Thursday, August 6, 2026
Home Blog Page 617

पत्रकारिता आणि परंपरेचा सन्मानः ‘दर्पण’ पुरस्कार वितरण सोहळ्याचा पोंभुर्लेत उत्सव”

0
पत्रकारिता आणि परंपरेचा सन्मानः ‘दर्पण’ पुरस्कार वितरण सोहळ्याचा पोंभुर्लेत उत्सव”

फलटण :-     6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिन नसून ‘दर्पण’ या मराठी वृत्तपत्राचा शुभारंभ दिन आहे. बाळशास्त्रींचा जन्म 20 फेब्रुवारी 1812 रोजी पोंभुर्ले येथे झाला होता. आजचा पत्रकार दिन बाळशास्त्रींची जयंती समजणे हे दुर्दैवी आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी ब्रिटीश काळात ‘दर्पण’ च्या माध्यमातून केलेल्या कार्याचा आदर्श घेऊन आजच्या पत्रकारांनी पत्रकारिता करावी,’’ असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये यांनी केले.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी आयोजित दर्पण पुरस्कार वितरण सोहळा:
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीने देण्यात येणाऱ्या 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण पोंभुर्ले येथील ‘दर्पण’ सभागृहात राजाभाऊ लिमये, मराठवाडा विभाग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम, आणि ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ होते.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर:
व्यासपीठावर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्वस्त विजय मांडके, महाराष्ट्र राज्य अधिस्विकृती समितीचे सदस्य प्रकाश कुलथे, पोंभुर्लेच्या सरपंच सौ. प्रियांका धावडे, उपसरपंच सादीक डोंगरकर, अ‍ॅड. प्रसाद करंदीकर, सुधाकर जांभेकर उपस्थित होते.

महत्त्वाचे वक्तव्ये:

  1. राजाभाऊ लिमये:
    ‘‘पोंभुर्ले ही बाळशास्त्रींची जन्मभूमी असल्याने येथे उभारलेल्या स्मारक कार्यात राज्यातील पत्रकारांनी आपले योगदान द्यावे. पत्रकारांनी बाळशास्त्रींच्या आदर्शांवर चालत समाजजागरणाचे कार्य केले पाहिजे.’’
  2. डॉ. जगदीश कदम:
    ‘‘बाळशास्त्रींच्या जन्मभूमीत वितरित होणाऱ्या ‘दर्पण’ पुरस्कारांना अन्य कोणत्याही पुरस्कारांपेक्षा महत्त्व आहे. बाळशास्त्रींचे चरित्र सोप्या भाषेत उपलब्ध करून देणे पत्रकारांसाठी उपयुक्त ठरेल.’’
  3. सुभाष धुमे:
    ‘‘पत्रकारांनी समाजातील संभ्रम दूर करण्यासाठी लोकशिक्षकाची भूमिका निभवावी. बाळशास्त्रींच्या कार्याचा आदर्श घेऊन निर्भीड पत्रकारिता केली पाहिजे.’’
  4. रविंद्र बेडकिहाळ:
    ‘‘पोंभुर्ले येथे पत्रकारितेचे महाविद्यालय सुरू करण्याचा आमचा मानस आहे. बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी पत्रकारांनी योगदान द्यावे.’’

पुरस्कार विजेते:
यावेळी विविध श्रेणींतील पुरस्कार देण्यात आले. यामध्ये:

दर्पण पत्रकारिता पुरस्कार:

श्रीकांत साबळे (दै. पुण्यनगरी, पुणे)

दीपक शिंदे (दै. लोकमत, सातारा)

नवनाथ कुताळ (दै. दिव्यमराठी, श्रीरामपूर)

सौ. विमल नलवडे (सा. धनसंतोष, कोरेगाव)

अ‍ॅड. रोहित अहिवळे (दै. गंधवार्ता, फलटण)

यशवंत खलाटे-पाटील (दै. पुण्यनगरी, फलटण)

महिला ‘दर्पण’ पुरस्कार:

श्रीमती शोभना कांबळे (दैनिक लोकमत, रत्नागिरी)

राज्यस्तरीय धाडसी पत्रकार पुरस्कार:

डॉ. प्रमोद फरांदे (दै. सकाळ, सातारा)

दर्पण साहित्यिक पुरस्कार:

निर्मलकुमार सूर्यवंशी (नांदेड)

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्रींच्या पालखीचे आगमन, दीपप्रज्वलन, आणि पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. ‘दर्पण’ स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर शेंडे यांनी केले, तर आभार विजय मांडके यांनी मानले.

उपस्थित मान्यवर व पत्रकार:
या कार्यक्रमास पुणे, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नांदेड यांसह विविध जिल्ह्यांतील मान्यवर, पत्रकार, साहित्यिक, आणि माध्यमप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लाडकी बहीण ठरतेय राज्याच्या तिजोरीवर भार..! शेतकरी योजनांसाठी निधीची कमतरता, कृषिमंत्र्यांनी कबूलच करून टाकलं

0
लाडकी बहीण ठरतेय राज्याच्या तिजोरीवर भार..! शेतकरी योजनांसाठी निधीची कमतरता, कृषिमंत्र्यांनी कबूलच करून टाकलं


राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, लाडकी बहीन योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर बोझा पडत असून शेतकरी कर्जमाफी योजनेवर परिणाम होत आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आघाडी महायुतीच्या विजयात या योजनेचा मोलाचा वाटा असल्याचे मानले जाते.



Source link

धनंजय मुंडे हत्या प्रकरण: राजकीय वातावरण तापले, राजीनाम्याची मागणी उचलून धरली

0
धनंजय मुंडे हत्या प्रकरण: राजकीय वातावरण तापले, राजीनाम्याची मागणी उचलून धरली

मुंबई: संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. सत्ताधारी महायुतीतील आमदार आणि विरोधी नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे ही मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी नेत्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली आहे.

या वादग्रस्त प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुंडे यांनी, “नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. माझ्या खात्याचा सविस्तर आढावा अजित पवारांसमोर मांडला,” असे स्पष्ट केले.

“मी कोणा-कोणाचे तोंड धरणार?”
धनंजय मुंडे यांनी विरोधकांनी लावलेल्या आरोपांवर अप्रत्यक्षपणे पलटवार केला. त्यांनी म्हटले, “लोकशाहीत प्रत्येकाला आरोप करण्याचा अधिकार आहे. पण माझ्या मतानुसार, जे आरोप करत आहेत त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना विचारावे. महायुतीतील भाजप आमदारांनीही आपल्या पक्षाच्या अध्यक्षांना विचारावे.”

चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांची तयारी
एसआयटीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाही मुंडे यांनी तपास यंत्रणेवर विश्वास व्यक्त केला आहे. “मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी योग्य अधिकारी नेमले आहेत. सध्या तपास सुरु आहे, त्यामुळे या प्रकरणावर बोलणे योग्य ठरणार नाही,” असे ते म्हणाले.

“मीडिया ट्रायल बंद करा, कोर्टावर विश्वास ठेवा”
मुंडे यांनी माध्यमांवर फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा आरोप केला. “कोर्टात तपास पूर्ण होऊ द्या. हे सगळं फेक नरेटिव्ह आहे. मीडिया ट्रायलमुळे चुकीचे संदेश जात आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

हृदयद्रावक..! दोन चिमुकल्यांना विष पाजून इंजिनिअर तरुण आणि पत्नीने संपवलं जीवन, पोलिसांनी सांगितलं कारण

0
हृदयद्रावक..! दोन चिमुकल्यांना विष पाजून इंजिनिअर तरुण आणि पत्नीने संपवलं जीवन, पोलिसांनी सांगितलं कारण


बेंगळुरूच्या सदाशिवनगर भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. बेंगळुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजिनीअर अनुप कुमार आणि त्याची पत्नी राखी यांनी दोन मुलांना विष देऊन त्यांची हत्या केली आणि नंतर या दाम्पत्याने आत्महत्या केली.



Source link

देशात HMPV व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या ६ वर, चेन्नईमध्ये २ मुलांना लागण

0
देशात HMPV व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या ६ वर, चेन्नईमध्ये २ मुलांना लागण


चीनमध्ये पसरलेल्या या विषाणूने भारतातही जोर पकडायला सुरुवात केली आहे. नुकतेच चेन्नईत या विषाणूचे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. या दोघ रुग्णांसह भारतात आतापर्यंत एचएमपीव्हीचे एकूण ६ रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी बेंगळुरूमध्ये दोन, गुजरातमध्ये एक आणि पश्चिम बंगालमध्ये एक रुग्ण आढळला आहे. दोन मुलांना ह्युमन मेटाप्युमोव्हायरसची (HMPV) लागण झाल्याचे एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. या दोघांवर सध्या चेन्नईत उपचार सुरू आहेत. हे दोन्ही रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात असल्याचे समोर आले आहेत. 



