Monday, August 3, 2026
Home Blog Page 573

माझ्या हिश्श्याचे किस्से: राहत इंदोरींनी सिनेमासाठी दिला होता नकार, सिनेगीतांच्या मोबदल्यापेक्षा मुशायऱ्यांमधून करायचे जास्त कमाई

0
माझ्या हिश्श्याचे किस्से:  राहत इंदोरींनी सिनेमासाठी दिला होता नकार, सिनेगीतांच्या मोबदल्यापेक्षा मुशायऱ्यांमधून करायचे जास्त कमाई


रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमधील गीतकार आणि शायरांच्या या मालिकेत आज एका अशा गीतकाराविषयी बोलू ज्यांच्या शायरीने देश-विदेशातील मुशायरे तर गाजवलेच; पण हिंदी सिनेमातील त्यांच्या गाण्यांमध्येही कसदार शायरी ऐकायला मिळायची. हे शायर – गीतकार म्हणजे राहत इंदोरी.

मला अजूनही आठवतेय. ही साधारण १९७० च्या दशकाअखेरची गोष्ट असेल. भोपाळच्या रवींद्र भवनमध्ये ऑल इंडिया रेडिओने एक मुशायरा आयोजित केला होता. मी त्याला उपस्थित होतो. मुशायऱ्यात उद्घोषणा झाली.. ‘अब आपके सामने तशरीफ़ ला रहे हैं इंदौर से आये एक नौजवान शायर जनाब राहत इंदोरी..’ राहत भाई माइकसमोर आले आणि त्यांना पाहून सभागृहातले काही लोक हसले. राहत भाई म्हणाले, ‘लोकहो, माझ्याकडे नको, माझ्या शायरीकडे पाहा. आणि माझा दावा आहे की, माझ्या रचना ऐकल्यावर तुमच्यासमोर उभ्या असलेल्या या राहत इंदोरीबद्दल तुम्हाला प्रेम वाटले नाही, तर मी शायरी सोडून देईन. मी त्या सायंकाळच्या मैफिलीचा साक्षीदार आहे, त्यांनी आपल्या रचना सादर करायला सुरूवात केली आणि अक्षरश: मुशायरा गाजवला. सगळे ‘वाह, वाह’ करत होते. जे त्यांच्यावर हसले होते, ते खजील झाले. या गोष्टीवरुन मला राहत इंदोरी यांचाच एक शेर आठवतोय…

अभी गनीमत है सब्र मेरा,

अभी लबालब भरा नहीं हूँ,

वो मुझको मुर्दा समझ रहा है,

उससे कहो मैं मरा नहीं हूँ।

ही गोष्ट २००२ किंवा २००३ ची असावी. माझ्या एका सिनेमाचे काम सुरू होणार होते. त्याची कहाणी लिहितानाच आम्ही ठरवले होते की अानंद बक्षीजींकडून गाणी लिहून घ्यायची. पण, हे नियोजन सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यामुळे कुणाकडून गाणी लिहून घ्यायची, असा विचार सुरू असताना, राहत इंदोरी साहेबांना घ्यावे, असे सर्वांनी ठरवले. त्यामुळे मी राहत भाईंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते हाती लागत नव्हते. बाहेर आहेत, मुशायऱ्याला गेले आहेत, हेच प्रत्येक वेळी सांगितले जायचे. महिनाभरानंतर माझे राहत भाईंशी बोलणे होऊ शकले. तुम्हाला प्रत्यक्ष भेटूनच बोलेन, असे मी त्यांना म्हणालो. ते माझ्याकडे आले. मी विचार केला की, तुमच्याकडून गाणी हवी आहेत, असे सांगितल्यावर ते खूप खुश होतील. मी त्यांना तसे सांगितले. ते म्हणाले, ‘रूमी भाई, तुम्हाला माझ्याविषयी माहीत नसावं. मी सिनेमाची गाणी लिहिणं बंद केलं आहे. आता मी गाणी लिहीत नाही.’

मला आश्चर्य वाटले. मी म्हणालो, ‘काय सांगता?’ त्यावर राहत भाईंनी सांगितले की, मी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’साठी शेवटचे लिहिले, त्यानंतर आता लिहीत नाही. मी विस्मयाने पुन्हा विचारलं की, तुम्ही सिनेमांसाठी गाणी लिहिणार नाही तर मग पैसाअडका – खर्चपाण्याचं काय..? हे एेकून ते खूप हसले. म्हणाले, ‘रूमी मियां, तुम्ही सिनेमावाले मला काय पैसे देणार? इथल्यापेक्षा मी खूप जास्त कमावतो.’ आता पूर्वीसारखे फारसे मुशायरेही होत नसावेत, असं मला वाटलं. म्हणून मी ‘कसं काय?’ असं विचारलं. ते म्हणाले, मी मुशायऱ्यांतून किती कमावतो, हे तुम्हाला माहीत आहे का? मी ‘नाही’ म्हणालो. त्यांनी सांगितलं की, मी अमेरिकेची एक टूर करतो. तिथे माझे मानधन ठरलेले असते. मी शनिवार-रविवारी मुशायरे करतो आणि आठवड्यांतील इतर दिवशी तिथले लोक मला स्नेहभोजनासाठी बोलावतात, भेटवस्तू देतात, कधी कधी लिफाफेही देतात. मी एकदम खुश आहे, सन्मानाने जगभरात फिरतो आहे.

मी विचारलं, पण गाणी न लिहिण्याचा निर्णय तुम्ही अचानक कसा घेतला? मुशायऱ्यांसोबत गाणीही लिहित राहिला असतात.. त्यावर राहत भाई म्हणाले की, एका खूप मोठ्या निर्माता-दिग्दर्शकाने माझ्या गाण्याचा तिसरा मुखडा रिजेक्ट केला, तेव्हा त्यांच्या घरातून बाहेर पडताना मी एक शेर ऐकवला होता.. बहुत मुश्किल है ग़ज़लों की रोटियाँ खाना, बेहरे को भी शेर सुनाना पड़ता है.. त्या दिवसापासून सिनेमासाठी गाणी लिहायची नाहीत, असे मी ठरवले.

एवढं सांगून राहत भाई परत गेले. दरम्यान असेच काही दिवस निघून गेले. २०११ मध्ये मी पुन्हा त्यांना फोन केला आणि मला काही बोलायचंय, कृपया माझ्या घरी या, असे सांगितले. राहत भाई माझ्याकडे आले. त्यांना म्हणालो की, मी ‘गली गली चोर है’ नावाचा एक सिनेमा सुरू करतोय. त्याचे लेखन आणि दिग्दर्शनही मीच करणार आहे. हा सिनेमा भ्रष्टाचारावर आहे. तुम्ही नेहमी व्यवस्थेच्या, सरकारच्या विरोधात लिहून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करता, त्यामुळे या कथेसाठी गाणेही तुम्हालाच लिहावे लागेल. हे एेकून माझ्या प्रेमाखातर त्यांनी होकार दिला. वास्तविक हे खरे आहे की, सरकार कोणत्याही पक्षाचे असो; ते व्यवस्था आणि सरकारच्या विरोधात लिहीत राहायचे, त्यामुळे त्यांना देशाचा कोणताही नागरी सन्मान किंवा पद्म पुरस्कार मिळाला नाही. पण, त्यांना या गोष्टीचा खेद वा खंत नव्हती. त्यांनी खरा पुरस्कार देशातील जनतेची मने जिंकून मिळवला होता. त्यामुळे लोक आजही त्यांचा आणि त्यांच्या लेखनाचा सन्मान करतात. आज राहत इंदोरी साहेब आपल्यात नाहीत. त्यांचे पुत्र सतलज राहत इंदोरी हेही उत्तम युवा शायर आहेत आणि तेही वडिलांप्रमाणे मैफिली गाजवत आहेत.

आज राहत इंदोरीजींच्या आठवणीत ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधील त्यांनी लिहिलेले हे गाणे ऐका, पाहा आणि चांगला, मोठा शायर एखादे आयटम साँग लिहितो, तेव्हा त्यातही किती खोल अर्थ दडलेला असतो, याचा अनुभव घ्या.

देख लें,

आँखों में आँखें डाल

सीख लें,

हर पल में जीना यार…

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link

देश – परदेश: अमृतकाळातील ‘आदर्श’ गाव!

0
देश – परदेश:  अमृतकाळातील ‘आदर्श’ गाव!


ज्ञानेश्वर मुळे9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

एकीकडे आपल्या गावात आर्थिक प्रगती आणि वाढते बकालपण असे विरोधाभासी चित्र दिसते, तर दुसरीकडे नागालँडमधील खोनोमा तसेच ओडिशातील कालराबंक अशा गावांत कमालीच्या स्वच्छता – सुविधांचे दर्शन घडते. तिथे श्रीमंतीचा झगमगाट नाही, पण गरिबीचे दर्शनही नाही. दृष्ट लागावी अशी ही गावे आहेत!

दिल्लीत असलो तरी मी अगदी नियमितपणे माझ्या गावाची वारी करतो. अगदी एखादा महिना चुकला तरी पुढच्या महिन्यात जातो. वर्षातून सात – आठ तरी भेटी निश्चितच होतात. माझी ऊर्जा अक्षय ठेवण्यात गावाच्या या भेटी फार मोठी भूमिका निभावतात. मी उल्हसित होऊन दिल्लीच्या प्रदूषित वातावरणाचा सामना करायला परत येतो. या नियमित भेटींमुळे गावात होणारे सूक्ष्म आणि स्थूल असे दोन्ही बदल माझ्या नजरेतून सुटत नाहीत.

गांधीजींनी ‘गावाकडे चला’ अशी घोषणा दिली, मात्र गेल्या पंचाहत्तर वर्षांत शहरांकडे जाणारे लोंढे थांबले नाहीत. कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील माझ्या गावाबद्दल बोलायचे तर विदर्भ, मराठवाड्याच्या तुलनेत आमच्या भागातील गावे संपन्न आहेत. माझ्या गावाची आर्थिक प्रगती वाखाणण्यासारखी आहे. सहकारी (आणि आता खासगी) साखर कारखाने, मुबलक पाणी यांच्या बळावर शेतकऱ्यांच्या खिशात बऱ्यापैकी पैसा आहे. गावात शाळा – कॉलेज आहेतच; पण अनेक मुलं – मुली शेजारच्या इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली शहरातही शिकायला जातात. गावातील पन्नासच्या वर युवक सैन्यात आहेत आणि ७०० ते ८०० युवक – युवती देशात व देशाबाहेर अधिकारपदावर आहेत. प्रत्येक घरापुढे चारचाकी नसेल, पण दुचाकी नक्की दिसेल. चारचाकी वाहनांप्रमाणेच ट्रक – ट्रॅक्टर, रिक्षा, स्कूल बस यांचीही रेलचेल आहे. गावाच्या प्रवेशद्वारावर अनेकदा छोटी – मोठी वाहतूक कोंडीही होते. कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनही घरोघरी पोहोचले आहेत. उत्तम प्रकारे सहकारी संस्था चालवल्या जात आहेत. साक्षरतेचे प्रमाणही ९५ ते ९७ टक्के असावे. या सगळ्या जमेच्या बाजू आहेत. सर्वांनाच अभिमान वाटावा अशी ही प्रगती आहे.

पण, याचा अर्थ सगळे आलबेल आणि अभिमानास्पद आहे, अशातला भाग नाही. गावात प्रवेश करण्याच्या थोडे आधी एक छोटा ओढा आहे. तिथे पूर्वी पाणी प्रवाहित असायचं आणि पावसाळ्यात वरच्या बाजूला छोटे मासेही दिसायचे. आता तिथे प्लॅस्टिकच्या बाटल्या, कोकचे कॅन, टाकाऊ वस्तू, जुन्या गाद्या अशा गोष्टींनी हा भाग व्यापलेला दिसतो. गेल्या दोन वर्षांत त्यामध्ये भरच पडली आहे. जातपात पूर्वीही होती, आता शिक्षण घेऊनही गावातल्या संस्था जातवार विभागताना दिसतात. प्रत्येक निवडणुकीत जात आणि पैसा याच कसोट्या जुने आणि नवे, युवा नेते वापरतात. ग्रामपंचायतीतही भ्रष्टाचार घुसल्याची चर्चा असून, राजकारणातील स्पर्धात्मकता टोकाला पोहोचली आहे. नदीच्या प्रदूषणाचे रडगाणे गेली दोन – तीन दशके तसेच आहे. आणि नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून आताही नाक धरुनच जावे लागते. ‘हागणदारीमुक्त’ अशा गावात संडासमध्ये पाणी नसणे आणि सुरक्षित दरवाजे नसणे ही समस्या आहे. अधूनमधून स्वच्छ करण्याचे प्रयत्न करुनही गावतलावातील जलपर्णी वाढतेच आहे आणि ते पाणी पिण्याोग्यही नाही. प्रत्येक घरात नळाचे पाणी आहे, तरी जमिनीतील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे पोटाचे विकार बळावले आहेतच; शिवाय आमचा सगळा तालुकाच कॅन्सरच्या रुग्णसंख्येत अग्रस्थानी पोहोचला आहे. आमच्या युवकांना आजूबाजूच्या भागात लग्नासाठी जोडीदार मिळत नाही, पण पैसे देऊन सुदूर प्रांतांतून मुली आणल्या जातात. एरवी कट्टर जातिवाद पाळणारे गावकरी अशावेळी मात्र जातपात बघत नाहीत. गावाच्या बाहेर असलेल्या कचरा डेपोतील अस्ताव्यस्त पसरलेला कचरा जणू गााच्या भविष्याविषयी सावधानीचा इशारा देतो आहे.

या पार्श्वभूमीवर २०२४ मध्ये मी दोन आदर्श गावे पाहिली. त्यांच्याविषयी लिहिणे आवश्यक आहे. नागालँडची राजधानी कोहिमा या शहरापासून केवळ काही अंतरावर असलेल्या खोनोमा नावाच्या गावाला आशियातील सर्वांत स्वच्छ गाव मानले जाते. डोंगराच्या कुशीतील हे गाव स्वच्छ तर आहेच; पण प्रत्येक घरासमोर सुंदर हिरवळ, बाग, फुलझाडे बहरलेली दिसतात. पारंपरिक घरे, शेती, शाळा, वन संरक्षण अशा सर्वच बाबतीत मन मोहवून टाकणारे हे गाव आहे. मी पाहिलेले दुसरे गाव ओडिशाच्या राजधानीपासून सव्वा तासाच्या अंतरावरचे कालराबंक. या गावाला अनेक जण आदर्श गाव तर मानतातच, पण हे देशातील पहिले ‘स्मार्ट गाव’ मानले जाते. निसर्गरम्य परिसरातील या गावात १०० टक्के साक्षरता आहेच; शिवाय गावात उत्तम प्राथमिक आरोग्य केंद्रही आहे. सर्व ग्रामस्थांकडे आरोग्य विमा आहे. ओडिया आणि इंग्रजी माध्यमातील उत्तम शाळा, पोलिस चौकी, पोस्ट ऑफिस, मोफत वाय फाय, पथदिवे, हागणदारीमुक्त परिसर, पाण्यासाठीचा कृत्रिम तलाव आणि युवकांना नोकरीची उपलब्धता ही या गावाची काही वैशिष्ट्ये. मी भेट दिली तेव्हा तिथला शंभर खाटांचा दवाखाना तयार होत आलेला दिसला. विशेष म्हणजे, हे स्वप्न अच्युत सामंत आणि त्यांची बहीण इतिराणी सामंत या भावंडाच्या प्रयत्नाने साकार झाले आहे. या गावात श्रीमंतीचा झगमगाट नाही, पण गरिबीचे दर्शनही नाही. खोनोमा असो की कालराबंक; दृष्ट लागावी अशी ही गावे आहेत!

(संपर्कः dmulay58@gmail.com)



Source link

रसिक स्पेशल: प्रजासत्ताकाचा आत्मशोध…

0
रसिक स्पेशल:  प्रजासत्ताकाचा आत्मशोध…




आता धनिक, नोकरशहा आणि राजकीय पक्ष विचार करतात. लोकांना विचार करण्याची सवय उरली नाही. परिणामी माणूस व्यक्ती म्हणून विस्कटलेला आहे. समाज एक गर्दी बनला आहे, एक ढीग झाला आहे. ढीग कोणीही कसाही हाताळावा. सत्ता ढिगातून हवं ते वेचते, बाकीचा ढीग… ढीगच राहतो. पंचाहत्तरीतील प्रजासत्ताक असं सैरभैर झालं आहे. यातून सावरत त्याला आत्मशोध घ्यावा लागेल… पंचाहत्तर वर्षांपूर्वी… भारतात १९५० मध्ये प्रथमच सिंहासनावर कोणीच बसणार नव्हतं. राजा – राणी इतिहासजमा झाले, सिंहासन संग्रहालयात गेलं होतं. सिंहासनासारखीच एक खुर्ची लोकसभेत बसवण्यात आली. त्या खुर्चीवर सभापती बसले. लोकांनी निवडून दिलेल्या लोकांचं सभागृह ते चालवू लागले. देशाचं सरकार चालवणारी माणसं या सभापतींसमोर उभं राहून, आपण काय काय करणार आहोत, ते सांगू लागली. सभागृहातले लोक नागरिकांच्या वतीनं गाऱ्हाणी आणि मागण्या मांडू लागले. कोट्यवधी लोकांच्या वतीनं त्यांचे हे प्रतिनिधी देशाचा कारभार हाकू लागले. राज्यघटनेनं लोकांना कारभार करण्याचा अधिकार दिला, त्यांच्या वतीनं प्रतिनिधी संसद, विधिमंडळे चालवू लागले. एका अर्थाने हे प्रजेची सत्ता आल्याचं द्योतक होतं. *
आज प्रजा आणि सत्ता यात नातं उरलेलं नाही. प्रजेची इच्छा सत्तेला कळत नाही. प्रजा आणि सत्ता यांच्यात थेट दुतर्फा संबंध राहिलेला नाही. सत्ता स्वतःच्या वळणानं चालत राहते. त्यातून प्रजेचं जे काही व्हायचं ते होत राहतं. भारतात आणि जगातही. सत्ता म्हणजे सरकार. सरकार म्हणजे निवडणुकीत बहुमत मिळालेल्या पक्षानं चालवलेलं सरकार. लोकशाही अगदी बाल्यावस्थेत होती, तेव्हा रोम – ग्रीसमध्ये नगरजन चौकात गोळा होत, चर्चा करत, निर्णय घेत. नगरं मोठी झाली. कारभार नगरांपुरता नव्हे, तर अधिक मोठ्या लोकसंख्येसाठी करावा लागला. इतकी माणसं थेट गोळा होणं शक्य नव्हतं. लोकांनी प्रतिनिधी निवडावेत आणि प्रतिनिधींनी राज्य करावं, हे ठरलं. भारतात १९७२ – ७४ च्या सुमाराला असंतोष होता. गुजरात आणि बिहारमध्ये, काही अंशी देशात जनता असंतुष्ट होती, तिच्या मनासारखं होत नव्हतं. त्या राज्यात आणि देशात लोकांनीच निवडून दिलेली सरकारं होती आणि तरीही लोकांना वाटत होतं की, ही सरकारे आपलं मन ओळखू शकत नाहीत. या स्थितीला सत्ताधारी काँग्रेस पक्ष कारणीभूत आहे, त्या पक्षातला भ्रष्टाचार कारणीभूत आहे, असं काही लोकांना वाटलं. ते एकत्र आले. जेपी अर्थात जयप्रकाश नारायण यांनी असंतोषाचं नेतृत्व केलं. आपला प्रतिनिधी नीट काम करत नसेल तर त्याला परत बोलवावं, असा विचार त्यांनी मांडला. काँग्रेसचे समर्थक म्हणाले की, हा सारा विरोधी पक्षांचा डाव आहे. लोकप्रतिनिधींना परत बोलावणं व्यवहार्य नाही. सतत लोकप्रतिनिधींना परत बोलवत राहिलं, तर कारभार होणार कसा? सरकारं चालू द्यावीत, जनता आणि सरकारांमध्ये संवाद घडवून आणावा. जेपींची चळवळ यशस्वी झाली. काँग्रेसची सरकारे पडली. विरोधकांची सरकारे निवडून आली. त्यानंतर आजवर असं दिसतंय की, कोणतंही सरकार आलं तरी बहुतांश जनता असंतुष्ट असते. आज भाजपची सरकारे आहेत. हा पक्ष म्हणतो की, त्यांनी उत्तम कारभार केलाय, जनता अत्यंत सुखात आहे. त्यासाठी तो काही आकडेही देतो. विरोधक अनेक उदाहरणं देऊन जनता दुःखात आहे, असं सांगतात. अर्थशास्त्र जाणणारे शक्यतो तटस्थपणे काही उदाहरणं आणि आकडे देतात. त्यातून जनता म्हणतात तशी सुखात नाही, असं दिसतं. ही १९७५ सारख्या स्थितीची लक्षणे तर नाहीत ना, असं वाटू लागतं. *
निवडणुकीचा खर्च फार वाढलाय. प्रचार महाग झालाय. लोकांना पैसा खाऊ घालण्याचा खर्च खूप वाढलाय. सभेसाठी, मिरवणुकीसाठी माणसं गोळा करावी लागतीत, ती पैसे मागतात. पुढारी पैसा कमावत असतील, तर आम्हाला त्यात वाटा का मिळू नये, असं लोक उघडपणे बोलतात. पक्षांना पैसा गोळा करावा लागतो. तो पैसा ६० टक्के लोकसंख्या असलेल्या गरिबांकडून येणं शक्य नाही. लोकसंख्येत ३५ टक्के असलेल्या मध्यम – उच्च मध्यमवर्गीयांकडून थोडासा पैसा येतो. पण, हा वर्ग एक पैसा देतो आणि दहा पैशाचा गवगवा करतो. मग उरतात समाजातले १ ते ५ टक्के श्रीमंत. ते नाना वाटांनी राजकीय पक्षांना पैसे देतात. सत्ताधारी पक्षाला पैसे देणाऱ्यांचा फायदा पाहावाच लागतो. ते तरी दिलेला पैसा परत कसा मिळवणार? सरकारकडं (ते चालवणाऱ्या पक्षांकडं) येणारा बहुतेक पैसा धनिकांकडून येतो. गरीब माणूस कर भरत नाही. आपण वापरतो त्या प्रत्येक बारीकसारीक वस्तूवर कर भरून बहुसंख्य जनता सरकारला पैसे देते.
रस्ते खराब. हवा खराब. रोगराई भरपूर. औषधपाणी करता करता खिसा रिकामा होतो. शिक्षण मिळते, पण शिकणाऱ्यांची आकडे साक्षरता, भाषा साक्षरताही जेमतेमच असते, तर्कशक्ती वगैरे सोडूनच द्या. राजकीय पक्ष सरकार आणि माध्यमांच्या आधारे एवढा धुरळा उडवतात की देशातील सामान्य माणूस डोळे चोळत राहतो, त्याला सभोवतालच्या वास्तवाचा अर्थ कळत नाही. निवडणूक येते तेव्हा धुरळा फार वाढतो. हा माणूस आपल्यापुढं काय चाललंय ते पाहू लागतो, तेव्हा पक्षांनी दिलेले पैसे, मांस, मद्य, कपडे, भांडी समोर येतात. त्याचाही अर्थ त्याला कळत नसतो. तो मतदान करून बसतो. कधी कधी आपण मत कोणाला दिलं आणि कोण निवडून आला, याचा पत्ता त्याला लागत नाही. *
जाहिरात, माध्यमांतून येणाऱ्या प्रतिमा आणि शब्द, इव्हेंट यांवर या गणराज्यातील प्रजेचं विचार करणं अवलंबून आहे. ती आपल्या बाबतीतले निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. या लोकांच्या ज्ञानात आणि माहितीत भर पडते, ती सार्वजनिक माध्यमातून. पण, त्यातील बहुतांश आता धनिकांनी ताब्यात घेतली आहेत. लोकांनी काय खावं, कसे कपडे घालावेत, औषधं कोणती घ्यावीत, पोरं कुठल्या शिक्षण संस्थात घालावीत, मतं कोणाला द्यावीत, कोणता राजकीय विचार करावा, हे सारं ते ठरवतात. उंची कपडे, उत्तम प्रकाशयोजना, उत्साहवर्धक संगीत, प्रभावी सूत्रधार आणि परिणामकारक पात्रं यांचा वापर ते करतात. गायक, खेळाडू, शिक्षक, डॉक्टर, कलाकार अशी मंडळी दिखाऊ पद्धतीनं पोकळ आशय लोकांसमोर पोहोचवतात. माणसांची डोकी आणि मन या आशयावर पोसली जातात. धनिक, नोकरशहा आणि राजकीय पक्ष विचार करतात. लोकांना विचार करण्याची सवय उरली नाही. त्यांनी विचार करण्याची आवश्यकता नाही, अशी स्थिती तयार झाली आहे. माणसं जगण्याच्या चक्रात इतकी अडकलीत की त्यांना विचार करायला वेळच मिळत नाही. अशातच त्यामध्ये जात येते, धर्म येतो, पंथ येतो. मग प्रत्येकाची स्वतंत्र आर्थिक स्थिती येते, कौटुंबिक स्थिती येते. हज्जार झेंगटं… परिणामी माणूस व्यक्ती म्हणून विस्कटलेला आहे. कुटुंबं विस्कटलेली आहेत. समाज ही एक गर्दी बनली आहे, एक ढीग झाला आहे. ढीग कोणीही कसाही हाताळावा, ढिगाचं काहीही करावं, ढीग स्वतः काहीही करू शकत नाही. सत्ता ढिगातून हवं ते वेचते, बाकीचा ढीग.. ढीगच राहतो. दुर्दैवाने पंचाहत्तरीतील प्रजासत्ताक असं काहीसं सैरभैर झालं आहे. * मग यावर मार्ग काय? समोरचा माणूस सांगेल – हे वस्त्र वापरा, ही टूथपेस्ट वापरा, हा पदार्थ खा, अमूक शाळेत जा, तमूकला फॉलो करा; त्यामुळं तुम्हाला स्वर्गसुख लाभेल, चिरंजीव आनंद मिळेल.. सांगू दे त्याला. काहीही सांगू देत.
आपण आपला विवेक वापरावा. आपल्या कृतीमुळं निसर्गावर काही विपरीत परिणाम होत नाही ना? आपल्या वागण्यानं कोणाला त्रास होत नाही ना? आपल्यामुळं कोणाचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात नाहीय ना? असा विचार करुन नंतरच निर्णय घ्यावा. पटलं नाही तर नम्रपणे नकार द्यावा. आपले हात – पाय, डोकं वापरात राहील, एकूण शरीर आणि बुद्धी सुदृढ राहील, अशा रीतीनं आपण जगावं. हे शक्य असल्याचं गांधीजींनी दाखवून दिलं होतं. व्यापार करता येतो, कारखानदारी करता येते, पैसे कमावता येतात आणि त्याचवेळी समाज सुखी ठेवण्यासाठी संस्थाही उभारता येतात, हे टाटांनी दाखवून दिलं. गांधीजी आपल्यातलेच होते आणि टाटाही आपल्यातलेच होते. एवढं पुरेसं नाही काय? (संपर्कः damlenilkanth@gmail.com)



Source link

आदरांजली: महान समाजसाधक

0
आदरांजली:  महान समाजसाधक


प्रा. डॉ. विश्वनाथ कराड13 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या कार्याविषयी ह. भ. प. श्री. धुंडा महाराज देगलूरकर यांना माहिती देताना ह. भ. प. श्री. किसन महाराज साखरे आणि प्रस्तुत लेखाचे लेखक डॉ. वि. दा. कराड.

ह. भ. प. किसन महाराज साखरे हे एका अर्थाने ज्ञानविज्ञानस्वरूप वेदब्रह्मऋषीचे मूर्तिमंत स्वरुप होते. वारकरी संप्रदायातील योगदानाप्रमाणेच श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकासासाठी त्यांनी केलेले कार्य त्यांच्या द्रष्टेपणाची प्रचिती देणारे आहे. त्यांच्या निर्वाणामुळे, भक्तिसाधनेसोबतच सद्कार्याच्या सिद्धीची दुर्मिळ दृष्टी लाभलेल्या एका महान समाजसाधकाला आपण मुकलो आहोत.

माझे परमस्नेही श्रीकृष्ण भिडे हे आमच्या पूना इंजिनिअरिंग कॉलेजच्या वर्कशॉप विभागाचे प्रमुख असताना तिथे एकदा ह. भ. प. श्री. किसन महाराज साखरे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी योगायोगाने माझी आणि महाराजांची पहिली भेट झाली. पुढे संपर्क वाढत गेला, स्नेहबंध जुळत गेले. माझ्या पूज्य भगिनी प्रयागअक्कांची साखरे महाराजांवर खूप श्रद्धा होती. त्या अनेक वर्षापासून आळंदी-पंढरपूर या ठिकाणी त्यांची कीर्तने-प्रवचने न चुकता ऐकत. त्यामुळे साखरे घराण्याशी आमचे निकटचे संबंध प्रस्थापित झाले. याच दरम्यान, इंद्रायणीकाठचा परिसर स्वच्छ – सुंदर करण्याची आणि तिथे छोटासा का होईना, एक घाट बांधण्याची माझ्या मनातील संकल्पना साखरे महाराजांना बोलून दाखवली. त्यावर ते म्हणाले, “माझ्याही मनात अनेक वर्षापासून हा विचार घोळतो आहे. मलाही वारकरी भाविकांच्या स्नानासाठी आणि तीर्थ म्हणून स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याची तीव्र इच्छा आहे. आपण सर्वांनी मिळून काहीतरी करुया.”

पुढे २८ नोव्हेंबर १९८६ या दिवशी मला आळंदीत महापुजेला जाण्याचा योग आला. महापूजेनंतर सर्व भक्तमंडळी आणि प्रमुख वारकरी चहापानासाठी एकत्र आले. त्या दिवशी राज्याच्या सहकार खात्याचे तत्कालीन आयुक्त श्री. श्रीवास्तव, साखरे महाराज, शंकरबापू आपेगावकर, माझे बंधू तुळशीराम कराड, भगिनी पूज्य प्रयागअक्का, आळंदी संस्थानचे बाळ ज. पंडित, प्रा. नूलकर, प्रा. प्र. ल. गावडे, आळंदीचे तत्कालीन नगराध्यक्ष दत्तोबा कुऱ्हाडे आदी उपस्थित होते. श्री. श्रीवास्तव मला म्हणाले की, तुम्ही नेहमी आळंदी- देहूतील इंद्रायणीच्या परिसर विकासाची आणि घाटबांधणीची संकल्पना बोलून दाखवता. खरोखरच तुम्हाला काही कार्य उभारायचे असेल, तर आळंदी-देहू परिसर विकास कार्यासाठी एखादी समिती वा विश्वस्त मंडळ का स्थापन करीत नाही? असा एखादा ट्रस्ट वा समिती स्थापन केल्याशिवाय या प्रकारचे सामुदायिक कार्य उभे राहू शकणार नाही. आपण पुढाकार घेऊन या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी. ही सूचना ऐकताच मी म्हणालो की, या कार्यासाठी समिती स्थापण्याची संकल्पना मला मान्य आहे. मात्र, तिचे अध्यक्ष ह. भ. प. श्री. किसन महाराज साखरे असतील आणि ह. भ. प. श्री. शंकरबापू आपेगावकर हे प्रमुख विश्वस्त असतील. मी प्रमुख कार्यवाह वा कार्याध्यक्ष म्हणून काम करायला तयार आहे. या प्रस्तावाला सर्वांनी सहमती दर्शवली आणि तिथेच अनेकांनी देणगीही दिली. अवघ्या तासाभरातच सुमारे १ लाख ११ हजार रुपयांचा निधी जमा झाला.

श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती गठीत झाली आणि तिच्या कार्याला गती येऊ लागली. २ ऑक्टोबर १९८७ ला विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रत्यक्ष कामाचा प्रारंभ झाला. पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण नियंत्रण या गोष्टीचे महत्त्व लक्षात घेऊन ही पवित्र तीर्थस्थाने स्वच्छ, सुंदर, सुशोभित करण्याचे काम सुरू झाले. हे कार्य मोठे असल्याने खर्चाचेही नियोजन करावे लागणार होते. त्यासाठी लोकांकडे जाऊन वर्गणी गोळा करताना साखरे महाराज आमच्यासोबत आवर्जून यायचे. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणीही ते पहाटे चार – पाचपासून हजर असायचे. राबणाऱ्या कारागीर, मजुरांना काही अडचण येणार नाही, त्यांच्या खाण्यापिण्याची आबाळ होणार नाही, याकडे स्वत: लक्ष पुरवायचे. काम करणाऱ्यांना सतत प्रोत्साहन द्यायचे. त्यामुळे आळंदी-देहूतील विकासकामांनी गती घेतली. आळंदीतील प्रदक्षिणा मार्ग, पालखी मार्ग, दर्शनबारी मार्ग सुयोग्यपणे बांधण्यात आला. इंद्रायणीत सोडले जाणारे सांडपाणी बाहेरच अडवून शेतीकडे वळवण्यात आले. नदीच्या दोन्ही तीरांवर मजबूत आणि सुंदर घाट बांधण्यात आले. त्यामुळे भाविकांसाठी स्नानाची चांगली व्यवस्था होऊ शकली. देहू येथेही सुंदर प्रवेशद्वार आणि आखीव-रेखीव घाट उभा राहत आहे. ज्ञानविज्ञानाची सांगड घालत या कामांमध्ये मी कल्पकता आणत होतो, पण त्यामागे असलेला साखरे महाराजांचा विश्वास खूप मोलाचा होता. आज या तीर्थस्थानांचा जो चेहरामोहरा बदललेला दिसतो, त्यामागे सदैव त्यांचीच प्रेरणा होती.

