Monday, August 3, 2026
Home Blog Page 566

महाकुंभहून भाविक थेट अयोध्येत दाखल..! दोन दिवसांत २५ लाख जणांचे शरयू स्नान, ३ लाख जणांना रामलल्ला दर्शन

0
महाकुंभहून भाविक थेट अयोध्येत दाखल..! दोन दिवसांत २५ लाख जणांचे शरयू स्नान, ३ लाख जणांना रामलल्ला दर्शन


प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभातून गंगेत स्नान करून परतणारे भाविक अयोध्येतील राम मंदिराच्या दर्शनासाठी सोमवारी अयोध्येत दाखल झाले. सोमवारी रामनगरीत दर्शनाचे पूर्वीचे सर्व विक्रम मोडीत निघाले. सोमवारी रामलल्ला दरबारात तीन लाखांहून अधिक भाविक सहभागी झाले होते. २५ लाखांहून अधिक लोकांनी सरयूमध्ये डुबकी मारली. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे जिल्हा प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा कोलमडली. अयोध्येतील महामार्गापासून प्रत्येक गल्लीपर्यंत प्रत्येक रस्त्यावर दिवसभर वाहतूक कोंडी झाली होती.



Source link

सुधीर चिंतामण अहिवळे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ : शिक्षण क्षेत्रातील योगदानाची उज्ज्वल साक्ष

0
सुधीर चिंतामण अहिवळे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ : शिक्षण क्षेत्रातील योगदानाची उज्ज्वल साक्ष

फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री.सुधीर चिंतामण अहिवळे यांची २८ जानेवारी २०२५ रोजी शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेनंतर सेवापूर्ती होत आहे.
श्री.सुधीर अहिवळे यांचा शैक्षणिक व प्रशासकीय प्रवास अतिशय दैदिप्यमान राहिला आहे. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण फलटण नगर परिषदेच्या शाळा नं. २ मधून पूर्ण केले.त्यांनी माध्यमिक शिक्षण मुधोजी हायस्कूल व महाविद्यालयीन शिक्षण मुधोजी महाविद्यालय फलटण येथून पूर्ण केले.पुढे त्यांनी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मधून बीएड(शिक्षणशास्त्र) पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीमध्ये अध्यापनाच्या पवित्र कार्याला सुरुवात केली. त्यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विविध विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये अध्यापनाचे कार्य केले.त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात नवचैतन्य हायस्कूल,गोंदवले बु.येथे १९९३ ला शिक्षक म्हणून सेवेत दाखल झाले.पुढे आसू,पवारवाडी, म्हसवड, मालोजी राजे शेती विद्यालय येथे काम करताना शैक्षणिक क्षेत्रात अध्यापना सोबतच आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रशासकीय कार्याचाही वेगळाच ठसा उमटवला. मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये उपप्राचार्य म्हणून विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या विकासासाठी त्यांनी खूप मोठे योगदान दिले. त्यांच्या कारकिर्दीमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा मराठी व भूगोल विषयात 100% निकाल कायम राहिला आहे.
समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांच्या प्रती असलेली त्यांची तळमळ, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न, प्रशालेच्या आणि संस्थेच्या प्रशासकीय कामात वेळोवेळी दाखवलेले कौशल्य आणि सामाजिक कार्यामध्ये तन, मन, धनाने दिलेले योगदान यामुळे सुधीर अहिवळे यांची प्राचार्य म्हणून विधानपरिषद माजी सभापती विधान परिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून नियुक्ती केली.त्यांनी सर्वांचा विश्वास सार्थ ठरवून शिक्षण क्षेत्रात अतुल्य असे योगदान दिले.
त्यांच्या गौरव समारंभाचे आयोजन २८ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता मुधोजी हायस्कूल, फलटण येथे करण्यात आले आहे.तरी श्री सुधीर अहिवळे सर यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व तमाम मित्र व सहकाऱ्यांना आग्रहाचे निमंत्रण आहे.

‘गंगेत डुबकी घेऊन गरिबी संपणार आहे का?,’ महाकुंभमध्ये स्नान करण्यावरुन खरगे यांचा भाजपा नेत्यांना टोला

0
‘गंगेत डुबकी घेऊन गरिबी संपणार आहे का?,’ महाकुंभमध्ये स्नान करण्यावरुन खरगे यांचा भाजपा नेत्यांना टोला


काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी भाजपा नेत्यांच्या महाकुंभ स्नानावरुन विधान केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “गंगेत डुबकी घेऊन काय गरिबी संपत नाही”. भाजपा-आरएसएसवर निशाणा साधत खरगे म्हणाले की, “ते म्हणतात प्रत्येक मशिदीखाली शिवलिंग शोधू नका. पण तेच लोकांना असं करण्यासाठी उसकवत असतात”.

महू येथे बोलताना खरगे यांनी सांगितलं की, “गंगेत डुबकी लावण्यासाठी भाजपा नेत्यांमध्ये स्पर्धाच लागली आहे. गंगेत डुबकी लगावून गरिबी कमी होणार नाही. माझा कोणाच्याही श्रद्धेला दुखावण्याचा हेतू नाही. जर कोणाला वाईट वाटलं असेल तर मी आधीच माफी मागतो”. पुढे ते म्हणाले की, “आरएसएस-भाजपा देशद्रोही आहे. गरिबी-बेरोजगारीपासून मुक्तता हवी असेल तर संविधानाची सुरक्षा करावी लागेल”.

खरगे म्हणाले आहेत की, “आज भाजपा-आरएसएसचे लोक काँग्रेसबद्दल वाईट बोलत आहेत. पण त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सगळं काही केलं. हे लोक स्वातंत्र्याच्या लढाईत इंग्रजांसह होते. इंग्रजांची चाकरी करत होते. स्वातंत्र्याच्या लढाईत त्यांचं काही योगदान नाही. यामुळे तुम्हाला एकजूट होऊन या लोकांना धडा शिकवावा लागेल आणि आपल्या अधिकारांचं रक्षण करावं लागेल”.

‘तुम्हा सर्वांना बाबासाहेबांप्रमाणे बनावं लागेल’

काँग्रेस अध्यक्ष पुढे म्हणाले की, “महूच्या जमिनीवरच बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता. त्यांनी देशातील दलित आणि वंचितांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याचं काम केलं. जेव्हा बाबासाहेब एकटे इतकं काम करु शकतात, तर तुम्ही सगळे बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे झालात तर भाजपा सरकार हादरुन जाईल. तुम्हा सर्वांना बाबासाहेब, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरु यांच्यासारखं व्हायचं आहे आणि संविधानाचं रक्षण करायचं आहे. ही लढाई तुमच्या वतीने राहुल गांधी लढत आहेत”.

गंगेत डुबकी लगावल्याने गरिबी दूर होते का?

गंगा स्नानावर ते म्हणाले की, “गंगेत डुबकी घेतल्याने गरिबी दूर होते का? माझा कोणाच्याही श्रद्धेला दुखावण्याचा हेतू नाही. जर कोणाला वाईट वाटलं असेल तर मी आधीच माफी मागतो. पण जेव्हा मुलं भुकेने मरत आहेत, शाळेत जात नाहीयेत, मजुरांना मजुरी मिळत नाही आहे तेव्हा हे लोक हजारो खर्च करुन डुबकींची स्पर्धा लावत आहेत. जोपर्यंत टीव्हीत चांगलं येत नाही तोपर्यंत डुबकी मारर राहतात. हे लोक देशाचं भलं होऊ देणार नाहीत”.

भाजपाने दिलं प्रत्युत्तर

खरगे यांच्या विधानावर भाजपा खासदार संबित पात्रा म्हणाले आहेत की, “ते दुसऱ्या एखाद्या धर्माबद्दल असं विधान करु शकतात का? सनातन धर्माविरोधात असं वक्तव्य निंदनीय आहे. काँग्रेस पक्षाने यावर स्पष्टीकरण द्यावं. हे तेच खरगे आहेत ज्यांनी म्हटलं होतं की, आम्ही सत्तेत आल्यास सनातनला संपवून टाकू”.





Source link

Mumbai Couple Suicide : घरच्यांनी लग्नाला नकार देताच प्रेमीयुगुलांची रेल्वेसमोर उडी, मुलगी अल्पवयीन!

0
Mumbai Couple Suicide : घरच्यांनी लग्नाला नकार देताच प्रेमीयुगुलांची रेल्वेसमोर उडी, मुलगी अल्पवयीन!


Mumbai Couple Suicide on Railway Track: मुंबईतील विक्रोळी परिसरात ही थरकाप उडवणारी घटना घडली आहे. घरच्यांनी लग्नाला नकार दिला म्हणून प्रेमीयुगुलाने धावत्या एक्स्प्रेससमोर उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेतील मुलगी अल्पवयीन आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.



Source link

BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ७ वर्षे ‘ती’ शपथ पाळणाऱ्या बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!

0
BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ७ वर्षे ‘ती’ शपथ पाळणाऱ्या बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!


विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेत स्वतंत्रपणे उमेदवार देण्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच, आता आगामी महापालिका निवडणुकांपूर्वीच उद्धव ठाकरेंना मुंबईत मोठा धक्का बसला आहे. आता,महिला उपनेत्याने ठाकरेंची साथ सोडली असून लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.



Source link

आग्र्यातील संगमरवरी ताजमहलसमोरच शाहजहाँला बनवायचा होता काळा ताजमहल? जाणून घ्या काय सत्य

0
आग्र्यातील संगमरवरी ताजमहलसमोरच शाहजहाँला बनवायचा होता काळा ताजमहल? जाणून घ्या काय सत्य



Black Taj Mahal Truth : शहाजहांला खरंच संगमरवरी ताजमहाल समोरच बनवायचा होता काळा ताजमहाल? 



Source link

मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक, डिस्ने प्लस हॉटस्टारच्या कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांचा जोरदार राडा!

0
मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक, डिस्ने प्लस हॉटस्टारच्या कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांचा जोरदार राडा!


Mns Aggressive Over Marathi : मराठीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसत आहे. डिस्ने प्लस हॉट स्टारच्या ॲपवर  क्रिकेटचे समालोचन अन्य प्रादेशिक भाषांत उपलब्ध आहे, मात्र मराठीत नसल्याने मनसे कार्यकर्त्यांनी थेट कंपनीचं कार्यालय गाठून निषेध नोंदवला. यावेळी मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, संतोष धुरी तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली .



Source link

GBS Injection Costs: एका इंजेक्शनला २० हजार रुपये खर्च; जीबीएस रुग्णाच्या नातेवाईकाची माहिती

0
GBS Injection Costs: एका इंजेक्शनला २० हजार रुपये खर्च; जीबीएस रुग्णाच्या नातेवाईकाची माहिती


GBS Treatment: देशात सध्या अनेक प्रकारचे गंभीर आणि संसर्गजन्य आजार पसरल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वात प्रथम एचएमपीव्ही आणि नंतर एचएन१ यांसारख्या आजाराने राज्याची चिंता वाढवली असताना पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम विषाणू म्हणजेच जीबीएसने थैमान घातले आहे. पुण्यात १०० हून अधिक रुग्णांना जीबीएसची लागण झाली आहे. त्यापैकी १७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने वैद्यकीय टीम पुण्याला पाठवली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएस रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा केली. दरम्यान, जीबीएसच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या आयव्हीआयजी इंजेक्शनची किंमत २० हजार रुपये असल्याचे वृत्त आहे.



Source link

बारामतीत अल्पवयीन मुलांच्या भांडणातून युवकावर कोयत्याने हल्ला! तिघांना पोलिस कोठडी

0
बारामतीत अल्पवयीन मुलांच्या भांडणातून युवकावर कोयत्याने हल्ला! तिघांना पोलिस कोठडी

पणदरे (बारामती) साहस टाइम्स : बारामती तालुक्यातील पणदरे येथे अल्पवयीन मुलांच्या वाद सोडवण्यासाठी गेलेल्या युवकावर कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २५ जाने.) घडली. या प्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

युवकावर दोन वेळा हल्ला
या घटनेत नीलेश रामदास जगदाळे (वय २१, रा. पणदरे) गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या आवारात काही अल्पवयीन मुले एकमेकांकडे बघण्यावरून भांडत होते. हे पाहून नीलेश जगदाळे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सुतगिरणी परिसरात वाद मिटवण्यासाठी नेले. मात्र, तिथे पुन्हा वाद उफाळला आणि एका अल्पवयीन मुलाने अचानक कोयता घेऊन जगदाळे यांच्या अंगावर हल्ला केला.

जगदाळे यांनी हा हल्ला चुकवल्याने वार त्यांच्या उजव्या खांद्यावर बसला. यानंतर दुसऱ्यांदा कोयत्याने वार केल्याने त्यांच्या उजव्या हाताच्या कोपराला गंभीर जखम झाली.

तीन अल्पवयीन मुलांना बाल न्यायालयाकडे रवानगी
नीलेश जगदाळे यांच्या तक्रारीवरून IPC 2023 च्या कलम १०९, ३५१(३), ११७ (४), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३) आणि शस्त्र अधिनियम कलम ३/२५, ४/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माळेगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन बाल न्यायालयाकडे सुपूर्द केले. तर प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल खटावकर तपास करत आहेत.

🔹 हायलाइट्स:

  • पणदरे येथे अल्पवयीन मुलांच्या वादातून कोयत्याने युवकावर हल्ला
  • पीडित युवक गंभीर जखमी, उजव्या हाताला खोल जखम
  • तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन बाल न्यायालयाकडे सुपूर्द
  • फरार आरोपींचा शोध सुरू

📌 घटनास्थळ: पणदरे, बारामती
📌 तपास अधिकारी: PSI अमोल खटावकर

Sahas Times,Baramati Crime ,Juvenile Crime ,Violence ,Police Action ,Maharashtra News,

542 कोटींचा टर्नओव्हर असलेले FIITJEE कोचिंग क्लासेस रातोरात बंद का झाले? लाखो रुपये फी भरणारे इंजिनीयरींगचे विद्यार्थी टेन्शनमध्ये

0
542 कोटींचा टर्नओव्हर असलेले FIITJEE कोचिंग क्लासेस रातोरात बंद का झाले? लाखो रुपये फी भरणारे इंजिनीयरींगचे विद्यार्थी टेन्शनमध्ये



भारतातील लोकप्रिय  FIITJEE कोचिंग क्लासेसच्या अनेक शाखा रातोरात बंद झाल्या आहेत.  विद्यार्थ्यांनी भरलेली लाखो रुपयांची फी त्यांना परत मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नेमकं काय झालं?



Source link