Friday, June 26, 2026
Home Blog Page 18

फलटणमध्ये सोशल मीडिया पोस्टवरून तणाव; हिंदुत्ववादी संघटनांचा पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा

0
फलटणमध्ये सोशल मीडिया पोस्टवरून तणाव; हिंदुत्ववादी संघटनांचा पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा

फलटणमध्ये सोशल मीडिया पोस्टवरून तणाव; हिंदुत्ववादी संघटनांचा पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा

फलटणमध्ये सोशल मीडिया पोस्टवरून तणाव; हिंदुत्ववादी संघटनांचा पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा
फलटण : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याच्या कारणावरून फलटण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दत्तनगर, फलटण येथे राहणाऱ्या अनिकेत संतोष घाडगे या युवकाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत पोस्ट शेअर केल्या होत्या. या पोस्टचा राग मनात धरून अजीम हसन आतार या युवकाने अनिकेत घाडगे याला फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली तसेच पोस्ट डिलीट न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुढे संतप्त झालेल्या आरोपीने अनिकेत घाडगे यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण केली आणि पुन्हा अशा प्रकारच्या पोस्ट टाकल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे घाबरलेल्या अनिकेत घाडगे यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत आरोपी अजीम हसन आतार याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ फलटण शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटना तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढण्यात आला. आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी आंदोलकांनी केली.
फलटण हे सर्व जाती-धर्मातील नागरिकांच्या ऐक्याचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सामाजिक प्रबोधन आणि समाजामध्ये सलोखा टिकवणे आवश्यक असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

अजीम आतारवर कठोर कारवाईची मागणी; मुस्लिम समाजातर्फे जाहीर निषेध

0
अजीम आतारवर कठोर कारवाईची मागणी; मुस्लिम समाजातर्फे जाहीर निषेध

अजीम आतारवर कठोर कारवाईची मागणी; मुस्लिम समाजातर्फे जाहीर निषेध

अजीम आतारवर कठोर कारवाईची मागणी; मुस्लिम समाजातर्फे जाहीर निषेध
फलटण | प्रतिनिधी :-  छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याच्या कारणावरून युवकाला धमकी देत मारहाण केल्याची घटना फलटण शहरात घडली असून, या प्रकरणातील आरोपी अजीम हसन आतार याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध स्तरातून होत आहे. विशेष म्हणजे, या घटनेचा मुस्लिम समाजानेही जाहीर निषेध नोंदवत शहरातील शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फलटण येथील दत्तनगर परिसरात राहणारे अनिकेत संतोष घाडगे यांनी 14 मे 2026 रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही पोस्ट शेअर केल्या होत्या. या पोस्टमुळे संतप्त झालेल्या अजीम हसन आतार याने अनिकेत घाडगे यांना फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच पोस्ट डिलीट न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.
यानंतरही आरोपीने अनिकेत घाडगे यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण केली व पुन्हा अशा प्रकारच्या पोस्ट केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर घाबरलेल्या अनिकेत घाडगे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत आरोपी अजीम हसन आतार याला अटक केली आहे.
दरम्यान, फलटण शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटना तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शहरातील शांतता अबाधित राहावी आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सामाजिक प्रबोधनाची गरज असल्याचे मतही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
फलटण हे सर्व धर्मीय आणि जाती-जमातीतील नागरिकांच्या ऐक्याचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना शहराच्या सामाजिक वातावरणाला बाधा पोहोचवणाऱ्या असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराने नितीन गडकरी गौरविले

0
आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराने नितीन गडकरी गौरविले

सातारा, दि. १५ :  केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी विधान परिषद सभापती व ज्येष्ठ आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मंत्री मकरंद पाटील यांनी स्वागत व प्रस्तावना केली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हायड्रोजन इंधन हे देशाचे भविष्य असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जदाता आणि इंधनदाता बनण्याची गरज असून, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
देशात लवकरच १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने उपलब्ध होतील, त्यामुळे पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होऊन इंधन आयातीवरील खर्चात मोठी बचत होईल, असेही गडकरी यांनी सांगितले. तसेच पुणे–सातारा प्रवास अवघ्या एका तासात, तर पुणे–छत्रपती संभाजीनगर प्रवास साडेतीन तासांत पूर्ण होईल, असा दावा त्यांनी केला.
देशातील सर्व प्रमुख रस्ते प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी शेती क्षेत्रात बायो इंधनाचा वापर वाढविण्याची गरज अधोरेखित केली. पाणी संवर्धनावर भर देत “पाणी हीच खरी संपत्ती” असल्याचे सांगत जलसंधारणामुळे शेती अधिक फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बायो इंधनाचा पर्याय सर्वांनी स्वीकारावा, असे आवाहन करताना गडकरी म्हणाले की, लवकरच विमान वाहतूक क्षेत्रातही बायो इंधनाचा वापर सुरू होईल. त्यामुळे भारत इंधन आयात करणारा नव्हे, तर इंधन निर्यात करणारा देश बनेल. तसेच वेस्ट प्लास्टिकपासून रस्ते निर्मितीचा प्रकल्पही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

