Thursday, August 20, 2026
Homeसाताराआपली फलटण मॅरेथॉन 2024-25:  1300 हून अधिक स्पर्धकांचा उत्साहवर्धक सहभाग!

आपली फलटण मॅरेथॉन 2024-25:  1300 हून अधिक स्पर्धकांचा उत्साहवर्धक सहभाग!

आपली फलटण मॅरेथॉन 2024-25: महेश मांजरेकरांसह 1300 हून अधिक स्पर्धकांचा उत्साहवर्धक सहभाग!

फलटण :  डॉ. प्रसाद जोशी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित आपली फलटण मॅरेथॉन 2024-25 ने फलटण शहरात नवचैतन्याचा संदेश दिला. या मॅरेथॉनमध्ये 1300 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन पाटील, आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाले.

बक्षीस समारंभात प्रमुख पाहुणे अभिनेते महेश मांजरेकर यांनी आपल्या भाषणात, “स्पर्धेत भाग घेणे हे खरे विजेतेपद आहे. योग्य आहार व व्यायाम ही काळाची गरज आहे,” असे सांगितले. यावेळी माजी विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे आवाहन केले.

या वर्षीच्या मॅरेथॉनमध्ये फलटणसह सातारा, पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, अकोला, कोल्हापूर, नगर आणि इतर शहरांमधून स्पर्धक आले. कार्यक्रमात 60 विजेत्यांचा गौरव करण्यात आला. प्रत्येकी गटात दहा हजार, सात हजार, पाच हजार रुपयांची बक्षिसे व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रसाद जोशी यांनी केले, सूत्रसंचालन नवनाथ कोलवडकर यांनी, तर आभारप्रदर्शन डॉ. प्राची जोशी यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments