
Hockey Player PR Sreejesh Padma Bhushan Award : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले. या विजयात गोलकीपर पीआर श्रीजेश याचा सिंहाचा वाटा होता. या ऐतिहासिक विजयानंतर श्रीजेशने आपल्या १८ वर्षांच्या हॉकी कारकिर्दीला निरोप दिला.

Hockey Player PR Sreejesh Padma Bhushan Award : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले. या विजयात गोलकीपर पीआर श्रीजेश याचा सिंहाचा वाटा होता. या ऐतिहासिक विजयानंतर श्रीजेशने आपल्या १८ वर्षांच्या हॉकी कारकिर्दीला निरोप दिला.

इंग्रजांनी जवळपास 200 वर्षे भारतावर राज्य केलं. इंग्रजांनी भारतातील अनेक राज्यांना आपले गुलाम केले होते. मात्र, भारतात एक राज्य असे होते ज्याला कधीच इंग्रज आपला गुलाम बनवू शकले नाहीत.
Source link

Republic Day : भारत आज आपला ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक कर्तव्य पथावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारची १० मंत्रालये/विभागांकडून चित्ररथांचे सादरीकरण करण्यात आले. एका वेगळ्या झांकीनं सर्वांचं मन मोहून घेतलं. तो चित्ररथ म्हणजे संविधाना प्रतिकृती आणि संविधानाचे जनक भीमराव आंबेडकर यांचा आवाज. संविधानाचा चित्ररथ पाहून पंतप्रधान मोदी आपला आनंद रोखू शकले नाहीत आणि त्यांनी हात हलवून चित्रपथाचे स्वागत केले. राज्यघटनेच्या झांकीद्वारे मोदी सरकारनेही विरोधकांना संदेश देण्याचा प्रयत्न केला, कसे ते जाणून घेऊया.

कर्नाटक उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सहमतीने लैंगिक संबंध ठेवल्याने पुरुषाला महिलेवर हल्ला करण्याचा अधिकार मिळू शकत नाही. एका सामाजिक कार्यकर्त्याने लैंगिक आणि शारीरिक शोषणाचा आरोप केल्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने हे वक्तव्य केले आहे. कोर्टात दाखल झालेल्या खटल्यानुसार, सर्कल इन्स्पेक्टर बी. अशोक कुमार आणि तक्रारदार पोलिस कॉन्स्टेबलच्या पत्नीचे २०१७ ते २०२२ या कालावधीत प्रेमसंबंध होते.

Success Story : प्रयत्न केल्यानं यशस्वी होतो आणि जर आपण कधी प्रयत्न केलेच नाही तर आपण यशस्वी कसे होणार. असंच काहीसं ओडिशाच्या राउरकेला शहरात राहणाऱ्या सौमेंद्र जेना यांच्यासोबत झालं आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दोन गोष्टींचे फोटो शेअर करत या प्रवासाविषयी सांगितलं आहे. त्यांनी शेअर केलेला एक फोटो हा राउरकेला येथील त्यांच्या जुन्या घराचा आहे जे खूपचं छोटं आहे. तर दुसरीकडे हा 12वीं पास दुबईमध्ये कसा आता लग्झरियस बंगल्यात राहतात. त्यांच्याकढे पोर्श टायकन आणि जी वॅगन ब्राबस 800 गाड्या आहेत. आता इथपर्यंतच प्रवास कसा होता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर रात्र-दिवस मेहनत आहे.
सौमेंद्र जेना यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सौमेंद्रनं दोन फोटो शेअर केले आहेत. ही पोस्ट शेअर करत सौमेंद्रनं कॅप्शन दिलं की हे माझं जुनं घर होतं-ओडिशाचं छोटसं शहर राउरकेला येथे आहे. इथेच माझा जन्म झाला. लहाणाचा मोठा झालो आणि 12 वी पर्यंत शिकलो. 2021 मध्ये या सगळ्या आठवणी जगण्यासाठी परत गेलो. आज दुबईतलं माझ घर ही तब्बल 17 वर्षांची मेहनत आहे. न झोपता सतत काम केलं कोणतंही कारण दिलं नाही. यशस्वी होण्यासाठी वेळ लागतो. आता तुमचं कारण काय आहे?
This was my home back then—a small town in Odisha, Rourkela, where I was born, grew up, and studied till class 12 (1988-2006). Revisited in 2021 for the memories!
Today, my home in Dubai tells the story of 17 years of relentless hard work, sleepless nights, and no shortcuts.… pic.twitter.com/nw5tCdtwKE— Soumendra Jena (@soamjena) January 24, 2025
अनेक लोकांनी सौमेंद्र जेना यांची ही पोस्ट पाहता त्यांना पाठिंबा दिला आहे. इतकंच नाही तर त्यानं केलेल्या स्ट्रगलसाठी त्याला शाब्बासकी दिली आहे. एका नेटकऱ्यानं सांगितलं की ‘स्वप्न ही पूर्ण होतात. यशस्वी होणं म्हणजे खूप मेहनत करावी लागते. न झोपता आणि कोणताही शॉर्टकट घेतले नाही तर यश मिळतं. आनंद आहे की तुम्ही तुमच्या मुलांनासोबत घेऊन गेलात. तुमच्या मुलांना तुम्ही किती मेहनत केली हे नक्कीच कळणार त्यांना त्याची जाणीव राहिल.’
हेही वाचा : लग्नाच्या आधल्या रात्री आमिर खानचा जावई संपूर्ण रात्र जुनैद खानसोबत झोपला अन्…
सौमेंद्र जेना यांच्याविषयी बोलायचं झालं तर ते आर्थिक क्षेत्रातील एक लोकप्रिय कन्टेन्ट क्रिएटर आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांचे 3,00,000 पेक्षा जास्त आणि युट्यूबवर त्यांचे जवळपास 487,000 सब्सक्रायबर्स आहेत. ते त्यांच्या कंटेन्टच्या मदतीनं आर्थिक विषयांना सोप्या भाषेत समजवतात. गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात आणि लोकांना आर्थिक विषयांवर योग्य निर्णय घेण्यास मदत करतात. सौमेंद्र जेना यांनी आयुष्यात जे काही केलं आहे त्यामुळे अनेकांना प्रोत्साहित केलं आहे.

Mumbai Coastal Road Project : मुंबई किनारी रस्त्याचे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून आज उत्तरवाहिनी मार्गाचे उद्घाटन झाले आहे. प्रजासत्ताक दिनी हा मार्ग नागरिकांना समर्पित होत असून उद्यापासून या मार्गासह अन्य तीन आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत.

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात आता नवे वळण आले आहे. सैफवर चाकू हल्ला केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या शरीफुल इस्लाम शहजाद या बांगलादेशी नागरिकाच्या बोटांचे ठसे घटनास्थळावर सापडलेल्या खुणांशी जुळत नाहीत. राज्य सीआयडीने शरीफुल इस्लामच्या फिंगरप्रिंट नमुन्यांचा निगेटिव्ह अहवाल सादर केला आहे. अशा तऱ्हेने मुंबई पोलिसांसाठी हा मोठा धक्का मानला जात असून खरा हल्लेखोर शरीफुल इस्लाम आहे की आणखी कोणी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Mother Threw Her 9-Month-Old Child: उत्तर प्रदेशच्या बलियामधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बहिणीला फसवण्यासाठी एका महिलेने आपल्या पोटच्या ९ महिन्याच्या निष्पाप मुलाला छतावरून खाली फेकले. या घटनेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. मुलाच्या आजीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या महिलेला अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Republic Day 2025 No Maharashtra Tableau This Year Know Why: दिल्लीतील कर्तव्यपथावर यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ दिसला नाही. असं का यामागील खरं कारण समोर आलं आहे.
Source link

Jalna News: जालन्यातील वाटुर फाटा येथे एका तरुणाने स्वत:ला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावातील व्यापाऱ्यासोबत पैशाच्या वादातून त्याने स्वत: पेटवून घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.