Monday, August 3, 2026
Home Blog Page 571

Viral News: इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची फी पाहून बसेल धक्का; पाहा व्हायरल पोस्ट!

0
Viral News: इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची फी पाहून बसेल धक्का; पाहा व्हायरल पोस्ट!


Bengaluru School Viral News: खाजगी अवाजवी फी आकारली जात असल्याच्या अनेक बातम्या ऐकायला मिळतात. अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, जी पाहून अनेकांना धक्का बसला आहे. बंगळुरू येथील एका खाजगी शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची फी पाहिल्यानंतर पालकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशा अवाजवी फीमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.



Source link

Krushna Abhishek: कृष्णा अभिषेकने शूज ठेवण्यासाठी खरेदी केला ३ बीएचके फ्लॅट, दर ६ महिन्यांनी बदलते कलेक्शन

0
Krushna Abhishek: कृष्णा अभिषेकने शूज ठेवण्यासाठी खरेदी केला ३ बीएचके फ्लॅट, दर ६ महिन्यांनी बदलते कलेक्शन


Krushna Abhishek: कॉमेडियन-अभिनेता कृष्णा अभिषेक नेहमी खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याला शूजची प्रचंड आवड आहे. नुकताच कृष्णा अभिषेकने ते ठेवण्यासाठी वेगळा फ्लॅट खरेदी केला आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’पासून ‘बिग बॉस’ आणि ‘लाफ्टर शेफ’पर्यंत अनेक रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या कृष्णा अभिषेकने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, त्याने राहण्यासाठी नाही तर शूज आणि कपडे ठेवण्यासाठी थ्री बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. तो या फ्लॅटचा वापर स्टोअर हाऊस म्हणून करतो. इतकंच नाही तर कृष्णा दर 6 महिन्यांनी आपल्या शूज आणि कपड्यांचे हे कलेक्शन अपडेट करतो.



Source link

आशा भोसलेंची नात आणि क्रिकेटपटू मोहम्मद सिराजचा फोटो व्हायरल, नेटकऱ्यांनी विचारले ‘लग्न करणार का?’

0
आशा भोसलेंची नात आणि क्रिकेटपटू मोहम्मद सिराजचा फोटो व्हायरल, नेटकऱ्यांनी विचारले ‘लग्न करणार का?’


गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले अनेकदा त्यांच्यासोबत पाहायला मिळते. ही आजी आणि नातीची जोडी अनेकदा एकत्र पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर जनाईच्या काही फोटोंची चर्चा रंगली आहे. खरंतर जनाईने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. दरम्यान, एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या फोटोमध्ये जनाई ही क्रिकेटपटू मोहम्मद सिराज दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.



Source link

Neerja Bhatla: डॉ. नीरजा भाटला यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर; करोडो महिलांना दिलं जीवनदान

0
Neerja Bhatla: डॉ. नीरजा भाटला यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर; करोडो महिलांना दिलं जीवनदान



डॉ. नीरजा भाटला यांना सर्वायकल कॅन्सरच्या संशोधनातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. 



Source link

Sky force Collection: अक्षय कुमारच्या ‘स्काय फोर्स’चा बॉक्स ऑफिसवर धमाका, दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ

0
Sky force Collection: अक्षय कुमारच्या ‘स्काय फोर्स’चा बॉक्स ऑफिसवर धमाका, दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ


बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचे गेल्या काही वर्षांपासून सिनेमे फ्लॉप ठरताना दिसत आहेत. मात्र, यंदाचे वर्ष हे अक्षयसाठी चांगले असणार असे चित्र आहे. नुकताच अक्षय कुमारचा स्कायफोर्स हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षयसोबत वीर पहारिया मुख्य भूमिकेत दिसत आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट त्याच्यासाठी लकी ठरत आहे. बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपटांनंतर अक्षयच्या या चित्रपटाने चांगली सुरुवात केली आहे. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने मोठी झेप घेतली आहे.



Source link

Guillain Barre Syndrome: राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचा पहिला बळी, पुण्यातील रुग्णाचा सोलापुरात मृत्यू

0
Guillain Barre Syndrome: राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचा पहिला बळी, पुण्यातील रुग्णाचा सोलापुरात मृत्यू


Guillain-Barre Syndrome Outbreak: पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या चिंतेत भर घालणारी माहिती समोर आली आहे. पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम म्हणजेच जीबीएसची लागण झालेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे. मृत रुग्णाला काही दिवसांपूर्वी जुलाबाचा त्रास सुरू झाला. सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारदरम्यान श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याचा मृत्यू झाला.



