Wednesday, November 18, 2026
Homeफलटणसातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी उदयसिंह पाटील-उंडाळकर; उपाध्यक्षपदी दीपकराव चव्हाण यांची निवड!

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी उदयसिंह पाटील-उंडाळकर; उपाध्यक्षपदी दीपकराव चव्हाण यांची निवड!

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा बहुप्रतीक्षित निर्णय अखेर जाहीर झाला आहे. बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) चे नेते तथा फलटणचे माजी आमदार दीपकराव चव्हाण यांची निवड झाली आहे.

या निवडीमुळे सातारा जिल्ह्याच्या सहकार आणि राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. अध्यक्षपदी उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची निवड झाल्याने कराड तालुक्याला जिल्हा बँकेच्या नेतृत्वाची संधी मिळाली आहे. तर उपाध्यक्षपदी दीपकराव चव्हाण यांची निवड झाल्याने फलटण तालुक्याला जिल्हा बँकेच्या नेतृत्वात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

दोन्ही पदांवरील निवडीमुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी कारभाराकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली बँकेचा कारभार अधिक प्रभावीपणे पुढे जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments