Thursday, August 6, 2026
Home Blog Page 611

’21 वर्षांपूर्वी मी तिला रोखलं होतं, पण… ‘ सर्वात सुंदर साध्वी म्हणून चर्चेत असलेल्या हर्षाच्या आईला आठवली ‘ती’ शपथ

0
’21 वर्षांपूर्वी मी तिला रोखलं होतं, पण… ‘ सर्वात सुंदर साध्वी म्हणून चर्चेत असलेल्या हर्षाच्या आईला आठवली ‘ती’ शपथ


प्रयागराजच्या संगम शहरात महाकुंभ 2025 सुरू झाल्यापासून, सुंदर साध्वी म्हणून हर्षा रिचारिया चर्चेत आहे. सोशल मीडियावर सुंदर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, लोक तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक होत आहेत. आता हर्षाच्या पालकांनी अलिकडच्या एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील एक अशी गोष्ट शेअर केली आहेत. ज्यामुळे तिचा आणि महाकुंभाचा संबंध काय याची ओळख पटली आहे. साध्वीच्या आईला २१ वर्षांपूर्वी कुंभमेळ्यात हर्षाने घेतलेली शपथ आठवली.

 साध्या कुटुंबातील हर्षा रिचारियाचे बीबीएचे शिक्षण घेतले आहे आणि अँकरिंगचा कोर्स देखील केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिचे वडील दिनेश रिचारिया यांनी सांगितले की, ती पूर्वी बस कंडक्टर म्हणून काम करायची.  2004 च्या उज्जैन कुंभमेळ्यानंतर साध्वी यांच्या वडिलांचा कल अध्यात्माकडे वळला आणि आता ते कायमचे भोपाळमध्ये स्थायिक झाले आहेत.

केदारनाथची यात्रा

हर्षाची आई किरण रिचारिया घरून एक बुटीक चालवते. मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की, हर्षला लहानपणापासूनच धर्म आणि अध्यात्माकडे कल होता. हर्षाने 3 वर्षांपूर्वी केदारनाथच्या यात्रेदरम्यान तिचे जीवन बदलण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर, त्यांनी उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये वेळ घालवायला सुरुवात केली आणि समाजसेवेसाठी एक एनजीओ देखील स्थापन केला.

हर्षा कोणाशी लग्न करशील?

वडिलांनी सांगितले की, त्यांनी हर्षासाठी दोन मुले पाहिली आहेत. एक डेहराडूनमध्ये आणि दुसरा नाशिकमध्ये. ते लवकरच हर्षाचे लग्न निश्चित करणार आहे. त्यांनी लोकांना आवाहन केले की, हर्षाला साध्वी म्हणून ट्रोल करणे थांबवावे कारण तिने संन्यास घेतलेला नाही तर फक्त गुरुदीक्षा घेतली आहे.

21  वर्षांचे स्वप्न

हर्षाच्या आईने सांगितले की, 2004 मध्ये कुंभमेळ्यादरम्यान पोलिसांनी हर्षाला आंघोळ करण्यापासून रोखले होते. त्यावेळी हर्ष म्हणाला होता, बघ आई, हे माझं स्वप्न आहे, एके दिवशी मी हत्तीवर बसून कुंभमेळ्याला नक्कीच जाईन. आज हे स्वप्न पूर्ण होताना पाहून त्याची आई भावुक झाली. त्याने असेही सांगितले की हर्षाला पहिल्यांदा साध्वीच्या पोशाखात पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले.





Source link

Saif Ali Khan: अमृता सिंगने एकदा सैफ अली खानला दिल्या होत्या झोपेच्या गोळ्या, काय होते कारण?

0
Saif Ali Khan: अमृता सिंगने एकदा सैफ अली खानला दिल्या होत्या झोपेच्या गोळ्या, काय होते कारण?


बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने करीना कपूशी लग्न करण्यापूर्वी अभिनेत्री अमृता सिंगशी लग्न केले होते. त्यांचा संसार जवळपास १३ वर्षे टिकला. २००४ मध्ये सैफ आणि अमृता यांचा अखेर घटस्फोट झाला. दरम्यान, चित्रपट निर्माते सूरज बडजात्या यांनी एकदा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या जोडप्याबद्दलचा एक किस्सा उघड केला. एकेकाळी अमृता सिंग ही सतत सैफला झोपेच्या गोळ्या द्यायची. आता त्यामागे नेमके काय कारण होते? चला जाणून घेऊया…



Source link

सरकारी नोकरी मिळताच पत्नीने सोडली पतीची साथ, सासरी राहण्यासाठी मागितली १ कोटीची कॅश

0
सरकारी नोकरी मिळताच पत्नीने सोडली पतीची साथ, सासरी राहण्यासाठी मागितली १ कोटीची कॅश


कानपूरमधील सरकारी नोकरी हे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा आणि कुटुंब तुटण्याचे कारण बनले. प्रत्यक्षात नोकरी मिळाल्यावर विवाहिता सासरचे घर सोडून माहेरी गेली. कारण विचारले असता तिने माहेरी राहून काम करणार असल्याचे सांगितले. आता ती एक कोटी रुपयांची मागणी करत असल्याचा आरोप आहे.



Source link

धोक्याची घंटा..! देशातील तब्बल ४४० जिल्ह्यातील कूपनलिकांचे पाणी शरीरास घातक, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांचा समावेश?

0
धोक्याची घंटा..! देशातील तब्बल ४४० जिल्ह्यातील कूपनलिकांचे पाणी शरीरास घातक, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांचा समावेश?


भारताच्या ४४० जिल्ह्यातील भूजल (ग्राउंडवाटर) मध्ये ‘नायट्रेट’ चे अति प्रमाण आढळले आहे. केंद्रीय भूजल बोर्डाने (CGWB) एक रिपोर्ट जारी करत ही माहिती दिली आहे. बोर्डाने सांगितले की, गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये २० टक्केहून अधिक ‘नायट्रेट’ का कन्सन्ट्रेशन आहे. ‘नायट्रेट’ कंटामिनेशन पर्यावरण आणि आरोग्यासाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. विशेष करून ‘नायट्रोजन’ आधारित खतांचा वापर होणाऱ्या भागात स्थिती गंभीर बनते. 



Source link

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात! चाकण शिक्रापूर रोडवर भरधाव कंटेनरने २० ते २५ वाहनांना उडवले, काही जण जखमी

0
Pune Accident: पुण्यात भीषण अपघात! चाकण शिक्रापूर रोडवर भरधाव कंटेनरने २० ते २५ वाहनांना उडवले, काही जण जखमी


Pune Accident : पुण्यात चाकण शिक्रापुर मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एका भरधाव कंटेनरने २० ते २५ वाहनांना उडवले. यात काही नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर मोठा गोंधळ उडाला होता. या घटनेमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या भीषण अपघाताचे व्हिडिओ आणि फोटो देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. कंटेनर चालकाला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.



Source link

Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार! मोदी सरकारनं दिली आठव्या वेतन आयोगाला मंजुरी

0
Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार! मोदी सरकारनं दिली आठव्या वेतन आयोगाला मंजुरी


सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचं किमान मूळ वेतन दरमहा ६,००० रुपयांवरून १८,००० रुपये झालं होतं. तर, किमान पेन्शन ३,५०० रुपयांवरून ९,००० रुपये झालं. जास्तीत जास्त वेतन २,५०,००० रुपये आणि जास्तीत जास्त पेन्शन १,२५,००० रुपये झालं.



Source link

Kho Kho World Cup : खो-खो वर्ल्डकपमध्ये भारताची तुफानी कामगिरी, पुरूष-महिला दोन्ही संघ क्वार्टर फायनलमध्ये

0
Kho Kho World Cup : खो-खो वर्ल्डकपमध्ये भारताची तुफानी कामगिरी, पुरूष-महिला दोन्ही संघ क्वार्टर फायनलमध्ये


खो-खो या खेळाचा पहिला वर्ल्डकप भारतात खेळला जात आहे. दिल्लीत सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने चांगली कामगिरी केली आहे. गुरुवारी (१५ जानेवारी) इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर टीम इंडियाचा सामना पेरू संघाविरुद्ध झाला. या सामन्यात भारताने पेरूच्या संघाचा ७०-३८ अशा मोठ्या फरकाने पराभव करत स्पर्धेत विजयाची हॅट्ट्रिक साधली. 



Source link

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 8 व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी

0
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 8 व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी



8th Pay Commission Approval:  आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आणि 2 सदस्यांच्या नावाची लवकरच घोषणा केली जाणार आहे.



Source link

8 वा वेतन आयोग लागू होणार नाही, तरीही सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कसा वाढणार?

0
8 वा वेतन आयोग लागू होणार नाही, तरीही सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कसा वाढणार?



8th Pay Commission: केंद्र शासनानं अतापर्यंत अनेक वेतन आयोगांच्या धर्तीवर सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची भेट दिली आहे. त्याचविषयीची ही मोठी बातमी… 
 



Source link

इस्रोने रचला इतिहास! अखेर दोन्ही उपग्रह अंतराळात जोडले; स्पॅडेक्स मोहीम यशस्वी करणारा भारत बनला चौथा देश

0
इस्रोने रचला इतिहास! अखेर दोन्ही उपग्रह अंतराळात जोडले; स्पॅडेक्स मोहीम यशस्वी करणारा भारत बनला चौथा देश


ISRO docks two satellites in space : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी पुन्हा एकदा इतिहास रचला. इस्रोने स्पाडेक्स (स्पेस डॉकिंग एक्सरसाइज) मोहिमेअंतर्गत दोन उपग्रहांना यशस्वीरित्या अंतराळात डॉक करण्याची प्रक्रिया पूर्ण करत देशवासियांना खुशखावर दिली आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर ही कामगिरी करणारा भारत चौथा देश ठरला आहे. इस्रोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये या बाबत माहिती दिली आहे. यात म्हटले आहे की, भारताने अंतराळ इतिहासात आपले नाव नोंदवले आहे. गुड मॉर्निंग इंडिया, इस्रोने स्पेडेक्स मोहिमेत ‘डॉकिंग’मध्ये ऐतिहासिक यश मिळवलं  आहे. या क्षणाचा साक्षीदार असल्याचा देशाला अभिमान वाटतो, असे ट्विट इस्रोने केले आहे. 



Source link