साखरे महाराज हे एका अर्थाने ज्ञानविज्ञानस्वरूप वेदब्रह्मऋषीचे मूर्तिमंत स्वरुप होते. त्यांची विद्वत्ता, वेदाभ्यास पाहून वाराणशीतील विद्वतसभेनेही त्यांचा सन्मान केला होता. त्यांचे ज्ञानेश्वरीवरील प्रभुत्व, व्रतस्थ जीवन, आषाढी वारीच्या वेळी उपवास करून पायी चालण्याचा प्रघात, कुठलीही पदवी प्राप्त केलेली नसताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे पीएच. डी. चे गाइड असणं अशा अनेक गोष्टींमुळे त्यांच्याविषयी माझ्या मनात नितांत आदर होता. त्यांच्यासारख्या विभूतींना जीवनाचा खरा अर्थ कळलेला असतो. वारकरी संप्रदायातील योगदानाप्रमाणेच श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकासासाठी साखरे महाराजांनी केलेले कार्य त्यांच्या द्रष्टेपणाची प्रचिती देणारे आहे. त्यांच्या निर्वाणामुळे, भक्तिसाधनेसोबतच सद्कार्याच्या सिद्धीची दुर्मिळ दृष्टी लाभलेल्या महान समाजसाधकाला आपण मुकलो आहोत. त्यांना विनम्र आदरांजली!

(संपर्कः vdkarad@mitpune.com)



Source link

कुठे तयार केला जातो देशाचा तिरंगा? केवळ एका कंपनीकडे आहे याचे कॉन्ट्रॅक्ट

0
कुठे तयार केला जातो देशाचा तिरंगा? केवळ एका कंपनीकडे आहे याचे कॉन्ट्रॅक्ट



 देशभरात 76 व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जातो. तिरंगा मोठ्या अभिमानाने फडकवला जातो. कुठे आणि कसा तयार केला जातो तिरंगा जाणून घेऊया. 



Source link

Padma Awards List : महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट..! ३ जणांना पद्मभूषण, तर ११ जणांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान

0
Padma Awards List : महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट..! ३ जणांना पद्मभूषण, तर ११ जणांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान


Padma Awardees from Maharashtra List : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक पद्म पुरस्कार हे पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये दिले जातात. यंदासात जणांना पद्मविभूषण पुरस्कार, १९ जणांना पद्मविभूषणआणि ११३ जणांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रात देखील विविध क्षेत्रात मोठं काम करणाऱ्या १४ जणांना पद्म पुरस्कार मिळाल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ३ पद्मभूषण तर ११ जणांना पद्मश्री पुरस्कार दिला आहे.



Source link

Padma Award : महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर, अरिजीत सिंग, दिवंगत पंकज उधास यांचाही सन्मान

0
Padma Award : महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर, अरिजीत सिंग, दिवंगत पंकज उधास यांचाही सन्मान


११३ पद्मश्री पुरस्कारांपैकी अद्वैत चरण गडनायक, अच्युत रामचंद्र पालव, अशोक लक्ष्मण सराफ, अश्विनी भिडे देशपांडे, बॅरी गॉडफ्रे जॉन, गोकुळचंद्र दास, फारुख अहमद मीर, दुर्गाचरण रणबीर, भरत गुप्त, गुरुवायूर दोराई, हरचंदनसिंग भट्टी, हरजिंदर सिंग श्रीनगर वाले, हसन रघु, जसपिंदर नरुला, जयनाचरण बठारी आणि निर्मला देवी यांना सन्मानित करण्यात आले आहे.



Source link

पत्नी शेजाऱ्याच्या घरी गेल्याने संतापला दारुडा पती, फावड्याने वार करत कापला गळा

0
पत्नी शेजाऱ्याच्या घरी गेल्याने संतापला दारुडा पती, फावड्याने वार करत कापला गळा


यूपीच्या अलिगढमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अतरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पतीने पत्नीचा गळा फावड्याने कापून हत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. घटनेनंतर मारेकरी पती घटनास्थळावरून पसार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



Source link

Padma Awards : क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, तर गोलकीपर पीआर श्रीजेश याला पद्मविभूषण पुरस्कार जाहीर

0
Padma Awards : क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, तर गोलकीपर पीआर श्रीजेश याला पद्मविभूषण पुरस्कार जाहीर


भारताचा माजी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गृह मंत्रालयाने पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झालेल्या नावांची घोषणा केली आहे. अलीकडेच रविचंद्रन अश्विन याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता.



Source link

सोलापूरमध्ये जिल्हा विकास समन्वय समितीची बैठक; केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा

0
सोलापूरमध्ये जिल्हा विकास समन्वय समितीची बैठक; केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा

सोलापूर: जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक सोलापूर येथे खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सह-अध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेत प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.

बैठकीत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, राष्ट्रीय पेयजल योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री आवास योजना (मिशन), स्वच्छ भारत मिशन (शहर), जलजीवन मिशन, एकात्मिक बाल विकास योजना, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यांसारख्या महत्त्वाच्या योजनांच्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सोलापूर जिल्ह्यात या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले.

या बैठकीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून प्रभावी कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला. जिल्ह्यातील मूलभूत सुविधांच्या विकासासाठी आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी सखोल चर्चा झाली.

बैठकीस खा. ओमराजे निंबाळकर, आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, आमदार नारायण पाटील, सोलापूर जिल्हाधिकारी, सोलापूर मनपा आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.