Friday, June 26, 2026
Home Blog Page 16

फलटण तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढविणारे नेतृत्व; संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारीची शिवसैनिकांची मागणी

0
फलटण तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढविणारे नेतृत्व; संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारीची शिवसैनिकांची मागणी

फलटण : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्याचे काम श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अल्पावधीत प्रभावीपणे उभे केले असल्याची भावना शिवसैनिकांमधून व्यक्त होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये त्यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी आता सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांकडून होत आहे.
जिल्हा परिषद सदस्या वैशाली संदीप कांबळे यांनी सांगितले की, जिल्हा परिषद निवडणुकीत ८ पैकी ५ जागांवर शिवसेनेने विजय मिळविला, तर पंचायत समितीमध्ये १६ पैकी ८ जागा पक्षाच्या पारड्यात पडल्या. या यशामागे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे नेतृत्व, संघटनशक्ती आणि कार्यकर्त्यांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क महत्त्वाचा ठरला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुढे सांगितले की, अत्यंत कमी कालावधीत संजीवराजे यांनी पक्ष संघटनाला नवी दिशा दिली. ग्रामीण भागात युवकांना पक्षाशी जोडण्याचे काम त्यांनी प्रभावीपणे केले असून, त्यांच्या नेतृत्वामुळे शिवसेनेबद्दल युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे गेली जवळपास ३० वर्षे तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असून, निंबाळकर घराण्याचा राजकीय व सामाजिक वारसा त्यांनी समर्थपणे पुढे नेला आहे. विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी समाजकारण आणि राजकारणात उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे शिवसैनिकांचे मत आहे.
फलटण तालुक्यात शिवसेनेच्या १०० शाखा स्थापन करण्याचा संकल्प त्यांनी हाती घेतला असून, आतापर्यंत जवळपास ४० शाखांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील युवक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात शिवसेनेची ताकद अधिक वाढविण्यासाठी संजीवराजे नाईक निंबाळकर यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी द्यावी, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे.

नेपाळमध्ये भारतीय सॉफ्ट हॉकी संघाची दमदार कामगिरी; नेपाळ व भूतानचा धुव्वा

0
नेपाळमध्ये भारतीय सॉफ्ट हॉकी संघाची दमदार कामगिरी; नेपाळ व भूतानचा धुव्वा

नेपाळमध्ये भारतीय सॉफ्ट हॉकी संघाची दमदार कामगिरी; नेपाळ व भूतानचा धुव्वा

फलटण प्रतिनिधी : नेपाळ येथील काठमांडूच्या इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सॉफ्ट हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने शानदार खेळाचे प्रदर्शन करत आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे. भारतीय संघाने सलग दोन सामन्यांत दणदणीत विजय मिळवत प्रतिस्पर्धी संघांना अक्षरशः धूळ चारली.
पहिल्या सामन्यात भारताने यजमान नेपाळ संघाचा तब्बल 6-0 अशा एकतर्फी फरकाने पराभव केला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ, वेगवान पासिंग आणि उत्कृष्ट बचावफळीच्या जोरावर सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड ठेवली. भारतीय संघाच्या आक्रमणापुढे नेपाळचा बचाव पूर्णपणे निष्प्रभ ठरला.
त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने भूतान संघावरही 5-0 अशी प्रभावी मात केली. या सामन्यातही भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट समन्वय आणि शिस्तबद्ध खेळ करत प्रतिस्पर्ध्यांना एकही गोल करण्याची संधी दिली नाही.
या सलग विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला असून आता सर्वांचे लक्ष उद्या होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या अत्यंत रोमांचक सामन्याकडे लागले आहे. हा सामना उद्या सकाळी 11.00 वाजता रंगणार असून दोन्ही देशांतील क्रीडाप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
भारताचा संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून पाकिस्तानविरुद्धही दमदार कामगिरी करत विजयाची परंपरा कायम राखण्याचा निर्धार खेळाडूंनी व्यक्त केला आहे.

वृक्षारोपणातून पर्यावरणाचा संदेश देत कालकथित चंद्रकांत उर्फ सचिन भालेराव यांचा अस्थि संकलन व पुण्यानुमोदन विधी संपन्न

0
वृक्षारोपणातून पर्यावरणाचा संदेश देत कालकथित चंद्रकांत उर्फ सचिन भालेराव यांचा अस्थि संकलन व पुण्यानुमोदन विधी संपन्न

वृक्षारोपणातून पर्यावरणाचा संदेश देत कालकथित चंद्रकांत उर्फ सचिन भालेराव यांचा अस्थि संकलन व पुण्यानुमोदन विधी संपन्न

वृक्षारोपणातून पर्यावरणाचा संदेश देत कालकथित चंद्रकांत उर्फ सचिन भालेराव यांचा अस्थि संकलन व पुण्यानुमोदन विधी संपन्न

फलटण : राजाळे गावचे माजी सरपंच तथा सामाजिक, राजकीय आणि लोकहिताच्या कार्यात सदैव अग्रेसर राहिलेले कालकथित चंद्रकांत उर्फ सचिन राजाराम भालेराव यांच्या अस्थी संकलन व पुण्यानुमोदन विधीचा कार्यक्रम आज बौद्ध धम्माच्या आचार-विचार व संस्कार पद्धतीने अत्यंत श्रद्धापूर्वक संपन्न झाला.

कालकथित चंद्रकांत उर्फ सचिन भालेराव यांनी राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले होते. राजाळे गावच्या सरपंचपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणावर होता. गावातील विविध सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक संघटनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनामुळे राजाळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आज पार पडलेल्या अस्थी संकलन व पुण्यानुमोदन विधीसाठी परिसरातील नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर विधी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा बौद्धाचार्य महावीर भालेराव यांनी बौद्ध धम्माच्या परंपरेनुसार त्रिशरण पंचशील ग्रहण करून विधिवत पार पाडला. यावेळी बुद्ध वंदना, धम्मवंदना, संघवंदना तसेच पुण्यानुमोदन गाथांचे पठण करण्यात आले.

कालकथित चंद्रकांत उर्फ सचिन राजाराम भालेराव यांच्या स्मरणार्थ त्याचे जिवलग मित्र रवींद्र जयवंत भोसले आणि माजी सनदी अधिकारी विश्वास जयवंत भोसले सर या बंधूंच्या हस्ते वडाचे झाड लावण्यात आले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष व बौद्धाचार्य महावीर भालेराव यांनी मार्गदर्शन करताना प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावण्याचा संकल्प आजच्या दिनी करण्याचे आव्हान त्यांनी केले. ते म्हणाले की, ” ही पृथ्वी आपले पालन पोषण करते. पृथ्वीच्या वाढणारे तापमान हे जगासाठी एक खूप मोठी समस्या झाली आहे. वाढणारे तापमान रोखण्यासाठी आणि आपल्या उद्याच्या भविष्यासाठी धम्माच्या विचाराबरोबर पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची गरज आहे. तेव्हा आपल्या सर्व सुख दुःखाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या पूर्वजांची, कुटुंबीयांची आठवण म्हणून वृक्षारोपणाचा संकल्प आज आपण करूया. हीच कालकथित चंद्रकांत उर्फ सचिन राजाराम भालेराव यांना आदरांजली ठरेल.

कार्यक्रमात उपस्थितांनी कालकथित चंद्रकांत उर्फ सचिन भालेराव यांच्या सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

“अनित्य आहेत सर्व संस्कार” या बुद्धांच्या शिकवणीचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

कराड पाटण मार्गावर चोरट्यांचा धुमाकूळ, महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यावर मारला डल्ला

0


Satara Crime News : सातारा जिल्ह्यातील कराड पाटण मार्गावर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. साकुर्डी व बेलदरे या दोन गावांच्या हद्दीवर एकाच दिवसात चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. साकुर्डी गावच्या हद्दीत मध्यरात्री चार चाकीतील सराफ व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली होती. तर बेलदरे फाटा येथे एका व्यावसायिक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 

चोरीच्या घटनांमुळे कराड तालुक्यातील सुपने तांबवे परिसरात घबराटीचे वातावरण

साकुर्डी गावच्या हद्दीत मध्यरात्री चार चाकीतील सराफ व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली होती. कराड तालुका पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीस ताब्यात घेतले असून पोलीस हवालदार गणेश वेदपाठक तपास करत आहेत. तर बेलदरे फाटा येथे एका व्यावसायिक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने लंपास केले आहेत. सदरील चेनस्नॅचिंग करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेरा कधी झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र या घटनांमुळे कराड तालुक्यातील सुपने तांबवे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांच सत्र सुरुच, आरोपींना अटक करण्याची मागणी

 

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांच सत्र गेल्या काही दिवसात सुरू आहे. रात्री घरफोडी करुन आरोपी पसार होतात. पोलिसांना त्यांचा थांगपत्ता लागत नाही. कळंब तालुक्यातील हसेगाव, बोर्डा, मसा, आंदोरा तसेच ढोकी इथ घरफोडी झाली. यामध्ये आरोपींना अटक होत नाही. यामुळं ज्यांच्या घरी चोरी झाली ते लोक आरोपींना अटक होत नाही म्हणून अभिनंदनाचे बॅनर घेऊन गांधीगिरी करत पोलिस अधीक्षक कार्यालयात गेले. आरोपींना अटक करत मुद्देमाल ताब्यात देण्याची मागणी त्यांनी केली. 

 

 

आणखी वाचा



Source link

श्रीराम कारखान्याच्या सभेत हायव्होल्टेज ड्रामा; संजीवराजेंचा ‘रुद्र अवतार’, दत्त इंडियाचा ठराव बहुमताने मंजूर

0
श्रीराम कारखान्याच्या सभेत हायव्होल्टेज ड्रामा; संजीवराजेंचा ‘रुद्र अवतार’, दत्त इंडियाचा ठराव बहुमताने मंजूर

श्रीराम कारखान्याच्या सभेत हायव्होल्टेज ड्रामा; संजीवराजेंचा ‘रुद्र अवतार’, दत्त इंडियाचा ठराव बहुमताने मंजूर


फलटण (प्रतिनिधी): फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा रविवारी (१८ मे) कारखाना स्थळावर अत्यंत वादळी वातावरणात पार पडली. मागील भागीदार ‘जव्हार शेतकरी सहकारी साखर कारखाना’ यांनी मुदतपूर्व करार रद्द केल्यानंतर आगामी १५ वर्षांसाठी कारखाना सहयोगी तत्त्वावर चालविण्यासाठी ‘दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, साखरवाडी’ यांच्या नावाचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. मात्र या सभेत करारातील अटी, शेतकऱ्यांचे हित आणि जुन्या व्यवहारांवरील आरोप-प्रत्यारोपांमुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये अभूतपूर्व खडाजंगी पाहायला मिळाली.
सभेदरम्यान नेहमी शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून ओळख असलेले श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा आणि थेट स्टेजवरून खाली उतरून विरोधकांना दिलेले प्रत्युत्तर हे संपूर्ण सभेचे केंद्रबिंदू ठरले.
जव्हार कारखान्याने करार मोडला; ८ कोटींची भरपाई मिळणार
सभेच्या सुरुवातीला कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी पार्श्वभूमी स्पष्ट करत सांगितले की, २००६ पासून कारखाना चालवणाऱ्या जव्हार शेतकरी सहकारी साखर कारखान्याने बदलती जागतिक बाजारपेठ, साखरेचे अस्थिर दर आणि वाढत्या आर्थिक तोट्यामुळे २६ फेब्रुवारी २०२६ रोजी कारखाना पुढे चालविण्यास असमर्थता दर्शवणारे पत्र दिले होते.
यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेत सात वर्षांचा ‘लॉकिंग पिरियड’ असताना जव्हार कारखाना कराराच्या मुदतीपूर्वी कसा बाहेर पडू शकतो, असा सवाल उपस्थित केला. यास उत्तर देताना प्रशासनाने स्पष्ट केले की, करार मधेच मोडल्यामुळे जव्हार कारखान्याकडून ८ कोटी रुपयांची नुकसानभरपाई वसूल करण्यात येणार असून ती त्यांच्या देणे-घेण्यातून समायोजित केली जाईल.
कारखान्याचे नेटवर्थ उणे १६ कोटी ४४ लाख रुपये असल्याने बँकांकडून कर्ज नाकारण्यात आले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या ५ मे २०२६ च्या आदेशानुसार ही विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आल्याचेही प्रशासनाने सांगितले.
‘दत्त इंडिया’चा प्रस्ताव अधिक फायदेशीर
कारखान्याने मागवलेल्या ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’ (EOI) प्रक्रियेत दोन कंपन्यांचे प्रस्ताव आले होते.
दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड :
पहिल्या ५ वर्षांसाठी वार्षिक ५.५ कोटी रुपये भाडे
पुढील ५ वर्षांसाठी ६ कोटी रुपये
शेवटच्या ५ वर्षांसाठी ६.५ कोटी रुपये भाडे
जव्हार कारखान्याची देणी भागवण्यासाठी तातडीने ३५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची तयारी
दीड वर्षात कारखान्याची क्षमता ५ हजार मेट्रिक टनांवरून १० हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन
शरयू कार्स :
साधारण ४.५ ते ५ कोटी रुपयांच्या वार्षिक भाड्याचा प्रस्ताव
आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर प्रस्ताव असल्याने सभासदांनी बहुमताने ‘दत्त इंडिया’च्या बाजूने ठराव मंजूर केला.
सभेत हायव्होल्टेज नाट्य; संजीवराजेंचा आक्रमक अवतार चर्चेत
सभेत जुन्या करारातील अटी, नफ्याचे वाटप आणि कथित आर्थिक नुकसानीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार आक्रमक भूमिका घेतली. नगराध्यक्ष श्रीमंत समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. नरसिंह निकम यांनी व्यवस्थापनाला धारेवर धरत एकापाठोपाठ प्रश्न उपस्थित केले.
२०२२ च्या करारात मंत्री समितीच्या सूचनेनुसार जव्हार कारखान्याकडून नफ्यातील प्रति टन २०० रुपये श्रीराम कारखान्याला का मिळाले नाहीत, असा सवाल करत विरोधकांनी तब्बल ४४ कोटी रुपयांच्या नुकसानीचा आरोप केला.
याच दरम्यान वातावरण अधिक तापले आणि स्टेजवर उपस्थित असलेले श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर अचानक आक्रमक झाले. विरोधकांच्या आरोपांना थेट प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी थेट स्टेजवरून खाली उतरून विरोधी सभासदांच्या दिशेने मोर्चा वळवला. संजीवराजेंचा हा ‘रुद्र अवतार’ पाहून काही काळ सभागृहात एकच खळबळ उडाली.
“सभासदांची दिशाभूल करू नका”
माईक हातात घेत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना थेट इशारा देत म्हटले की,
“जुने करार आणि मागील प्रश्न उकरून काढून सामान्य सभासदांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. आजची सभा कारखाना पुढे कसा चालवायचा यासाठी आहे.”
यानंतर त्यांनी संयम दाखवत नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना उद्देशून सांगितले,
“तुम्ही विचारत असलेल्या प्रत्येक प्रश्नाची सविस्तर उत्तरे आमच्याकडे आहेत. आम्ही काहीही लपवत नाही. कारखाना वाचवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपण शांततेत बसून सर्व शंकांचे निरसन करूया.”
गदारोळातच ठराव मंजूर
चेअरमन आणि प्रशासनाने स्पष्ट केले की, नवीन करारामुळे श्रीराम कारखान्यावर कोणतीही अतिरिक्त कर्जाची जबाबदारी येणार नाही. शेतकऱ्यांचे ऊस बिल आणि कामगारांचे पगार वेळेत देण्यासाठी कारखाना सुरू राहणे अत्यावश्यक असल्याचे सांगत सत्ताधारी गटाने बहुमताने ‘दत्त इंडिया’चा ठराव मंजूर केला. राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली.
सभेला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, संचालक मंडळ आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

फलटणच्या ‘यशवंत को-ऑपरेटिव्ह बँके’चा परवाना रद्द; RBI ची मोठी कारवाई, ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण

0
फलटणच्या ‘यशवंत को-ऑपरेटिव्ह बँके’चा परवाना रद्द; RBI ची मोठी कारवाई, ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण

फलटणच्या ‘यशवंत को-ऑपरेटिव्ह बँके’चा परवाना रद्द; RBI ची मोठी कारवाई, ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण

फलटण :- फलटणच्या ‘यशवंत को-ऑपरेटिव्ह बँके’चा परवाना रद्द; RBI ची मोठी कारवाई, ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण
फलटण शहर व तालुक्यातील सहकार आणि बँकिंग क्षेत्राला मोठा धक्का बसला असून भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) फलटण येथील The Yashwant Co-operative Bank Ltd. या बँकेचा बँकिंग परवाना अखेर रद्द केला आहे. आरबीआयने दि. १९ मे २०२६ रोजी जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती जाहीर केली. आजच्या कामकाजाची वेळ संपल्यानंतर बँकेला कोणतेही बँकिंग व्यवहार करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर बनली होती. बँकेकडे आवश्यक तेवढे भांडवल उपलब्ध नसल्याचे तसेच भविष्यात उत्पन्न मिळण्याची कोणतीही ठोस शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, बँक आपल्या विद्यमान ठेवीदारांची रक्कम परत करण्यास सक्षम नसल्याचेही आरबीआयने नमूद केले आहे.
तसेच, बँकेने बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट १९४९ मधील विविध तरतुदींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेषतः कलम ११(१), २२(३) आणि ५६ अंतर्गत असलेल्या नियमांचे पालन करण्यात बँकेने गंभीर त्रुटी केल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. बँक पुढे सुरू राहिल्यास ठेवीदारांचे आणि सार्वजनिक हिताचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने हा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे आरबीआयने स्पष्ट केले.
परवाना रद्द झाल्यानंतर बँकेला नवीन ठेवी स्वीकारणे, विद्यमान ठेवींची परतफेड करणे किंवा इतर कोणताही बँकिंग व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, बँकेची अवसायन प्रक्रिया (Winding Up) सुरू करण्यासाठी सहकार आयुक्त व सहकारी संस्था निबंधक, महाराष्ट्र यांच्याकडे अवसायक (Liquidator) नेमण्याची विनंतीही आरबीआयकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ‘ठेवी विमा आणि पत हमी महामंडळ’ (DICGC) अंतर्गत प्रत्येक ठेवीदाराला जास्तीत जास्त ५ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. बँकेच्या आकडेवारीनुसार तब्बल ९९.०२ टक्के ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम DICGC मार्फत परत मिळण्यास पात्रता आहे.
विशेष म्हणजे, २० एप्रिल २०२६ पर्यंत DICGC कडून संबंधित ठेवीदारांना सुमारे १०६.९६ कोटी रुपयांचे वितरणही करण्यात आले असल्याची माहिती आरबीआयच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आली आहे.
या घडामोडीमुळे फलटण शहर आणि तालुक्यातील सहकार क्षेत्र, ठेवीदार, कर्जदार आणि व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली असून पुढील काळात या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विरोधकांना थेट भिडले संजीवराजे; श्रीरामच्या सभेत ‘शिवसेना स्टाईल’चा आक्रमक अवतार चर्चेत

0
विरोधकांना थेट भिडले संजीवराजे; श्रीरामच्या सभेत ‘शिवसेना स्टाईल’चा आक्रमक अवतार चर्चेत

विरोधकांना थेट भिडले संजीवराजे; श्रीरामच्या सभेत ‘शिवसेना स्टाईल’चा आक्रमक अवतार चर्चेत

फलटण : नेहमी शांत, संयमी आणि सुसंस्कृत नेतृत्वाची ओळख असलेले शिवसेना नेते तथा ‘श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे’ संचालक संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा काल फलटणकरांना एक वेगळाच आक्रमक अवतार पाहायला मिळाला. ‘श्रीराम सहकारी साखर कारखाना’ आणि जव्हार यांच्यातील भागीदारी करार संपुष्टात आल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर संजीवराजेंनी थेट आक्रमक भूमिका घेत विरोधकांना जशास तसे उत्तर दिले. त्यांच्या या ‘शिवसेना स्टाईल’ मर्दुमकीची चर्चा सध्या संपूर्ण फलटण तालुक्यात रंगली आहे.
कारखाना चालवण्यासाठी ‘श्री दत्त इंडिया साखर कारखाना, साखरवाडी’ आणि ‘शरयू साखर कारखाना, कापशी’ यांच्याकडून भागीदारीचे प्रस्ताव आले होते. यावर निर्णय घेण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. सभेत बहुसंख्य सभासदांनी ‘दत्त इंडिया साखर कारखाना’सोबत भागीदारी करण्याच्या प्रस्तावाला बहुमताने मंजुरी दिली.
मात्र, मुख्य विषयावर चर्चा पूर्ण झाल्यानंतर नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ॲड. नरसिंह निकम, शिवरूपराजे खर्डेकर, विश्वासराव भोसले आणि शेतकरी संघटनेचे धनंजय महामुलकर यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेतील जुने मुद्दे उपस्थित करत वातावरण तापवण्याचा प्रयत्न केल्याचे सभास्थळी पाहायला मिळाले.
संयम सुटला अन् संजीवराजेंनी घेतली आक्रमक भूमिका
सुरुवातीला संजीवराजे यांनी अत्यंत संयमी आणि शांत भूमिकेतून विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला सविस्तर उत्तरे दिली. मात्र, वारंवार त्याच मुद्द्यांवरून प्रश्नांचा भडिमार सुरूच राहिल्याने सभेतील वातावरण अधिकच तापले. विरोधकांचा वाढता आक्रमकपणा पाहून अखेर संजीवराजेंनीही थेट आक्रमक पवित्रा घेतला.
काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केलेल्या संजीवराजेंनी थेट व्यासपीठावरून खाली उतरून विरोधकांच्या घोळक्यात प्रवेश केला. बोलत असलेले नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या हातातील माईक घेत त्यांनी विरोधकांना कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले. त्यांच्या या रुद्रावतारामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर चर्चा शांततेत पार पडली आणि सभा सुरळीतरीत्या संपन्न झाली.
“बाळासाहेब आणि शिंदेंचा खरा शिलेदार”
संजीवराजेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खरा शिलेदार म्हणजे संजीवराजे,” अशा प्रतिक्रिया तालुक्यातील शिवसैनिकांकडून उमटत आहेत.
फलटणच्या राजकारणात नवा टप्पा?
सभेनंतर दिवसभर फलटण शहर व तालुक्यात संजीवराजेंच्या आक्रमक शैलीचीच चर्चा सुरू होती. “विरोधकांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्याची गरज होती,” अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. संजीवराजेंच्या या ‘ॲक्शन मोड’मुळे फलटणच्या राजकारणाला नवी धार मिळाल्याचे बोलले जात असून, आगामी काळात तालुक्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

फलटणचा सुपुत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचा कर्णधारपहिल्या साऊथ एशियन सॉफ्ट हॉकी चॅम्पियनशिपसाठी लखन मोरे यांची निवड

0
फलटणचा सुपुत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचा कर्णधारपहिल्या साऊथ एशियन सॉफ्ट हॉकी चॅम्पियनशिपसाठी लखन मोरे यांची निवड

फलटणचा सुपुत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचा कर्णधार
पहिल्या साऊथ एशियन सॉफ्ट हॉकी चॅम्पियनशिपसाठी लखन मोरे यांची निवड


फलटण : लखन नंदकुमार मोरे यांची Amateur Soft Hockey Federation of India आयोजित 1st South Asian Soft Hockey Championship 2026 स्पर्धेसाठी भारतीय पुरुष सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा २०, २१ व २२ मे २०२६ रोजी Kathmandu येथे पार पडणार असून भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि भूतान हे देश सहभागी होणार आहेत.

राजस्थानातील Jaipur येथे दि. १४ मे ते १८ मे दरम्यान आयोजित पाच दिवसीय राष्ट्रीय शिबिरात ऑल इंडिया सॉफ्ट हॉकी फेडरेशनचे वरिष्ठ अधिकारी, प्रशिक्षक व खेळाडू यांच्या उपस्थितीत पुरुष व महिला संघांच्या कर्णधारांची निवड करण्यात आली. त्यामध्ये फलटणच्या लखन मोरे यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचा मान मिळवला.

लखन मोरे यांचे शालेय शिक्षण यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे तर उच्च शिक्षण मुधोजी कॉलेज येथे झाले. शिक्षणासोबतच हॉकीचे धडे घेत त्यांनी मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर आज आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे.

फलटण शहर, मंगळवार पेठ, कसबा पेठ तसेच संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा आणि सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा क्षण ठरला आहे. सन २००० पासून यशवंतराव चव्हाण हायस्कूल मैदान, घडसोली मैदान आणि मुधोजी कॉलेजच्या मैदानावर घडलेला हा खेळाडू आज भारताचे प्रतिनिधित्व करत असल्याने क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लखन मोरे यांच्या या यशाबद्दल शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू, संस्थांचे पदाधिकारी तसेच फलटण तालुक्यातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. काठमांडू येथे भारतीय संघ विजयी होऊन परत यावा, अशा शुभेच्छाही व्यक्त करण्यात येत आहेत.

“चक दे इंडिया”च्या घोषणेसह फलटणकरांकडून भारतीय पुरुष व महिला सॉफ्ट हॉकी संघाला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

साक्री तालुक्यात पुन्हा दुहेरी हत्याकांड; भोंदूगिरीच्या संशयातून उलगडले थरारक प्रकरण

0
साक्री तालुक्यात पुन्हा दुहेरी हत्याकांड; भोंदूगिरीच्या संशयातून उलगडले थरारक प्रकरण


धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच आणखी एका दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. साक्री तालुक्यातील वर्धाने-उभरांडी शिवारात दोन जणांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणामागे भोंदूगिरीचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका भोंदूला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी भडगाव-वर्धाने टेंबे फाट्याजवळ एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आला. मृत महिलेच्या अंगावर एमएच १८ सीएफ ८१५१ क्रमांकाची अॅक्सेस १२५ दुचाकी टाकण्यात आली होती. महिलेच्या तोंडाला रुमाल बांधलेला असल्याने प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचा पोलिसांना संशय आला.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तात्काळ महिलेची ओळख पटवली. मृत महिलेचे नाव जयश्री रजनीकांत काकुस्ते (वय २५) असून त्या कासारे येथील रहिवासी होत्या. त्या बचत गटामार्फत बजाज फायनान्स कलेक्शनचे काम करत असल्याची माहिती समोर आली. घटनेपूर्वी रात्री त्यांचे पतीशी संभाषण झाल्याचेही समजते. या घटनेमुळे काकुस्ते कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
घटनास्थळी महिलेचा मोबाईल आणि पर्स सापडल्याने हा प्रकार लुटमारीचा नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत योगेश भैय्या बापू खैरनार (रा. जैताणे) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान संशयिताने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
संशयिताच्या म्हणण्यानुसार, एक व्यक्ती संबंधित महिलेचा खून करत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. महिलेचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात त्या व्यक्तीचा त्याच्याकडून खून झाल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत उमरांडी-जैताणे गोशाळा मठाजवळील टेकडी परिसरात शोधमोहीम राबवली.
पोलिस अधिकारी मयूर भामरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन तपास केला असता निर्जन ठिकाणी पुरलेला एका तरुणाचा मृतदेह हस्तगत करण्यात आला. मृत तरुणाची ओळख अक्षय सोनवणे (रा. भांडणे) अशी पटली.
दरम्यान, भोंदू संशयिताकडून मिळणाऱ्या उडवाउडवीच्या उत्तरांमुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. विवाहितेच्या तोंडाला बांधलेला रुमाल, घटनास्थळी सापडलेली पर्स आणि दुचाकी यामुळे तपासाला गती मिळाली.
या गंभीर प्रकरणात एसीपी अजय देवरे यांनी स्वतः लक्ष घालत तपासाची सूत्रे हातात घेतली होती. फॉरेन्सिक टीम, एलसीबी, डॉग स्कॉड आणि निजामपूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईतून हे दुहेरी हत्याकांड उघडकीस आले.

फलटण : श्रीराम कारखान्याच्या विशेष सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, ‘जवाहर’ करार रद्द करण्यावरून जोरदार खडाजंगी

0
फलटण : श्रीराम कारखान्याच्या विशेष सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, ‘जवाहर’ करार रद्द करण्यावरून जोरदार खडाजंगी

फलटण : श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या विशेष सर्वसाधारण सभेत आज सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. ‘जवाहर’ बरोबर असलेला करार रद्द करून नवीन करार ‘श्री दत्त इंडिया’ बरोबर करण्याचा ठराव सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या निर्णयावरून सभागृहात वातावरण चांगलेच तापले होते.

सभेत विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघूनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण-कोरेगाव विधानसभेचे माजी आमदार दिपक चव्हाण तसेच चेअरमन बाळासाहेब शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेदरम्यान श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर दिला असून शेतकरी समाधानी असल्याचा दावा सत्ताधारी गटाकडून करण्यात आला. “संजीवराजे यांच्या नेतृत्वावर शेतकऱ्यांचा पूर्ण विश्वास आहे,” अशी भावना अनेक सभासदांनी व्यक्त केली.
दुसरीकडे विरोधी गटाचे नेते तथा फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ऍड. नरसिंह निकम, शिवरूपराजे खर्डेकर-भोसले तसेच शेतकरी संघटनेचे धनंजय महामुलकर यांनी सत्ताधारी गटावर विविध प्रश्न उपस्थित केले. ‘जवाहर’ करार रद्द करण्यामागील कारणे, नवीन कराराच्या अटी, आर्थिक व्यवहार आणि निर्णय प्रक्रियेबाबत त्यांनी आक्षेप घेत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
काही काळ सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र अखेरीस ‘श्री दत्त इंडिया’ बरोबरच्या नवीन कराराचा ठराव मंजूर करण्यात आला. या सभेमुळे श्रीराम कारखान्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे समोर आला आहे.