Source link

Mumbai Local : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक वाढवल्यामुळे लोकल ट्रेनचा बोजवारा, प्रवाशांचे प्रचंड हाल!

0
Mumbai Local : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक वाढवल्यामुळे लोकल ट्रेनचा बोजवारा, प्रवाशांचे प्रचंड हाल!


Mumbai Local News: कर्नाक पुलावर गर्डर बसवण्यासाठी रेल्वकडून रात्रीचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला. परंतु, काम अद्यापही न संपल्याने मुंबईची लाईफलाइन म्हटली जाणारी लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. मेगाब्लॉकमुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक खोळंबलेली असून पश्चिम रेल्वेची वाहतूक उशीराने सुरू आहे. एवढेच नव्हेतर, लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्या दादर, भायखळा आणि वडाळा इथपर्यंत धावत आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना रिक्षा किंवा बसने प्रवास करावा लागत आहे.



Source link

फलटण: जयमल्हार लॉजवर पोलिसांचा छापा; वेश्याव्यवसाय प्रकरणी दोन अटकेत, एक फरार

0
फलटण: जयमल्हार लॉजवर पोलिसांचा छापा; वेश्याव्यवसाय प्रकरणी दोन अटकेत, एक फरार

फरांदवाडी (ता. फलटण) – जयमल्हार लॉजवर फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस आणि त्यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात वेश्याव्यवसाय उघडकीस आला आहे. या कारवाईत १ लाख २६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दोन जणांना अटक करण्यात आली आहे, तर एक संशयित फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १.५० वाजता, मिळालेल्या गुप्त माहितीनुसार फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जयमल्हार लॉज येथे छापा टाकला. या छाप्यात प्रविण रंगराव पवार (वय ३५, रा. विडणी, ता. फलटण), दिपक दत्तात्रय धायगुडे (वय २८, रा. सरडे, ता. फलटण) यांना अटक करण्यात आली असून राहुल सुर्यकांत सरगर (वय ५०, रा. मलटण, ता. फलटण) हा फरार आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून १ लाख २६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेचीही सुटका करण्यात आली आहे.

पोलिसांचा इशारा: अशा गैरकृत्यांविरोधात कठोर कारवाई होणार

या कारवाईत फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय आणि निर्भया पथकाच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. यामध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, तसेच स.पो. फी. अहिवळे, पो.ना. शेख, पो.कॉ. लयटे, मपो कॉ. तळपे, पो.हवा. भोसले, पो.कॉ. पवार, पो.कॉ. काकडे, चापोकों नाळे, मपोकों वलेकर यांचा सहभाग होता.

फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवावे आणि अशा प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्यांविषयी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. अशा कृत्यांना पाठीशी घातले जाणार नाही आणि कठोर कारवाई केली जाईल.

Video: लेकीच्या जन्मानंतर दीपिका पादूकोणचा पहिला रॅम्प वॉक, नेटकऱ्यांनी केले कौतुक

0
Video: लेकीच्या जन्मानंतर दीपिका पादूकोणचा पहिला रॅम्प वॉक, नेटकऱ्यांनी केले कौतुक


बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाने एका मुलीला जन्म दिला. तिने मुलीचे नाव दुआ ठेवले. त्यानंतर दीपिकाने फिल्म इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. आता दीपिका रॅम्प वॉक करताना दिसली. त्याचा वॉक पाहून चाहते आनंदी झाले आहेत. अनेकांनी तर दीपिकाची तुलना सदाबहार अभिनेत्री रेखा यांच्याशी केली आहे.



Source link

Ajit Pawar: अजित पवार यांच्या निकवर्तीयांची दादागिरी; जमिनीच्या वादातून नागरिकाला मारहाण

0
Ajit Pawar: अजित पवार यांच्या निकवर्तीयांची दादागिरी; जमिनीच्या वादातून नागरिकाला मारहाण


Viral Video: राज्यात राजकीय नेत्यांचा पाठिंबा असलेल्या कार्यकर्त्यांकडून सर्वसामान्य लोकांचा शारिरीक आणि मानसिक छळ केला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांनी काही दिवसांपूर्वी एका रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेला काही दिवस उलटले तोच, बाबुराव चांदेरे यांनी आणखी एका व्यक्तीला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.



Source link