Thursday, August 6, 2026
Home Blog Page 619

Eknath Shinde : खुलेआम बारूद से उडा दूंगा! एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, तरुणाचा व्हिडिओ व्हायरल

0
Eknath Shinde : खुलेआम बारूद से उडा दूंगा! एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, तरुणाचा व्हिडिओ व्हायरल


Eknath Shinde News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी एका २६ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. संबंधित तरुणाचा त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती श्रीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गुलजारी लाल फडतरे यांनी दिली.



Source link

Golden Globe 2025 : ‘गोल्डन ग्लोब’मध्ये भारताच्या पदरी निराशा, कुणी जिंकले मानाचे पुरस्कार? पाहा यादी

0
Golden Globe 2025 : ‘गोल्डन ग्लोब’मध्ये भारताच्या पदरी निराशा, कुणी जिंकले मानाचे पुरस्कार? पाहा यादी


Golden Globe 2025 Winner List : ८२व्या ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी कोणत्याही भारतीय चित्रपटाला हा पुरस्कार मिळालेला नाही.



Source link

HMPV मुळे टेन्शन वाढलं; महाराष्ट्र सरकारकडून ॲडव्हायझरी जारी, वाचा काय करावे व काय करू नये?

0
HMPV मुळे टेन्शन वाढलं; महाराष्ट्र सरकारकडून ॲडव्हायझरी जारी, वाचा काय करावे व काय करू नये?


कोरोना महामारीच्या ५ वर्षाननंतरचीनमध्ये ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) या व्हाय़रसचा उद्रेक झाला आहे.श्वसन संस्थेवर परिणाम करणारा विषाणूं वेगाने पसरसत असल्याने केंद्र सरकारबरोबरच आता राज्य सरकारही सतर्क झाले आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानेॲडव्हायझरी जारी केली आहे.



Source link

आपली फलटण मॅरेथॉन 2024-25:  1300 हून अधिक स्पर्धकांचा उत्साहवर्धक सहभाग!

0
आपली फलटण मॅरेथॉन 2024-25:  1300 हून अधिक स्पर्धकांचा उत्साहवर्धक सहभाग!

आपली फलटण मॅरेथॉन 2024-25: महेश मांजरेकरांसह 1300 हून अधिक स्पर्धकांचा उत्साहवर्धक सहभाग!

फलटण :  डॉ. प्रसाद जोशी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित आपली फलटण मॅरेथॉन 2024-25 ने फलटण शहरात नवचैतन्याचा संदेश दिला. या मॅरेथॉनमध्ये 1300 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन पाटील, आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाले.

बक्षीस समारंभात प्रमुख पाहुणे अभिनेते महेश मांजरेकर यांनी आपल्या भाषणात, “स्पर्धेत भाग घेणे हे खरे विजेतेपद आहे. योग्य आहार व व्यायाम ही काळाची गरज आहे,” असे सांगितले. यावेळी माजी विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे आवाहन केले.

या वर्षीच्या मॅरेथॉनमध्ये फलटणसह सातारा, पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, अकोला, कोल्हापूर, नगर आणि इतर शहरांमधून स्पर्धक आले. कार्यक्रमात 60 विजेत्यांचा गौरव करण्यात आला. प्रत्येकी गटात दहा हजार, सात हजार, पाच हजार रुपयांची बक्षिसे व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रसाद जोशी यांनी केले, सूत्रसंचालन नवनाथ कोलवडकर यांनी, तर आभारप्रदर्शन डॉ. प्राची जोशी यांनी मानले.

Gauri Khan: लग्नाच्या ३३ वर्षांनंतर गौरी खानने स्वीकारला इस्लाम धर्म? हिजाबमधील फोटोमागचे काय आहे सत्य

0
Gauri Khan: लग्नाच्या ३३ वर्षांनंतर गौरी खानने स्वीकारला इस्लाम धर्म? हिजाबमधील फोटोमागचे काय आहे सत्य


बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते आणि लाडके कपल म्हणून अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान ओळखली जाते. या कपलची लव्हस्टोरी देखील सर्वांना माहिती आहे. गौरी छिब्बर ही धर्माने मुस्लीम असलेला शाहरुख खानच्या प्रेमात पडली. कुटुंबीयांचा विरोध असतानाही दोघांनी लग्न केले. अनेक आव्हानांचा सामना करत शाहरुख खानने प्रचंड मेहनत करत शेवटी पत्नी आणि मुलांना असे आयुष्य दिले आहे जे एखादा पुरुष आपल्या कुटुंबीयांना देण्यासाठी धडपड करत असतो. शाहरुख खानच्या घरातही ईद साजरी केली जाते आणि दिवाळीही, त्याचे घर मन्नत धार्मिक ऐक्याचे प्रतीक मानले जाते. सध्या सोशल मीडियावर गौरीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये तिने हिजाब घातल्यामुळे धर्मांतर केल्याची चर्चा रंगली आहे.



Source link

‘भारी नुकसान हो गया…’ OYO अविवाहित जोडप्यांना रुम देणार नाही! सोशल मीडियावर Memes Viral

0
‘भारी नुकसान हो गया…’ OYO अविवाहित जोडप्यांना रुम देणार नाही! सोशल मीडियावर Memes Viral


OYO Rules :  ट्रॅव्हल बुकिंग वेबसाइट OYO आपल्या कपल फ्रेंडली नियमांमुळे अतिशय लोकप्रिय आहे. पण नुकतंच OYO ने आपल्या चेकइन पॉलिसीमध्ये बदल केले आहेत. ज्या बदलानुसार अविवाहित जोडप्यांना परवानगी नसल्याच म्हटलं आहे. OYO ने नियमात बदल केल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार मिम्स व्हायरल झाले आहेत. 

OYO ने आपल्या पार्टनर हॉटेल्सना अधिकार दिले आहेत की, ते कोणत्या कपल्सला परवानगी देऊ शकतात किंवा नाकारु शकतात. पण या नव्या पॉलिसीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अनेकजण OYO ची ही Bad Idea असल्याच सांगत आहेत. 

अविवाहितांना परवानगी नाही 

OYO च्या नव्या नियमानुसार जोडप्यांना नात्याचं प्रमाणपत्र दाखवणं गरजेचं आहे. पण यामुळे OYO चं मोठं नुकसान होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. एवढंच नव्हे तर यामुळे त्यांच्या सेल्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळेल असं दुसऱ्या एका युझरने म्हटलं आहे. 

OYO कडून मिळालेली अधिकृत माहिती

PTI ने OYO उत्तर भारताचे क्षेत्र प्रमुख पावस शर्मा यांनी सांगितले की, “OYO सुरक्षित आणि जबाबदार आदरातिथ्य पद्धती कायम ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे. त्यामुळे OYO ने आपल्या नियमात महत्त्वाचे बदल केले आहेत. अविवाहित जोडप्याला आता OYO मध्ये रुम्स दिले जाणार नाहीत. कायद्याची अंमलबजावणी आणि नागरी समाजाचे ऐकण्याची आणि काम करण्याची आमची जबाबदारी देखील आम्ही ओळखतो, त्यामुळे ओयोने हे महत्त्वाचे बदल केले आहेत. 





Source link

Dharashiv: धाराशिवमध्ये शेतीच्या वादातून हिंसक हाणामारी; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

0
Dharashiv: धाराशिवमध्ये शेतीच्या वादातून हिंसक हाणामारी; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी


Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री धक्कादायक घटना घडली. शेतीच्या वादातून झालेल्या हिंसक हाणामारीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.



Source link

Sharad Ponkshe : मुख्यमंत्र्यांसाठी व्हीआयपी रूमला रंगरंगोटी, प्रेक्षकांना मात्र तुटक्या खुर्च्या! शरद पोंक्षे संतापले

0
Sharad Ponkshe : मुख्यमंत्र्यांसाठी व्हीआयपी रूमला रंगरंगोटी, प्रेक्षकांना मात्र तुटक्या खुर्च्या! शरद पोंक्षे संतापले


Sharad Ponkshe Angry On Theater Situation : भारतीय मनोरंजन विश्वात रंगभूमीचे विशेष योगदान आहे. मात्र, सध्या नाट्यगृहांच्या अवस्था या चर्चेचा विषय ठरत आहेत. अनेक कलाकार नाट्यगृहाच्या या दुरावस्थेवर बोलताना दिसतात. आता अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील हा मुद्दा उपस्थित करून एक प्रश्न उपस्थित केला आहे. कल्याणमधील अत्रे रंगमंदिराची दुरवस्था आणि त्यासंबंधी प्रशासनाची अनास्था या मुद्द्यावर ज्येष्ठ नाट्यअभिनेते शरद पोंक्षे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमासाठी व्हीव्हीआयपी कक्षाची रंगरंगोटी केली जात असताना, नाट्यगृहातील इतर भागांच्या दुरवस्थेची स्थिती अजूनही बिकट असल्याचे त्यांनी म्हटले. 



Source link

HMPV Symptoms: एचएमपीव्ही व्हायरस म्हणजे काय, त्याची लक्षणे काय आहेत आणि सर्वाधिक धोका कोणाला? वाचा

0
HMPV Symptoms: एचएमपीव्ही व्हायरस म्हणजे काय, त्याची लक्षणे काय आहेत आणि सर्वाधिक धोका कोणाला? वाचा


HMPV Virus Details: बेंगळुरूमध्ये एका आठ महिन्यांच्या बाळाला ह्युमन मेटान्यूमोव्हायरस म्हणजेच एचएमपीव्हीची लागण झाल्याचा संशय आहे. एका खासगी रुग्णालयात हा रुग्ण आढळून आला असून रुग्णालयाने संशयित संसर्गाची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांना दिली आहे. मात्र, अद्याप राज्याच्या आरोग्य विभागाने स्वतंत्रपणे निकालाची पडताळणी केली नाही. खासगी रुग्णालयाच्या निष्कर्षांची विश्वासार्हता मान्य केली आहे. त्यांच्या चाचणी प्रक्रियेच्या अचूकतेवर आमचा विश्वास आहे, असे आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.



Source link

Mufasa The Lion King : ‘मुफासा द लायन किंग’ आता ओटीटीवर बघता येणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या

0
Mufasa The Lion King : ‘मुफासा द लायन किंग’ आता ओटीटीवर बघता येणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या


Mufasa The Lion King On OTT : बॉलिवूड किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान याने आपल्या मुलांसह आवाज दिलेला, डिस्नेचा ॲनिमेटेड चित्रपट ‘मुफासा: द लायन किंग’ २० डिसेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’च्या मोठ्या वादळातही या चित्रपटाची कमाई सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे. दरम्यान, आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची सगळीकडे चर्चा होत आहे. हा गाजलेला चित्रपट केव्हा आणि कुठे रिलीज होईल, ते जाणून घेऊया…  



Source link