Friday, June 26, 2026
Home Blog Page 17

श्रीराम सहकारी साखर कारखान्याची उद्या विशेष सर्वसाधारण सभा; भागीदारी करार रद्द व EOI प्रक्रियेवर महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित

0
श्रीराम सहकारी साखर कारखान्याची उद्या विशेष सर्वसाधारण सभा; भागीदारी करार रद्द व EOI प्रक्रियेवर महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित

श्रीराम सहकारी साखर कारखान्याची उद्या विशेष सर्वसाधारण सभा; भागीदारी करार रद्द व EOI प्रक्रियेवर महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित

फलटण :- श्रीराम सहकारी साखर कारखान्याची उद्या विशेष सर्वसाधारण सभा; भागीदारी करार रद्द व EOI प्रक्रियेवर महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित
श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस जाहीर करण्यात आली असून ही सभा सोमवार, दि. १८ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली आहे. कारखान्याचे चेअरमन मा. डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
सभेत हातकणंगले, जि. कोल्हापूर येथील कल्लाप्पाणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड यांच्यासोबत दि. १ मार्च २०२२ रोजी करण्यात आलेल्या भागीदारी कराराच्या रद्दबातल करण्याबाबत सविस्तर चर्चा होणार असून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या दि. ८ जानेवारी २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘Expression of Interest (EOI)’ प्रक्रियेद्वारे कारखाना, अर्कशाळा तसेच देशी-विदेशी मद्य विभाग सहकारी अथवा खासगी तत्वावर चालविण्याच्या प्रस्तावावरही सभेत निर्णय होणार असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत तळेकर यांनी सर्व सभासदांना सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सभासद असलेल्या प्रत्येक सहकारी संस्थेने आपल्या अधिकृत प्रतिनिधीचे नाव पंचकमिटीकडे लेखी स्वरूपात दि. १५ मे २०२६ पर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
दरम्यान, ही विशेष सभा केवळ सभासदांसाठी मर्यादित ठेवण्यात आली असून सभासदांव्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सभास्थळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडे बंदोबस्ताची मागणी करण्यात आली असून संबंधित पत्रही देण्यात आले आहे. विनापरवाना प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
विशेष सूचनेनुसार, गणपूर्ती अभावी सभा तहकूब झाल्यास त्याच दिवशी अर्ध्या तासाने त्याच ठिकाणी सभा पुन्हा घेण्यात येणार असून त्यावेळी गणपूर्तीची आवश्यकता राहणार नसल्याचेही नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतीय सैन्यात निवड झालेल्या युवकाला नगराध्यक्षांकडून अनोखी भेट

0
भारतीय सैन्यात निवड झालेल्या युवकाला नगराध्यक्षांकडून अनोखी भेट

समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या संवेदनशील कृतीने युवक भारावले

फलटण, दि. १७ (प्रतिनिधी) — देशसेवेचे स्वप्न पूर्ण करून भारतीय सैन्यात निवड झालेल्या युवकाचा फलटण शहरात उत्साहात सत्कार करण्यात आला. मात्र या सत्कार सोहळ्याला एक वेगळीच भावनिक उंची मिळाली ती फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दाखवलेल्या आत्मीयतेमुळे. त्यांच्या साध्या पण हृदयस्पर्शी कृतीमुळे उपस्थित युवकांसह नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण झाले असून शहरभर या प्रसंगाची चर्चा रंगू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १५ रोजी रात्री नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर हे सातारा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमास उपस्थित राहून फलटण शहरात परतले होते. शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी ते नगरसेवक संदीप चोरमले यांच्यासमवेत रात्री उशिरापर्यंत बाहेर पडले होते.
ब्राम्हण गल्ली परिसरात सुरू असलेल्या पाण्याच्या पाईपलाईनच्या कामाची पाहणी करण्यासाठी ते मारवाड पेठ मार्गे जात असताना काही युवक एका तरुणाला खांद्यावर घेऊन जल्लोष करताना त्यांना दिसले. रात्रीच्या वेळी सुरू असलेला हा आनंदोत्सव पाहून नगराध्यक्षांनी तत्काळ आपली गाडी थांबवून नेमका काय प्रकार सुरू आहे, याची विचारपूस केली.
यावेळी उपस्थित युवकांनी सांगितले की, हवालदार सुदाम भिमराव जाधव यांचे नातू तसेच सुभेदार देवदास जाधव यांचे चिरंजीव प्रणव देवदास जाधव याची भारतीय सैन्यात निवड झाली असून मित्रमंडळी त्याच्या यशाचा आनंद साजरा करत आहेत. ही माहिती समजताच नगराध्यक्षांनी प्रणव जाधव याचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे, शुभेच्छा देऊन नगराध्यक्ष पुढे निघून गेले होते. मात्र काही अंतर गेल्यानंतर त्यांच्या मनात त्या युवकाबद्दलचा सन्मान आणि आपुलकी अधिक दृढ झाली. त्यांनी पुन्हा गाडी थांबवून युवकांजवळ येत प्रणव जाधव याला जवळ बोलावले. संवादादरम्यान प्रणव हा सूरज भिसे पाटील यांच्या स्वरूपा अकॅडमीचा विद्यार्थी असल्याचे समजले.
यावेळी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या खिशातील पेन काढून प्रणवच्या शर्टच्या कॉलरला लावले आणि त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देत भावनिक शब्दांत म्हणाले, “माझ्याकडे तुला देण्यासाठी आत्ता काही नाही, पण माझ्याकडे हे पेन आहे. हेच तुला भेट म्हणून देतो. देशसेवेत मोठं नाव कमव.” असे म्हणत त्यांनी स्वतःचे पेन प्रणवला भेट दिले.
नगराध्यक्षांच्या या अनपेक्षित आणि मनाला भिडणाऱ्या कृतीमुळे उपस्थित युवक भारावून गेले. काही क्षण परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले होते. युवकांनी टाळ्यांच्या गजरात नगराध्यक्षांचे स्वागत केले. त्यानंतर सर्व युवकांनी नगराध्यक्षांसोबत छायाचित्रे काढत आनंद व्यक्त केला.
या प्रसंगानंतर फलटण शहरात नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या संवेदनशील स्वभावाची चर्चा रंगू लागली आहे. कोणताही दिखावा न करता एका सैनिक कुटुंबातील युवकाच्या यशाचा सन्मान करण्यासाठी केलेली ही साधी पण हृदयस्पर्शी कृती अनेकांच्या मनाला भावली आहे. सामाजिक माध्यमांवरही या घटनेचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून देशसेवेसाठी पुढे येणाऱ्या युवकांचा सन्मान प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
प्रणव जाधव यांच्या यशामुळे फलटण शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून युवकांमध्ये भारतीय सैन्याबद्दलचा अभिमान आणि देशसेवेची भावना पुन्हा अधोरेखित झाली आहे.

फलटणमध्ये ब्राह्मण गल्लीतील पाईपलाईन व सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात; विकासकामात अडथळे

0
फलटणमध्ये ब्राह्मण गल्लीतील पाईपलाईन व सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात; विकासकामात अडथळे

फलटणमध्ये ब्राह्मण गल्लीतील पाईपलाईन व सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात; विकासकामात अडथळे

फलटणमध्ये ब्राह्मण गल्लीतील पाईपलाईन व सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात; विकासकामात अडथळे आणणाऱ्यांना नगरसेविका सिद्धाली शहा यांचा इशारा
फलटण : फलटण शहरातील ब्राह्मण गल्ली परिसरात सार्वजनिक पाण्याची टाकी (हौद) ते एरंडे घराच्या बाजूने नवीन पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे तसेच सिमेंट काँक्रीट रस्ता करण्याचे महत्त्वपूर्ण विकासकाम नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आले असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
या भागातील नागरिकांना नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा मिळावा तसेच रस्त्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागावी, या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, नागरिकांच्या हिताचे असलेल्या या लोकोपयोगी कामात काही विघ्नसंतोषी प्रवृत्तींकडून जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात असल्याचा गंभीर आरोप नगरसेविका सिद्धाली शहा यांनी केला आहे.
या संदर्भात प्रसिद्धीपत्रकाद्वारे बोलताना माजी नगरसेवक अनुप शहा यांनी सांगितले की, काही स्वयंघोषित समाजसेवक आणि पगारदार कार्यकर्ते राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून विकासकामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. “नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सुरू असलेल्या विकासकामांत राजकारण आणणे अत्यंत दुर्दैवी आहे. जनतेच्या हिताच्या कामात अडथळे निर्माण करणाऱ्यांचा डाव कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ दिला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
तसेच, नागरिकांच्या आग्रही मागणीनुसार हे काम पूर्णत्वास नेले जाईल, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, फलटणचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच पाणीपुरवठा समितीचे सभापती राहुल निंबाळकर यांच्या सहकार्याने हे प्रलंबित काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात येईल.
शहर आणि प्रभागाच्या विकासाशी कोणतीही तडजोड केली जाणार नसून, यापुढे विकासकामात अडथळे निर्माण करणाऱ्यांना ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल, असा खणखणीत इशाराही नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा आणि माजी नगरसेवक अनुप शहा यांनी दिला आहे.
दरम्यान, या विकासकामामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक नागरिकांनी या कामाचे स्वागत केले असल्याची माहिती माजी नगरसेवक अनुप शहा यांनी दिली.

श्रीराम सहकारी साखर कारखान्याची उद्या विशेष सर्वसाधारण सभा; भागीदारी करार रद्द व EOI प्रक्रियेवर महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित

0
श्रीराम सहकारी साखर कारखान्याची उद्या विशेष सर्वसाधारण सभा; भागीदारी करार रद्द व EOI प्रक्रियेवर महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित

श्रीराम सहकारी साखर कारखान्याची उद्या विशेष सर्वसाधारण सभा; भागीदारी करार रद्द व EOI प्रक्रियेवर महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित

फलटण :- श्रीराम सहकारी साखर कारखान्याची उद्या विशेष सर्वसाधारण सभा; भागीदारी करार रद्द व EOI प्रक्रियेवर महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित
श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस जाहीर करण्यात आली असून ही सभा सोमवार, दि. १८ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली आहे. कारखान्याचे चेअरमन मा. डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
सभेत हातकणंगले, जि. कोल्हापूर येथील कल्लाप्पाणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड यांच्यासोबत दि. १ मार्च २०२२ रोजी करण्यात आलेल्या भागीदारी कराराच्या रद्दबातल करण्याबाबत सविस्तर चर्चा होणार असून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या दि. ८ जानेवारी २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘Expression of Interest (EOI)’ प्रक्रियेद्वारे कारखाना, अर्कशाळा तसेच देशी-विदेशी मद्य विभाग सहकारी अथवा खासगी तत्वावर चालविण्याच्या प्रस्तावावरही सभेत निर्णय होणार असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत तळेकर यांनी सर्व सभासदांना सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सभासद असलेल्या प्रत्येक सहकारी संस्थेने आपल्या अधिकृत प्रतिनिधीचे नाव पंचकमिटीकडे लेखी स्वरूपात दि. १५ मे २०२६ पर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
दरम्यान, ही विशेष सभा केवळ सभासदांसाठी मर्यादित ठेवण्यात आली असून सभासदांव्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सभास्थळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडे बंदोबस्ताची मागणी करण्यात आली असून संबंधित पत्रही देण्यात आले आहे. विनापरवाना प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
विशेष सूचनेनुसार, गणपूर्ती अभावी सभा तहकूब झाल्यास त्याच दिवशी अर्ध्या तासाने त्याच ठिकाणी सभा पुन्हा घेण्यात येणार असून त्यावेळी गणपूर्तीची आवश्यकता राहणार नसल्याचेही नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.