इंधन बचत व सार्वजनिक वाहतुकीच्या वापरासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन

0
इंधन बचत व सार्वजनिक वाहतुकीच्या वापरासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन

इंधन बचत व सार्वजनिक वाहतुकीच्या वापरासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन

इंधन बचत व सार्वजनिक वाहतुकीच्या वापरासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन
सातारा, दि. १४ : पश्चिम आशियातील वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचत, परकीय चलन संवर्धन आणि ऊर्जा कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना विविध उपाययोजना अवलंबण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा आणि महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ १५ मे २०२६ रोजी सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना घरातून काम करण्यास प्रोत्साहन देणे, अनावश्यक सोने खरेदी टाळणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविणे, खाद्य तेलाचा मर्यादित वापर, रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे, स्वदेशी उत्पादनांचा वापर वाढविणे तसेच परदेश दौरे टाळणे यांसारख्या उपाययोजनांचे आवाहन केले आहे.
या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने सर्व विभाग प्रमुखांना त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी शक्य तितक्या प्रमाणात एस.टी. बससह सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचे निर्देश द्यावेत, असे सांगण्यात आले. तसेच संयुक्त दौऱ्यांसाठी कारपूलिंगचा अवलंब करणे, अनावश्यक वाहन वापर टाळणे आणि इंधन बचतीबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
शासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करताना पालकमंत्री श्री. देसाई यांनी नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे म्हटले आहे. तसेच शासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पोलीस विभागानेही कठोरपणे पालन करावे, असे निर्देश अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी दिले.

फलटणमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पोस्टवरून वाद; धमकी व मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल

0
फलटणमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पोस्टवरून वाद; धमकी व मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल

फलटण : छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याच्या कारणावरून फलटण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अजिम हासन आतार, रा. शुक्रवार पेठ, फलटण याच्याविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात एनसीआर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १४ मे २०२६ रोजी अनिकेत संतोष घाडगे, रा. दत्तनगर, फलटण यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पोस्ट शेअर केल्या होत्या. या पोस्टवरून संतप्त झालेल्या अजिम आतार याने अनिकेत घाडगे यांना फोन करून शिवीगाळ केली तसेच संबंधित पोस्ट हटविण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या परिसरात जाऊन मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 115(2), 352, 351(2), 351(3), 351(4) आणि 131 अन्वये एनसीआर क्रमांक 0366/2026 दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर विविध हिंदुत्ववादी संघटना तसेच स्थानिक हिंदू समाजामध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीवर कठोर कारवाई करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच पोलिस प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास फलटण बंदची हाक देण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास फलटण शहर पोलीस करत आहेत.

फलटण : छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याच्या कारणावरून फलटण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अजिम हासन आतार, रा. शुक्रवार पेठ, फलटण याच्याविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात एनसीआर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १४ मे २०२६ रोजी अनिकेत संतोष घाडगे, रा. दत्तनगर, फलटण यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पोस्ट शेअर केल्या होत्या. या पोस्टवरून संतप्त झालेल्या अजिम आतार याने अनिकेत घाडगे यांना फोन करून शिवीगाळ केली तसेच संबंधित पोस्ट हटविण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या परिसरात जाऊन मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 115(2), 352, 351(2), 351(3), 351(4) आणि 131 अन्वये एनसीआर क्रमांक 0366/2026 दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर विविध हिंदुत्ववादी संघटना तसेच स्थानिक हिंदू समाजामध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीवर कठोर कारवाई करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच पोलिस प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास फलटण बंदची हाक देण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास फलटण शहर पोलीस करत आहेत.

Satara : वादळी वाऱ्यामुळं शिवसागर जलाशयात बोट पलटी, बेपत्ता बोट चालकाचा मृतदेह सापडला

0


सातारा : राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. विविध भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यामुळे सातारा जिल्ह्यातील शिवसागर जलाशयात बोट पलटी झाल्याची घटना घडली होती. या पलटी झालेल्या बोटीच्या चालकाचा मृतदेह सापडला आहे. काल संध्याकाळच्या सुमारास दोन पर्यटकांना शिवसागर जलाशयात फिरण्यासाठी घेऊन जात असताना वादळी वाऱ्यामुळे बोट पलटी झाली होती. यामधील दोन्ही पर्यटकांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले होते. 

काल संध्याकाळच्या सुमारास दोन पर्यटकांना शिवसागर जलाशयात फिरण्यासाठी घेऊन जात असताना वादळी वाऱ्यामुळे बोट पलटी झाली होती. मात्र शिवसागर बोट क्लब मधील बोटीचा चालक रुपेश तांबे बेपत्ता झाला होता. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला आहे. सावरी येथील सुरु असलेल्या नवीन पुलाच्या ठिकाणी ही घटना घडली होत. 

साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा येथे खाजगी बोट तेटली येथे कोयना जलाशयात उलटल्याची घटना घडली होती. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामध्ये बामनोली जवळच्या शिवसागर जलाशयात दोन पर्यटकांना घेऊन ही बोट निघाली होती. यावेळी बोट पलटी झाली होती. यानंतर दोन्ही पर्यटक पाण्यातून पोहून सुखरूप बाहेर निघाले होते. मात्र शिवसागर बोट क्लब मधील बोटीचा चालक बेपत्ता झाला होता.  रुपेश धोंडीबा तांबे असे बोट चालकाचे नाव होते. सावरी येथील सुरू असलेल्या नवीन पुलाच्या ठिकाणी ही घटना घडली होती.  या घटनेनंतर शिवसागर बोट क्लब च्या सभासदांकडून आज सकाळपासून शोध मोहीम सुरु करण्यात आली होती. अखेर बोट चालकाचा मृतदेह सापडला आहे.  

आणखी वाचा



Source link

फलटण मधून जाणार ‘मुंबई-बंगळुरू ग्रीन कॉरिडॉर’; पालखी मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी

0
फलटण मधून जाणार ‘मुंबई-बंगळुरू ग्रीन कॉरिडॉर’; पालखी मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी

फलटण मधून जाणार ‘मुंबई-बंगळुरू ग्रीन कॉरिडॉर’; पालखी मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी


                                                             फलटण : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग (NH-965) प्रकल्पाची पाहणी करत महत्त्वपूर्ण घोषणा केली. ‘मुंबई-बंगळुरू ग्रीन कॉरिडॉर’ हा महत्त्वाकांक्षी महामार्ग फलटणमधून जाणार असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. या प्रकल्पासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे कौतुक करत गडकरी यांनी त्यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला.
सकाळी दिवेघाट आणि जेजुरी येथील कामांची पाहणी केल्यानंतर गडकरी फलटण येथे दाखल झाले. सुरवडी (ता. फलटण) येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार परिषदेत त्यांनी पालखी महामार्गाच्या प्रगतीची माहिती दिली.
“पालखी मार्गाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. दिवे घाटातील अडचणी दूर करून तेथील रस्त्यांची रुंदी वाढवण्यात आली आहे. उर्वरित काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल,” अशी माहिती गडकरी यांनी दिली. जेजुरी बायपासला स्थानिकांचा विरोध झाल्याने त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल उभारण्याची घोषणाही त्यांनी केली. तसेच फलटण शहरातील अंतर्गत पालखी मार्गासाठी ९७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
“रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत मी अत्यंत कडक आहे. रस्ता उत्तम दर्जाचाच झाला पाहिजे, हा माझा आग्रह आहे,” असे सांगत त्यांनी कामात आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी स्थानिक आमदार आणि खासदारांनी मोठे सहकार्य केल्याचे नमूद केले.
या महामार्गावरील १३ पुलांच्या बांधकामात अत्याधुनिक ‘अल्ट्रा-हाय-परफॉर्मन्स काँक्रीट’ (UHPC) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
पर्यावरण संवर्धनावर भर देताना गडकरी म्हणाले की, “हा महामार्ग खऱ्या अर्थाने ग्रीन महामार्ग व्हावा, ही अपेक्षा आहे. वारकरी आणि प्रवाशांचे जीवन अधिक सुसह्य व्हावे यासाठी जुन्या झाडांचे संवर्धन आणि नवीन वृक्षलागवड करणे आवश्यक आहे.”
पालखी मार्गामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून रोजगारनिर्मिती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीलाही हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मार्गावर ४६ तलावांची निर्मिती करण्यात आली असून, ४० हजार नवीन झाडांची लागवड आणि ४५० झाडांचे यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार सचिन पाटील, आमदार अभिजीत पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, प्रल्हाद साळुंखे-पाटील, शिवांजली भोसले, धनंजय साळुंखे-पाटील, पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

फलटणमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची ३६९ वी जयंती उत्साहात साजरी; रुद्राभिषेकाने शिवभक्तीचा जागर

0
फलटणमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची ३६९ वी जयंती उत्साहात साजरी; रुद्राभिषेकाने शिवभक्तीचा जागर

फलटणमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची ३६९ वी जयंती उत्साहात साजरी; रुद्राभिषेकाने शिवभक्तीचा जागर

फलटण : फलटण येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते विधिवत रुद्राभिषेक पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात भक्ती आणि शिवप्रेमाचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, धर्मनिष्ठा आणि स्वराज्याप्रती असलेल्या अतुलनीय बलिदानाला अभिवादन करण्यासाठी हजारो शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. संपूर्ण परिसर ‘जय शिवराय’ आणि ‘धर्मवीर संभाजी महाराज की जय’च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.

यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, फलटण हे छत्रपती संभाजी महाराजांचे आजोळ असल्याने या शहराला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन हे राष्ट्रनिष्ठा, स्वाभिमान आणि धर्मरक्षणाचे प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच नव्या पिढीने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जाणून घेत त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमास शिवभक्त, नागरिक आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवकाळी पावसाने फलटणकरांना दिलासा ; उष्णतेपासून नागरिकांची सुटका

0
अवकाळी पावसाने फलटणकरांना दिलासा ; उष्णतेपासून नागरिकांची सुटका

अवकाळी पावसाने फलटणकरांना दिलासा ; उष्णतेपासून नागरिकांची सुटका

फलटण : गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाच्या झळांनी होरपळून निघालेल्या फलटणकरांना गुरुवारी सायंकाळी झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने मोठा दिलासा दिला. शहरासह उपनगरांमध्ये अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना असह्य उष्णतेपासून काही प्रमाणात मुक्ती मिळाली आहे.
सकाळपासूनच सूर्य आग ओकत असल्याने नागरिक हैराण झाले होते. दुपारनंतर उकाड्यात अधिक वाढ झाली होती. मात्र सायंकाळी पाचच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर सुरू असलेल्या या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले होते. रस्त्यांवरील धूळ वाहून गेल्याने वातावरण स्वच्छ व आल्हाददायक झाले.
अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. अनेकांनी दुकानांच्या आडोशाला आश्रय घेतला. मात्र उष्णतेचा तडाखा कमी झाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. शेतकरी वर्गानेही या पावसाचे स्वागत केले असून, आगामी पेरणीपूर्वी झालेला हा पाऊस लाभदायक ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दिव्यांगांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? प्रहार दिव्यांग संघटनेच्या उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली!

0
दिव्यांगांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? प्रहार दिव्यांग संघटनेच्या उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली!


फलटण : प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने फलटण तहसीलदार कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस असून, एका दिव्यांग उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्याची गंभीर घटना घडली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले असून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश जगताप यांनी आमदार सचिन पाटील यांच्यावर टीका करताना, “दिव्यांगांची मते चालतात; मात्र त्यांच्या अडीअडचणींकडे दुर्लक्ष केले जाते,” असा आरोप केला.
दरम्यान, संजय गांधी निराधार योजनेत कार्यरत असलेली महिला कर्मचारी आपल्या मूळ पदावरील कामाऐवजी तहसील कार्यालयातील गौण खनिज विभागात कार्यरत असल्याचा मुद्दाही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात तहसीलदार डॉ. अभिजित जाधव संबंधित कर्मचाऱ्याला पाठीशी घालत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका समोर आलेली नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. एका दिव्यांग कर्मचाऱ्याची प्रकृती खालावल्यानंतरही प्रशासन मौन बाळगत असल्याने संताप अधिक तीव्र झाला आहे.
“उपोषणकर्त्यांच्या जीवितास काही बरे-वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण?” असा सवाल उपस्थित करत प्रहार दिव्यांग संघटनेने प्रशासनाला तात्काळ निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.