जिल्हा परिषद सदस्या सौ.वैशालीताई कांबळे यांचा प्रयत्नातून निंबळक येथील ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनेतील साहित्याचे वाटप
निंबळक: निंबळक ता.फलटण येथे महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याण मंडळ व इतर कल्याणकारी मंडळ यांच्या मार्फत लाभार्थ्यांना पेटी ,बॅग व वॉटर फिल्टर तसेच भांडी किट वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. या मधील लाभार्थ्यांना जिल्हा परिषद सदस्या सौ.वैशालीताई कांबळे यांच्या प्रयत्नातून मोफत सुविधा देण्यात आलेल्या आहेत.
या वेळी बोलताना समाज कल्याण अधिकारी मयूर गौंड म्हणाले की समाज कल्याण विभागाच्या शासनाच्या विविध योजना असून त्या मोफत आहेत.याचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.मयुर गौंड जिल्हा समाज कल्याण अधिकारी रायगड तसेच सौ. वैशाली संदीप कांबळे जिल्हा परिषद सदस्य बरड गट व सदस्य समाज कल्याण समिती सातारा तसेच श्री.मेघराज नाईक निंबाळकर चेअरमन श्री संत ज्ञानेश्वर नागरी यांनी सहकारी पतसंस्था निंबळक व सौ.संगीता महेंद्र भोसले ग्रामपंचायत सदस्य निंबळक तसेच सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मदने, संजय यादव व श्री किशोर गौंड ग्राम विकास अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