विकासकामांच्या नावाखाली नागरिकांना वेठीस; फलटण नगरपरिषदेवर संतप्त नागरिकांचा घणाघाती आरोप

0
विकासकामांच्या नावाखाली नागरिकांना वेठीस; फलटण नगरपरिषदेवर संतप्त नागरिकांचा घणाघाती आरोप

विकासकामांच्या नावाखाली नागरिकांना वेठीस; फलटण नगरपरिषदेवर संतप्त नागरिकांचा घणाघाती आरोप

फलटण प्रतिनिधी : फलटण नगरपरिषदेच्या हद्दीतील शंकर मार्केट आणि ब्राह्मण गल्ली परिसरात सुरू असलेल्या पिण्याच्या पाईपलाईन कामावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कोणतीही पूर्वसूचना, योग्य नियोजन किंवा पर्यायी व्यवस्था न करता सुरू करण्यात आलेल्या कामामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप परिसरातील रहिवाशांनी केला आहे.
नागरिकांनी सांगितले की, रस्त्याची मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आल्याने अनेक वाहनधारकांची वाहने अडकून पडली आहेत. परिसरातील वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली असून नागरिकांना दैनंदिन हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. याशिवाय वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडितामुळे महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना तीव्र उकाड्यात त्रास सहन करावा लागत आहे.
त्यातच शंकर मार्केट व ब्राह्मण गल्ली परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून “दुष्काळात तेरावा महिना” अशी अवस्था निर्माण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
प्रभाग क्रमांक ४ आणि ८ मध्ये दोन्ही बाजूंनी खड्डे खोदण्यात आल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. संबंधित लोकप्रतिनिधींनी कामाच्या ठिकाणी उशिरा भेट दिल्याचा आरोप करत, नागरिकांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात ते अपयशी ठरल्याची टीकाही करण्यात आली.
“विकासकामे करताना सर्व नागरिकांचा विचार होणे आवश्यक आहे. विकास हा राजकारणमुक्त आणि सर्वसमावेशक असावा. एक-दोन घरांच्या सोयीसाठी संपूर्ण परिसर वेठीस धरणे हा विकासाचा योग्य दृष्टिकोन असू शकत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.
ब्राह्मण गल्लीमध्ये राजकारण आणू नये, अशी मागणी करत नागरिकांनी चांगल्या कामांना विरोध नसल्याचे स्पष्ट केले. मात्र नागरिकांना त्रास देणाऱ्या कामांविरोधात कायम भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
दरम्यान, संबंधित लोकप्रतिनिधींनी एका सजग नागरिकाला “विघ्नसंतोषी” संबोधल्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे नेमके कोण आहेत, हे आता जनतेला चांगलेच समजले आहे,” असा पलटवार नागरिकांनी केला.
या प्रकरणावरून नागरिक, ठेकेदार तसेच आजी-माजी नगरसेवक यांच्यात वाद निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, तात्काळ पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अन्यथा टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी तसेच अखंडित वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

फलटणमध्ये मान्सूनपूर्व नालेसफाईला वेग; नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची भर उन्हात पाहणी

0
फलटणमध्ये मान्सूनपूर्व नालेसफाईला वेग; नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची भर उन्हात पाहणी

फलटण :- फलटणमध्ये मान्सूनपूर्व नालेसफाईला वेग; नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची भर उन्हात पाहणी
फलटण शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामांना वेग आला असून, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतः भर उन्हात विविध भागांची पाहणी करून कामांचा आढावा घेतला. शहरातील मारवाड पेठ आणि दगडी पूल परिसरात सुरू असलेल्या नाला स्वच्छता मोहिमेची त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यानंतर फलटणकर नागरिक आता मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात नाल्यांमध्ये साचलेल्या घाणीमुळे दुर्गंधी आणि सांडपाण्याच्या समस्या निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेकडून पावसाळ्यापूर्वीच नालेसफाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर हे स्वतः रस्त्यावर उतरून कामांची पाहणी करत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
यावेळी माजी नगरसेवक अनुप शहा यांनी नगराध्यक्षांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. “पूर्वीचे सत्ताधारी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत होते. मात्र विद्यमान नगराध्यक्षांना जनतेच्या अडचणींची जाणीव असून ते स्वतः उन्हाची पर्वा न करता कामांची बारकाईने पाहणी करत आहेत,” असे अनुप शहा यांनी सांगितले.
नगराध्यक्षांनी प्रभाग क्रमांक ८ आणि १२ मधील नालेसफाईच्या कामांचा आढावा घेत संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. शनिवार-रविवारची सुट्टी असतानाही त्यांनी दुपारच्या वेळेत प्रत्यक्ष भेट देत स्वच्छता मोहिमेवर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या या कार्यतत्परतेमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या पाहणी दौऱ्यावेळी नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फलटणमध्ये पाणीटंचाई तीव्र; उपाययोजना न झाल्यास उपोषणाचा इशारा

0
फलटणमध्ये पाणीटंचाई तीव्र; उपाययोजना न झाल्यास उपोषणाचा इशारा

फलटण प्रतिनिधी : शहरातील तेली गल्ली, रंगारी महादेव मंदिर परिसर, केकाड गल्ली आणि ब्राह्मण गल्ली या भागांमध्ये मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना नगरसेवक विशाल तेली यांनी फलटण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
दि. १५ मे २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात संबंधित भागांमध्ये नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित भागातील पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा, अन्यथा फलटण नगरपरिषदेसमोर उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक विशाल तेली यांनी दिला आहे.
“पाणीपुरवठा वेळेवर आणि नियमित न झाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन स्वतः जबाबदार राहील,” असा स्पष्ट उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागासमोर या समस्येचे तातडीने निराकरण करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
दरम्यान, शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या पाणी समस्येमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून प्रशासनाने त्वरित दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

फलटणमध्ये शांतता राखण्याचे आवाहन; समाजकंटकांवर कठोर कारवाईचा इशारा

0
फलटणमध्ये शांतता राखण्याचे आवाहन; समाजकंटकांवर कठोर कारवाईचा इशारा

फलटण : छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी भावना दुखावणारी ऑडिओ क्लिप आणि सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल झाल्यानंतर फलटण शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस शहरातील पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच शांतता समिती सदस्य उपस्थित होते.
डीवायएसपी विशाल खांबे यांनी सांगितले की, संबंधित ऑडिओ क्लिप आणि पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून अनेक नागरिकांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ परिस्थितीचा आढावा घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तसेच दोन समाजांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व संयम राखून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

फलटणकरांच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे !

0
फलटणकरांच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे !

फलटणकरांच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे !

फलटण : फलटण नगरपरिषदेचा पाणी पुरवठा व आरोग्य विभाग हे शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवणारे आणि शहाराचे आरोग्य अबाधित राखणारे अत्यंत महत्त्वाचे विभाग आहेत.
या दोन्ही विभागांमध्ये नागरिकांच्या हिताला चुना लावला जात आहे मनमानी पद्धतीने कारभार सुरू होवून यंत्रणा हाताबाहेर जाऊन ऐशीतैशी झाली आहे,कोण कोणाचे ऐकायच्या मानसिकतेत नाही.
न. प.चा पाणीपुरवठा विभाग म्हणजे मूलभूत जीवन आधार आहे, तसेच आरोग्य व स्वच्छता विभाग म्हणजे शहाराचे आरोग्य आहे.
फ.न .प. च्या हद्दीत पाणी पुरवठा विभागाला मरगळ आली आहे, दरमहा या विभागांवर लाखो रुपये चा खर्च केला जातो निष्कर्ष मात्र २० टक्के, ज्या भागात काम करायचे असेल तर तिथे सुरुवातीला स्थानिक नागरिकांना दिलासा म्हणून पूर्व कल्पना द्या, त्यांना पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून पहिल्यांदा घरात पाणी साठवण करण्यासाठी सूचना द्यावी वेळप्रसंगी पाणी टॅकर न सांगता वेळेत पाठवा, शहरातील उद्याच्या तीस वर्षांपुढील नियोजन करुन नविन गुणवत्ता पूर्ण पाइपलाइन टाकली जावी.
संबंधित विभागाचे सभापती , सदस्य, अधिकारी कर्मचारी वृंद यांनी सदैव संवेदनशील असले पाहिजे फोन उचलावेत ,जमत नसेल तर थोड्या वेळाने फोन करा, काही मंडळी नेत्यांनी फोन केला तर उचलला जात आहे. आत्ता इथून पुढे असला दळभद्री कारभार खपवून घेतला जाणार नाही.
आरोग्य विभागात सुध्दा असाच कारभार सुरू आहे.
या विभागात नगरपरिषदेचे अंदाजपत्रकानुसार झालेली तरतूद व उपलब्ध होणाऱ्या निधीचा वापर जनकल्याणासाठी झाला पाहिजे, कार्यकर्ते आणि ठेकेदार सांभाळण्यासाठी नकोय , स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमानुसार एकूण महसुली उत्पन्नाचा मोठा हिस्सा हा मूलभूत सोयीसुविधा वर खर्च होतो.
पाणीपुरवठा विभागाच्या वीज बिल, पाणी पट्टी वसुली, जलवाहिनी ची देखभाल , खरेदी आणि दुरुस्ती यांवर सर्वाधिक खर्च होत आहे, तो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास खर्च कमी होईल मात्र तसं होत नाही.
आरोग्य व स्वच्छता विभाग मध्ये घनकचरा व्यवस्थापन, कर्मचारी यांचे वेतन व लागणारे साहित्य उपलब्ध करून देणे.
राज्य शासनाच्या विविध योजना त्यामध्ये सुवर्ण जयंती नगरोतथान महाभियान, इतर विशेष नागरी योजना, मलनिस्सारण व पाणीपुरवठा प्रकल्प करता कोट्यवधींचा निधी मंजूर केला जातो.
केंद्र आणि राज्य वित्त आयोगाकडून पाणीपुरवठास्वच्छता विभागाकरता विशेष अनुदान दिले जाते हे कुठं किती टक्के जाते हा खूप मोठा संशोधनाचा विषय आहे.
काही वर्षांपूर्वी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या कौशल्यानेदूरदृष्टी च्या माध्यमातून चौथ्या टप्प्यातील पाणी साठवण क्षमताविविध भौतिक सुविधा उपलब्ध केल्याने आजही शहरातील पाणीपुरवठा खंडित झाला नाही , कॅनाल पाणी एक महिना नाही आलें तरी पाणी साठवण क्षमता मजबूत असल्याने नागरिकांना होणाऱ्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कोलमडली जात नाही याचं सर्व श्रेय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना जाते .
बादशाही मस्जिद समोर सदैव कचरा पडलेला असतो त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून कचरयाचा ढिग पडलेला असतो.
त्या ठिकाणी खाजगी कामगार (कंत्राटी पद्धतीने) नेमून ठेवला पाहिजे म्हणजे नागरिक, व्यापारी, भाजी विक्रेते तिथे कचरा टाकणार नाहीत.
हे त्या विभागातील अधिकारी कर्मचारी व सभापती , स्थानिक सदस्य चे काम आहे मात्र तसं होताना दिसून येत नाही.
लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनी वास्तविक पाहता दरमहा या विभागात जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित केले पाहिजे व लोकाभिमुख प्रशासन चालवावे असे एक जबाबदार नागरिक म्हणून वाटत आहे, तशा पध्दतीने काम न झाल्यास जनतेच्या जन आक्रोशाला सामोरे जावे लागेल यांची खबरदारी घ्यावी.
शहारातील विकास प्रकल्प करता कोणीही पदरमोड किंवा खिशातून* पैसे खर्च करीत नाही .
फलटण शहरातील विविध समस्या दूर करण्यासाठी पत्रकार बंधूंनी प्रभावी उपाय योजना कशा पद्धतीने होतील याकरिता एक आदर्श व जबाबदार नागरिक म्हणून सदैव संवेदनशील असतातच मात्र अजूनही स्पष्ट व रोखठोकपणे प्रसिद्ध केल्यास लवकर निदान होईल

झाडे लावा झाडे जगवा…. हरित फलटण…मी फलटण कर

१० हजारांहून अधिक गाणी लिहिणारे महाकवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी विचारांचा बुलंद आवाज

0
१० हजारांहून अधिक गाणी लिहिणारे महाकवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी विचारांचा बुलंद आवाज

