतात.
पचनतंत्र सुधारते
भाजलेल्या हरभऱ्यामध्ये भरपूर फायबर असते, जे पचनासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. हे बद्धकोष्ठता, गॅस, वायू, आणि पोटदुखीसारख्या समस्या दूर ठेवते.
हृदयासाठी फायदेशीर
भाजलेले हरभरे शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत करतात. यामुळे हृदय निरोगी राहते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.
वजन नियंत्रणात
भाजलेले हरभरे प्रथिनेयुक्त असल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. वारंवार भूक लागत नाही, त्यामुळे अस्वास्थ्यकर खाणे टाळले जाते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
रक्तातील साखर नियंत्रण
भाजलेल्या हरभऱ्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे ते मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. यातील फायबर आणि प्रथिने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवतात.
भाजलेले हरभरे हे स्वाद आणि आरोग्य यांचा समतोल राखणारा सर्वोत्तम पर्याय आहे!
WhatsApp वरून समभार

फलटण :- फलटण येथे कृषी प्रदर्शनात भरड धान्यांचे फायदे उलगडले श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण यांनी आयोजित श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 अंतर्गत चर्चासत्रात, कृषी विज्ञान केंद्र कालवडेच्या गृहविज्ञान विषयतज्ज्ञ डॉ. प्रियदर्शनी देशमुख यांनी शेतकऱ्यांना भरड धान्य म्हणजेच मिलेट्सच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत सखोल मार्गदर्शन केले.
डॉ. देशमुख यांनी सांगितले की, गहू व तांदळाच्या तुलनेत भरड धान्य आरोग्यासाठी पोषणमूल्यांनी समृद्ध आहे. त्यामुळे याला ‘श्रीअन्न’ म्हणून ओळखले जाते. ज्वारी, बाजरी, राळे, नाचणी, राजगिरा यांसारखी धान्ये मधुमेह व रक्तक्षय टाळण्यासाठी उपयुक्त ठरतात.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. रामदास कदम होते. चर्चासत्रात माजी विद्यार्थी व पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकरी श्री. प्रतिक भोसले यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान, बदलत्या शेती पद्धती, तसेच दुष्काळातील प्रगतशील शेती यावर प्रकाश टाकला.
याप्रसंगी महाविद्यालयीन समितीचे व्हॉइस चेअरमन श्री. शरदराव रणवरे, प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, तसेच प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी आणि शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी दिक्षा चौगुले यांनी केले.
संपादकीय: प्रा. एन. एस. धालपे, डॉ. जी. बी. अडसूळ

—
सातारा :- मांढरदेवी यात्रा शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. यात्रा १२ जानेवारी ते २९ जानेवारी या कालावधीत होणार असून, गर्दीचे व्यवस्थापन, स्वच्छता, आणि भाविकांच्या सुरक्षिततेवर विशेष भर दिला जाणार आहे.
गर्दी व्यवस्थापनासाठी निर्देश:
जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले की, यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून काम करावे. भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन देवस्थान ट्रस्टने प्रभावीपणे करावे. यासाठी ड्रोनच्या सहाय्याने देखरेख करण्यात येणार आहे.
पशुहत्येवर बंदी:
यात्रेदरम्यान पशुहत्या होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
आरोग्य आणि स्वच्छता:
आरोग्य विभागाने डॉक्टर आणि औषध उपलब्धतेची खबरदारी घ्यावी, तसेच भाविकांसाठी कार्डीयाक अॅम्ब्युलन्स उपलब्ध असेल. स्वच्छ पिण्याचे पाणी आणि कचऱ्याच्या व्यवस्थापनावर विशेष लक्ष दिले जाईल.
वाहतूक आणि पार्किंग:
राज्य परिवहन विभागाने यात्रेच्या काळात विशेष गाड्या व फेऱ्यांचे नियोजन करावे. घाट रस्त्यावर गाड्या बंद पडू नयेत म्हणून क्रेनची सुविधा ठेवण्यात येईल. खाजगी वाहनांसाठी व्यवस्थित पार्किंगची व्यवस्था करण्यात येईल.
इतर सुविधा:
भाविकांसाठी मोबाईल टॉयलेट्स, शुद्ध पिण्याचे पाणी, आणि २४ तास अखंड वीज पुरवठा सुनिश्चित करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले की, यात्रेसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांनी ओळखपत्र परिधान करणे अनिवार्य आहे. तसेच, यात्रेच्या मुख्य दिवशी १२ जानेवारी, महापूजेच्या दिवशी १३ जानेवारी, आणि उतरत्या यात्रेच्या दिवशी १४ जानेवारी गर्दीचे व्यवस्थापन चोख पार पाडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे.
यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अशी विनंतीही जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.

