Monday, August 3, 2026
Home Blog Page 565

Maharashtra Weather Update: एसी, कूलर, फॅन ठेवा सुरू! राज्यात उष्णता वाढणार, IMDने दिला अलर्ट

0
Maharashtra Weather Update: एसी, कूलर, फॅन ठेवा सुरू! राज्यात उष्णता वाढणार, IMDने दिला अलर्ट


 तापमान किती ?

राज्यात अहमदनगर येथे सोमवारी १२.९, औरंगाबाददमहे १६.१, बीडमध्ये १७, हिंगोलीमध्ये ११.८, जालनामध्ये १७.५, लातूरमध्ये १९.८, नंदुरबारमध्ये २०.१, पालघर २१.३, तर पुण्यात १३  ते १७.९ असे तापमान आहे.   



Source link

स्मार्टफोन आणि ‘या’ वस्तूंच्या किंमती कमी होणार? Budget 2025 मध्ये तुमच्यासाठी काय?

0
स्मार्टफोन आणि ‘या’ वस्तूंच्या किंमती कमी होणार? Budget 2025 मध्ये तुमच्यासाठी काय?



Budget 2025: अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. टेक कंपन्यांबाबत एक मोठा निर्णय होऊ शकते.



Source link

Guillain Barre Syndrome : गुलियन बॅरे सिंड्रोमच्या वाढत्या प्रादुर्भावाने केंद्र अलर्ट, पुण्याला पाठवले तज्ज्ञांचे पथक

0
Guillain Barre Syndrome : गुलियन बॅरे सिंड्रोमच्या वाढत्या प्रादुर्भावाने केंद्र अलर्ट, पुण्याला पाठवले तज्ज्ञांचे पथक


गुलियन बॅरे सिंड्रोम ( जीबीएस)ची प्रकरणे हाताळण्यासाठी राज्याला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय आणि बहु-विषयक पथक महाराष्ट्रात पाठवले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, जीबीएसच्या संशयित आणि पुष्टी झालेल्या प्रकरणांमध्ये वाढ लक्षात घेता राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सल्ला देण्यासाठी आणि मदतीसाठी तज्ञांचे एक पथक पुण्यात पाठविण्यात आले आहे.



Source link

धक्कादायक! १४ वर्षाच्या मुलाची वडिलांच्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडत आत्महत्या, सोलापुरातील घटना

0
धक्कादायक! १४ वर्षाच्या मुलाची वडिलांच्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडत आत्महत्या, सोलापुरातील घटना


सोलापूर जिल्ह्यातील माढा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका १४ वर्षीय मुलाने वडिलांच्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या मुलाचे वडील सीमा सुरक्षा दलात निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुलाचे वडील कर्तव्यासाठी राजस्थानमध्ये तैनात आहेत. 



Source link

Mamta Kulkarni : हा तर सनातन धर्मासोबत विश्वासघात; ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवल्याने भडकले साधू-संत

0
Mamta Kulkarni : हा तर सनातन धर्मासोबत विश्वासघात; ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवल्याने भडकले साधू-संत


Mamta Kulkarni mahamandaleshwar : बॉलिवूडची माजी अभिनेत्री ममता कुलकर्णी महामंडलेश्वर करण्याच्या निर्णयावरून संत समाजात वाद निर्माण झाला आहे. संत म्हणतात की, कोणत्याही व्यक्तीला महामंडलेश्वर बनवण्यापूर्वी त्याचे चारित्र्य, पार्श्वभूमी तपासली जाते. एवढा उच्च दर्जा तुम्ही कुणालाही देऊ शकत नाही.



Source link

Railway Emergency Block : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवर दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक, वाचा संपूर्ण वेळापत्रक

0
Railway Emergency Block : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवर दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक, वाचा संपूर्ण वेळापत्रक


लोकल रेल्वे मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हटली जाते. आता मध्य-हार्बर मार्गावर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज व उद्या (२७ व २८ जानेवारी) मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जिद बंदर या स्थानकादरम्यान विशेष आपत्कालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. कर्नाक आरओबी (टप्पा-२) च्या पुनर्बांधणीसाठी ओपन वेब गर्डर्सच्या समायोजनासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.



Source link

शिक्षिका पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने संपवले जीवन, कुटुंबीयांनी शवपेटीवर लिहिलं आत्महत्येचं कारण

0
शिक्षिका पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने संपवले जीवन, कुटुंबीयांनी शवपेटीवर लिहिलं आत्महत्येचं कारण


कर्नाटकातील हुबळी येथे अतुल सुभाष आत्महत्येसारखे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. पत्नीच्या छळाला कंटाळून चामुंडेश्वरी नगरमध्ये एका ४० वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट सोडल्याचे सांगितले जात आहे. त्यावर लिहिले आहे, ‘बाबा, मला माफ करा, तिला (पत्नीला) माझा मृत्यू हवा आहे.’ कुटुंबीयांनी त्यांच्या शेवटच्या इच्छेचा आदर करत शवपेटीवर त्याच्या आत्महत्येचे कारणही लिहिले आहे.



Source link

GK : भारतातील एकमेव राज्य जिथे एकही कुत्रा दिसणार नाही; 99 टक्के लोकांना उत्तर माहित नाही

0
GK : भारतातील एकमेव राज्य जिथे एकही कुत्रा दिसणार नाही; 99 टक्के लोकांना उत्तर माहित नाही


Dog Free State In India : भारत देश विविधतनेने नटलेला देश आहे. संस्कृती, निसर्गसौंदर्य, खाद्यसंस्कृती, विशिष्ट प्रकारच्या चालितीरी, पेहराव यासह विविध कारणांमुळे भारतातील प्रत्येक राज्य हे वैशिष्ट्यपूर्ण ठरते. मात्र, भारतातील एक राज्य विशिष्ट कारणामुळे वेगळे ठरते. हे कारण म्हणजे एक श्वान नसलेले हे भारतातील एकमेव राज्य आहे. जाणून घेऊया भारतातील हे राज्य कोणते?

भारतात एकूण 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रत्येक राज्य वेगवेगळ्या कारणामुळे लोकप्रिय आहे. भारतात सर्वत्र कुत्रा हा प्राणी दिसतो. अनेकजण कुत्रा पाळतात देखील. मात्र, भारतात एक असे राज्य आहे. जिथे कुत्रा हा प्राणी पहायलासुद्धा मिळणार नाही. या राज्याचे नाव आहे लक्षद्वीप (Lakshadweep).  येथे कुत्रा हा प्राणी का दिसत नाही यामागचे कारण खूपच रंजक आहे. 

भारतातील लक्षद्वीप हे थेट मालदीवला (Maldives) टक्कर देते. लक्षद्वीप हे भारतातील एक सुंदर बेट आहे. येथील अथांग समुद्र किनारे आणि निसर्गसौंदर्या पाहण्यासाठी  फक्त देशातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात. लक्षद्वीपमध्ये मांजर आणि उंदीर तुम्हाला हमखाम पहायला मिळतील. मात्र लक्षद्वीपमध्ये कुत्रा हा प्राणी तुम्हाला कुठेही दिसणार नाही. इतकचं नाही तर, पाळीव कुत्र्यांना सोबत घेऊन येणाऱ्या पर्यटकांना येथे प्रवेश दिला जात नाही. 

36 लहान बेटांनी बनलेल्या लक्षद्वीपची एकूण लोकसंख्या सुमारे 64000 आहे. लक्षद्वीपमध्ये 32 बेटे असूनही. येथील फक्त दहा बेटांवर लोक राहतात. ज्यामध्ये कावरत्ती, अगत्ती, अमिनी, कदम, किलातन, चेतलाट, बित्रा, अंदोह, कल्पना आणि मिनीकॉय यांचा समावेश आहे. यापैकी अनेक बेटे आहेत जिथे 100 पेक्षा कमी लोक राहतात. कावरत्ती ही  लक्षद्वीपची राजधानी आहे. लक्षद्वीपमध्ये माशांच्या 600 हून अधिक प्रजाती आढळतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, लक्षद्वीप हे रेबीज मुक्त राज्य आहे. सरकारने लक्षद्वीपमध्ये पाळीव आणि बिगर पाळीव कुत्रे नेण्यास बंदी घातली आहे. येथील लोकांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धेमुळे कुत्र्यांची पैदास तसेच पालन केले जात नाही. बेटावर कुत्रे नसल्यामुळे वातावरण स्वच्छ आणि शांत राहण्यास मदत होते.
  





Source link

दोन बायका अन् फजिती ऐका..! डॉक्टर नवऱ्याची दोन पत्नींमध्ये वाटणी, दोघींकडे ३-३ दिवस राहणार अन् १ दिवस..

0
दोन बायका अन् फजिती ऐका..! डॉक्टर नवऱ्याची दोन पत्नींमध्ये वाटणी, दोघींकडे ३-३ दिवस राहणार अन् १ दिवस..


कुटुंबातील जमीन आणि मालमत्तेच्या विभागणीबद्दल तुम्ही आतापर्यंत ऐकले असेल, पण आम्ही तुम्हाला ज्या वाटणीबद्दल सांगणार आहोत ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल. डॉक्टर नवऱ्याची ही विभागणी आहे, जी दोन बायकांमध्ये करण्यात आली आहे. झालेल्या वाटणीनुसार पती आठवड्यातून तीन दिवस एका पत्नीसोबत आणि दुसऱ्या पत्नीसोबत तीन दिवस राहणार आहे. विशेष म्हणजे रविवारी डॉक्टर आपल्या आईसोबत वेळ घालवणार आहेत. या अजब निर्णयावर सोमवारी बागपत कोतवालीत शिक्कामोर्तब झाले.



Source link

Recruitment: रेल्वेत अप्रेंटिस पदांसाठी भरती, एकूण १,१५४ जागा भरणार; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

0
Recruitment: रेल्वेत अप्रेंटिस पदांसाठी भरती, एकूण १,१५४ जागा भरणार; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया


East Central Railway Apprentice Recruitment: पूर्व मध्य रेल्वे ईसीआर येथे अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार rrcecr.gov.in येथे रेल्वे भरती कक्ष, पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेत संस्थेतील एकूण १ हजार १५४ पदे भरण्यात येणार आहेत. दरम्यान, २५ जानेवारीपासून नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०२५ आहे. या नोकरीशी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.



Source link