Thursday, August 6, 2026
Home Blog Page 618

परिस्थिती नसताना शेअर मार्केटमध्ये गुंतवले पैसे, ‘स्कॅम १९९२’मधील अभिनेत्यासोबत खऱ्या आयुष्यात झाला स्कॅम

0
परिस्थिती नसताना शेअर मार्केटमध्ये गुंतवले पैसे, ‘स्कॅम १९९२’मधील अभिनेत्यासोबत खऱ्या आयुष्यात झाला स्कॅम


‘स्कॅम १९९२’ ही वेब सीरिज २०२० साली प्रदर्शित झाली होती. ही सीरिज प्रचंड गाजली होती. हंसल मेहता दिग्दर्शित या सीरिजची कथा १९९२ साली झालेल्या शेअर बाजार घोटाळ्यावर आधारित होती, ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. सोनी लिव्हवर प्रदर्शित झालेली ही सीरिज प्रचंड गाजली होती. या सीरिजमध्ये प्रतीक गांधीने मुख्य भूमिका साकारली होती तर कवीन दवे, रजत कपूर, सतीश कौशिक हे कलाकार देखील दिसले होते. पण तुम्हाला माहित आहे का या सीरिजमधील एक अशी व्यक्तिरेखा होती ज्याची कथा त्याने साकारलेल्या व्यक्तिरेखेशी अगदी मिळतीजुळती होती. अभिनेत्याने स्वत: जाऊन हंसल मेहता यांना या भूमिकेसाठी विचारले होते.



Source link

7821300000… बँकेत जमा असलेल्या या रकमेवर कुणीच केला नाही दावा; तुम्ही असू शकता वारसदार, असा चेक करा स्टेटस

0
7821300000… बँकेत जमा असलेल्या या रकमेवर कुणीच केला नाही दावा; तुम्ही असू शकता वारसदार, असा चेक करा स्टेटस


Unclaimed Deposit In Banks : अनेकांना पैसा जमा करण्याची सवय असते. काही जण घरात पैसे जमवून ठेवतात तर काही जण बँकेत पैसे भरतात. अनेकदा जमा केलेली रक्कम लक्षात येत नाही. देशभरातील बँकांमध्ये 7821300000 इतकी रक्कम जमा आहे. या रकमेवर कुणीच दावा केलेला नाही. या रकमेचे तुम्ही तर वारसदार नाही. तुम्ही ऑलनाईल याचा स्टेटस चेक करु शकता. 

बँकेत जमा असलेली रक्कम ज्यावर कुणीच दावा केला नाही अशा रकमेचा डेटा  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ने शेअर केला आहे. मार्च 2024 पर्यंत देशभरातील विविध बँकांमध्ये एकूण 78,213 कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत. या रकमेवर अद्याप कुणीच दावा केलेला नाही. दावा न केलेल्या या रकमेचा हा आकडा वर्षानुवर्षे सातत्याने वाढत आहे. अशा प्रकारे दावा न केलेली रक्कम  RBI द्वारे डिपॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड (DEAF) मध्ये हस्तांतरित केली जाते, ज्याद्वारे या रकमेवर वार्षिक फक्त 3 टक्के व्याज मिळते. 

या दावा न केलेल्या रकमेचा प्रश्न सोडवण्यासाठी तसेच रक्कम जमा करणाऱ्यांच्या वारसदारांना ही रक्कम मिळवता यावी यासाठी RBI ने ऑगस्ट 2023 मध्ये अनक्लेम्ड डिपॉझिट-गेटवे टू ऍक्सेस इन्फॉर्मेशन (UDGAM) पोर्टल लाँच केले. हे प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना वेगवेगळ्या बँकांमधील दावा न केलेल्या ठेवी एकाच ठिकाणी ट्रॅक करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

UDGAM पोर्टल हे RBI ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड (ReBIT), इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाईड सर्व्हिसेस (IFTAS) आणि सहभागी बँकांच्या सहकार्याने डेव्हलप केलेले एक-स्टॉप प्लॅटफॉर्म आहे. अनेक बँकांमधील हक्क नसलेल्या ठेवी शोधण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले. आत्तापर्यंत, देशातील जवळपास 30 बँका या पोर्टलचा भाग आहेत.  ज्यामध्ये दावा न केलेल्या सुमारे 90% ठेवी ठेवल्या जातात. 
सुरुवातीला स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), दक्षिण भारतीय बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, धनलक्ष्मी बँक, DBS बँक इंडिया आणि सिटी बँक यांना पोर्टलमध्ये लिस्टिंग करण्यात आले. टप्प्याटप्प्याने इतर बँकांना या पोर्टलशी जोडण्यात आल्या आहेत.

असा चेक करा स्टेटस

  • सर्वप्रथम, UDGAM पोर्टल udgam.rbi.org.in वर जा. 
  • दावा न केलेल्या रकमेच्या टॅब वर क्लिक करुन नोंदणी करा. 
  • नोंदणी करण्यासाठी, तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि तुमचे नाव प्रविष्ट करा. 
  • पासवर्ड सेट करुन कॅप्चे कोड टाका. 
  • चेक बॉक्सवर टिक करा आणि पुढील क्लिक करा. 
  • त्यानंतर OTP टाकून पडताळणी करा.
  • नाव आणि मोबाईल नंबर टाकून पासवर्ड तयार करा.  
  • मोबाईल नंबर आणि पासवर्डने तुम्ही यावर लॉगिन करू शकता. 
  • दावा न केलेल्या ठेवींचा मागोवा घेऊन तु्मही दावे देखील करू शकतात. 





Source link

Law Of India: आर्थिक हिंसाचार, शारीरिक हिंसाचार आणि लैंगिक हिंसाचार यांच्यात नेमका फरक काय? वाचा

0
Law Of India: आर्थिक हिंसाचार, शारीरिक हिंसाचार आणि लैंगिक हिंसाचार यांच्यात नेमका फरक काय? वाचा


General Knowledge: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. महिलांवर घराबाहेर नव्हेतर घरातही सुरक्षित नाहीत. कारण महिलांवर घराच्या चार भिंतीत होणाऱ्या हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे. आयसीडब्ल्यूआर २००२ नुसार, भारतातील ४५ टक्के महिलांना त्यांचे पती मारहाण करतात. भारतात दर ६० मिनिटांनी एक स्त्री कौटुंबिक हिंसेमुळे दगावते. हिंसाचाराचे अनेक प्रकार आहेत, ज्यात आर्थिक हिंसाचार, शारीरिक हिंसाचार आणि लैंगिक हिंसाचाराचा समावेश आहे.



Source link

इंडिया गेटच नाव बदला; भाजप नेत्याने सुचवले नवे नाव

0
इंडिया गेटच नाव बदला; भाजप नेत्याने सुचवले नवे नाव



दिल्लीच्या इंडिया गेटचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजप नेत्याने नविन नाव सुचवले आहे. 



Source link

जमिनीवर तलावासारखा खड्डा अन् झाडावर जाऊन अडकली पोलीस व्हॅन, छत्तीसगड हल्ल्याचे भयानक फोटो आले समोर

0
जमिनीवर तलावासारखा खड्डा अन्  झाडावर जाऊन अडकली पोलीस व्हॅन, छत्तीसगड हल्ल्याचे भयानक फोटो आले समोर


Naxal attack In chhattisgarh : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांवर मोठा हल्ला केला आहे. नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांचे वाहन आयईडी स्फोटाने उडवून दिले. या हल्ल्यात ९ जवान शहीद झाले आहेत. विजापूरमधील कुटरू रोडवर हा हल्ला झाला. हा आयईडी स्फोट इतका जबरदस्त होता की, जमिनीवर तलावासारखा खड्डा पडला असून गाडी उडून झाडावर अडकली आहे. गाडीच्या भागांचा चुराडा झाला आहे. 



Source link

भारतीय रेल्वेलाही भरावे लागते वीज बिल, 1 दिवसाचा खर्च ऐकून बसेल धक्का

0
भारतीय रेल्वेलाही भरावे लागते वीज बिल, 1 दिवसाचा खर्च ऐकून बसेल धक्का


Indian Railways : भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे नेटवर्क असून भारतात एक मोठी संख्या आहे, जे लोक आजही रेल्वेने प्रवास करतात. भारताच्या कानाकोपऱ्यात कुठेही जायण्यासाठी रेल्वे ही सोयीची मानली जाते. बदलत्या काळानुसार रेल्वेचे चित्रही बदल आहेत. आज रेल्वेमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सुख सुविधा देण्यात आलंय. भारतीय रेल्वे ही चार झोनमध्ये विभागलं गेलंय. मुख्य म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. रेल्वेतून फक्त मनुष्य प्रवास करत नाही. तर मालगाड्यातून मोठ्या प्रमाणात व्यवसायही केला जातो. यामुळे भारताला रेल्वेतून आर्थिकदृष्ट्या मोठी ताकद मिळतेय. 

भारतात दररोज 1300 हून अधिक गाड्या देशाच्या कानाकोपऱ्यातून धावतात, ज्यामध्ये हजारो आणि लाखो प्रवासी प्रवास करतात. विशेष हंगामात आणि सणासुद्दीत रेल्वेच्या विशेष गाड्या सोडल्या जातात.  जेणेकरून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देता येतील.

यामध्ये व्हीआयपी ट्रेन, शताब्दी, राजधानी, एक्स्प्रेस, सुपरफास्ट, लोकल, गुड्स ट्रेन इत्यादींचा समावेश आहे. लोक कमी किमतीपासून ते जास्त किमतीपर्यंत रेल्वेने प्रवास करतात. या काळात त्यांना नवीन अनुभव मिळतो. जेव्हा कोणी रेल्वेने प्रवास करतो तेव्हा तो अनेक राज्यांमधून जातो. या काळात त्यांना विविध प्रकारच्या लोकांना भेटण्याची संधी मिळते. अनेक भाषा शिकण्याची संधी मिळेल. याशिवाय खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैली जवळून पाहण्याचीही संधी आहे.

तुम्ही जेव्हा रेल्वेतून प्रवास करता तेव्हा ही रेल्वे कोणी बांधली असेल. रेल्वे रुळ कसे बसवले असती यापैकी एक प्रश्न म्हणजे एका दिवसात रेल्वेचे वीज बिल किती येत असेल, असे प्रश्न तुम्हाला कधी पडलेत का?

 

 

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे अगदी खरं आहे की सर्वसामान्यांप्रमाणेच रेल्वेलाही वीज बिल भरावं लागतं. अगदी उत्तम आणि हुशार विद्यार्थ्यांनाही या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल, मात्र स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञानाच्या दृष्टिकोनातून याचं उत्तर जाणून घेणं गरजेच आहे. 

किती बिल भरतं रेल्वे?

खरंतर, रेल्वे आणि रेल्वे स्थानकांसाठी भारतीय रेल्वेला प्रति युनिट 7 रुपये मोजावे लागतात. ट्रेनची एक बोगी दर तासाला अंदाजे 210 युनिट वीज वापरते. त्यानुसार 12 तासांत प्रति बोगी वीज खर्च 17,640 रुपये आहे. स्लीपर आणि जनरल डब्यांसाठी, हा वापर सुमारे 120 युनिट प्रति तास असतो. त्यानुसार, 1440 युनिट विजेसाठी रेल्वेला 10,080 रुपये मोजावे लागतात. ट्रेनचा एकूण वीज खर्च प्रतिदिन 5,76,000 रुपयांच्या घरात आहे. जे भारतीय रेल्वेला भरावं लागतं. हाय टेंशन वायरच्या माध्यमातून दररोज 18.83 लाख रुपये खर्च होत असतो.