Mother of Six Children Absconded With Beggar: उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यातील एक अजब लव्ह स्टोरी समोर आली आहे. येथे सहा मुलांची आई एका भिकाऱ्याच्या प्रेमात पडली. हा भिकारी दररोज महिलेच्या घरी भीक मागण्यासाठी येत होता. त्यांच्या ओळखीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले व शेवटी महिलेने आपली मुले व पतीला सोडून भिकारीसोबत फरार झाली.

—
फलटण :- फलटण तालुक्यातील तलाठी कार्यालयातील महसूल सेवक (कोतवाल) दीपक दौलतराव उदंडे (वय 49, रा. कसबा पेठ, फलटण) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 500 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
तक्रारदाराच्या पत्नीच्या नावावर दीड गुंठे जागेसह खरेदी केलेल्या घराची सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी उदंडे याने 1,000 रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर 500 रुपयांवर व्यवहार निश्चित झाला. लाच स्वीकारताना उदंडे याला अटक करण्यात आली.
सदर प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा करत आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी:
शिरीष सरदेशपांडे (पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र), विजय चौधरी (अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे), आणि राजेश वसंत वाघमारे (पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पो.हवा. गोगावले, आणि पो.ना. गणेश ताटे यांनी ही यशस्वी कारवाई केली.
सार्वजनिक आवाहन:
लाच मागणीविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा (पत्ता: सि.स. नं. 524/अ, जिल्हा कोषागार कार्यालयाजवळ, सदर बझार, सातारा) येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक वसंत वाघमारे यांनी केले आहे.
—
—

फलटण: फलटण शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरपरिषदेने पाऊल उचलले आहे. मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली जात आहे.
शहरातील मुख्य चौक, अंतर्गत रस्ते, तसेच साखर कारखाने आणि विविध उद्योगांमुळे वाढत्या ट्रक, ट्रॅक्टर, व अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
अतिक्रमण मोहीमेसाठी नियोजन
महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ अंतर्गत कलम १७९ अनुसार, सार्वजनिक रस्त्यांवरील अडथळे व अतिक्रमणे काढून टाकण्याचा अधिकार मुख्याधिकाऱ्यांना आहे. याच अधिकाराचा वापर करत, मुख्याधिकारी मोरे यांनी दोन पथकांची नेमणूक केली असून, जेसीबी मशीन, ट्रॅक्टर ट्रॉली, अग्निशमन वाहन, आणि इतर साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
लोकप्रतिनिधींचा पुढाकार
आमदार सचिन पाटील व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नागरिकांच्या तक्रारीवर लक्ष घालून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
फलटण शहराच्या स्वच्छता, सुंदरता, आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी अतिक्रमण काढून टाकण्याची ही कारवाई महत्त्वपूर्ण आहे. पथक प्रमुखांनी अतिक्रमण हटविताना उद्भवणाऱ्या समस्यांवर तात्काळ तांत्रिक सहाय्य देण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत.
शहरातील नागरिकांना या मोहिमेमुळे वाहतूक कोंडीमुक्त रस्ते आणि स्वच्छ वातावरणाचा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Kolhapur News : कोल्हापुरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाचीने पळून जाऊन गावातील एका मुलीशी लग्न केल्याने बदनामी होईल या भीतीने थेट लग्नाच्या जेवणात विष मिसळलं. ही घटना आचाऱ्याचा लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर आरोपी मामा फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी मामाचा शोध घेतला जात आहे. ही घटना पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश ज्योतीराम पाटील असं आरोपी मामाचे नाव आहे.