FBI Most Wanted List : अमेरिकेची जगप्रसिद्ध तपास यंत्रणा असलेल्या एफबीआयच्या यादीत एका भारतीय व्यक्तिचा समावेश करण्यात आला आहे. त्याच्यावर मोठं बक्षीस देखील ठेवण्यात आलं आहे. भद्रेशकुमार चेतनभाई पटेल असे या आरोपीचं नाव आहे. त्याने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केली असून तो फरार आहे. सध्या एफबीआय त्याचा शोध घेत आहे.
सातारा जिल्ह्यात साकारल्या जाणाऱ्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला गती देण्यासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केलेल्या एमएसआरडिसीचे कार्यालय महाबळेश्वर येथे सुरू करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शिंदे हे दरे या त्यांच्या मूळगावी आले असता त्यांनी या भागातील पर्यटन वाढीच्या दृष्टीने सुरू असलेल्या विविध विकासकामांचा विशेष बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
सातारा जिल्ह्यातील दरे, मुनावळे तसेच कोयना नदीच्या लगत असलेल्या दोनशे चौदा गावात नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या नवीन महाबळेश्वर विस्तारित प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा शिंदे यांनी या बैठकीत आढावा घेतला.
नव्याने विकसित केल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळाचे विकास प्राधिकरण म्हणून एमएसआरडीसीची नियुक्ती केली असल्याने या भागाचा सुनियोजितपणे विकास करण्याची जबाबदारी एमएसआरडीसीची आहे. त्यांचे कार्यालय साताऱ्यात असल्याने स्थानिकांना तिथे वारंवार जाणे अवघड होत होते. स्थानिक ग्रामस्थांची ही अडचण सोडवण्यासाठी एमएसआरडीसीचे कार्यालय तत्काळ महाबळेश्वरमध्ये सुरू करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले.
तसेच यावेळी ग्रामस्थांनी कोयना नदीचे पत्रातील पाणी हे स्थिर असल्याने येथे चालवण्यात येणाऱ्या बोटींना समुद्रातील बोटींप्रमाणे नव्हे तर वेगळे नियम लावावेत अशी मागणी केली. या बोटींना लावण्यात येणारे काही नियम दुरुस्त करून नवीन नियम तयार करावे असे सुचवले. त्याबाबत हे नियम तपासून त्यात आवश्यक ते बदल करावे असे शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून इथे कोयना नदीवरील पुलाचे तसेच प्रतापगड आणि तापोळा येथे रस्ता रुंदीकरण आणि पर्यटक गॅलरीचे काम सुरू असून या कामांची प्रगती त्यांनी जाणून घेतली. तसेच या कामांचा वेग वाढवून ती लवकरात लवकर पूर्ण करावी असेही सांगितले.
या गावात नव्याने विकसित होणाऱ्या पर्यटनस्थळी स्थानिक नागरिकांना उपजीविकेचे साधन मिळावे यासाठी त्याना तात्पुरत्या स्वरूपात तंबूमध्ये होम स्टे उभारण्याची परवानगी द्यावी. तसेच त्यासाठी लागणाऱ्या बांधकाम परवानग्या द्याव्यात असेही सांगितले. तसेच कोयना तीरावर बांबू तसेच इतर झाडांच्या लागवडीला प्रोत्साहन द्यावे असेही सांगितले.
यासोबतच प्रतापगड किल्ल्यावर सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने हे काम तातडीने थांबवण्याचे निर्देश दिले होते. प्रतापगड हे शिवछत्रपतींची पावनभूमी असल्याने इथे निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेणार नाही असे शिंदे यांनी स्पष्ट केले. याठिकाणी नव्याने होणारे कामही दर्जेदारच व्हायला हवे असेही निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. तसेच कोयना जलाशयाजवळील मुनावळे,वासोटा किल्ला, तापोळा पट्ट्यातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी केली.
या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोयना जलाशयालागत असलेल्या मुनावळे येथील जलपर्यटन प्रकल्प, वासोटा किल्ला परिसर तसेच तापोळा येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी वासोटा येथे लवकरच नाईट टुरिजम सुरू करण्याचे तसेच पर्यटकांसाठी वॉटर ऍम्ब्युलन्सची व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या नवीन पुलाच्या कामाची देखील पाहणी केली. हा पूल जून महिन्यापर्यंत पूर्ण होणार असून त्याद्वारे तापोळा बामणोली आणि महाबळेश्वर येथील पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
फलटण :- मुधोजी महाविद्यालयात पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकारिता व साहित्य यांचा जवळचा संबंध अधोरेखित केला. त्यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करताना सांगितले की, चांगल्या पत्रकारितेसाठी व स्तंभलेखनासाठी साहित्य आणि इतिहासाचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.
प्रसिद्धी समितीच्या वतीने आयोजित या सन्मान सोहळ्यात फलटण आणि पंचक्रोशीतील विविध वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील 25 पत्रकार उपस्थित होते. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, आजच्या युगात इलेक्ट्रॉनिक मीडिया जलद व तात्काळ माहिती देणारे प्रभावी साधन झाले असले, तरीही प्रिंट मीडियातील वैचारिक लेखन हे कधीही कालबाह्य होणार नाही.
लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि भारतीय लोकशाहीच्या विकासामध्ये पत्रकारितेचे योगदान अतुलनीय राहिले आहे. स्वातंत्र्यलढ्यात पत्रकारितेच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीला प्रोत्साहन मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान फलटणमधील दैनिक ऐक्यचे ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता, स्थैर्यचे चैतन्य रुद्रभटे, तसेच चोरमले, यशवंत खलाटे, बापूराव जगताप, विशाल शिंदे आदी पत्रकारांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. महाविद्यालयाने त्यांचा शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान केला.
महाविद्यालयाचा सहभाग कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच. कदम होते. कला शाखाप्रमुख डॉ. ए.एन. शिंदे, डॉ. पी.आर. पवार, प्रसिद्धी समिती प्रमुख डॉ. बी.जी. सरक यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यांची वेळेकर यांनी केले.
सारांश या सन्मान सोहळ्यामुळे पत्रकारिता आणि साहित्याच्या महत्त्वाला नवे अधोरेखित मूल्य मिळाले. कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग होता.
आळजापूर: आळजापूर गावातील महिलांनी दारूविक्रीला विरोध करण्यासाठी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित बॅलेट पेपर मतदान प्रक्रियेत गावातील महिलांनी एकमताने दारू विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला.
एकूण 723 महिला मतदारांपैकी 480 महिलांनी मतदान केले, त्यापैकी 454 मतं दारूबंदीच्या बाजूने तर केवळ 19 मतं मद्यविक्रीसाठी पडली. 7 मते अवैध ठरली.
तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांची माहिती: गावातील महिलांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा मतदान उपक्रम राबवला. तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी अंतिम निकाल जिल्हाधिकारी कार्यालय व संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवला असून लवकरच गावामध्ये दारूबंदीचा आदेश लागू होणार आहे.
सरपंच शुभम नलवडे यांचा नेतृत्वभव: आळजापूर ग्रामपंचायतीचे सरपंच शुभम नलवडे यांनी सुरुवातीपासूनच गावामध्ये दारूबंदी लागू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी महिलांना जनजागृती करून पुढील पिढी दारूच्या आहारी जाऊ नये यासाठी विशेष भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांना गावकऱ्यांचा आणि महिलांचा मोठा पाठिंबा मिळाला.
निवडणूक प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग: निवडणूक पर्यवेक्षण अधिकारी अभिजीत सोनवणे, सहाय्यक तलाठी लक्ष्मण अहिवळे, तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांनी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली.
महिलांची एकजूट आणि सामाजिक परिवर्तनाचा टप्पा: गावातील महिलांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक निर्णय घेता आला. या निर्णयामुळे महिलांचे सशक्तीकरण आणि दारूविरोधी चळवळीला तालुक्यासह जिल्हास्तरावर नवी दिशा मिळेल.
सारांश: आळजापूरमध्ये महिलांनी केलेल्या संघर्षामुळे दारू विक्री बंद होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा निर्णय गावाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक बदलासाठी मैलाचा दगड ठरेल.
फलटण : श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग परिपत्रकाप्रमाणे ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम अंतर्गत शनिवार दिनांक 11/01/2025 रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या विविध उपक्रमांसाठी मार्गदर्शक म्हणून प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फलटणचे प्राचार्य मा. श्री. अमित सस्ते उपस्थित होते. सर्वप्रथम महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहामध्ये ‘वाचन कौशल्य कार्यशाळा’ संपन्न झाली. या कार्यशाळेचे आयोजन भाषा विभागाच्या ‘वाचन उपक्रम समिती’ द्वारे करण्यात आले होते. या कार्यशाळेची सुरुवात प्रास्ताविकाने झाली. प्रास्ताविका मध्ये प्रा. डॉ. सतेज दणाणे यांनी आज बदलत्या काळात या उपक्रमाची आवश्यकता का निर्माण झाली हे स्पष्ट केले तसेच कार्यशाळेचे स्वरूप स्पष्ट केले. यानंतर प्रा. डॉ. संदेश बिचुकले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व प्रमुख पाहुण्यांचा गुलाब पुष्प, श्रीफळ व श्रीराम एज्युकेशन सोसायटीची वार्षिक दिनदर्शिका देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे प्राचार्य मा. श्री. अमित सस्ते यांनी विद्यार्थ्यांना ‘वाचन संस्कृती’ याविषयी मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी वाचन संस्कृती, वाचन शब्दाची उत्पत्ती, वाचनाची आवश्यकता, महत्त्व, वाचन कसे करावे, ग्रंथालय म्हणजे ज्ञान भांडार, महत्त्वाची पुस्तके, वाचना मुळेच वैचारिक बैठक तयार होते, ग्रंथांमुळे महापुरुष कसे घडले?, वाचन एक मूलभूत गरज, वाचाल तर वाचाल, वाचना द्वारे व्यक्तिमत्वाचा विकास, वाचनाद्वारे समाज व राष्ट्रनिर्मिती या विविध विचारांद्वारे वाचनाची आवश्यकता स्पष्ट केली तसेच शासनाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदेश बिचुकले यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. डॉ. सतेज दणाणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापिका तसेच विद्यार्थी उपस्थित होते. यानंतर विद्यार्थ्यांसाठी ‘पुस्तकाचे सामूहिक वाचन’ उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची अवांतर वाचनाची पुस्तके देण्यात आली. विद्यार्थ्यांनी या पुस्तकाचे शांतपणे वाचन केले व त्या पुस्तकांमधील विचार, वैशिष्ट्ये, उद्देश, आशय सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच पुस्तकावर आधारित विचार मंथन केले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने ग्रंथालयाची स्वच्छता केली. त्यामध्ये कपाटांच्या काचा पुसल्या, विषयवार ग्रंथांची विभागणी करून ती क्रमवार ठेवली, ग्रंथालय अभ्यासिका याची स्वच्छता केली, ग्रंथालयातील केरकचरा साफ केला. त्यानंतर ग्रंथालय अभ्यासिका मध्ये बसून पुन्हा पुस्तकांचे सामूहिक वाचन केले. यावेळी भाषा विभागाद्वारे विविध ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य मा. श्री. अमित सस्ते सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ग्रंथ प्रदर्शन कक्षाचे उद्घाटन झाल्यानंतर मान्यवरांनी ग्रंथ प्रदर्शनाचे पाहणी केली तसेच विद्यार्थ्यांनीही त्याचा लाभ घेतला. यावेळी मा. श्री. सस्ते सरांनी ग्रंथ प्रदर्शनाचे महत्त्व सांगितले तसेच वाचनीय पुस्तकांची नावे व प्रेरणादायी पुस्तके वाचण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी हिंदी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संदेश बिचुकले व मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सतेज दणाणे तसेच कला, वाणिज्य विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. अशाप्रकारे ‘वाचन संकल्प महाराष्ट्रचा’ उपक्रमांतर्गत महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले व विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला.
बारामती : बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने १६ ते २० जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार, १५ जानेवारी रोजी होणार आहे. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडणार आहे.
या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे ते कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संकल्पनेवर आधारित असून, हे राज्यातील आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीचा अनुभव देणारे प्रदर्शन ठरणार आहे.
गेल्या दहा वर्षांपासून हे प्रदर्शन प्रात्यक्षिकांवर आधारित आयोजित केले जात आहे. यंदाच्या प्रदर्शनाबद्दल कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या कार्यक्रमामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने, राज्यभरातील राजकीय आणि कृषी क्षेत्राचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे.
बारामतीतील हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान आणि प्रगतीची एक संधी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
Bollywood Nostalgia : ‘शोले’, ‘झहीर’, ‘डॉन’, ‘बागबान’, ‘कभी खुशी कभी गम’ असे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या करिअरची सुरुवात एका फ्लॉप चित्रपटाने झाली होती. ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. एकापाठोपाठ फ्लॉप चित्रपट देणारा हा अभिनेता एके दिवशी बॉलिवूडचा मेगास्टार होईल, असा विचार कुणी केलाही नसेल. अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासोबतही चित्रपट केले आहेत, जे लोकांना खूप आवडले. पण, तुम्हाला अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा एक चित्रपट आठवतो का, ज्यामध्ये अभिनेत्रीने बिग बींच्या बहिणीची भूमिका साकारली होती.
फलटण : आज फलटण तालुक्यात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला. महाराजा मंगल कार्यालयात झालेल्या या आयोजनात, नागरिकांच्या अनेक प्रलंबित तक्रारी आणि समस्यांचा जागेवर निपटारा करण्यात आला.
जनता दरबारात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावेळी जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील, सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, महानंदाचे माजी उपाध्यक्ष डी. के. पवार, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. नरसिंह निकम, आणि स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
या दरबारात क्रीडा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कृषी विभाग, वन विभाग, आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांसह इतर शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींवर कार्यवाही केली.
यावेळी युवा नेते सचिन सस्ते यांनी माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांनी सुरू केलेली गिरवी ते मुंबई एसटी सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. आमदार सचिन पाटील यांनी नागरिकांना अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन केले.
या जनता दरबारामुळे नागरिकांच्या समस्या तातडीने सुटल्या आणि शासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचा विश्वास वाढला.
Mumbai Scam News: मुंबईतील टोरेस घोटाळ्याचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु करण्यात आला आहे. टोरेसची सर्व कार्यालयं सील करण्यात आली आहेत. तर, टोरेसची तीन बँक खाती देखील गोठवण्यात आली आहेत. मात्र, या तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. टोरेसने डायमंडच्या नावाखाली मोइसॅनाइटच्या खड्यांची विक्री करून आपल्या गुंतवणूकदारांची फसवणूक केली. भारतीय बाजारात या खड्यांची किंमत ३०० रुपये असून ती गुंतवणूकदारांना ४२ ते ५० हजार रुपयांना विकले गेले, अशी माहिती ईओडब्ल्यूचे डीसीपी संग्राम सिंह निशाणदार यांनी सांगितले.
फलटण :- फलटण येथील विश्रामगृहात आज आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभागाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. गटविकास अधिकारी सतीश कुंभार, दारासिंग निकाळजे (विस्तारित गटशिक्षणाधिकारी), जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, गटनेते अशोकराव जाधव, अमित रणवरे, अमोल खराडे यांची उपस्थिती होती.
बैठकीत आमदारांनी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत पाणी टंचाईचा कोणताही त्रास नागरिकांना व जनावरांना होऊ नये याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. तसेच, पाणीपुरवठा, जलसंधारण, पाणंद रस्ते, पंचायत समितीच्या योजनांचा आढावा घेतला.
येत्या काळात तालुक्यातील ग्रामसेवक, सरपंच, आणि जिल्हा परिषद शिक्षकांसमवेत बैठक घेऊन गावातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आमदारांनी सांगितले. गटविकास अधिकारी सतीश कुंभार यांनी प्रशासन जनतेच्या कामांसाठी पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन दिले.
फलटण तालुका पाणी टंचाईमुक्त करण्यासाठी प्रशासन व स्थानिक प्रतिनिधी सक्रिय!