Source link

Justin Trudeau : भारताशी पंगा घेतलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा राजीनामा; ‘या’ कारणामुळे झाले पायउतार

0
Justin Trudeau : भारताशी पंगा घेतलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा राजीनामा; ‘या’ कारणामुळे झाले पायउतार


Canada PM Justin Trudeau Resignation: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच त्यांनी लिबरल पक्षाच्या नेतेपदाचाही राजीनामा दिला आहे. आता त्यांचा नऊ वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. ट्रुडो यांच्याविरोधात पक्षात असंतोष वाढत असताना ट्रुडो यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यांनी आज ओटावा येथील रिडेऊ कॉटेज येथील आपल्या निवासस्थानाबाहेर पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. मात्र, जोपर्यंत पक्षाचा नवा नेता निवडला जात नाही तोपर्यंत ते या पदावर कायम राहतील.



Source link

Manmad Accident : मनमाडमध्ये भीषण अपघात; भरधाव ट्रकने २ शाळकरी मुलांना चिरडले, एका मुलाचा व मुलीचा जागीच मृत्यू

0
Manmad Accident : मनमाडमध्ये भीषण अपघात; भरधाव ट्रकने २ शाळकरी मुलांना चिरडले, एका मुलाचा व मुलीचा जागीच मृत्यू


नाशिक जिल्ह्यातील मनमाडमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव ट्रकच्या धडकेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मनमान- चांदवड रोडवर मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर हा अपघात झाला. भरधाव ट्रकखाली सापडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दोघांच्या कुटूंबाला धक्का बसला असून शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 



Source link

ऑनर किलिंग..! घर सोडून गेलेल्या बहिणीला भावानेच २०० फूट खोल दरीत ढकलून संपवलं, छत्रपती संभाजीनगरमधील घटना

0
ऑनर किलिंग..! घर सोडून गेलेल्या बहिणीला भावानेच २०० फूट खोल दरीत ढकलून संपवलं, छत्रपती संभाजीनगरमधील घटना


Chhatrapati Sambhajinagar Honor Killing : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून घरातून पळून गेलेल्या १७ वर्षीय बहिणीचा भावानेच खून केला आहे. मुलीला गोड बोलून आरोपीने तिला डोंगरावर नेले व तेथून २०० फूट खोल दरीत ढकलून तिची हत्या केली. नम्रता गणेश शेरकर (वय १७ वर्ष) असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव असून ऋषिकेश तानाजी शेरकर (वय २५) असं आरोपी भावाचं नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. 



Source link

Electric Blanket: इलेक्ट्रिक ब्लँकेट म्हणजे काय? जाणून घ्या प्रकार आणि टॉप ब्रँड

0
Electric Blanket: इलेक्ट्रिक ब्लँकेट म्हणजे काय? जाणून घ्या प्रकार आणि टॉप ब्रँड


Electric Blanket Buying Guide: कडाक्याच्या थंडीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक जण स्वेटर, हात- मोजे आणि गरम टोप्या परिधान करतात. सध्या बाजारात इलेक्ट्रिक ब्लँकेटची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे इलेक्ट्रिक ब्लँकेट उत्तम दर्जाचे असून अतिशय उबदार कंफर्टेबल फॅब्रिक मटेरियल पासून तयार केले जातात. इलेक्ट्रिक ब्लँकेट हे अनेक प्रकारचे असतात. त्यामुळे कोणता खरेदी करावा, असा प्रश्न ग्राहकांना पडतो. आज आपण बाजारात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक ब्लँकेटच्या टॉप ब्रँडबद्दल जाणून घेऊयात.



Source link

‘महाराष्ट्रातील सगळे भिकारी शिर्डीत गोळा झालेत, मोफत जेवण बंद करा’, साई भक्तांबाबत बोलताना माजी खासदाराची जीभ घसरली

0
‘महाराष्ट्रातील सगळे भिकारी शिर्डीत गोळा झालेत, मोफत जेवण बंद करा’, साई भक्तांबाबत बोलताना माजी खासदाराची जीभ घसरली


शिर्डीतील साईबाबा संस्थानाकडून दररोज लाखो लोकांना अन्नछत्रामार्फत मोफत जेवण पुरवलं जातं मात्र हे मोफत जेवण बंद करावं. फुकट जेवणामुळे महाराष्ट्रातील भिकारी सगळे येथे गोळा झाले आहेत. त्यांच्याकडून पैसे घेऊन हे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावे, अशी मागणी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली.‘संपूर्ण देश येथे येऊन फुकट जेवण करतोय,संपूर्ण महाराष्टातील भिकारी येथे गोळा झालेत’,असं विधानही सुजय विखे यांनी शिर्डीतील एका कार्यक्रमात केलं. या विधानावरून राजकारण तापलं आहे.



Source link