Monday, November 16, 2026
Homeफलटणदर रविवारी चला बुद्ध विहारी’ उपक्रमांतर्गत समतानगर विडणी येथे बुद्धपूजेचे आयोजन

दर रविवारी चला बुद्ध विहारी’ उपक्रमांतर्गत समतानगर विडणी येथे बुद्धपूजेचे आयोजन

‘दर रविवारी चला बुद्ध विहारी’ उपक्रमांतर्गत समतानगर विडणी येथे बुद्धपूजेचे आयोजन

विडणी : मौजे समतानगर, विडणी येथील पंचशील बुद्ध विहारात न्यू पंचशील तरुण मित्र मंडळाच्या वतीने ‘दर रविवारी चला बुद्ध विहारी’ या उपक्रमांतर्गत बुद्धपूजेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात बुद्ध वंदना व पूजेच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. यावेळी न्यू पंचशील तरुण मित्र मंडळाचे कार्यकर्ते, बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होते.

बुद्ध विहार हे केवळ धार्मिक स्थळ नसून धम्माचे आचरण, सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि प्रबोधनाचे केंद्र व्हावे, या उद्देशाने ‘दर रविवारी चला बुद्ध विहारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला समाजबांधवांनी नियमितपणे सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments