Monday, August 3, 2026
Home Blog Page 568

सुधीर चिंतामण अहिवळे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ: शिक्षण क्षेत्रातील योगदानाची उज्ज्वल साक्ष

0
सुधीर चिंतामण अहिवळे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ: शिक्षण क्षेत्रातील योगदानाची उज्ज्वल साक्ष

फलटण :- फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. सुधीर चिंतामण अहिवळे यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभाचे आयोजन २८ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता मुधोजी हायस्कूल, फलटण येथे करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक

आधारस्तंभ व प्रेरणास्थान:
मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, मा.सभापती, विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य व अध्यक्ष, फलटण एज्युकेशन सोसायटी.

मार्गदर्शक:
मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, चेअरमन, कृषि उत्पन्न बाजार समिती व गव्हर्निंग कौन्सिल, फलटण एज्युकेशन सोसायटी.

अध्यक्ष:
मा. श्री. दिपकराव चव्हाण, मा. आमदार, फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघ.

शुभहस्ते:
मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा व सचिव, फलटण एज्युकेशन सोसायटी.

सुधीर अहिवळे यांचा शैक्षणिक व सामाजिक प्रवास

सुधीर चिंतामण अहिवळे यांनी प्राथमिक शिक्षण फलटणच्या २ नंबर शाळेत पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण मुधोजी हायस्कूल व महाविद्यालयीन शिक्षण मुधोजी महाविद्यालयात झाले. विद्या प्रतिष्ठान बारामती येथे शिक्षणशास्त्रात पदवी मिळवल्यानंतर त्यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीमध्ये अध्यापनाच्या पवित्र कार्याला सुरुवात केली.

त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९९३ साली  नवचैतन्य हायस्कूल, गोंदवले बु. येथे शिक्षक म्हणून ज्ञान्यदानाला सुरुवात  केली. ज्योतिर्लिंग हायस्कूल दालवडी ,शिक्षक म्हणून उत्तम काम केले .सिद्धनाथ हायस्कूल व न्युजिअर कॉलेज  म्हसवड, मालोजी राजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे तसेच मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे उपप्राचार्य तसेच  प्रशासक म्हणून  त्यांनी उत्तम असे काम केले प्रशासकीय म्हणून आपल्या  कौशल्याच ठसा उमटविला  त्यांना २०२४ मध्ये फलटण एज्युकेशन सोसायटीचे मान्यबिंदू  असलेल्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली, या संधीचे सोने करत , प्राचार्य पदाच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर  आदर्शवत असे काम करून दाखविले.                      .                                                                                                                                                                                               महाविद्यालयीन जीवनामध्ये  सुधीर अहिवळे यांनी सामाजिक, शैक्षणिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देऊन काम केले आहे . १९९१ मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले स्मृती शताब्दी वर्षामध्ये फलटण येथील मुधोजी महाविद्यालयामध्ये शिक्षक प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या संयुक्त समितीच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन केले होत . यासाठी पुणे विद्यापीठाचे रजिस्टर नलवडे सर, मिलिंद महाविद्यालय औरंगाबादचे सोनकांबळे सर व अर्थतज्ज्ञ तथा आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक नरेंद्र जाधव, जिण आमचं या आत्मचरित्राच्या लेखिका सामाजिक कार्यकर्त्या बेबीताई कांबळे यांनी या कार्यक्रमामध्ये  आपले विचार व्यक्त केले. मुधोजी महाविद्यालय फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा जोतीराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रांचं अनावर करण्यामध्ये सुधीर अहिवळे यांचे योगदान महत्त्वाचे आहे                                                                           छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घेऊन सुराज्याची निर्मिती केली .भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा दिलेला संदेश, महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजनांसाठी केलेले शिक्षणाचे कार्य ,शाहू महाराजांनी आरक्षणाचा पाया रचला अशा थोर पुरोगामी विचारधारेतून सुधीर अहिवळे सरांनी समाजकार्याचा वसा घेतला व सर्वांशी प्रेमाने स्नेहाने मानवतेच्या भावनेतून बौद्ध धम्माची शिकवण जोपासण्याचा प्रयत्न केला .

मार्गदर्शकांचा विश्वास सार्थ ठरवला

. सुधीर अहिवळे यांच्या शैक्षणिक योगदानाला विधानपरिषद माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे सततचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी वेळोवेळी दाखविलेला विश्वास सुधीर अहिवळे यांनी आपल्या कार्याने सार्थ ठरवला.विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ, शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय कौशल्य आणि सामाजिक योगदान यामुळे सुधीर अहिवळे यांची प्राचार्य म्हणून नियुक्ती शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरली आहे.

कार्यक्रमाचे आयोजक व निमंत्रक

मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे हा समारंभ उत्साहात साजरा केला जाणार आहे.

स्थळ: मुधोजी हायस्कूल, फलटण
वेळ: मंगळवार, २८ जानेवारी २०२५, सायं. ६.०० वाजता

बेरोजगारीचं भीषण वास्तव! पुण्यात नोकरीसाठी हजारोंचा महापूर

0
बेरोजगारीचं भीषण वास्तव! पुण्यात नोकरीसाठी हजारोंचा महापूर

🔹 सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओने उघड केली गंभीर परिस्थिती

पुणे – नोकरीच्या शोधात तरुण मोठ्या प्रमाणावर आपली शहरं सोडून बाहेर पडत आहेत. मात्र, वाढत्या बेरोजगारीमुळे नोकरी मिळवणं अधिक कठीण बनत चाललं आहे. याचाच प्रत्यय पुण्यातील एका घटनेत आला आहे. यूपीएस कंपनीने केवळ १०० पदांसाठी भरतीची जाहिरात दिली होती, पण ४ ते ५ हजार उमेदवार मुलाखतीसाठी हजर झाले!

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. कंपनीच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या असून, हातात बायोडेटा घेऊन तरुण-तरुणी संधीच्या प्रतीक्षेत उभे आहेत. ही परिस्थिती पाहून अनेकांनी वाढती बेरोजगारी आणि लोकसंख्येचा विषय चर्चेत आणला आहे.

तरुणांना मोठी स्पर्धेची जाणीव

व्हिडीओत एक व्यक्ती उमेदवारांना सांगताना दिसत आहे की, “हातातील नोकरी सोडू नका, कारण बाहेर प्रचंड स्पर्धा आहे.” या घटनेने बेरोजगारीच्या संकटाची गंभीरता अधोरेखित केली आहे.

नेटिझन्सही यावर प्रतिक्रिया देत आहेत. “एका नोकरीसाठी हजारोंचा महापूर! अवघड आहे तरुणांचं,” अशी कमेंट काहींनी केली आहे, तर काहींनी याला “बेरोजगारीचं भीषण वास्तव” म्हणून हाक दिली आहे.

बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर

गेल्या काही वर्षांत शिक्षण घेऊनही नोकरी मिळवणं कठीण झालं आहे. बेरोजगारीचा वाढता दर हा देशासाठी मोठा प्रश्न बनला आहे. या परिस्थितीवर ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात आणखी गंभीर संकट उभं राहू शकतं.

Gondia Accident : गोंदियात भीषण अपघात! बोलेरोची दुचाकीला भीषण धडक, ५ महिन्यांच्या बाळासह तिघे जागीच ठार

0
Gondia Accident : गोंदियात भीषण अपघात! बोलेरोची दुचाकीला भीषण धडक, ५ महिन्यांच्या बाळासह तिघे जागीच ठार


Gondia Accident : गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्याच्या नवेगावबांध-बाराभाटी मार्गावर रविवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला आहे. एका कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक हा गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये पाच महिन्यांच्या बाळासह ३ वर्षांची मुलगी व २५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जखमी दुचाकीचालक हा गंभीर असून त्याला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे हलविण्यात आले आहे.



Source link

Bobby Deol Birthday : हाताला काहीच काम नाही म्हणून बॉबी देओलने काय केले माहितीये का? वाचा त्याचा प्रवास

0
Bobby Deol Birthday : हाताला काहीच काम नाही म्हणून बॉबी देओलने काय केले माहितीये का? वाचा त्याचा प्रवास


बॉलिवूडमध्ये झाली जबरदस्त एन्ट्री!

बॉबी देओलने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला, तेव्हा त्याला जबरदस्त यश मिळाले. त्याची स्टाइल आणि त्याच्या अभिनयाने लोकांना इतके आकर्षित केले की, तो रातोरात स्टार बनला. बॉबी आणि ट्विंकल खन्ना यांनी ‘बरसात’ या चित्रपटाद्वारे एकत्र चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर बॉबीकडे अनेक चित्रपट आले. त्यानंतर बॉबी देओलने ‘सोल्जर’ , ‘गुप्त : द हिडन ट्रुथ’ , ‘दिल्लगी’ , ‘बादल’ , ‘बिच्चू’ , ‘क्रांती’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले.



Source link

महावितरण अकाउंटंट आणि ग्रामसेवक पदावर निवड – ऋतुराज भोसले आणि प्रतीक्षा अहिवळे यांचा सत्कार

0
महावितरण अकाउंटंट आणि ग्रामसेवक पदावर निवड – ऋतुराज भोसले आणि प्रतीक्षा अहिवळे यांचा सत्कार

फलटण, मंगळवार पेठ: मंगळवार पेठ येथील ऋतुराज तानाजी भोसले यांची महावितरणमध्ये अकाउंटंट म्हणून आणि प्रतीक्षा सागर अहिवळे हिची ग्रामसेवक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी नगरसेवक सचिन अहिवळे (सर), प्रशांत काकडे (आप्पा), सनी मोरे, मिलींद काकडे, अनिकेत काकडे, अमोल सरतापे (साहेब), गौतम काकडे, दत्ता भोसले, विकी बोके, नामदेव काकडे, विशाल मोहिते, श्री अहिवळे, कपिल येवले, तुषार आढाव, कुणाल काकडे, सोनु शिंदे, वैभव मोहिते, अमित काकडे, मुकेश रणपिसे, आकाश काकडे, शुभम काकडे, तसेच ऋतुराज भोसले यांचे वडील तानाजी भोसले आणि प्रतीक्षा अहिवळे हिचे वडील सागर अहिवळे उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी ऋतुराज आणि प्रतीक्षाचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

54 सेकंदांचा थरारक Video; काही कळायच्या आतच दोन वेगवान बसमध्ये आला माणूस, चमत्कारिकरित्या वाचला जीव

0
54 सेकंदांचा थरारक Video; काही कळायच्या आतच दोन वेगवान बसमध्ये आला माणूस, चमत्कारिकरित्या वाचला जीव


Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक थरराक व्हिडीओ व्हायरल होत असून, अवघ्या 54 सेकंदांच्या या व्हिडीओनं अनेकांचेच प्राण कंठाशी आणल्याचंही पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर पाहिला जाणारा हा व्हिडीओ तामिळनाडूतील असल्याचं म्हटलं जात आहे. 

अनेकांनीच हा व्हिडीओ रिशेअर करत आणि त्यावर व्यक्त होत त्या 54 सेकंदांमध्ये जे काही घडलं ते पाहून डोळ्यांवर विश्वासच बसला नाही, अशाही प्रतिक्रिया दिल्या. कारण, व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या त्या व्यक्तीनं जवळपास मृत्यूच पाहिला होता. एका CCTV मध्ये घडलेली संपूर्ण घटना कैद झाली आणि हा थरार नेटकऱ्यांनाही हैराण करून गेला. 

कोणत्या घटनेनं हादरा? 

प्राथमिक माहितीनुसार तामिळनाडूतील भरत नावाची ही व्यक्ती थमरनकोट्टई ते पट्टूकोट्टई असा प्रवास करत होती. तिथं भरतला एक खासगी बस पकडायची होती. यासाठी त्यानं पाऊल पुढे टाकलं तेव्हाच खासगी बसला ओव्हरटेक करणारी एक सरकारी बस मागून आली  आणि भरत दोन्ही बसच्या मध्ये तयार झालेल्या चिंचोळ्या वाटेत फसला. ही काही सेकंद इतकी घाबरवणारी होती, की होत्याचं नव्हतं होतं की काय, हीच भीती अनेकांच्या मनात घर करून गेली. पण, दोन्ही वेगवान बसच्या कचाट्यात सापडलेल्या या माणसाला किरकोळ खरचटणं वगळता इतर कोणतीही दुखापत झाली नाही.

