Monday, August 3, 2026
Home Blog Page 569

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील ४८ तासात तापमानात होणार मोठे बदल! IMD ने वर्तवला अंदाज

0
Maharashtra Weather Update : राज्यात पुढील ४८ तासात तापमानात होणार मोठे बदल! IMD ने वर्तवला अंदाज


Maharashtra IMD Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल झाले आहेत. दरम्यान, पुढील दोन दिवसांत हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील काही दिवसांत तपमनात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर सकाळी आणि रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता आहे.



Source link

फलटण : महामार्गलगत गव्हाच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळला, वनविभाग तपासात

0
फलटण : महामार्गलगत गव्हाच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळला, वनविभाग तपासात

निंभोरे (ता. फलटण) : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गालगत निंभोरे गावाच्या हद्दीत गव्हाच्या शेतात एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. ही घटना २६ जानेवारी रोजी दुपारी नागरिकांच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच फलटण वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

घटनास्थळावर मोठी गर्दी

निंभोरे गावालगत अष्टविनायक हॉटेलच्या समोरील बाजूस गव्हाच्या शेतात बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच नागरिकांनी वनविभागाला कळवले. वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

शिवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार मृत्यूचे कारण

बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बिबट्याच्या शवविच्छेदनानंतरच त्याच्या मृत्यूमागील कारण स्पष्ट होईल. प्राथमिक अंदाजानुसार विषबाधा किंवा अपघाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

परिसरात भीतीचे वातावरण

फलटण तालुक्यातील निंबळक, मुंजवडी, गिरवी या भागात यापूर्वी अनेकदा बिबट्या आढळल्याची प्रकरणे समोर आली आहेत. अनेक वेळा वन विभागाच्या कॅमेरातही बिबट्या कैद झाला होता. मात्र, आता महामार्गालगत बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि जंगल विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास वनविभाग आणि स्थानिक प्रशासन करीत आहे.

लाडकी बहीण व पीएम किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून ४ हजार कोटी वसुलीचे आव्हान, प्रशासनाला फुटणार घाम!

0
लाडकी बहीण व पीएम किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून ४ हजार कोटी वसुलीचे आव्हान, प्रशासनाला फुटणार घाम!


लाडकी बहिण योजना आणि पीएम किसान सन्मान निधी सारख्या लोकप्रिय योजनांच्या जोरावर महाराष्ट्रात महायुतीची सत्ता कायम राहिली. मात्र आता अपात्र लाभार्थ्यांना देण्यात आलेले कोट्यवधी रुपये वसूल करण्यासाठी नोकरशहांची धडपड सुरू आहे.



Source link

5,62,51,58,48,05,00,000 एवढी संपत्ती गायब! भारताला कुणी आणि कसं लुटलं?

0
5,62,51,58,48,05,00,000 एवढी संपत्ती गायब! भारताला कुणी आणि कसं लुटलं?


India Wealth Report Oxfam International : जहां डाल डाल पर सोने की चिडfया करती है बसेरा वो भारत देश है मेरा…. असं भारताचे वर्णन केले जाते. एकेकाळी भारतातून सोन्याचा धूर निघायचं असं सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र हे खरचं आहे हे सिद्ध करणारा एक रिपोर्ट जगासमोर आला आहे. एकेकाळी भारतात 5,62,51,58,48,05,00,000 एवढी संपत्ती  होती. मात्र, ही सर्व संपत्ती गायब झाली आहे. जाणून घेऊया भारताची लुट कोणी केली.

ऑक्सफॅम इंटरनॅशनलने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. . ‘टेकर्स, नॉट मेकर्स’ असे या अहवालाचे नाव आहे. स्वित्झर्लंडमध्ये  जगातील श्रीमंत आणि शक्तिशाली मान्यवरांच्या उपस्थितीत हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालात प्रथमच भारतात किती संपत्ती होती याचा आकडा जगासमोर आणला आहे. 

एकेकाळी भारताकडे इतकी संपत्ती होती की अमेरिका आणि चीन सारखे शक्तीशाली देशांचे काहीच अस्तित्व नसते. ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या अहवालानुसार एकेकाळी भारतात 5,62,51,58,48,05,00,000 एवढी संपत्ती  होती. मात्र, भारतातील या संपत्तीची मोठ्या प्रमाणात लुट झाली. 

1765 ते 1900 या काळात ब्रिटनने भारतात वसाहती निर्माण केल्या. या दरम्यान त्यांनी भारतातून 64.82 ट्रिलियन डॉलरची संपत्ती काढली. या रकमेचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की सध्या भारताची एकूण अर्थव्यवस्था केवळ 3.5 ट्रिलियन डॉलर आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था 28 ट्रिलियन डॉलर्सची आहे. म्हणजे ब्रिटनने अमेरिकेच्या सध्याच्या अर्थव्यवस्थेच्या दुपटीहून अधिक लूट केली. ब्रिटनने लुटलेल्या 65 ट्रिलियन डॉलरपैकी  33.8 ट्रिलियन डॉलर इतकी संपत्ती ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत 10 टक्के लोकांकडे गेल्याचेही या अहवालात म्हटले आहे . लंडनच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ५० ब्रिटिश पौंडांच्या नोटांनी झाकले गेले असते, तर त्या नोटांच्या तुलनेत ही रक्कम चारपट जास्त असेल असेही सांगितले जात आहे. ‘ऑक्सफॅम इंटरनॅशनल’ अहवालात जागतिक असमानतेबाबतही चर्चा करण्यातक आली आहे. 





Source link

कोरोना विषाणू नैसर्गिक नव्हता, प्रयोगशाळेतून लीक झाला होता; ट्रम्प सत्तेवर येताच CIA चा चीनवर निशाणा

0
कोरोना विषाणू नैसर्गिक नव्हता, प्रयोगशाळेतून लीक झाला होता; ट्रम्प सत्तेवर येताच CIA चा चीनवर निशाणा


डोनाल्ड ट्रम्प येताच अमेरिकन सरकारने आपली जुनी वृत्ती दाखवण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने मोठा दावा केला आहे की, कोरोना विषाणू नैसर्गिक नव्हता तर याची उत्पत्ती प्रयोगशाळेतून झाली आहे. आपल्या पहिल्या कार्यकाळातही ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसला ‘चायनीज व्हायरस’ म्हणत शी जिनपिंग सरकारवर हल्ला चढवला होता. अमेरिकेचा हा नवा दावाही महत्त्वाचा आहे कारण लॉकडाऊन, आर्थिक संकट आणि लाखो लोकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या या विषाणूच्या उत्पत्तीचा प्रश्न जागतिक स्तरावर मोठा प्रश्न आहे. चीनने अमेरिकेचा हा अहवाल राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे.



Source link

पुणे तेथे काय उणे..! केवळ १ रुपयात ड्रेसची जाहिरात दुकानदाराच्या अंगलट; आक्रमक महिलांनी स्टॅच्यूवरचे कपडेही काढून नेले!

0
पुणे तेथे काय उणे..! केवळ १ रुपयात ड्रेसची जाहिरात दुकानदाराच्या अंगलट; आक्रमक महिलांनी स्टॅच्यूवरचे कपडेही काढून नेले!


पुणेरी पाट्या जशा प्रसिद्ध आहेत तसेच अभिनव जाहिराती प्रसिद्ध करून पुणेकर मार्केटिंगचा नवा फंडा बाजारात आणत आहेत.आज प्रजासत्ताक दिनी पुण्यातील एका दुकानदाराने मार्केटिंगचा फंडा म्हणून केवळ एक रुपयात ड्रेस घेऊन जा, अशी जाहिरात केली. याचे शहरभर पॉम्पलेटही वाटले.याचा परिणाम असा झाला की, आज सकाळपासूनच १ रुपयात ड्रेस खरेदी करण्यासाठी दुकानासमोर महिलांची झुंबड उडाली. महिलांची गर्दी पाहून दुकानदाराला धडकी भरली व त्याने दुकान बंद करून पलायन केले. ड्रेस मिळत नसल्याचे पाहून पुणेकर महिलाही संतप्त झाल्या त्यांनी दुकान फोडण्याची धमकी तर दिलीच पण बाहेर पुतळ्यांना घातलेले कपडेही काढून नेले. परिस्थिती हाताबाहेर जात असलेली पाहून पोलिसांना पाचारण केले गेले व स्थिती नियंत्रणात आणली.



Source link

देव तारी त्याला..! इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून चिमुकला पडला अन् चमत्कार घडला, CCTV फुटेज तुफान व्हायरल

0
देव तारी त्याला..! इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून चिमुकला पडला अन् चमत्कार घडला, CCTV फुटेज तुफान व्हायरल


Dombivli News : डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरामध्ये एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून दोन वर्षाचा मुलगा खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र देवदूत म्हणून धावत आलेल्या एका तरुणाच्या प्रसंगावधानाने मुलाचा जीव वाचला आहे.



Source link

सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा यानिक सिनर कोण आहे? ३ ग्रँड स्लॅम पटकावणारा पहिलाच इटालियन

0
सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा यानिक सिनर कोण आहे? ३ ग्रँड स्लॅम पटकावणारा पहिलाच इटालियन


Australia Open 2025 Final : इटलीच्या यानिक सिनर याने ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ चे विजेतेपद पटकावले आहे. ऑस्ट्रेलियन ओपनची पुरुष गटातील फायनल जगातील नंबर वन खेळाडू यानिक सिनर आणि जागतिक नंबर दोन खेळाडू जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांच्यात खेळला गेला. यामध्ये यानिक सिनरने बाजी मारली. 



Source link

Telngana Accident: ओव्हरटेकच्या नादात ट्रकवरून रिक्षावर पडले रेल्वे ट्रॅकचे रॉड, ७ जण जागीच ठार, Video

0
Telngana Accident: ओव्हरटेकच्या नादात ट्रकवरून रिक्षावर पडले रेल्वे ट्रॅकचे रॉड, ७ जण जागीच ठार, Video


Telngana Road Accident: तेलंगाणा राज्यातील वारंगल जिल्ह्यात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात ७ जणांचा बळी गेला आहे. तेलंगाणामधील वारंगल -मामुनुरु मार्गावर रेल्वे ट्रॅक (railway track) बसवण्याचे काम सुरू आहे. यासाठीवापरले जाणारे लोखंडी रॉड ट्रकमधून नेले जात होते. हे रॉड ऑटो रिक्षावर पडले आहेत. याखाली दबल्याने ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर या अपघातात सहा जण गंभीर जखमी असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.



Source link

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनताच डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, बांगलादेशच्या युनूस सरकारला झटका

0
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनताच डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, बांगलादेशच्या युनूस सरकारला झटका


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प एकापाठोपाठ एक कठोर निर्णय घेत आहेत. आता त्यांच्या एका निर्णयामुळे बांगलादेशच्या मोहम्मद युनूस सरकारला मोठा धक्का बसला आहे. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी ९० दिवसांसाठी परदेशी निधीवर बंदी घातली, त्यानंतर बांगलादेशातील यूएसएआयडीने एक पत्र जारी करून सर्व कामे तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले. अमेरिकेने बांगलादेशमध्ये करार, वर्क ऑर्डर, अनुदान, सहकारी करार किंवा इतर मदत किंवा खरेदी उपकरणांअंतर्गत कोणतेही काम तात्काळ थांबवले आहे. 



Source link