वृक्षारोपणातून पर्यावरणाचा संदेश देत कालकथित चंद्रकांत उर्फ सचिन भालेराव यांचा अस्थि संकलन व पुण्यानुमोदन विधी संपन्न

0
6
वृक्षारोपणातून पर्यावरणाचा संदेश देत कालकथित चंद्रकांत उर्फ सचिन भालेराव यांचा अस्थि संकलन व पुण्यानुमोदन विधी संपन्न

वृक्षारोपणातून पर्यावरणाचा संदेश देत कालकथित चंद्रकांत उर्फ सचिन भालेराव यांचा अस्थि संकलन व पुण्यानुमोदन विधी संपन्न

वृक्षारोपणातून पर्यावरणाचा संदेश देत कालकथित चंद्रकांत उर्फ सचिन भालेराव यांचा अस्थि संकलन व पुण्यानुमोदन विधी संपन्न

फलटण : राजाळे गावचे माजी सरपंच तथा सामाजिक, राजकीय आणि लोकहिताच्या कार्यात सदैव अग्रेसर राहिलेले कालकथित चंद्रकांत उर्फ सचिन राजाराम भालेराव यांच्या अस्थी संकलन व पुण्यानुमोदन विधीचा कार्यक्रम आज बौद्ध धम्माच्या आचार-विचार व संस्कार पद्धतीने अत्यंत श्रद्धापूर्वक संपन्न झाला.

कालकथित चंद्रकांत उर्फ सचिन भालेराव यांनी राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले होते. राजाळे गावच्या सरपंचपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणावर होता. गावातील विविध सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक संघटनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनामुळे राजाळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आज पार पडलेल्या अस्थी संकलन व पुण्यानुमोदन विधीसाठी परिसरातील नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर विधी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा बौद्धाचार्य महावीर भालेराव यांनी बौद्ध धम्माच्या परंपरेनुसार त्रिशरण पंचशील ग्रहण करून विधिवत पार पाडला. यावेळी बुद्ध वंदना, धम्मवंदना, संघवंदना तसेच पुण्यानुमोदन गाथांचे पठण करण्यात आले.

कालकथित चंद्रकांत उर्फ सचिन राजाराम भालेराव यांच्या स्मरणार्थ त्याचे जिवलग मित्र रवींद्र जयवंत भोसले आणि माजी सनदी अधिकारी विश्वास जयवंत भोसले सर या बंधूंच्या हस्ते वडाचे झाड लावण्यात आले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष व बौद्धाचार्य महावीर भालेराव यांनी मार्गदर्शन करताना प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावण्याचा संकल्प आजच्या दिनी करण्याचे आव्हान त्यांनी केले. ते म्हणाले की, ” ही पृथ्वी आपले पालन पोषण करते. पृथ्वीच्या वाढणारे तापमान हे जगासाठी एक खूप मोठी समस्या झाली आहे. वाढणारे तापमान रोखण्यासाठी आणि आपल्या उद्याच्या भविष्यासाठी धम्माच्या विचाराबरोबर पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची गरज आहे. तेव्हा आपल्या सर्व सुख दुःखाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या पूर्वजांची, कुटुंबीयांची आठवण म्हणून वृक्षारोपणाचा संकल्प आज आपण करूया. हीच कालकथित चंद्रकांत उर्फ सचिन राजाराम भालेराव यांना आदरांजली ठरेल.

कार्यक्रमात उपस्थितांनी कालकथित चंद्रकांत उर्फ सचिन भालेराव यांच्या सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

“अनित्य आहेत सर्व संस्कार” या बुद्धांच्या शिकवणीचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.