समयसूचकतेमुळं वाचला जीव… 

सरकारी बस येताच खासगी बसच्या पत्र्याला भरत जवळपास टेकला आणि त्यानं कसाबसा तोल सावरला. सरकारी बस जेव्हा पुढे गेली, तेव्हा हा माणूस अक्षरश: लोटांगण घालतात तसा जमिनीशी बिलगला आणि एका क्षणात उभा राहून तिथून निघूनही गेला. काही क्षणांमध्ये घडलेला हा सर्व प्रकार पाहताना हे जे काही घडलं ते नेमकं काय होतं, हाच प्रश्न राहून राहून विचारला जातोय. 





Source link

Entertainment News in Marathi Live: Shreyas Talpade Birthday : ज्या चित्रपटामुळे ओळख मिळाली, त्याच्यामुळेच श्रेयस तळपदेचं लग्न आलेलं अडचणीत!

0
Entertainment News in Marathi Live: Shreyas Talpade Birthday : ज्या चित्रपटामुळे ओळख मिळाली, त्याच्यामुळेच श्रेयस तळपदेचं लग्न आलेलं अडचणीत!


Shreyas Talpade Birthday : ज्या चित्रपटामुळे ओळख मिळाली, त्याच्यामुळेच श्रेयस तळपदेचं लग्न आलेलं अडचणीत!

Shreyas Talpade Birthday : ज्या चित्रपटामुळे ओळख मिळाली, त्याच्यामुळेच श्रेयस तळपदेचं लग्न आलेलं अडचणीत!(PTI)
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Mon, 27 Jan 202503:36 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Shreyas Talpade Birthday : ज्या चित्रपटामुळे ओळख मिळाली, त्याच्यामुळेच श्रेयस तळपदेचं लग्न आलेलं अडचणीत!

  • Shreyas Talpade Birthday : पहिल्याच चित्रपटाने त्याला मनोरंजन विश्वात ओळख मिळवून दिली होती. मात्र, या चित्रपटामुळे श्रेयसचे लग्न पणाला लागले होते.


Read the full story here





Source link

Shreyas Talpade Birthday : ज्या चित्रपटामुळे ओळख मिळाली, त्याच्यामुळेच श्रेयस तळपदेचं लग्न आलेलं अडचणीत!

0
Entertainment News in Marathi Live: Shreyas Talpade Birthday : ज्या चित्रपटामुळे ओळख मिळाली, त्याच्यामुळेच श्रेयस तळपदेचं लग्न आलेलं अडचणीत!


Happy Birthday Shreyas Talpade : आज म्हणजेच २७ जानेवारीला बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे आपला ४९वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या दमदार अभिनयाने केवळ मराठी मनोरंजन विश्वच नाही, तर बॉलिवूड आणि साऊथलाही आपली भुरळ पडणारा श्रेयस सगळ्या प्रेक्षकांचा लाडका आहे. मराठी चित्रपटसृष्टी नव्हे, तर तो बॉलिवूडमधील देखील एक मोठे नाव आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘इकबाल’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. विशेष म्हणजे या पहिल्याच चित्रपटाने त्याला मनोरंजन विश्वात ओळख मिळवून दिली होती. मात्र, या चित्रपटामुळे श्रेयसचे लग्न पणाला लागले होते.



Source link

पुण्यात अजित पवारांचे शिलेदार बाबुराव चांदेरेंची मुजोरी सुरूच! एकाला मारहाण केल्यानंतर दमदाटीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

0
पुण्यात अजित पवारांचे शिलेदार बाबुराव चांदेरेंची मुजोरी सुरूच! एकाला मारहाण केल्यानंतर दमदाटीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल


Pune Baburao Chandere Viral Video : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे असणारे पुणे महानगर पालिकेचे माजी नगर सेवक व स्थायी समितिचे सदस्य बाबुराव चांदेरे यांची सामान्य नागरिकांना दमदाटी करण्याचे प्रकार वाढले आहे. जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला कुस्तीत धोबी पंचाद देतात तसे उचलून जमिनीवर आपटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकारणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असतांना त्यांचा आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात ते मजुरांना दमदाटी करतांना दिसत आहे.



Source link

पितळखोरा लेणी: भारताच्या शिल्पकलेतील विस्मयकारी गूढ!

0
पितळखोरा लेणी: भारताच्या शिल्पकलेतील विस्मयकारी गूढ!

भारतीय सांस्कृतिक जडण घडणीत ज्या शैलगृहांचे संघारामांचे खूप मोठे योगदान आहे त्या पैकीची एक मुख्य लेणी “पितांगलय” म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्य़ातील कन्नड तालुक्यातील कालीमठ फाट्या जवळील #अरूणा या मौसमी नदीच्या तीरावर विभागून असलेली #पितळखोरा लेणी.
आद्य लेणीचे मान तर या शैलगृहाने पटकावलेले आहेच शिवाय इतरत्र आढळून न येणारी अनेक शिल्पे या शैलगृहाची शोभा वाढवत होती.
पितळखोरा लेणीला गंधर्व लेणी, यक्ष लेणी, किन्नर लेणी असेही संबोधन विद्वान वर्गात प्रचलित आहे.
अभावानेच असे एखादे शिल्प आपल्या दृष्टीपथास पडेल त्यापैकीच हे एक शिल्प पितळखोरा लेणीवर होते, आज हे शिल्प तिथे नाही भग्नावशेषात रूपांतरित झालेली पितळखोरा लेणी तिच्या शेवटच्या अवस्थेत आहे.
लेणीवरील फसाडाचे अलंकरण करण्यासाठी तिला सुशोभित करण्यासाठीच तत्कालीन मान्यतेनुसार समाज मनावर ज्या गोष्टी अधिराज्य करत होत्या जनमानसांना आकृष्ट करत होत्या त्यांचेच अंकन अलंकरण करण्यात येत असे.

हवेतून उडत येणारे गंधर्वाचे हे एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प इतर कोणत्याच लेणीत पाहायला मिळत नाही.
शिल्पाचे सुक्ष्म निरिक्षण केल्या अंती बर्याच गोष्टी साफ दिसून येतात त्यास्तव गढूळ पाण्याखालचे आपल्याला काही दिसत तसेच काहीसे आपले होऊन जाते नितळ पाण्याच्या तळाशी काय दडले आहे हे आपल्या चक्षूना सहज दिसून येते तशीच शिल्पांची भाषा अवगत झाली की बर्‍याच गोष्टी आपल्याला लक्षात येतात. जसे हवेतून उडत येत असल्याने पक्षा प्रमाणे हे गंधर्व आपले पाय दुमडून स्वर्गातून स्वच्छंदी विहार करत येत आहेत अशी कल्पनाच इथे अधोरेखित करण्यात आली आहे. स्वर्गातून विहार करत करत येत असल्याने आपल्या संरक्षणार्थ त्याने ढाल देखील धरली आहे, आता इथे आणखीन एक बाब साफ स्पष्ट होते ती म्हणजे भारतीय शस्त्रा अशा आयताकृती आकारची ढाल अढळून येत नाही म्हणजेच याचाच अर्थ असा निघतो की ही ढाल पाश्चिमात्य देशातील असून अशा प्रकाराच्या ढाली वापरण्याचे प्रचलन तिकडे होते.
ढालीचे अंकन हे स्पष्ट करते की ऐतदेशी कलाकारांनी एकतर ती पाहीली असणार किंवा शिल्प कोरणारे शिल्पी हे पाश्चिमात्य असणार दोघांच्यापैकी एक बाब पक्की होते.
शिल्पातील गंधर्वाचा पेहराव तत्कालीन जनमानसे लेवून असायचे त्या प्रमाणेच आहे तीच बाब आभूषणांच्या बाबत आहे गळ्यातील कंठा आपल्याला त्याची खुणगाठ पटवून देतो, त्या प्रमाणेच विशेष म्हणजे कुरळे केसांचा हा गंधर्व आजही आपल्याकडे पाहत आपल्या स्वागतासाठी स्वर्गातून विहार करत आपल्यासाठी प्रत्यक्ष हजर होत असल्याचे भाव त्याच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसून येत आहेत या आणि अशा अनेक बाबी शिल्पांची भाषा अवगत झाली की कळुन येतात अन्यथा “काला अक्षर भैंस बराबर” अशी आपली अवस्था.

पितळखोरा लेणी यासाठीच महत्त्वपूर्ण आहे !

सूरज रतन जगताप