Friday, June 26, 2026
Home Blog Page 15

गोकुळच्या आधुनिक कार्यपद्धतीचे श्रीमंत संजीवराजेंकडून कौतुक

0
गोकुळच्या आधुनिक कार्यपद्धतीचे श्रीमंत संजीवराजेंकडून कौतुक

गोकुळच्या आधुनिक कार्यपद्धतीचे श्रीमंत संजीवराजेंकडून कौतुक
दुग्ध व्यवसायातील अत्याधुनिक प्रकल्पांची घेतली सविस्तर माहिती
फलटण (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य ठरलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या “गोकुळ” डेअरीला गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे संस्थापक व चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सदिच्छा भेट देत संस्थेच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक केले. यावेळी त्यांनी दुग्ध व्यवसायातील आधुनिक प्रकल्प, पशुसंवर्धन योजना आणि शेतकरी हिताच्या विविध उपक्रमांची माहिती घेत समाधान व्यक्त केले.
गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी संस्थेच्या विविध प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, आधुनिक दूध प्रक्रिया तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय सेवा, चारा विकास प्रकल्प तसेच महिला सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या उपक्रमांबाबत माहिती देण्यात आली. यावेळी प्रशासक मंडळ अध्यक्ष तथा जिल्हा निबंधक संजयकुमार सुद्रिक, सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
गोकुळ डेअरीकडे सध्या दररोज १७ लाख लिटर दूध प्रक्रिया क्षमता असून उपग्रह दुग्ध प्रकल्प, शीतकरण केंद्रे, आधुनिक पॅकिंग युनिट आणि पशुखाद्य प्रकल्प कार्यरत आहेत. शेतकऱ्यांसाठी मोबाईल पशुवैद्यकीय सेवा, एआय केंद्रे, चारा बँक, बायोगॅस योजना, महिला नेतृत्व विकास कार्यक्रम आणि कार्बन क्रेडिटसारखे नाविन्यपूर्ण उपक्रमही यशस्वीपणे राबवले जात आहेत.
संस्थेला “सहकार भूषण”, राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कार, ऊर्जा बचत पुरस्कार यांसह अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले असून ISO प्रमाणपत्रांमुळे गुणवत्ता व्यवस्थापनातही गोकुळने वेगळी ओळख निर्माण केली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये संस्थेची उलाढाल तब्बल ३९६६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून ६२ कोटी लिटरहून अधिक दूध हाताळण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटणमधील गोविंद मिल्कच्या स्थापनेपासून झालेल्या प्रगतीचाही आढावा घेतला. सन १९९५-९६ मध्ये सुरू झालेल्या गोविंद मिल्कने आज सात जिल्ह्यांतील ८०० गावांमधील २५ हजारांहून अधिक दूध उत्पादकांना जोडले आहे. दररोज साडेसहा ते सात लाख लिटर दूध संकलन करणाऱ्या या संस्थेने शेतकऱ्यांच्या विश्वासावर मोठे जाळे उभे केले आहे.
गोविंद मिल्कने गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देत अँटीबायोटिक्स, केमिकल रेसिड्यू आणि अ‍ॅफलाटॉक्सिन तपासणीची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. तसेच मुक्त संचार गोठे, चारा निर्मिती केंद्र, कालवड संगोपन, बायोगॅस प्रकल्प आणि महिलांसाठी विशेष प्रशिक्षण यांसारख्या योजनांमुळे फलटण तालुक्यात दुग्ध व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय म्हणून विकसित होत असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

“शिस्त, संघटन आणि समता हीच समता सैनिकाची खरी ओळख” – दादासाहेब भोसले

0
“शिस्त, संघटन आणि समता हीच समता सैनिकाची खरी ओळख” – दादासाहेब भोसले

“शिस्त, संघटन आणि समता हीच समता सैनिकाची खरी ओळख” – दादासाहेब भोसले

पाचगणी : भारतीय बौद्ध महासभा, पाचगणी शाखा व समता सैनिक दलाच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ मे रोजी समता सैनिक दलाचे विशेष प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २१ मे १९३८ रोजी पाचगणी येथे दिलेल्या ऐतिहासिक भेटीच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराला राज्य संघटक तथा समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर, पुणे विभाग व सातारा जिल्हा प्रभारी दादासाहेब भोसले यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून सैनिकांना मार्गदर्शन केले. त्यांनी समता सैनिक दलाची कार्यपद्धती, शिस्त, संघटनात्मक बांधणी, सामाजिक जबाबदारी तसेच आंबेडकरी चळवळीतील सैनिकांची भूमिका याविषयी सखोल माहिती दिली.

तसेच सैनिक शिक्षक मेजर संपत भोसले, मेजर पी. एस. सातपुते आणि समता फोर्सच्या कंपनी कमांडर अर्चना चव्हाण मॅडम यांनी उपस्थित सैनिकांना प्रशिक्षण देत संघटन कौशल्य, सामाजिक बांधिलकी आणि शिस्तीचे महत्त्व पटवून दिले. शिबिरामध्ये सैनिकांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.

भारतीय बौद्ध महासभा पाचगणी शाखेचे अध्यक्ष अशोक कदम यांच्या नेतृत्वाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. महासचिव व समता सैनिक दलाचे कंपनी कमांडर महेंद्र सोनवणे, कोषाध्यक्ष सचिन कांबळे, संस्कार सचिव उत्तम कांबळे, सचिव खरात साहेब, छाया परिहार, आशा सोनवणे तसेच महिला व पुरुष सैनिकांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.ú

या शिबिरामुळे युवकांमध्ये समता सैनिक दलाबद्दल जागर निर्माण झाला असून उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.

पाचगणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विचार महोत्सव उत्साहात संपन्न

0
पाचगणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विचार महोत्सव उत्साहात संपन्न

पाचगणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विचार महोत्सव उत्साहात संपन्न

पाचगणी : भारतीय बौद्ध महासभा, पाचगणी शाखा व समता सैनिक दलाच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विचार महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. २१ मे १९३८ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाचगणी येथे भेट देऊन ऐतिहासिक मार्गदर्शन केले होते. त्याच पवित्र स्थळी उभारण्यात आलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी शहरातील विविध सामाजिक, राजकीय व बौद्ध संघटनांनी उत्स्फूर्त सहकार्य केले. विशेष म्हणजे पाचगणी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे हे स्वतः उपस्थित राहून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. तसेच नगरसेवक, महिला, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

कार्यक्रमात समता सैनिक दलाचे विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी असिस्टंट स्टाफ ऑफिसर व राज्य संघटक (पुणे विभाग) तसेच सातारा जिल्हा प्रभारी दादासाहेब भोसले यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.

सैनिक शिक्षक मेजर संपत भोसले, मेजर पी. एस. सातपुते तसेच समता फोर्सच्या कंपनी कमांडर अर्चना चव्हाण मॅडम यांनी समता सैनिक दलाच्या कार्यपद्धती, शिस्त, संघटन आणि सामाजिक बांधिलकी याविषयी प्रभावी मार्गदर्शन केले.

भारतीय बौद्ध महासभा पाचगणी शाखेचे अध्यक्ष अशोक कदम यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महासचिव व समता सैनिक दलाचे कंपनी कमांडर महेंद्र सोनवणे, कोषाध्यक्ष सचिन कांबळे, संस्कार सचिव उत्तम कांबळे, सचिव खरात साहेब, छाया परिहार, आशा सोनवणे तसेच अनेक महिला व पुरुष सैनिकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

दिवसभर विविध प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आले. धम्म दिप कला मंच गायन पार्टी सातारा यांनी
भीमगीते गायली, व्याख्याने आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारे उपक्रम पार पडले. उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे जतन व प्रसार करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमामुळे पाचगणी परिसरात आंबेडकरी विचारांचा जागर निर्माण झाला असून उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.

चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; पोलिसांची कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद

0


सातारा : गेल्या काही वर्षात डिजिटल अरेस्टच्या (Digital arrest) नावाखाली वयोवृद्ध, पेन्शनधारक किंवा डिजिटल ज्ञानाचा अभाव असलेल्यांची मोठी आर्थिक फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकरणे समोर आले आहेत. त्यातच, आता सातारा पोलिसांनी (Satara) मोठी कारवाई करत सायबर गुन्हेगारीतील आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. साताऱ्यातील कोरेगावमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने सायबर क्राईम रॅकेटचा पर्दाफाश करत पाच आरोपींना अटक केली आहे. अमेरिकन नागरिकांना “डिजिटल अटक” दाखवून भीती निर्माण करत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्याचा हा प्रकार असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. या प्रकरणात तब्बल 21 युवक-युवती आणि 4 महिलांचा सहभाग असल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. 

साताऱ्यात चक्क फेब्रुवारी महिन्यापासून हे बनावट कॉल सेंटर सुरू असल्याचा संशय असून, त्याची तयारी जानेवारीपासून सुरू करण्यात आली होती. सागर सूर्यवंशी हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, पोलिसांनी छापा टाकताच, पुरावे नष्ट करण्यासाठी डेटा डिलीट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामध्ये 35 लाख रुपये रोख रकमेशिवाय मोबाईल आणि लॅपटॉप देखील पोलिसांनी जप्त केले आहेत. या कॉल सेंटरमधून दर महिन्याला अंदाजे 20 लाख रुपयांची उलाढाल होत असल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांच्या तपासातून समोर आला आहे. 

विशेष म्हणजे आरोपींनी अमेरिकन नागरिकांनाही गंडा घातला असून अमेरिकन नागरिकांचे मोबाईल नंबर आरोपींकडे कसे पोहोचत होते, याचा आता सायबर पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. त्यानुसार, आत्तापर्यंत किती लोकांची फसवणूक झाली असून किती रुपयांची आर्थिक उलाढाल आणि फसवणूक झाल्याचं पोलीस तपासातून पुढे येईल, असे सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी म्हटले. 

हेही वाचा

बीडमध्ये लग्नातील धुव्वादार आतिषबाजीने जाळ अन् धुर संगटच; फोटोग्राफर गंभीर जखमी, असोसिएशनचा संताप

आणखी वाचा



Source link

कॉक्रोच जनता पार्टीने ‘क्रांती’ची मशाल पेटवली, देशभरात जोरदार हवा, साताऱ्यात युवा पँथरचं आंदोलन

0



Cockroach Janata Party: कॉक्रोच जनता पार्टीने ‘क्रांती’ची मशाल पेटवली, देशभरात जोरदार हवा, साताऱ्यात युवा पँथरचं आंदोलन



Source link

वडिलोपार्जित जमिनीवर हक्काचा दावा; न्यायालयीन लढा सुरूच राहणार – रामचंद्र मदने

0
वडिलोपार्जित जमिनीवर हक्काचा दावा; न्यायालयीन लढा सुरूच राहणार – रामचंद्र मदने


फलटण : शहरातील सर्वे नंबर ५१९ (नवीन सिटी सर्वे नंबर ६४/४६) या वादग्रस्त जमिनीप्रकरणी रामचंद्र मदने यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी संबंधित जमिनीबाबतचे सातबारा उतारे, फेरफार नोंदी, खरेदीखत तसेच इतर कागदपत्रे पत्रकारांसमोर सादर करत जमिनीवरील मालकीचा दावा पुन्हा एकदा ठामपणे मांडला.
रामचंद्र मदने यांनी सांगितले की, जुना सर्वे नंबर ५१९ व नवीन सिटी सर्वे नंबर ६४ मधील एकूण क्षेत्र २५ एकर १६ गुंठे असून, सध्याचा सिटी सर्वे नंबर ६४/४६ हा एक लाख तीन हजार ९०२ चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाचा आहे. ही जमीन सन १९५५ मध्ये शासन आदेशानुसार गणपती राहू मदने यांना वाटप करण्यात आली होती. त्यावेळी शासनाकडे १ हजार ५० रुपये जमा करण्यात आले होते आणि त्याबाबतच्या पावत्या उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला.
या जमिनीवर काही मंडळींकडून लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा दावा केला जात असल्याबाबत बोलताना, “जर संबंधितांकडे खरेदीखत, बक्षीसपत्र किंवा अन्य कायदेशीर कागदपत्रे असतील तर ती त्यांनी सादर करावीत. वैध पुरावे असल्यास आम्ही माघार घेण्यास तयार आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सन १९५५ पासून आजपर्यंत या जागेवर लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीची सातबारावर कोणतीही नोंद नसल्याचा दावा करत, २३ मार्च २०२६ रोजी झालेल्या जमिनीच्या मोजणीबाबत कोणतीही नोटीस देण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्या मोजणीविरोधात हरकती दाखल केल्या असून त्याची सुनावणी सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
फलटण-सातारा रस्त्यावरील पुलासाठी तसेच परिसरातील मुरूम काढण्यासाठी त्यांच्या आजोबांनी पाच एकर जागा दिली होती, त्याचे पुरावे देखील आमच्याकडे असल्याचा दावा मदने यांनी केला. तसेच या सर्वे नंबरमधील १६ गुंठे जागा महाविद्यालयासाठी देण्यात आली असून त्याचा फेरफार क्रमांक ८१२६ असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी तहसीलदारांवर गंभीर आरोप करत, सातबारा दुरुस्ती अर्जावर महाविद्यालय प्रशासनाने २४ जुलै २०२४ रोजी लेखी म्हणणे दिले असून महाविद्यालयाची जागा वगळता उर्वरित जमीन मदने यांच्या नावावर करण्याची भूमिका घेतल्याचा दावा केला.
तसेच फलटण तहसीलदारांनी मध्यस्थीच्या उद्देशाने घरी बोलावून चर्चेदरम्यान काही रकमेची मागणी केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. संबंधित चर्चेचे ध्वनिमुद्रण आपल्याकडे उपलब्ध असून ते न्यायालयात सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणात सीडीआर मागवण्याची मागणीही न्यायालयाकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“ही आमच्या वडिलोपार्जित जमिनीची लढाई आहे. काही राजकीय मंडळी आणि प्रशासनातील काही अधिकारी ठराविक समाजाला पुढे करून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहेत. मात्र योग्य न्याय मिळेपर्यंत आमचा कायदेशीर लढा सुरूच राहील,” अशी भूमिका रामचंद्र मदने यांनी मांडली.
या पत्रकार परिषदेला रामचंद्र मदने यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

