Monday, August 17, 2026
Homeफलटणफलटणमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पोस्टवरून वाद; धमकी व मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल

फलटणमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पोस्टवरून वाद; धमकी व मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल

फलटण : छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याच्या कारणावरून फलटण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अजिम हासन आतार, रा. शुक्रवार पेठ, फलटण याच्याविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात एनसीआर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १४ मे २०२६ रोजी अनिकेत संतोष घाडगे, रा. दत्तनगर, फलटण यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पोस्ट शेअर केल्या होत्या. या पोस्टवरून संतप्त झालेल्या अजिम आतार याने अनिकेत घाडगे यांना फोन करून शिवीगाळ केली तसेच संबंधित पोस्ट हटविण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या परिसरात जाऊन मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 115(2), 352, 351(2), 351(3), 351(4) आणि 131 अन्वये एनसीआर क्रमांक 0366/2026 दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर विविध हिंदुत्ववादी संघटना तसेच स्थानिक हिंदू समाजामध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीवर कठोर कारवाई करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच पोलिस प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास फलटण बंदची हाक देण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास फलटण शहर पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments