Monday, November 16, 2026
Homeफलटण"बुद्ध विहार हे केवळ पूजा-अर्चा करण्याचे ठिकाण नसून ज्ञान, विचार, प्रज्ञा आणि...

“बुद्ध विहार हे केवळ पूजा-अर्चा करण्याचे ठिकाण नसून ज्ञान, विचार, प्रज्ञा आणि शील यांची जोपासना करणारे केंद्र आहे. – सोमीनाथ घोरपडे

“बुद्ध विहार हे केवळ पूजा-अर्चा करण्याचे ठिकाण नसून ज्ञान, विचार, प्रज्ञा आणि शील यांची जोपासना करणारे केंद्र आहे. – सोमीनाथ घोरपडे

गुणवरे येथे ‘दर रविवारी चला बुद्ध विहारी’ उपक्रमांतर्गत बालसंस्कार वर्गाचे आयोजन

गुणवरे : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका माजी कार्यकारणी आणि ग्रामशाखेच्या वतीने ‘दर रविवारी चला बुद्ध विहारी’ ही संकल्पना घेऊन गुणवरे येथे बालसंस्कार वर्गाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना अनापानसती ध्यानसाधना, मंगलमैत्री भावना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार, त्यांचे संघर्षमय जीवन आणि महापुरुषांच्या विचारांनुसार आचरण करण्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी पदाधिकारी व सातारा जिल्हा संस्कार सचिव आयु. सोमिनाथ घोरपडे सर, माजी अध्यक्ष आयु. महावीर भालेराव आणि माजी कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे सर उपस्थित होते.

यावेळी सोमीनाथ घोरपडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासाठी घेतलेले अपार कष्ट, केलेला संघर्ष, ज्ञानसाधना आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेले यश यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात ठेवावा. केवळ शैक्षणिक यश मिळवणे एवढेच ध्येय न ठेवता शिक्षणातून विवेकशील, स्वाभिमानी आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले, “बुद्ध विहार हे केवळ पूजा-अर्चा करण्याचे ठिकाण नसून ज्ञान, विचार, प्रज्ञा आणि शील यांची जोपासना करणारे केंद्र आहे. या बुद्ध विहारातून उद्याचे मिलिंद आणि नागसेन घडले पाहिजेत. त्यामुळे कोणी येवो अथवा न येवो, आपण विद्यार्थ्यांना सोबत घेऊन हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवला पाहिजे. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकांचे वाचन व्हावे, त्यावर चर्चा व्हावी, विचारांचे मंथन आणि वैचारिक संवाद घडावा. या प्रक्रियेतूनच महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेणारी भावी पिढी निर्माण होईल. ही पिढी आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी आदर्श जीवन जगेल तसेच शिक्षण, प्रशासन, सामाजिक आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांतील मानाच्या व मोक्याच्या जागा आपल्या कर्तृत्वाने प्राप्त करेल.”

यावेळी आयु. महावीर भालेराव सर यांनी विद्यार्थ्यांना अनापानसती ध्यानसाधनेचे महत्त्व समजावून सांगितले. श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना त्याकडे सजगपणे लक्ष देणे, श्वासावर मन एकाग्र करणे आणि मनात येणारे विचार शांतपणे पाहणे, ही अनापानसती ध्यानाची प्राथमिक प्रक्रिया आहे. नियमित ध्यानसाधनेमुळे मनाची एकाग्रता वाढण्यास, चंचलता कमी होण्यास आणि अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपासक विजय विठ्ठल निकाळजे यांनी विद्यार्थ्यांना ध्यानसाधनेतील मंगलमैत्री या महत्त्वपूर्ण संकल्पनेची ओळख करून दिली. मंगलमैत्री म्हणजे सर्व प्राणिमात्रांविषयी मनात प्रेम, सद्भावना, करुणा आणि कल्याणाची भावना निर्माण करणे. कोणाविषयीही द्वेष, मत्सर किंवा वैर न बाळगता सर्वांचे मंगल व्हावे, अशी मनोभावना विकसित करणे होय.त्यांनी विद्यार्थ्यांना डोक्यापासून पायांच्या तळव्यांपर्यंत संपूर्ण शरीराविषयी मंगलभावना व्यक्त करण्याचा सराव शिकवला. डोके, डोळे, कान, नाक, तोंड, मान, खांदे, हात, छाती, पोट, पाठ, कंबर, पाय आणि पायांचे तळवे अशा शरीराच्या प्रत्येक अवयवाकडे सजगतेने लक्ष देत मनात आरोग्य, सुख, शांती आणि कल्याणाची भावना निर्माण करावी, असे त्यांनी सांगितले.
या साधनेचा व्यापक अर्थ स्पष्ट करताना स्वतःपासून सुरुवात करून कुटुंबीय, मित्र, परिचित, अपरिचित आणि सर्व सजीव प्राणिमात्रांपर्यंत मंगलमैत्रीचा विस्तार करावा. ‘सर्वांचे कल्याण होवो, सर्व सुखी होवोत, सर्व निरोगी राहोत, सर्वांच्या जीवनात शांती नांदो’ अशी भावना मनात दृढ करणे म्हणजे मंगलमैत्री होय, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
‘वाट महामानवाची’ गीताने कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. विठ्ठल निकाळजे सर यांनी केले. यावेळी त्यांनी महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित ‘वाट महामानवाची’ हे गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गीताच्या माध्यमातून महामानवांच्या विचारांचा आणि त्यांच्या परिवर्तनवादी कार्याचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा गुणवरेचे अध्यक्ष आयु. सागर आढाव, सरचिटणीस आयु. सुधीर आढाव आणि कोषाध्यक्ष आयु. दीपक आढाव उपस्थित होते. त्यांनी गुणवरे येथे सुरू झालेला हा बालसंस्कार वर्ग आणि ‘दर रविवारी चला बुद्ध विहारी’ हा उपक्रम भविष्यात नियमितपणे सुरू राहण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments