Monday, August 3, 2026
Home Blog Page 572

Weather Updates: राज्यात पुढील ५ दिवस थंडीचा जोर वाढणार! हवामान विभागाचा नागरिकांना इशारा

0
Weather Updates: राज्यात पुढील ५ दिवस थंडीचा जोर वाढणार! हवामान विभागाचा नागरिकांना इशारा


२५ जानेवारी रोजी राज्यात तापमान किती होते?

धुळे – १०.५ सेल्सिअस, निफाड – ११.३ सेल्सिअस, परभणी (कृषी)- १२.९ सेल्सिअस, धाराशिव – १३.४ सेल्सिअस, जळगाव – १४ सेल्सिअस, नाशिक – १४.८ सेल्सिअस, नाशिक – १४.८ सेल्सिअस, अहिल्यानगर – १४.७ सेल्सिअस, पुणे – १५.५ सेल्सिअस, नागपूर – १५.५ सेल्सिअस, ब्रह्मपुरी – १५.२ सेल्सिअस, वर्धा – १५.२ सेल्सिअस, गडचिरोली- १५ सेल्सिअस, गोंदिया – १५.८ सेल्सिअस, भंडारा – १५ सेल्सिअस , परभणी – १५.३ सेल्सिअस, सातारा – १५.५ सेल्सिअस, अमरावती – १६.१ सेल्सिअस, सांगली – १६.३ सेल्सिअस, बुलढाणा – १६.४ सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर – १६.४ सेल्सिअस , मालेगाव – १६ सेल्सिअस , सोलापूर – १८.१ सेल्सिअस, कोल्हापूर – १८.१ सेल्सिअस , डहाणू – १८.९ सेल्सिअस, वाशिम – १९.६ सेल्सिअस, यवतमाळ – १८ सेल्सिअस, सांताक्रूझ – २०.२ सेल्सिअस , रत्नागिरी – २०.६ सेल्सिअस , महाबळेश्वर – १७.४ सेल्सिअस.



Source link

Entertainment News in Marathi Live: Shahrukh Khan: सरकारच्या एका चुकीमुळे शाहरुख खानला लागली लॉटरी, जाणून नेमकं प्रकरण काय?

0
Entertainment News in Marathi Live: Shahrukh Khan: सरकारच्या एका चुकीमुळे शाहरुख खानला लागली लॉटरी, जाणून नेमकं प्रकरण काय?


Shahrukh Khan: सरकारच्या एका चुकीमुळे शाहरुख खानला लागली लॉटरी, जाणून नेमकं प्रकरण काय?

Shahrukh Khan: सरकारच्या एका चुकीमुळे शाहरुख खानला लागली लॉटरी, जाणून नेमकं प्रकरण काय?(PTI)
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Sun, 26 Jan 202502:02 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Shahrukh Khan: सरकारच्या एका चुकीमुळे शाहरुख खानला लागली लॉटरी, जाणून नेमकं प्रकरण काय?

  • Shahrukh Khan: शाहरूख खानला त्याच्या मन्नत या बंगल्यामुळे ९ कोटी रुपये मिळणार आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घेऊया..


Read the full story here





Source link

Shahrukh Khan: सरकारच्या एका चुकीमुळे शाहरुख खानला लागली लॉटरी, जाणून नेमकं प्रकरण काय?

0
Entertainment News in Marathi Live: Shahrukh Khan: सरकारच्या एका चुकीमुळे शाहरुख खानला लागली लॉटरी, जाणून नेमकं प्रकरण काय?


बॉलिवूडचा किंग खान शाहरुख जितका प्रसिद्ध आहे तितकाच त्याचा मन्नत बंगला देखील प्रसिद्ध आहे. वांद्रे येथे असलेल्या शाहरुखच्या बंगल्याबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळते. शाहरुख देखील दर रविवारी बंगल्याच्या गच्चीवर जाऊन चाहत्यांची भेट घेतो. शाहरूखने अनेक मुलाखतींमध्ये मन्नत हा बंगला माझ्यासाठी लकी ठरला आहे असे म्हटले आहे. आता आता हा बंगला शाहरुख खानला पुन्हा एकदा नऊ कोटी रुपये देणार आहे, जाणून घेऊयात हे नेमकं प्रकरण काय आहे?



Source link

Maharashtra Election News LIVE January 26, 2025: लाडकी बहीण व पीएम किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून ४ हजार कोटी वसुलीचे आव्हान, प्रशासनाला फुटणार घाम!

0
Maharashtra Election News LIVE January 26, 2025: लाडकी बहीण व पीएम किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून ४ हजार कोटी वसुलीचे आव्हान, प्रशासनाला फुटणार घाम!


Maharashtra Election 2024 News LIVE: लाडकी बहीण व पीएम किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून ४ हजार कोटी वसुलीचे आव्हान, प्रशासनाला फुटणार घाम!

Maharashtra Election 2024 News LIVE: लाडकी बहीण व पीएम किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून ४ हजार कोटी वसुलीचे आव्हान, प्रशासनाला फुटणार घाम!(PTI)
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Sun, 26 Jan 202505:55 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: लाडकी बहीण व पीएम किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून ४ हजार कोटी वसुलीचे आव्हान, प्रशासनाला फुटणार घाम!

  • Ladki Bahin Yojana : ३० लाख अपात्र महिला आणि १२ लाख शेतकऱ्यांना लोकप्रिय योजनांचा लाभ मिळाल्याने महाराष्ट्रासमोर चार हजार कोटी रुपयांच्या वसुलीचे आव्हान आहे.


Read the full story here

Sun, 26 Jan 202505:18 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पुणे तेथे काय उणे..! केवळ १ रुपयात ड्रेसची जाहिरात दुकानदाराच्या अंगलट; आक्रमक महिलांनी स्टॅच्यूवरचे कपडेही काढून नेले!

  • Pune News : एक रुपयात ड्रेस देण्याची ऑफर पुण्यातील एका दुकानदाराच्या चांगलीच अंगलट आली. ड्रेसच्या संख्येहून कित्येक पट अधिक महिलांनी गर्दी केल्याने दुकानदाराला अखेर दुकान बंद करून पळून जाण्याची वेळ आहे.


Read the full story here

Sun, 26 Jan 202503:43 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: देव तारी त्याला..! इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून चिमुकला पडला अन् चमत्कार घडला, CCTV फुटेज तुफान व्हायरल

  • Dombivli News : डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरामध्ये एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून दोन वर्षाचा मुलगा खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र देवदूत म्हणून धावत आलेल्या एका तरुणाच्या प्रसंगावधानाने मुलाचा जीव वाचला आहे.


Read the full story here

Sun, 26 Jan 202510:15 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai Coastal Road : कोस्टल रोडचं लोकार्पण, आता मरिन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर फक्त १५ मिनिटांत गाठता येणार

  • Mumbai Coastal Road Project : मुंबई किनारी रस्त्याचे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून आज उत्तरवाहिनी मार्गाचे उद्घाटन झाले आहे. प्रजासत्ताक दिनी हा मार्ग नागरिकांना समर्पित होत असून उद्यापासून या मार्गासह अन्य तीन आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत.


Read the full story here

Sun, 26 Jan 202509:52 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: सैफ अली खान प्रकरणात मोठा ट्विस्ट, शरीफुल इस्लामशी जुळले नाहीत फिंगरप्रिंट्स; खरा हल्लेखोर कोण?

  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयडीने सिस्टीम जनरेटेड रिपोर्टद्वारे घटनास्थळावरून गोळा करण्यात आलेल्या १९ बोटांच्या ठशांपैकी एकही बोटांचे ठसे आरोपींच्या बोटांच्या ठशांशी जुळत नसल्याची पुष्टी केली आहे. अशातच सैफ प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठा धक्का बसला आहे.


Read the full story here

Sun, 26 Jan 202508:05 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Jalna: जालन्यात भरचौकात तरुणानं स्वत:ला पेटवून घेतलं, थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

  • Man Sets Himself On Fire: जालन्यातील वाटुर फाटा येथे गावातील व्यापाऱ्यासोबत पैशाच्या वादातून एका तरुणाने स्वत:ला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली.


Read the full story here

Sun, 26 Jan 202505:20 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Guillain Barre Syndrome: जीबीएसची लागण झालेल्या पुण्यातील रुग्णाचा मृत्यू, नागरिकांना भरली धडकी!

  • GBS Death: गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झालेल्या पुण्यातील रुग्णाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे.


Read the full story here

Sun, 26 Jan 202504:30 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai Local : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक वाढवल्यामुळे लोकल ट्रेनचा बोजवारा, प्रवाशांचे प्रचंड हाल

  • Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक वाढवल्यामुळे लोकलसेवा विस्कळीत झाली असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.


Read the full story here

Sun, 26 Jan 202502:45 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Ajit Pawar: अजित पवार यांच्या निकवर्तीयांची दादागिरी; जमिनीच्या वादातून नागरिकाला मारहाण

  • Baburao Chandere: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांनी जमीनीच्या वादातून एका व्यक्तीला मारहाण केल्याची माहिती समोर आली.


Read the full story here

Sun, 26 Jan 202502:05 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Weather Updates: राज्यात पुढील ५ दिवस थंडीचा जोर वाढणार! हवामान विभागाचा नागरिकांना इशारा

  • Maharashtra Weather Updates Today: महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडणार असून नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


Read the full story here

Sun, 26 Jan 202501:31 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: जेव्हा- जेव्हा तिरंगा धोक्यात येईल, तेव्हा महाराष्ट्रातील भगवा त्याचं रक्षण करेल; उद्धव ठाकरेंची विरोधकांवर टीका

  • Uddhav Thackeray: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी आयोजित संविधान पूजन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे.


Read the full story here





Source link

जेव्हा- जेव्हा तिरंगा धोक्यात येईल, तेव्हा महाराष्ट्रातील भगवा त्याचं रक्षण करेल; उद्धव ठाकरेंची विरोधकांवर टीका

0
जेव्हा- जेव्हा तिरंगा धोक्यात येईल, तेव्हा महाराष्ट्रातील भगवा त्याचं रक्षण करेल; उद्धव ठाकरेंची विरोधकांवर टीका


Uddhav Thackeray News: भारताला हुकूमशाही राजवटीच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र आंदोलन करेल, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी आयोजित संविधान पूजन कार्यक्रमात ठाकरे म्हणाले की, जेव्हा जेव्हा तिरंगा धोक्यात येईल तेव्हा महाराष्ट्रातील भगवा त्याचे रक्षण करेल.



Source link

Google Doodle: भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून गुगलनं तयार केलं खास डूडल!

0
Google Doodle: भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून गुगलनं तयार केलं खास डूडल!


Indian Republic Day 2025: भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गुगलने खास डूडल तयार केले आहे, ज्यात भारतीय वन्यजीव विषयक चित्रण आहे, जे देशाच्या समृद्ध जैवविविधतेवर प्रकाश टाकते. भारतातील वैविध्यपूर्ण वन्यजीवांपासून प्रेरणा घेऊन गुगल डूडलमध्ये उत्तरेतील बर्फाळ हिमालयापासून ते दक्षिणेकडील पश्चिम घाटातील घनदाट वर्षावनांपर्यंत देशाच्या विविध प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे प्राणी दाखवण्यात आले आहेत.



Source link

विडणीतील सडलेल्या मृतदेहाचा रहस्यभेद अजूनही कायम; माहिती देणाऱ्यास १ लाखांचे बक्षीस

0
विडणीतील सडलेल्या मृतदेहाचा रहस्यभेद अजूनही कायम; माहिती देणाऱ्यास १ लाखांचे बक्षीस

हत्या की नरबळी? पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान

फलटण, ता. २५: आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर विडणी (ता. फलटण) गावच्या हद्दीत २५ फाटा येथे सापडलेल्या सडलेल्या व अर्धवट अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. हा खून आहे की अघोरी कृत्याद्वारे नरबळी, याबाबतही अजून स्पष्टता मिळालेली नाही. तपासाला गती देण्यासाठी सातारा जिल्हा पोलिस दलाने माहिती देणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

शुक्रवार, १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता प्रदीप महादेव जाधव यांच्या ऊसाच्या शेतात हा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी तेलकट साडी, स्कार्फ, काळी बाहुली, केस, दिव्याची वात, कुंकू, गुलाल, सुरी, सत्तूर यांसारख्या वस्तू सापडल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय, मृतदेहाच्या २०० मीटर अंतरावर असलेल्या पाण्याच्या पाटात एक कवटीही आढळली, त्यामुळे चर्चेला अधिकच उधाण आले आहे.

या घटनेनंतर सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कड्डुकर, पोलिस उपअधीक्षक राहुल धस यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वानपथकाच्या मदतीने तपास राबवूनही मृतदेहाची ओळख पटवता आलेली नाही, तसेच शरीराचे इतर अवशेषही हाती लागले नाहीत.

गुन्ह्याच्या तपासासाठी बक्षीस जाहीर

या रहस्यमय घटनेची उकल करण्यासाठी सातारा जिल्हा पोलिस दलाने माहिती देणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले असून, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असून हा अघोरी कृत्याचा प्रकार आहे की पूर्ववैमनस्यातून घडलेला गुन्हा, याचा छडा लावणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले आहे.

कबीररंग: चलते चलते जुग भया, पाव कोस पर गाँव…

0
कबीररंग:  चलते चलते जुग भया, पाव कोस पर गाँव…


हेमकिरण पत्की33 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

छांदोग्य उपनिषदात एक कथा आहे. एकदा एका माणसाला चोर पकडतात. गांधार या त्याच्या मायदेशापासून दूर नेतात आणि नेताना त्याचे डोळे बांधतात. पुढं त्याला वाळवंटात सोडून देतात. तुला पाहिजे तिकडं जा, असं सांगतात. मग तो ज्याला त्याला वाट विचारू लागतो. लोक सांगतील त्या दिशेनं जाऊ लागतो. याप्रमाणे गावोगाव हिंडता – हिंडता तो पुन्हा गांधार या त्याच्या मायदेशातच परततो. म्हणजे एवढं भ्रमण करूनही परत मूळ गावी येतो… सामान्य माणसाचंही असंच आहे. मायेनं पछाडलेल्या माणसाच्या डोळ्यांवर त्यानं स्वतःच पट्टी बांधून घेतल्यानं, आपलं कायमचं राहतं गाव जवळ असूनही ते दूर आहे, असा त्याचा समज होतो आणि तो वणवण फिरत राहतो. कबीर म्हणतात…

नाँव न जानै गाँव का,

बिन जाने किस जाँव।

चलते चलते जुग भया,

पाव कोस पर गाँव।।

हे जग आंधळं आहे का? की आपण आंधळे आहोत? आपल्या सान्निध्यात असलेल्या वस्तू आपल्याला जिथं आहेत, तिथं आणि जशा आहेत तशा का दिसत नाहीत, समजत नाहीत? ज्या वस्तू शोधायला पाहिजेत, त्यांचं नाव – गावही आपल्याला माहीत नाही. नीटपणे माहिती घेतल्याशिवाय शोध करायला निघाल्यानं विनाकारण आपली पायपीट होते. खरं तर काय शोधायचं असतं आपल्याला? आपल्याला कळतं का ते? की नुसतंच कालप्रवाहात आपणही वाहत जात असतो?

प्रेमाची अखंड स्थिती म्हणजे काय, हे जाणून घ्यावं वाटतं. हृदयाची अमाप शांतता आपल्याला हवी असते. महत्त्वाचं म्हणजे, जगताना कुठल्याही शारीरिक आणि मानसिक बंधनांचा काच आपल्याला नको असतो. प्रेमाची अखंड स्थिती हवी असलेले आपण विषयसुखाच्या वाटेला लागतो. इंद्रियांच्या आपापसातील भांडणांमुळं न संपणाऱ्या मनाच्या कोलाहलात सापडतो आणि जाणीव मंदावून टाकणारी सारी बंधनं बहुतेक आपल्या श्वासासोबतच संपतात. आपल्याला जायचं असतं सुख-दुःखापासून मोकळं करणाऱ्या गावी आणि कुठं पोहोचतो आपण! प्रेम, शांतता आणि मुक्ती यांसारख्या मौल्यवान वस्तू कुठं शोधाव्यात, याचं ज्ञान असतं का आपल्याजवळ? म्हणूनच कबीर सांगतात…

साधु सीप साहिब समुँद,

निपजत मोती माहिं।

बस्तु ठिकाने पाइये,

नाल खाल में नाहिं।।

ईश्वर हा समुद्र आहे, साधू म्हणजे त्यातील शिंपले आहे. सत्यवचनांचे मोती त्या शिंपल्यात तयार होतात. मोतीच शोधायचे असतील, तर समुद्रात बुडी घ्यायला हवी, नाल्यात आणि ओढ्यात ते कसे मिळतील?

कबीर सांगताहेत : जीवनातल्या कुठल्याही मौल्यवान वस्तूचं योग्य आकलन झाल्यावर, खरं मोल कळल्यावर आणि तिचं आपल्या आयुष्यातील स्थान नीटपणे ध्यानात आल्यावरच तिचा आढळ आपल्याला कळू शकतो. या मौल्यवान वस्तूच्या शोधासाठी साधूंची वचनं, त्यांचा बोध आपल्यासाठी आवश्यक असतो. जीवनमुक्त साधूंचे दिशादर्शक वचनमोती आपल्या असण्याचा बोध खोलातून घेणाऱ्या सत्त्वशील साधकाच्या हृदयात असतात. ते उथळपणानं अनुभव घेणाऱ्या शब्दज्ञानी जनांच्या मनाच्या ओढ्यानाल्यात कुठले सापडायला?

हे सारं आपल्या जीवनसाधनेतून जाणून घेणारं कबीरांचं सत्यनिष्ठ हृदय आपल्यासाठी कळवळतं. ते म्हणतात, हे सारं जगण्याचं दर्शन साधूनं घडवलं, तरी माणूस मोहमायेच्या अंधारात चाचपडतच राहतो. आत्मीय वस्तू त्याला दिसत नाही.

कबीर ये जग आघरा,

जैसी अंधी गाय।

बछरा था सो मरि गया,

ऊभी चाम चटाय।।

कबीर आपल्या या दोह्यातून आणखी एका प्रतिकाच्या आधारानं जगाचा भ्रामक आंधळेपणा स्पष्ट करतात. माणसाला जे आहे ते जसंच्या तसं दिसत नाही. त्याच्या दृष्टीवर अज्ञानाची धूळ जमा झालेली असते. म्हणून वास्तविक दर्शनापासून तो वंचित राहतो. मायेचा पसारा दृष्टीत जमा झाल्यानं त्याची दृष्टी एखाद्या आंधळ्या गायीसारखी होते. गाय आपलं पारडू मेलं, तरी त्याचं अंग चाटत राहते.

या प्रतिकातील गायीसारख्या आंधळेपणानं भरलेल्या जगाला कसं समजावता येईल, याची कबीरांच्या करुणामय हृदयाला चिंता वाटते. कबीरांची ही चिंता आपल्याला जगण्याच्या तातडीतून जाणवली, तर आपलं प्रेम, शांतता आणि मुक्ती यांच्या अखंड चित्तस्थितीला बाहेर शोधणं निरर्थक असल्याचा बोध आपल्याला होऊ शकेल. कबीरांना जीवनसाधकाचं हेच डोळसपण आपल्याला सांगायचं आहे!

(संपर्कः hemkiranpatki@gmail.com)



Source link

राज्य आहे लोकांचे…: राजकीय गुन्हेगारीकरणाचे प्रजासत्ताकापुढे आव्हान

0
राज्य आहे लोकांचे…:  राजकीय गुन्हेगारीकरणाचे प्रजासत्ताकापुढे आव्हान


  • Marathi News
  • Opinion
  • Political Criminalization Is A Challenge To The Republic Rasik Article By Dr. Amol Annadate

डॉ. अमोल अन्नदाते3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

नुकतेच आमच्या वर्गमित्र-मैत्रिणींच्या गेट-टुगेदरच्या वेळी जगाच्या विविध भागांमध्ये स्थायिक झालेले जुने सवंगडी जमले होते. यापैकी काही जण परदेशात उच्चपदस्थ होते. त्यापैकी सिंगापूर आणि आइसलँड इथून आलेले मित्र तिथल्या कायदा – सुव्यवस्थेबद्दल सांगत होते. तिथे आपला ८ वर्षांचा मुलगा किती निर्भयपणे एकटा टॅक्सीने फिरू शकतो, एखादी महागडी वस्तू रस्त्याच्या कडेला सोडून गेलात, तरी दोन दिवसांनी ती तशीच तिथे कशी परत सापडते, याचे कौतुक ऐकवत होते.

भारतातील वातावरण आणि रोज येणाऱ्या गुन्ह्यांच्या बातम्या पाहता, इथे पाऊल ठेवल्यापासून आम्ही प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहोत, प्रवासही दिवसाच करत आहोत, असे त्यांनी सांगितल्यावर मात्र भारतीय म्हणून मला त्याचे शल्य वाटले. आइसलँड आणि सिंगापूर हे गुन्हेगारीचे प्रमाण सर्वात कमी असलेले देश आहेत. भारत गुन्हेगारीच्या बाबतीत जगात ७७ व्या क्रमांकावर आहे आणि हे नक्कीच भूषणावह नाही. ही क्रमवारी ठरवताना केवळ नोंदवलेले गुन्हे गृहीत धरण्यात येतात. घडणारा प्रत्येक गुन्हा नोंदवला गेला, तर आपण कोणत्या क्रमांकावर असू, याची कल्पना न केलेली बरी.

भारतातील गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि लोकांच्या मनात सतत दाटलेली भीती हे भारतीय लोकशाहीसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. वाढत्या गुन्हेगारीचा पहिला संदर्भ राजकारण आणि लोकप्रतिनिधींशी जोडला जाणे क्रमप्राप्त आहे. देशात गेल्या काही वर्षांत झालेल्या निवडणुकांचे निकाल बघितले आणि त्यांची सरासरी काढली तर ३४ टक्के खासदारांवर गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी २४ टक्के म्हणजे ५ पैकी एका खासदारावर गंभीर स्वरूपाचे व मोठी शिक्षा होऊ शकतील, असे गुन्हे दाखल आहेत. तीनपैकी एका आमदारावर गुन्हे दाखल आहेत. राजकीय आंदोलने , जमावबंदी असे छोटे गुन्हे वगळले तरी खून, अपहरण असे अत्यंत गंभीर गुन्हे असलेले कितीतरी लोक कायदेमंडळाचे सदस्य म्हणून निवडून जात आहेत, हा लोकशाहीतील केवढा मोठा विरोधाभास आहे! लोकप्रतिनिधींवरील आरोपाच्या प्रकरणांतील एक टक्क्यांहून कमी प्रकरणे निकालांपर्यंत पोहोचू शकतात. भारतीय न्यायव्यवस्थेच्या गती आणि शक्तीमध्ये प्रजासत्ताकाच्या ७५ वर्षांतही मोठी सुधारणा का होऊ शकली नाही, या सर्वसामान्यांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर राजकारणाच्या गुन्हेगारीकरणात दडले आहे.

