Monday, August 3, 2026
Home Blog Page 567

‘भंगार’ नका समजू, जुन्या गाडीमुळे तुम्हाला आता मिळेल दुप्पट फायदा! पण कसं? जाणून घ्या!

0
‘भंगार’ नका समजू, जुन्या गाडीमुळे तुम्हाला आता मिळेल दुप्पट फायदा! पण कसं? जाणून घ्या!



Vehicle Scrapping Policy: सरकार सामान्य लोकांना जुनी आणि नादुरुस्त वाहने स्क्रॅप करण्याची सुविधा देत आहे. 



Source link

Waqf Amendment Bill : वक्फ संशोधन विधेयकाला JPC ची मंजुरी, समितीकडून १४ बदल; विरोधकांच्या सूचना फेटाळल्या

0
Waqf Amendment Bill : वक्फ संशोधन विधेयकाला JPC ची मंजुरी, समितीकडून १४ बदल; विरोधकांच्या सूचना फेटाळल्या


Waqf amendment bill JPC : वक्फ दुरुस्ती विधेयकाला संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) मंजुरी दिली आहे. त्यात १४ बदल करण्यात आले आहेत. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा अहवाल सभागृहात मांडण्यात येणार आहे. सत्ताधारी भाजपच्या जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर एकूण ४४ बदल प्रस्तावित करण्यात आले होते, त्यापैकी अनेक बदल विरोधी खासदारांनीही मांडले होते, परंतु प्रस्तावित बदल मतदानाद्वारे विरोधकांचे प्रस्ताव फेटाळून लावले.



Source link

Chandrapur: वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक; १९ वाघांची शिकार केल्याचा संशय

0
Chandrapur: वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक; १९ वाघांची शिकार केल्याचा संशय


Bahelia Gang News: वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीतील म्होरक्याला अटक चंद्रपूरातील जंगलातून अटक करण्यात आली. अजित राजगोंड असे त्याचे नाव आहे. महाराष्ट्र राज्यात झालेल्या अनेक वाघांच्या त्याने शिकारी केल्याची माहिती आहे. मध्य प्रदेशातील बहेलिया टोळीने अवघ्या दोन वर्षात १९ वाघांची शिकार केल्याची संशय आहे. अजित राजगोंड अटक करण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या कारवाईनंतर राज्याला रेड अलर्ट देण्यात आले आहे.



Source link

शाहरुख खानच्या घड्याळाची किंमत ऐकून बसेल धक्का, इतक्या किंमतीत येईल मुंबईत घर

0
शाहरुख खानच्या घड्याळाची किंमत ऐकून बसेल धक्का, इतक्या किंमतीत येईल मुंबईत घर


बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने पुन्हा एकदा आपल्या स्टाईलने सर्वांची मने जिंकली. आयफा २०२५ च्या प्री-इव्हेंटमध्ये शाहरुख खानने हजेरी लावली होती. यावेळी त्याचं मनमोहक व्यक्तिमत्व सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दरम्यान, शाहरूखच्या हातातील घड्याळज्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या कार्यक्रमात शाहरुख खानने ऑडेमार पिगुएचे लिमिटेड एडिशन घड्याळ परिधान केले होते. हे घड्याळ १८ कॅरेट वाळूच्या सोन्यापासून बनवलेले आहे. हे खास घड्याळ अतिशय काटेकोरपणे डिझाइन करण्यात आले असून जगभरात अशी केवळ २५० घड्याळे उपलब्ध आहेत.



Source link

धक्कादायक! पुण्यात ‘गे’ लोकांशी ग्रॅन्डर अ‍ॅपवर ओळख वाढवून निर्जनस्थळी नेऊन लुटणारी टोळी गजाआड

0
धक्कादायक! पुण्यात ‘गे’ लोकांशी ग्रॅन्डर अ‍ॅपवर ओळख वाढवून निर्जनस्थळी नेऊन लुटणारी टोळी गजाआड


Nanded City Crime : पुण्यात फसवणुकीचा नवा प्रकार समोर आला आहे. ग्रॅन्डर अ‍ॅपवरून गे नागरिकांची जवळीक निर्माण करून त्यांना निर्जनस्थळी बोलावून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारत किसन धिंडले (वय १८, रा. मुक्ताई हाईटस, सांगळे घाट, धायरी) याला अटक केली आहे. तर त्याच्या ३ अल्पवयीन साथीदारांना देखील ताब्यात घेतलं असून त्यांची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे.



Source link

पंजाबमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना! माथेफिरूने हातोड्याने तोडला पुतळा

0
पंजाबमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना! माथेफिरूने हातोड्याने तोडला पुतळा


Dr. Babasaheb Ambedkar statue vandalise in Amritsar : पंजाबमधील अमृतसरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. एका माथेफिरूने त्यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी लावलेल्या शिडीवर चढून पुतळ्यावर हातोड्याने वार केले. यामुळे हा पुतळा तुटला आहे. जवळ असणाऱ्या संविधान प्रतिमेची देखील आरोपीने तोडफोड केली आहे. या घटनेमुळे पंजाबमध्ये मोठा तनाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. 



Source link

Chhaava Movie : ‘छावा’तून छत्रपती संभाजी महाराजांचा ‘तो’ सीन काढून टाकणार! लक्ष्मण उतेकरांनी दिली ग्वाही

0
Chhaava Movie : ‘छावा’तून छत्रपती संभाजी महाराजांचा ‘तो’ सीन काढून टाकणार! लक्ष्मण उतेकरांनी दिली ग्वाही


Chhaava Movie Scene Clash : नुकताच विकी कौशलच्या ‘छावा’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. तर, अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या झलकेसाठी सगळेच प्रेक्षक आसुसलेले होते. मात्र, हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर लोक आपला तीव्र संताप जाहीर करू लागले. या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील अभिनेता विकी कौशल नाचताना आणि लेझीम खेळताना दाखवण्यात आला होता. हे दृश्य पाहून प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. अखेर यावर आता दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी प्रतिक्रिया देत, हा सीन काढून टाकणार असल्याचे म्हटले आहे.



Source link

Mary Kom : बॉक्सर मेरी कोम पोहोचली महाकुंभला, गंगेत स्नान करताना लगावले बॉक्सिंग पंच

0
Mary Kom : बॉक्सर मेरी कोम पोहोचली महाकुंभला, गंगेत स्नान करताना लगावले बॉक्सिंग पंच


महान बॉक्सर आणि ऑलिम्पिक पदक विजेती मेरी कोम हिने रविवारी (२६ जानेवारी) कुंभमेळ्यात पवित्र स्नान केले. प्रयागराजमध्ये डुबकी मारल्यानंतर मेरी कोमने पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. यावेळी मेरी कोम खूप आनंदी दिसत होती.



Source link

कान्हेरी लेण्यांच्या जतनासाठी विशेष प्रयत्न – केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा

0
कान्हेरी लेण्यांच्या जतनासाठी विशेष प्रयत्न – केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा

मुंबई – बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राचीन कान्हेरी लेण्यांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी केली. शुक्रवारी कान्हेरी लेण्यांना भेट दिल्यानंतर त्यांनी उद्यान आणि पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना विविध सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

गोयल यांनी लेण्यांच्या जतनासाठी माहिती केंद्र, ध्यानधारणा केंद्र, तसेच प्रदर्शन सभागृह उभारण्याचे निर्देश दिले. तसेच कान्हेरी लेण्यांची प्रतिकृती उद्यानात साकारण्याची कल्पनाही त्यांनी मांडली, जेणेकरून उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना या ऐतिहासिक वारशाची माहिती मिळेल. राजस्थान अथवा गुजरातमध्ये यासाठी योग्य पाषाण उपलब्ध होतो का, याचा शोध घ्यावा, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

यावेळी आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. त्यांनीही कान्हेरी लेण्यांच्या पर्यटन विकासावर भर देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

वनराणी मिनी ट्रेनचे पुनरुज्जीवन

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटकांचे आकर्षण असलेली ‘वनराणी’ मिनी ट्रेन सध्या डागडुजीसाठी बंद आहे. मात्र, पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी येत्या १६ जुलै रोजी इलेक्ट्रिक मिनी ट्रेनचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती पीयूष गोयल यांनी दिली.

पर्यटकांसाठी सुधारणा आणि सुविधा

  • लेण्यांच्या अभ्यासक आणि ध्यानधारणा करणाऱ्या भाविकांसाठी माहिती केंद्र उभारले जाईल.
  • पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि उत्तम खानपान सेवा उपलब्ध करून दिली जाईल.
  • पर्यटकांसाठी आकर्षक आणि माहितीपूर्ण प्रदर्शने भरवली जातील.

या सुधारणा केल्यास कान्हेरी लेण्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल आणि हा ऐतिहासिक ठेवा भविष्यातील पिढ्यांसाठी अधिक चांगल्या प्रकारे जतन केला जाईल.

ग्राहकांना दिलासा! उच्चांकी दरवाढीनंतर आज स्वस्त झालं सोनं, वाचा 24 कॅरेटचे दर

0
ग्राहकांना दिलासा! उच्चांकी दरवाढीनंतर आज स्वस्त झालं सोनं, वाचा 24 कॅरेटचे दर


Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. वायदे बाजारात उच्चांकी दरवाढ झाल्यानंतर आज मात्र सोन्याचे दर घसरले आहेत. सोनं जवळपास 200 रुपये तर चांदी 1000 रुपयांपर्यंत घसरले आहे. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊया. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 2800 डॉलरच्या जवळपास स्थिरावले आहे. तर यावेळी चांदीजेखील 959 रुपयांनी घसरून 90,640 रुपयांवर स्थिरावली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततेमुळं लिलावी होण्याच्या कारणामुळं शुक्रवारी राष्ट्रीय राजधानी सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात सातत्याने उच्चांकी गाठत होते. मात्र, आज आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर घसरले आहे. 

आज 24 कॅरेट सोन्याचे दर 170 रुपयांनी घसरले असून प्रतितोळा 82,250 रुपयांवर स्थिरावले आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 150 रुपयांनी कमी होऊन 75,400 रुपयांवर घसरले आहे. आज 18 कॅरेट सोन्याच्या दरात 130 रुपयांची घट होऊन सोन्याचे दर 61,690 रुपयांवर स्थिरावले आहेत. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  75,400 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  82,250 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  61,690 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,540 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   8,225 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6,169 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   60,320 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   65,800 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    49,352 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 75,400 रुपये
24 कॅरेट- 82,250 रुपये
18 कॅरेट-  61,690 रुपये





Source link