आम्ही तुम्हाला सांगतो की, रेल्वे ट्रेनच्या डब्यात दोन प्रकारची वीज पुरवते. पहिली डायरेक्ट हाय टेंशन वायर आणि दुसरी पॉवर जनरेट केलेली आहे. अनेकदा तुम्ही पाहिले असेल की ट्रेनमध्ये जनरेटर कोच बसवलेला असतो, ज्यामध्ये डिझेलच्या माध्यमातून वीज तयार करण्यात येत असते. 





Source link

800000 कोटींचा चुराडा! HMPV व्हायरसमुळे Share Market Crash; कोरोनापेक्षा डेंजर स्थिती

0
800000 कोटींचा चुराडा! HMPV व्हायरसमुळे Share Market Crash; कोरोनापेक्षा डेंजर स्थिती


Share Market Crash : चीनमधून कोरोनापेक्षा भयंकर व्हायरची भारतात एन्ट्री झाली आहे. यामुळे भारताची चिंता वाढली आहे. भारतात HMPV चे 3 रुग्ण सापडले आहेत. कर्नाटकमध्ये आढळले दोन रुग्ण आढले आहेत. 3 महिन्याच्या मुलीसह 8 महिन्याच्या मुलालाही HMPVची लागण झाली आहे. गुजरातमध्ये  तिसरा रुग्ण सापडला आहे.  HMPV व्हायरच्या दहशतीमुळे शेअर मार्केट क्रॅश झाला आहे. शेयर बाजारात  कोरोनापेक्षा डेंजर स्थिती पहायला मिळत आहे. गुंतवणूकदार धास्तावले 800000 कोटींचा चुराडा झाला आहे. 

6 जानेवारी रोजी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला. सोमवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीने चांगलीच उसळी घेतली. मात्र, काही वेळातच भारतात  HMPV चे रुग्ण सापडल्याचे वृत्त समोर आले आणि शेअर बाजारात खळबळ उडाली. बाजारात 1400 अंकांची घसरण झाली. पाहता पाहता शेअर मार्केटमध्ये 800000 कोटींचा चुराडा झाला. 

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1400 अंकांनी घसरला. निफ्टी निर्देशांक 365 अंकांनी घसरला. निर्देशांकातील सर्व समभागांनी लाल चिन्ह गाठले. मोठ्या समभागांची स्थिती बिकट दिसत होती. टाटा स्टील, एचडीएफसी बँक, अदानी पोर्ट्स, रिलायन्स यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्स 1400 अंकांनी घसरून आजच्या 77,782 अंकांच्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर आला, तर निफ्टी 23,600 च्या खाली घसरला.   इंडेक्सवरूल सर्व स्टॉक रेड अलर्टवर पोहचले. Tata Steel, HDFC Bank, Adani Ports, Reliance सारख्या बड्या कंपन्यांचे शेअर कोसळले. 

सेंसेक्स 1400 अंकांनी गडगडला आहे. चीनमध्ये पसरलेल्या एचएमपीव्ही या नवीन विषाणूचे भारतात तीन रुग्‍ण आढळल्याने शेअर मार्केटवर याचा परिणाम झाला. तिमाही निकालांपूर्वी गुंतवणूकदार सावध झाले आहेत. परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढत आहेत. भारतीय शेअरमार्केटवर याचा दबाव पडला आणि शेअर मार्केट गडगडला. 





Source link

HMPV Outbreak : कोरोनापेक्षा किती वेगळा आहे HMPV? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं!

0
HMPV Outbreak : कोरोनापेक्षा किती वेगळा आहे HMPV? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं!


HMPV Outbreak : कोरोना व्हायरसची दोन वर्षं कुणीच विसरणार नाही. त्यात ‘नवीन’ व्हायरसची भारतात एंट्री झाल्याने लोकांच्या आणि तुमच्या-आमच्या मनात असंख्य प्रश्न आहेत. हा व्हायरस कोरोनासारखाच आहे का? त्यातही लॉकडाऊन लागेल का? अशी प्रश्नं सर्वांना पडत आहेत. त्याच प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न केलाय.

कोरोना व्हायरसची लस घेतलेल्या लोकांनाही HMPV ची लागण होऊ शकते का?

होय. कोरोना व्हायरसची लस घेतलेल्या व्यक्तींनाही HMPV व्हायरसची लागण होऊ शकते.

HMPV हा व्हायरस चीनमधून आला का?

नाही. HMPV व्हायरसचा फैलाव सध्या चीनमध्ये होत असला तरीही या व्हायरसचा उगम चीनमध्ये झालेला नाही. या व्हायरसचा उगम नेदरलँडमध्ये झाला होता.

HMPV व्हायरस नवीन प्रकारचा व्हायरस आहे का?

नाही. सर्वात आधी या व्हायरसचा प्रादुर्भाव नेदरलँड येथे 2001 मध्ये दिसून आला होता. काही वर्षांनी हा युरोप आणि अमेरिकेतही सापडला होता. सध्या चीन आणि मलेशियात याचा सर्वाधिक फैलाव होतोय.

कोरोना व्हायरसप्रमाणेच आणि HMPV पसरतो का?

कोरोना व्हायरस प्रमाणे हा व्हायरस संसर्गजन्य आहे. याचा फैलाव शिंकल्याने, संसर्ग असलेल्या रुग्णाला स्पर्श केल्याने आणि व्हायरस असलेल्या ठिकाणाला स्पर्श केल्याने पसरतो. परंतु, कोरोनाप्रणाणे हा व्हायरस वातावरणात पसरलेला नाही. कोरोनाप्रमाणे या व्हायरसचा संसर्ग हा हवेतून होतो याचा अद्याप पुरावा नाही.

HMPV रुग्णाला क्वारंटाईन करावं लागतं का?

HMPV व्हायरसची लागण झाल्यानंतर प्रशासन त्याचा फैलाव रोखण्यासाठी रुग्णांना वेगळ्या खोलीत उपचारासाठी ठेवू शकतात. अर्थात त्यांना क्वारंटाईन केले जाऊ शकते.

HMPV व्हायरसमुळे लॉकडाऊन लागेल का?

कोरोना व्हायरसची लक्षणे आणि तीव्रता HMPV च्या तुलनेत खूप अधिक होती. सोबतच, कोरोना फैलाव अगदी बोलण्यातून आणि नुसतं हवेतून सुद्धा होतो. त्यामुळे, कोरोना काळाप्रमाणे HMPV व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन लागेल याची शक्यता खूप कमी आहे.

HMPV व्हायरसने कुणाला सर्वाधिक धोका?

डॉ. अविनाश भोंडवे यांनी झी २४ तासला दिलेल्या माहितीनुसार, या व्हायरसचा सर्वात जास्त धोका तान्ह्या बाळांना, पाच वर्षाखालील मुला-मुलींना आणि वयोवृद्ध लोकांना अधिक आहे. ज्यांची रोगप्रतिकारक्षमता कमी आहे, त्यांना या व्हायरसची लागण होण्याची शक्यता अधिक आहे.

HMPV व्हायरसने मृत्यू होतो का?

2001 मध्ये सर्वप्रथम या व्हायरसचा उद्रेक झाला. हिवाळ्यात याचा धोका अधिक असतो. परंतु, HMPV व्हायरसची लागण झाल्यानंतर मृत्यू होण्याचं प्रमाण खूप दुर्मिळ आहे.

मृत्यूचा धोका कुणाला?

HMPV व्हायरसची लागण होऊन मृत्यू होण्याचे प्रकार क्वचितच घडले. ज्या रुग्णांना आधीच गंभीर आजार आहे, असे आजार ज्यात एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक्षमता कमी होते त्यांनी या व्हायरसपासून खूप सावध राहण्याची गरज आहे.

HMPV वर लस उपलब्ध आहे का?

HMPV व्हायरसवर सध्या लस उपलब्ध नाही. एवढेच नव्हे, तर ठराविक औषधही नाही. सध्या सावधगिरी आणि लक्षणांनुसार उपचार घेतले जातात.

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

‘माझ्या मांडीवर येऊन बस…’ मेट्रोत सीटवरुन दोन मुली भिडल्या, एकीने कानाखाली लगावली तर दुसरीने ओढले केस

0
‘माझ्या मांडीवर येऊन बस…’ मेट्रोत सीटवरुन दोन मुली भिडल्या, एकीने कानाखाली लगावली तर दुसरीने ओढले केस


दिल्ली असो वा मुंबई इथला प्रवास कायमच चर्चेत असतो. लोकांच्या सोईसाठी मेट्रोची सुविधा पुरवण्यात आली आहे. पण सोशल मीडियावर ही मेट्रो कायमच वेगळ्या कारणामुळे चर्चेत असते. प्रवास करताना प्रत्येकाला वाटतं की, आपल्याला थोडं बसायला मिळालं तर आराम मिळेल. आणि या सीटसाठी अनेकदा प्रयत्नही केले जातात. अशावेळी वाद हा ठरलेलाच आहे. असाच एक वाद दोन महिलांमध्ये झाला आहे. हा वाद बसण्याच्या जागेवरुन झाला. 

एकमेकींच्या झिंजा ओढल्या 

व्हायरल व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे प्रवाशांनी खचाखच भरलेल्या दिल्ली मेट्रोचे दृश्य दिसते, परंतु देशाचे सरकार आणि दिल्ली मेट्रोमध्ये एक गोष्ट समान आहे. येथे खुर्ची आणि आसनावरून नेहमीच वाद होत असतात. कधी लाथ मारण्याची स्पर्धा तर कधी केस पकडून ओढण्याची स्पर्धा. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही असेच काहीसे घडले आहे. किंबहुना सीटवरून होणारा संघर्ष इतका वाढला की, मेट्रोमध्ये उभी असलेली महिला सीट न मिळाल्याने आपल्या प्रतिस्पर्धी महिलेच्या मांडीवर बसली आणि यानंतर एकच वाद सुरु झाला.कानाखाली, एकमेकींना ढोसे मारणे आणि केसांनी ओढण्याची जणू स्पर्शाच सुरु झाली. 

जागांवरून युद्ध सुरू

व्हिडिओमध्ये ती महिला समोरच्या महिलेला शिवीगाळ करताना दिसत आहे, त्यानंतर ती सीटवरून उठते, महिलेच्या अक्षरशः कानाखाली लगावते. महिलेला तिच्या केसांनी पकडून मेट्रोच्या फरशीवर फेकते. या दोघांमधील लढाईचे अनेक लोक साक्षीदार आहेत. यातील एका महिलेचा आरोप आहे की, समोरच्या महिलेने तिच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न केला. एखाद्या माणसाने असेच केले असते तर लोकांनी त्याला पकडून मारहाण केली असती. म्हणूनच मांडीवर बसणे चुकीचे आहे. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओलाखो लोकांनी पाहिला आहे, तर अनेकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे, अशा परिस्थितीत सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले… भाऊ, तिने तिचे केस धरून मला ओढायला सुरुवात केली… लोकांमध्ये भांडणे होतात, गरीब लोक केस ओढतात. तर दुसऱ्या युजरने लिहिले… महिलांना खरोखर कसे लढायचे हे माहित नसते, म्हणूनच त्या नेहमी केसांना लक्ष्य करतात.





Source link

री-रिलीजचा जॅकपॉट! ‘ये जवानी है दिवानी’ सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, वाचा तीन दिवसांची कमाई

0
री-रिलीजचा जॅकपॉट! ‘ये जवानी है दिवानी’ सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, वाचा तीन दिवसांची कमाई


बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘ये जवानी है दिवानी’ तब्बल ११ वर्षांनंतर वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. २०१३ मध्ये जेव्हा ‘ये जवानी है दिवानी’ सिनेमागृहात दाखल झाला होता, तेव्हा पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १९.४५ कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण १८८.५७ कोटी रुपयांची कमाई केली होती. आता पुन्हा प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चला जाणून घेऊया चित्रपटाने तीन दिवसात किती कमाई केली…



Source link