न्यायव्यवस्था संथ, कमकुवत राहणे ही सत्ताधारी, विरोधक अशा सर्वांसाठी सोयीचे बनले आहे. निवडणुकांचे बहुतांश अर्थकारण काळ्या पैशावर चालते आणि गुन्हेगारी हा काळ्या पैशाचा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळे गुन्हेगारांना पदरी बाळगणे ही राजकारणाची रीत झाली आहे. आता हे संबंध इतक्या हीन पातळीवर गेले आहेत की, राजकीय पक्ष थेट गुन्हेगारांनाच तिकीट देऊ लागले आहेत. मोठ्या गुन्ह्यामध्ये तुरुंगात असूनही प्रचार न करता निवडून आल्याची कितीतरी उदाहरणे आपण पाहतो. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाला अशी लोकमान्यता मिळाल्यामुळे खून, दरोडे, खंडणी असे छोटेमोठे गुन्हे दाखल असणे आणि गुंड, दबंग अशी प्रतिमा बनणे ही राजकीय पक्षांना हवीशी वाटणारी ‘पात्रता’ होऊन बसली आहे.

लोकांनाही आपला लोकप्रतिनिधी गुन्हेगार का हवा आहे, हा एक सामाजिक संशोधनाचा विषय आहे. निवडणूक अर्ज भरताना स्वतःची संपत्ती आणि दाखल असलेले गुन्हे जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मग मतदान करताना आपण उमेदवारांचे शपथपत्र उघडून वाचतो का? स्वतःशी संबंधित एखादे प्रकरण पोलिस ठाण्यात गेले की आपण आधी लोकप्रतिनिधींकडे धाव घेतो. त्यांनी मदत करावी, अशी आपली अपेक्षा असते. थोडक्यात, आम्ही काही बेकायदेशीर केले तर आम्हाला वाचवा, तुम्ही केले तरी काही हरकत नाही, असा एक अलिखित करार मतदार – लोकप्रतिनिधींमध्ये दिसतो.

सामान्य भारतीय माणूस हा अत्यंत पापभीरू , नियमांना घाबरणारा आहे. न्याय देणारी व्यवस्था कमकुवत आणि सोयी-सुविधा देणारे सरकार असमर्थ असल्याची त्याला जणू खात्रीच पटली आहे. त्यातच जात – धर्म, भाषिक आणि प्रादेशिक अस्मिता दिवसेंदिवस अधिकच टोकदार होऊ लागल्याने तो धास्तावला आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला एखादा बाहुबली आपल्याला सुरक्षा देऊ शकेल, अशी अपेक्षा कदाचित तो ठेवत असावा. एखादा साधा-सच्चा माणूस निवडून येईल आणि लोकप्रतिनिधी बनून आपले हक्क मिळवून देईल, यावरून सर्वसामन्य मतदाराचा विश्वास उडाला आहे.

एकूणच अशा गोष्टींमुळे लोकशाहीचा आधार असलेल्या संस्था कमकुवत होत आहेत. सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाचा केंद्रबिंदू असलेल्या सामान्य जनतेचे या संस्थांवरील नियंत्रण सुटत चालले आहे. ते कायम राहावे आणि आणखी मजबूत व्हावे, म्हणून आपल्या सामाजिक, राजकीय धारणा बदलल्या पाहिजेत. आमिषे, खोटी आश्वासने, फुकटच्या खैराती नाकारत गुन्हेगारीमुक्त प्रजासत्ताकासाठी ठाम आग्रह धरला पाहिजे. हे करू शकणारे नागरिकच लोकशाही वाचवू शकतील.

(संपर्कः dramolaannadate@gmail.com)



Source link

गोष्ट सांगतो ऐका…: डबा

0
गोष्ट सांगतो ऐका…:  डबा


अरविंद जगताप5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

पवनने ऐकलं नाही म्हणून वीरेंद्र अस्वस्थ झाला. लग्नाची गोष्ट पण पवनने ऐकली नाही. आपण उपयोगाच्या गोष्टी सांगतो; पण लोक ऐकत नाहीत, याचा वीरेंद्रला त्रास व्हायचा.

वीरेंद्र आणि पवन एकाच ऑफिसमध्ये कामाला. पाच – सहा वर्षे झाली. दोघंही अकाऊंटमध्ये आहेत. पगार ठीकठाक. मैत्रीही फार नाही. म्हणजे कामच एवढं असतं की, बोलायलाही वेळ मिळत नाही. मग घरी जायची घाई. घर एक – दीड तास लांब. दोघे दोन दिशेला राहतात. वीरेंद्र तसा जन्मल्यापासून पुण्यातच राहतो. पवन बाहेरून आलाय. वीरेंद्र आईवडिलांसोबत राहतो. पवन एकटाच. हे लक्षात आलं कारण ऑफिससमोर एक राजस्थानी माणूस पोळीभाजीची गाडी लावतो. स्वस्त जेवण. पवन तिथेच जेवतो.

एक दिवस वीरेंद्रने पाहिलं. त्याने मोठं भाषण दिलं पवनला. गाडीवर किती वाईट जेवण असतं, बाहेर जेवण केल्याने कसा पित्ताचा त्रास होतो, ते तेल कुठलं वापरतात, सोडा खूप घालतात.. अशा अनेक गोष्टी वीरेंद्र बोलत राहिला. मी कसा रोज घरून डबा आणतो, बाहेर काही खात नाही, हे कौतुक सांगत होता. पवन खूप वेळ ऐकत होता. मग बोलला, ‘मी एकटाच असतो रूमवर. आईवडील गावी असतात. त्यांना पैसे पाठवावे लागतात, म्हणून जेवतो इथे. स्वस्त आहे. दुसरा पर्याय नाही.’ वीरेंद्रला ती गोष्ट फार पटली नाही. पण, त्याच्याकडं दुसरा पर्याय नव्हता. अर्थात, रोज घरचा डबा खाताना त्याला पवनची आठवण यायची. तो गाड्यावर ते तेलकट जेवण खात असेल, हे डोळ्यासमोर दिसायचं. पण, त्याच्या हातात विचार करण्याशिवाय काही नव्हतं. दोघांचा पगार सारखाच होता.

बाकी पुन्हा एकदा हा विषय निघाला होता, तेव्हा वीरेंद्र पवनला म्हणाला, ‘तू लग्न का करत नाहीस?’ पवन हसला. मग काही वेळाने त्याने वीरेंद्रला विचारलं, ‘माझं जाऊ दे. तू का लग्न करत नाहीस?’ मग वीरेंद्रही तसंच हसला. दोघांनाही कारण माहीत होतं. लग्न जमणं काही सोपी गोष्ट नव्हती. पगार कमी, मुलींच्या अपेक्षा जास्त. प्रयत्न तर दोघेही करत होते; पण यश येत नव्हतं. आणि लग्न जमत नाही, हे दुःख एकमेकांना शेअर करण्याएवढा त्यांचा दोस्तांना नव्हता. तरीही वीरेंद्र पवनबद्दल विचार करत राहायचा. तसा त्याचा स्वभावच होता. समोरच्या माणसाला काहीतरी सल्ला देत राहणे. ऑफिसमधले शिपाई दिसले की, त्यांना बचतीविषयी सांगत राहणे. अगदी ऑफिसातल्या मुलींना सेफ्टीसाठी चाकू असलेले नेलकटर वापरायचं सांगायलाही तो कमी करत नसे.

एकदा तो फरशी पुसणाऱ्या मावशीला त्यांची पद्धत कशी चुकीची आहे, फरशी पुसताना पहिल्या केबिनपासून सुरूवात केली तर अंदाजे दहा मिनिटं वाचतील वगैरे सांगत होता. मावशी फक्त ‘मला कुठं घाई असते?’ एवढंच म्हणाल्या. पण, अशा उत्तराने वीरेंद्र कधी खचला नाही. तो सल्ले देतच राहायचा. पवनने वधू-वर सूचक मंडळात नोंदणी करावी, असा सल्ला त्याने चार-पाचदा दिला. पवन एवढे पैसे खर्चायला तयार नव्हता. जमवतील घरचे कधीतरी या विश्वासावर तो दिवस ढकलत होता. पण, पुन्हा वीरेंद्र त्याला गणित करून दाखवायचा. बायको आली, तिने स्वयंपाक करायला सुरूवात केली की किती पैसे वाचतील वगैरे.. ‘पण, बायको काय डबा बनवायला करायची का?’ पवन एवढंच म्हणाला. वीरेंद्र म्हणाला, ‘अर्थात..’ वीरेंद्रच आयुष्य अकाऊंट म्हणजे अकाऊंट. हिशेब. पुढचा विचार. पुढे हळूहळू ऑफिसात खूप गोष्टी घडू लागल्या. हा विषय वीरेंद्र विसरून गेला.

पवन महिनाभर गावी गेला होता सुटी टाकून. ऑफिसमध्ये सगळ्यांना वाटत होतं की त्याने नोकरी सोडली. कारण आधी दोन दिवसांत येतो म्हणून गावी गेलेला पवन महिना झाला तरी ‘आज येतो, उद्या येतो’ म्हणत होता. आधी वीरेंद्रने फार मनावर घेतलं नाही. पण, नंतर तो अस्वस्थ होऊ लागला. पवन आजारी तर पडला नसेल? एवढे दिवस बाहेर खायचा, नक्कीच पित्त वाढलं असेल. त्याने आपलं ऐकायला पाहिजे होतं. पवनने ऐकलं नाही म्हणून वीरेंद्र खूप अस्वस्थ झाला. लग्नाची गोष्ट पण पवनने ऐकली नाही. आपण एवढ्या उपयोगाच्या गोष्टी सांगतो; पण लोक ऐकत नाहीत, याचा वीरेंद्रला कायम त्रास व्हायचा. अर्थात एक – दोन दिवस. नंतर तो विसरून जायचा. पवनबद्दल विचार करणं सुटलं. त्याला कारणही तसंच झालं. वधू-वर सूचक मंडळातून त्याला एक स्थळ आलं.

मुलगी अकाऊंटवालीच होती. दोघे भेटले. भारी गोष्ट म्हणजे, दोघांचा स्वभाव चांगलाच जुळला. तिलाही प्रत्येकीची चौकशी करायची सवय. कुणी काय केलं पाहिजे, हे आवर्जून सांगणे ही दोघांमधली कॉमन गोष्ट. म्हणजे दोघं केअरिंग आहेत, हे दोघांच्या घरच्यांना छान वाटलं. लग्न झालं. संसारात रमून गेला वीरेंद्र. पण, पुन्हा पवन आठवू लागला. कुठं असेल? तब्येत कशी असेल? त्याच्या पित्ताबद्दल चौकशी केली पाहिजे, असं मनात येऊन गेलं. खूप वेळा. पण, संसार आणि ऑफिस या भानगडीत वेळ मिळाला नाही. खूप गोष्टी राहून जातात. वेळ हे कारण.

महिना झाला आणि पवन उगवला. एका महिन्यात भलताच बदलून गेला होता. गावी राहून जरा तेज आलं होतं चेहऱ्यावर. मूठभर मांस चढल्यासारखा दिसत होता. हे सगळं अर्थात वीरेंद्रच्या डोक्यात चालू होतं. आपण उगीच त्याच्या आजारपणाबद्दल विचार करून चिंतेत होतो, हा तर आणखी फिट होऊन आलाय. वीरेंद्र लंच ब्रेकपर्यंत काम कमी आणि हाच विचार जास्त करत होता. पण, ऑफिसमध्ये बोलायची सोय नव्हती. शेवटी लंच ब्रेक झाला. आता कधी एकदा पवनला गाठतो आणि प्रश्नांचा भडिमार करतो, असं झालं त्याला. पाच मिनिट, दहा मिनिट..

वीरेंद्र वाट बघत होता, पण पवन काही आला नाही. वीरेंद्र पोळीभाजीच्या गाडीपाशी उभा होता. त्याला लक्षात आलं की, आपल्या म्हणण्याप्रमाणे पवनने बाहेर गाडीवर जेवण बंद केलेलं दिसतंय. हे भारी आहे. वीरेंद्रला बरं वाटलं. मनोमन सुखावला तो. आणि पहिला घास घेतला. तेवढ्यात खांद्यावर हात ठेवला कुणी तरी. वीरेंद्रने दचकून मागं पाहिलं. पवन उभा होता. दोघांना आश्चर्याचा धक्का बसला होता. वीरेंद्र चक्क गाडीवर जेवत होता. तो हिरमुसला. शेवटी खरं बोलला.. ‘लग्न झालं, बायकोसोबत ऑफिसजवळच राहतो. आता आईवडील नसतात सोबत. आणि बायको सकाळी सकाळी उठून डबा करत नाही. तिला त्रास नको म्हणून गाडीवर जेवतो आजकाल..’ पवन त्याला ऑफिसमध्ये जाऊ म्हणाला. त्याने डबा आणला होता. पवनही लग्न करून आला होता. त्याच्या बायकोने डबा दिला होता. पवन आता रोज डबा घेऊन येणार होता. तो वीरेंद्रला म्हणाला, ‘आपण माझा डबा खात जाऊ.’ वीरेंद्र ‘नाही’ म्हणाला. त्याच्या लक्षात आलं, आपण फक्त सल्ले – सजेशन देतो, पवन सोल्युशन देणारा माणूस आहे. ‘माझा डबा खाऊ,’ असं आपण एकदा तरी म्हणायला हवं होतं. आपण उगीच स्वतःला फार केअरिंग समजत होतो.

(संपर्कः jarvindas30@gmail.com)



Source link