फलटण : महामानव यांच्या विचारांना महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचविणारे ज्येष्ठ लोककवी, शाहिर आणि प्रबोधनकार यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२२ रोजी नाशिक जिल्ह्यातील येथे झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या वामनदादांनी आपल्या लेखणीच्या बळावर समाजप्रबोधनाचे महान कार्य उभे केले.
वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. घरची १८ एकर शेती असूनही आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. आई सईबाई मोलमजुरी करून संसार चालवत होत्या. लहानपणी वामनदादांनी गाई-म्हशी चारण्याचे काम केले. पुढे मोठ्या भावाला रेल्वेत नोकरी मिळाल्यानंतर कुटुंब मुंबईत आले. शिवडी येथील बीडीडी चाळीत राहात असताना त्यांनी बाराखडी शिकली आणि स्वतःच्या जिद्दीने वाचनातून ज्ञान मिळवले.
रेल्वे, हिंदुस्थान लिव्हर, नोट प्रेस अशा ठिकाणी नोकऱ्या केल्या; मात्र त्यात मन रमले नाही. कधी गिरणीत काम, कधी आईस्क्रीम विक्री तर कधी कोळसा विकून त्यांनी उदरनिर्वाह केला. अभिनयाची आवड असल्याने त्यांनी मिनर्व्हा, करदार आणि रणजित फिल्म स्टुडिओमध्येही काम केले. याच काळात त्यांनी प्रसिद्ध गीतकार प्रदीप यांच्या देशभक्तीपर गाण्याचे विडंबन करून आंबेडकरी चळवळीचा आवाज बुलंद केला. बीडीडी चाळीत त्यांच्या या गीताला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि इथूनच एका महान कवीचा जन्म झाला.
वामनदादांनी अनेक मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. ‘सांगते ऐका’सारख्या गाजलेल्या चित्रपटाची गाणीही त्यांनी रचली. मात्र १९४३ मध्ये नायगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण ऐकल्यानंतर त्यांच्या आयुष्याला निर्णायक वळण मिळाले. बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी चित्रपटसृष्टीकडे पाठ फिरवली आणि समाजप्रबोधनासाठी स्वतःला वाहून घेतले.
दादासाहेब गायकवाड यांच्या सहवासात आल्यावर त्यांनी गावोगावी फिरून गीतांच्या माध्यमातून आंबेडकरी विचार जनतेपर्यंत पोहोचवले. तबला, पेटी आणि सहकाऱ्यांसह ते कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रबोधनाचे कार्य करत राहिले. त्यांनी केवळ आंबेडकरीच नव्हे तर देशभक्तीपर गीतांनाही मोठे योगदान दिले. त्यांच्या ४०० देशभक्तीपर गीतांचा स्वतंत्र खंड प्रकाशित झाला आहे. मराठीसोबत हिंदी गीतलेखनातही त्यांनी ठसा उमटवला.
वामनदादांनी आयुष्यात तब्बल १० हजारांहून अधिक मराठी आणि हिंदी गीते लिहिली. प्रा. सागर जाधव यांनी त्यांच्या गीतांचे १६ खंड प्रकाशित करण्याचा संकल्प केला असून त्यापैकी अनेक खंड प्रकाशित झाले आहेत. माधवराव गायकवाड आणि सुमित्रा गायकवाड यांनी त्यांच्या सुमारे २२०० गीतांचे संकलन केले आहे.
अत्यंत मोठे साहित्यिक योगदान असूनही वामनदादांचे अखेरचे दिवस मात्र कठीण परिस्थितीत गेले. गंगाखेड येथे विलास जंगले यांच्या घरी त्यांनी आयुष्याचा शेवटचा काळ व्यतीत केला. निधनाच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी लिहिलेले गीत आजही असंख्यांच्या डोळ्यांत अश्रू आणते—
“राहील विश्व मागे, जाईल मी उद्याला
निर्वाण गौतमाचे, पाहिल मी उद्याला…”
१५ मे २००४ रोजी या महान शाहिराने अखेरचा श्वास घेतला. गंगाखेड येथे त्यांच्या समाधीस्थळी त्यांच्या अमर ओळी कोरलेल्या आहेत—
“माणसा इथे मी तुझे गीत गावे,
असे गीत गावे तुझे हित व्हावे…”
आज त्यांच्या स्मृतिदिनी महाकवी वामनदादा कर्डक यांना विनम्र अभिवादन.