फलटण शहर गुन्हेगारमुक्त करण्यासाठी कठोर कारवाईची मागणी; भीम आर्मीचे पोलिस प्रशासनाला निवेदन

0
फलटण शहर गुन्हेगारमुक्त करण्यासाठी कठोर कारवाईची मागणी; भीम आर्मीचे पोलिस प्रशासनाला निवेदन

फलटण शहर गुन्हेगारमुक्त करण्यासाठी कठोर कारवाईची मागणी; भीम आर्मीचे पोलिस प्रशासनाला निवेदन

फलटण शहर गुन्हेगारमुक्त करण्यासाठी कठोर कारवाईची मागणी; भीम आर्मीचे पोलिस प्रशासनाला निवेदन
फलटण : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेले शहरीकरण, वाढती लोकसंख्या आणि त्यासोबत वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त करत भीम आर्मी संघटनेने फलटण शहरात कठोर कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) तसेच एमपीडीए सारख्या प्रभावी प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने पोलिस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली. सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून त्यांना तडीपार करण्यात यावे, जेणेकरून शहरातील शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
फलटण शहर सुरक्षित करण्यासाठी शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये व गर्दीच्या ठिकाणी अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, नियमित नाकाबंदी, कोंबिंग ऑपरेशन आणि संशयितांवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे संघटनेने सांगितले. तसेच कायद्याचा धाक निर्माण होणे आवश्यक असून गुन्हेगारी, भीती आणि दहशतमुक्त फलटण निर्माण करण्यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
या मागणीमुळे आता पोलिस उपअधीक्षक (DYSP) तसेच फलटण शहर पोलिस निरीक्षक कोणती भूमिका घेणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
निवेदन देताना अजित संभाजी मोरे, सुनील पवार, तेजस भोसले, तुषार जाधव आणि सनी पवार उपस्थित होते.

खंडणीसाठी सलून चालकावर हल्ला; सराईत गुन्हेगार अभिजित जाधव जेरबंद

0
खंडणीसाठी सलून चालकावर हल्ला; सराईत गुन्हेगार अभिजित जाधव जेरबंद

खंडणीसाठी सलून चालकावर हल्ला; सराईत गुन्हेगार अभिजित जाधव जेरबंद

फलटण (प्रतिनिधी)  :लोखंडी हत्याराचा धाक दाखवत सलून व्यावसायिकाकडे दरमहा १० हजार रुपयांची खंडणी मागून मारहाण व तोडफोड करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे. अभिजित अरुण जाधव (वय २२, रा. मलटण, ता. फलटण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या साथीदाराचीही ओळख पटली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशिष अशोक गाडगे यांचे फलटण येथील जिंती नाका परिसरात ‘किंग युनिटेक्स पार्लर’ नावाचे सलून दुकान आहे. दि. १९ मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास दोन युवक मोटरसायकलवरून दुकानासमोर आले. त्यापैकी पांढरा शर्ट परिधान केलेल्या आरोपीने दुकानात प्रवेश करत शिवीगाळ सुरू केली.
यानंतर त्याने कमरेतील सुमारे दोन फूट लांबीचे धारदार लोखंडी हत्यार बाहेर काढून फिर्यादींना धमकावत, “मला अभि भाई म्हणतात… दुकान चालवायचे असेल तर दरमहा १० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल,” अशी धमकी दिली. फिर्यादींनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने दुकानातील साहित्याची तोडफोड केली.
दरम्यान, दुकानातील कामगार मोहम्मद फरमान आणि अजिम अहमद यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, दुसऱ्या आरोपीने लोखंडी कड्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. आरोपींनी दुकानाबाहेरील कारची काच फोडून परिसरात दहशत निर्माण केली आणि तेथून पसार झाले.
या घटनेप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अभिजित जाधव याला मलटण परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, अक्षय जाधव (रा. मलटण, फलटण) याच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरसायकल तसेच लोखंडी हत्यार जप्त केले आहे. आरोपी अभिजित जाधव याच्यावर यापूर्वीही घरफोडी, जबरी चोरी, मारामारी आणि महिलांविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. २३ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे करत आहेत.
ही कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक अरविंद काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील संतोष नाळे, जितेंद्र टिके, अतुल बडे आणि मुकेश घोरपडे यांनी सहभाग घेतला.

खेल का जुनून… देश का गौरव..!

0
खेल का जुनून… देश का गौरव..!

खेल का जुनून… देश का गौरव..!

साहस Times :
नेपाळची राजधानी Kathmandu येथे पार पडलेल्या पहिल्याच साऊथ एशियन सॉफ्ट हॉकी २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ११-१ अशा दणदणीत फरकाने पराभव करून अजिंक्यपद पटकावले.
भारतीय संघाचे नेतृत्व Lakhan More यांनी अत्यंत दमदार पद्धतीने केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नेपाळ, भूतान आणि पाकिस्तान या संघांवर निर्विवाद वर्चस्व गाजवत स्पर्धेत एकहाती दबदबा निर्माण केला.
या अभिमानास्पद विजयामुळे Phaltan या ऐतिहासिक नगरीचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले असून भारत, महाराष्ट्र, पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी ही अत्यंत गौरवाची बाब ठरली आहे.
स्पर्धेतील भारतीय संघाच्या शानदार कामगिरीनंतर आता पुढील महिन्यात Malaysia येथे तीन देशांदरम्यान लीग सामने खेळविण्यात येणार आहेत. तसेच २०२७ मध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या पहिल्या सॉफ्ट हॉकी वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन भारतात होणार असून जगातील १४ देशांचे संघ त्यात सहभागी होणार आहेत.
भारतीय संघाच्या या ऐतिहासिक यशामुळे देशभरातून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लिंगायत समाजाच्या दफनभूमीवरील अडथळ्याप्रकरणी कारवाईची मागणी; आंदोलनाचा इशारा

0
लिंगायत समाजाच्या दफनभूमीवरील अडथळ्याप्रकरणी कारवाईची मागणी; आंदोलनाचा इशारा

लिंगायत समाजाच्या दफनभूमीवरील अडथळ्याप्रकरणी कारवाईची मागणी; आंदोलनाचा इशारा

फलटण, प्रतिनिधी : फलटण येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीवर स्वतःचा हक्क सांगत मृतदेहाच्या दफनविधीत अडथळा आणणाऱ्या रामचंद्र उर्फ रामभाऊ बाळासाहेब मदने व त्यांच्या कुटुंबीयांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आला.
या पत्रकार परिषदेला समाजाचे प्रतिनिधी राजाराम फणसे, प्रा. सतीश जंगम, विजय गाडे, संजय खांडेकर, धन्यकुमार सतुटे, राहुल उदांडे यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.
समाजाच्या वतीने सांगण्यात आले की, मुधोजी कॉलेजसमोरील गट नंबर ६४-ब मधील जागा ही सुमारे १०० वर्षांपासून वीरशैव लिंगायत समाजाची दफनभूमी म्हणून वापरात आहे. या ठिकाणी १९२४ सालातील समाधीचा शिलालेख असून आजही साठ ते सत्तर समाध्या अस्तित्वात आहेत. न्यायालयानेही संबंधित जागेबाबत लिंगायत समाजाच्या बाजूने निकाल दिलेला असल्याचा दावा करण्यात आला.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून रामभाऊ मदने व त्यांच्या कुटुंबीयांकडून दफनविधीवेळी वारंवार अडथळे निर्माण केले जात असून समाजबांधवांना दमदाटी, शिवीगाळ व मारहाणीच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे मृतदेह चार ते पाच तास ताटकळत ठेवावे लागत असून मृतदेहाची अवहेलना होत असल्याची खंत समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
दिनांक १८ मे रोजीही अशाच प्रकारे अडथळा निर्माण झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत तणाव निर्माण झाला होता. अखेर तहसीलदार व फलटण पोलीस प्रशासनाने घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात आणत दफनविधी पार पाडण्यास मदत केली.
या प्रकरणी रामभाऊ मदने व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७२/२०२६ व १९६/२०२६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करून हा प्रकार कायमचा बंद करावा, अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी चंद्रकांत मेनकुदळे, बाळासाहेब सावंत, तानाजी करळे, विशाल बाजारे, विलास मुजुमले, संजय शिपटे, अमित निदान, धनंजय रणसिंग आदी उपस्थित होते.