Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रGBS Injection Costs: एका इंजेक्शनला २० हजार रुपये खर्च; जीबीएस रुग्णाच्या नातेवाईकाची...

GBS Injection Costs: एका इंजेक्शनला २० हजार रुपये खर्च; जीबीएस रुग्णाच्या नातेवाईकाची माहिती

[ad_1]

GBS Treatment: देशात सध्या अनेक प्रकारचे गंभीर आणि संसर्गजन्य आजार पसरल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वात प्रथम एचएमपीव्ही आणि नंतर एचएन१ यांसारख्या आजाराने राज्याची चिंता वाढवली असताना पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम विषाणू म्हणजेच जीबीएसने थैमान घातले आहे. पुण्यात १०० हून अधिक रुग्णांना जीबीएसची लागण झाली आहे. त्यापैकी १७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने वैद्यकीय टीम पुण्याला पाठवली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएस रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा केली. दरम्यान, जीबीएसच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या आयव्हीआयजी इंजेक्शनची किंमत २० हजार रुपये असल्याचे वृत्त आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments