Friday, October 9, 2026
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडे हत्या प्रकरण: राजकीय वातावरण तापले, राजीनाम्याची मागणी उचलून धरली

धनंजय मुंडे हत्या प्रकरण: राजकीय वातावरण तापले, राजीनाम्याची मागणी उचलून धरली

मुंबई: संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. सत्ताधारी महायुतीतील आमदार आणि विरोधी नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे ही मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी नेत्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली आहे.

या वादग्रस्त प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुंडे यांनी, “नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. माझ्या खात्याचा सविस्तर आढावा अजित पवारांसमोर मांडला,” असे स्पष्ट केले.

“मी कोणा-कोणाचे तोंड धरणार?”
धनंजय मुंडे यांनी विरोधकांनी लावलेल्या आरोपांवर अप्रत्यक्षपणे पलटवार केला. त्यांनी म्हटले, “लोकशाहीत प्रत्येकाला आरोप करण्याचा अधिकार आहे. पण माझ्या मतानुसार, जे आरोप करत आहेत त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना विचारावे. महायुतीतील भाजप आमदारांनीही आपल्या पक्षाच्या अध्यक्षांना विचारावे.”

चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांची तयारी
एसआयटीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाही मुंडे यांनी तपास यंत्रणेवर विश्वास व्यक्त केला आहे. “मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी योग्य अधिकारी नेमले आहेत. सध्या तपास सुरु आहे, त्यामुळे या प्रकरणावर बोलणे योग्य ठरणार नाही,” असे ते म्हणाले.

“मीडिया ट्रायल बंद करा, कोर्टावर विश्वास ठेवा”
मुंडे यांनी माध्यमांवर फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा आरोप केला. “कोर्टात तपास पूर्ण होऊ द्या. हे सगळं फेक नरेटिव्ह आहे. मीडिया ट्रायलमुळे चुकीचे संदेश जात आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments