Friday, June 26, 2026
Home Blog Page 14

फलटणच्या डॉ. प्रसाद जोशी यांना प्रतिष्ठेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’

0
फलटणच्या डॉ. प्रसाद जोशी यांना प्रतिष्ठेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’

फलटणच्या डॉ. प्रसाद जोशी यांना प्रतिष्ठेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’

फलटणच्या डॉ. प्रसाद जोशी यांना प्रतिष्ठेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’
फलटण : समर्पित, सहानुभूतीपूर्ण आणि आधुनिक ऑर्थोपेडिक सेवेमुळे रुग्णांचा विश्वास संपादन करणारे फलटण येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना प्रतिष्ठित ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. ग्रीन सोल्युशन्स प्रा. लि. यांच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त २३ मे २०२६ रोजी पुण्यातील बालेवाडी येथील द ऑर्किड हॉटेलमध्ये आयोजित भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा सन्मान प्रख्यात अभिनेते मकरंद अनासपुरे तसेच लोकमत पुण्याचे मुख्य संपादक संजय आवटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे फलटणमधून दिल्या जाणाऱ्या गुणवत्तापूर्ण आणि परवडणाऱ्या ऑर्थोपेडिक सेवेला राज्यस्तरावर मान्यता मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
ग्रीन सोल्युशन्स प्रा. लि. ही संस्था गेल्या १४ वर्षांपासून पर्यावरणीय परिसंस्था व्यवस्थापन क्षेत्रात विविध पथदर्शी उपक्रम राबवत आहे. संस्थेने भारताचे नॉर्वेमध्ये प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कार्य केले असून, संस्थेचे श्री. सागर अहिवळे आणि श्रीमती आरती भोसले अहिवळे यांच्या कार्याचेही यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारताना डॉ. प्रसाद जोशी यांनी ग्रीन सोल्युशन्स प्रा. लि., श्री. सागर अहिवळे तसेच श्रीमती आरती भोसले अहिवळे यांचे मनःपूर्वक आभार मानले. हा सन्मान समाजहितासाठी अधिक प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

समतानगर बुद्ध विहारात पूज्य भंते करुणानंद महाथेरो यांची प्रभावी धम्मदेशना

0
समतानगर बुद्ध विहारात पूज्य भंते करुणानंद महाथेरो यांची प्रभावी धम्मदेशना

समतानगर बुद्ध विहारात पूज्य भंते करुणानंद महाथेरो यांची प्रभावी धम्मदेशना

अनित्य, अनात्म व दुःख समजल्याशिवाय जीवन समजत नाही’ – पूज्य भंते करुणानंद महाथेरो

फलटण : पूज्य भंते करुणानंद थेरो यांच्या प्रभावी धम्मदेशनाने समता नगर विडणी परिसर भारावला
फलटण तालुक्यातील समता नगर, विडणी येथे कालकथित सुमनताई सचिन मोहिते यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजित जाहीर धम्मदेसना कार्यक्रम अत्यंत श्रद्धामय आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी पूज्य भंते करुणानंद थेरो यांनी उपस्थितांना बुद्ध धम्म, मानवी जीवन, दुःख, अनित्यता आणि बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीविषयी सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान बुद्ध, सद्‌धम्म आणि पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार वंदन करून भंतेजींनी आपल्या धम्मदेशनास सुरुवात केली. त्यांनी सांगितले की, “तथागत बुद्धांनी संपूर्ण मानवजातीला दुःखमुक्तीचा मार्ग दिला. बुद्धांचा धम्म हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी आहे.”

भंतेजींनी कालकथित सुमनताई मोहिते यांच्या धम्मविषयक विचारांचा उल्लेख करत “शारीरिक दुःख असतानाही बुद्धधम्मामुळे मानसिक आनंद मिळतो,” असे त्या नेहमी सांगत असत, असे भंतेजींनी भावनिक शब्दांत सांगितले. धम्मदेसनेमध्ये भंते करुणानंद थेरो यांनी बुद्धांच्या “अनित्य, अनात्म आणि दुःख” या त्रिसूत्री सिद्धांताचे अत्यंत सोप्या भाषेत विवेचन केले. जीवन हे क्षणभंगुर असून प्रत्येकाच्या वाट्याला दुःख येते, मात्र बुद्धांनी सांगितलेला अष्टांगिक मार्ग हा त्यावरील उपाय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी पटाचारा, किसा गौतमी, विशाखा यांसारख्या बौद्ध धम्मातील महामातांचा दाखला देत मानवी जीवनातील दुःख, मृत्यू आणि परिवर्तन शीलता यांचे वास्तव समजावून सांगितले. “जन्म झाला म्हणजे मृत्यू अटळ आहे. त्यामुळे अहंकार, लोभ आणि द्वेष बाजूला ठेवून शील, सदाचार आणि माणुसकीचा मार्ग स्वीकारणे हेच खरे जीवन आहे,” असे ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीचा उल्लेख करताना भंतेजी म्हणाले की, “बाबासाहेबांनी बुद्धधम्म स्वीकारून मानवमुक्तीचा मार्ग दिला. त्यांनी दिलेल्या विचारांचा प्रचार आणि आचरण करणे ही प्रत्येक बौद्धाची जबाबदारी आहे.” पश्चिम महाराष्ट्रात धम्मकार्य अधिक व्यापक करण्यासाठी कराड परिसरात प्रशिक्षण व साधना केंद्र उभारण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. “या भागात बुद्ध धम्माचा प्रचार-प्रसार वाढविण्यासाठी संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर, राज्य संघटक व पुणे व सातारा जिल्हा प्रभारी दादासाहेब भोसले, भारतीय बौध्द महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका अनुराधा धनसिंग सोनवणे, केंद्रीय शिक्षक तथा शाखा फलटण तालुक्याचे माजी कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, भारतीय बौध्द महासभा शाखा फलटण माजी कार्यकारणी माजी अध्यक्ष महावीर भालेराव, सरचिटणीस बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, संस्कार विभागाचे उपाध्यक्ष बजरंग गायकवाड, संघटक अमोल काकडे, आनंद जगताप व समतानगर बौद्ध उपासक उपासिका यांच्या वतीने भंते करुणानंद महाथेरो यांना भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ, चिवर व धम्मदान देण्यात आले.

बौद्ध धम्म संस्कार पद्धतीमध्ये कालकथित सुमनताई सचिन मोहिते यांच्या स्मरणार्थ लावलेल्या बोधिवृक्षाच्या पहिल्या स्मृतिदिनी विशेष श्रद्धापूर्वक भंते करुणानंद महाथेरो यांच्या हस्ते “बोधिवृक्ष पूजन व धम्मस्मरण विधी” करण्यात आला.भंते आणि नातेवाईकांनी बोधिवृक्षाच्या मुळाशी स्वच्छ पाणी अर्पण केले. उपस्थित सर्व उपासक -उपासिका यांनी शांतपणे वृक्षाभोवती भंते करुणानंद यांच्या समवेत प्रदक्षिणा घालून सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी मेत्ताभावना केली. हा विधी कृतज्ञता, स्मरण आणि धम्मनिष्ठ जीवनाचा संदेश देणारा असतो.

यावेळी भंते करुणानंद महाथेरो यांनी समतानगर येथील बुद्ध विहार भेट दिली. महामानवांना वंदन करून त्यांनी सर्व बौध्द उपासक – उपासिका यांच्या प्रती मंगल मैत्रीची भावना व्यक्त करून धम्माच्या प्रचार व प्रसार कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका माजी कार्यकारणी व समतानगर येथील बौद्ध उपासक उपासिका यांनी फुलांचा वर्षाव करत भंते करुणानंद महाथेरो यांचे उस्फूर्त स्वागत केले.

कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक, समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर, राज्य संघटक, पुणे व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भोसले, भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष नानासो मोहिते, महिला अध्यक्ष सुजाता गायकवाड, सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचीव सोमीनाथ घोरपडे, फलटण तालुका अध्यक्ष भीमराव लोंढे, सरचिटणीस केशव ठोंबरे, कोषाध्यक्ष राजकुमार रणवरे, महिला अध्यक्षा रंजना रणवरे व फलटण तालुका कार्यकारिणीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीच्या महिला विभाग प्रमुख चित्राताई गायकवाड, प्रा. एम. टी ढोले, माजी तालुका अध्यक्ष शिवाजी सावंत, केंद्रीय शिक्षक अरुण गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचे अध्यक्ष हरिष काकडे, पिंपळपान ग्रंथालयाचे आबासो यादव, शाखा पुणे जिल्हा पूर्वचे उपाध्यक्ष लक्ष्मण भोसले, सचिव शिंदे सर, बारामती शहर अध्यक्ष भारत सोनवणे, सचिव डॉ. लोंढे, प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष राजू मोरे, महिला केंद्रीय शिक्षक कदम मॅडम, समता सैनिक दलाचे सैनिक कदम, पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष दादा गायकवाड उपस्थित होते.

जिल्हा, तालुका पदाधिकारी, सचिन मोहिते यांचे सर्व कुटुंबिय, बौध्द उपासक-उपासिका आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मोहिते परिवाराच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले.तसेच सर्वांनी भोजनदान देण्यात आहे.

टेंभुर्णी MIDC मध्ये स्वतंत्र अग्निशामक केंद्राला मंजुरीआमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

0
टेंभुर्णी MIDC मध्ये स्वतंत्र अग्निशामक केंद्राला मंजुरीआमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

टेंभुर्णी : टेंभुर्णी येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत अनेक दुकाने जळून खाक झाल्यानंतर परिसरातील व्यावसायिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक व्यावसायिकांनी टेंभुर्णी MIDC परिसरात स्वतंत्र अग्निशामक केंद्र स्थापन करण्याची मागणी केली होती.

या मागणीची तात्काळ दखल घेत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन संबंधित मागणीचे पत्र सादर केले. या भेटीत टेंभुर्णी औद्योगिक परिसरातील वाढती व्यापारी व औद्योगिक वर्दळ लक्षात घेता अग्निसुरक्षेची अत्यंत आवश्यकता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तत्काळ सकारात्मक निर्णय घेत टेंभुर्णी MIDC मध्ये स्वतंत्र अग्निशामक केंद्र स्थापनेस मंजुरीचे आदेश दिले. या निर्णयामुळे व्यापारी, उद्योजक आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून भविष्यातील आपत्कालीन परिस्थितींना अधिक सक्षमपणे सामोरे जाणे शक्य होणार आहे.
स्थानिक नागरिकांनी व व्यावसायिकांनी या निर्णयाबद्दल आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.

तब्बल पावणे सतरा लाखांचा गैरव्यवहार, खेड ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे थेट निलंबन

0


Satara News : खेड ग्रामपंचायतीच्या सरपंच लता फरांदे यांच्यावर अखेर प्रशासकीय कारवाईचा मोठा बडगा उगारण्यात आला आहे. तब्बल पावणे सतरा लाखांच्या आर्थिक अनियमितता आणि गंभीर गैरव्यवहार प्रकरणी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत त्यांना सरपंच पदावरुन निलंबित करण्याचा अंतिम आदेश जारी करण्यात आला आहे. या कारवाईमुळं खेडसह संपूर्ण तालुक्यात राजकीय खळबळ उडाली आहे. 

खेड ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि अधिकारांचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी

खेड ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि अधिकारांचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी आणि विरोधकांनी प्रशासनाकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली होती. प्राथमिक तपास आणि त्यानंतर सादर करण्यात आलेल्या फेरचौकशी अहवालात सरपंचांवर ठेवण्यात आलेले काही आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याचे सिद्ध झाले असून तक्रारदारांनी 
सरपंच यांच्यावर झालेल्या या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

 

आणखी वाचा



Source link

आंबेनळी घाट चढली, पण उतरलीच नाही…; स्कॉर्पिओ दरीत कोसळली, 24 तास मृतदेह पडून, अंगावर काटा येण

0


Raigad Accident Ambenali Ghat: रायगडच्या आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ  कार 1200 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आंबेनळी घाटात (Ambenali Ghat) दाभिळ टोक याठिकाणी हा अपघात झाला. मुळात हा अपघात शनिवारी रात्री झाला होता. मात्र, रात्रीच्या अंधारात स्कॉर्पिओ गाडी दरीत (Car Accident) कोसळल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. मात्र, या तरुणांच्या कुटुंबीयांनी रविवारी सकाळपासून शोधाशोध सुरु केल्यानंतर रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ कार 1200 फूट खाली दरीत पडल्याचे निदर्शनास आले आणि अपघात झाल्याचे निष्पन्न झाले. या नव्या माहितीमुळे या संपूर्ण प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. एखादा अपघात होतो किंवा गाडी दरीत कोसळते याचा पत्ता 24 तास उलटूनही पोलीस आणि संबंधित यंत्रणांना लागत नाही, याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Raigad Accident news)

रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटात अनेकदा अपघात घडतात. या घाटात अनेक तीव्र उतार आणि वळणे आहेत. यामध्ये शनिवारी आणखी एका अपघाताची भर पडली. मुळात या अपघाताचा पत्ता आणखी काही काळ लागला नसता. मात्र, आपली मुलं घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केल्याने स्कॉर्पिओ कार दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या अपघातामध्ये मृत पावलेल्या आठ जणांपैकी पाच जण हे साताऱ्याच्या आसगाव येथील आहेत. हे सर्वजण एकाच गावात राहत असून बालपणीपासूनचे मित्र होते. सगळेजण एकमेकांच्या घरापासून काही अंतरावर राहत होते. मृतांपैकी रितेश लोखंडे याच्या वडिलांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना आपला मुलगा हर्णे येथून रविवारी नव्हे तर शनिवारी रात्री निघाल्याचे सांगितले. आम्ही अनेकदा सांगूनही रितेश त्याच्या मित्रांसोबत पिकनिकला गेला. शुक्रवारी रात्री ते साताऱ्यातून निघाले. शनिवारी पहाटे ते हर्णे येथे पोहोचले. दिवसभर त्याठिकाणी समुद्रावर खेळले, फिरले. त्यांनी मौजमजा करतानाचे स्टेटसही मोबाईल फोनवर टाकले होते. रितेशने आईला फोन करुन आम्ही मच्छी खाल्ल्याचे सांगितले. शनिवारी संध्याकाळी सात वाजता रितेशने मला फोन केला. तो मला म्हणाला की, रात्री 10 वाजता आम्ही निघणार आहोत. रात्री दहा वाजता ते जेवून साताऱ्याच्या दिशेने निघाले. रविवारी सकाळी मी कामावरुन घरी आलो. पोरगा घरी आला नाही म्हणून मला चिंता वाटायला लागली. दिवसभर माझं मन लागत नव्हतं, मी दिवसभर फोन करत होतो. मी त्याला 50 ते 60 फोन केले, फोनची रिंग वाजत होती, पण कोणी उचलत नव्हतं. नंतर मी संध्याकाळी सात वाजता माझ्या मोठ्या भावाला फोन केला, त्यांनी माझ्या भाचीला फोन करुन मुलं घरी आली नसल्याचे सांगितले. तिथून पुढे आम्ही शोध सुरु केला. मी अजिंक्यतारा रुग्णालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. तेथील डॉक्टरांनी मला मदत केली. आम्ही  पोलीस स्टेशनला फोन केले. आम्ही मुलांचे फोन ट्रॅक केले. रात्री एक-दोन वाजेपर्यंत आम्ही हे बघत होतो. तेव्हा आम्हाला कळाले की गाडी दरीत कोसळली आहे. हे कळाल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली, असे रितेश लोखंडेच्या वडिलांनी सांगितले. 

Satara news: आंबेनळी घाटातील दरीत कार कोसळल्याचे कसे समजले?

स्कॉर्पिओ कार आंबेनळी घाटातील दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाल्याचे तब्बल 24 तासांनी उघड झाले. मुलांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या रितेश लोखंडे याच्या वडिलांनी पोलीस आणि आपल्या नातेवाईकांना सांगून शोधाशोध सुरु केली. पोलिसांनी मुलांच्या मोबाईल फोनवरुन त्यांचे लोकेशन शोधून काढले. त्यांचे शेवटचे लोकेशन पोलादपूर आणि आंबेनळी घाटाच्या परिसरात आढळून आले. त्यावेळी पोलिसांना त्यांच्या कारचा अपघात होऊ गाडी दरीत कोसळल्याचा संशय आला. त्यानंतर ट्रेकर्सला पाचारण करुन अपघाताच्या परिसरात शोधाशोध सुरु झाली. त्यावेळी दरीत एक कार दिसून आली. मात्र, ही कार पूर्वीच्या अपघातामधील असल्याचे निष्पन्न झाले. दुसऱ्यांदा पुन्हा तपासणी केल्यानंतर खोल दरीत स्कॉर्पिओ कार पडल्याचे दिसून आले. रात्री कारमधून मृतदेह काढून वर आणणे शक्य नव्हते. त्यामुळे सोमवारी सकाळी ट्रेकर्सनी दोरीच्या साहाय्याने एका स्ट्रेचरला बांधून सर्व मृतदेह वर आणले. 

आणखी वाचा

Raigad Accident Ambenali Ghat: कार 800 फूट खोल दरीत, दोरीला बांधलेल्या पिवळ्या स्ट्रेचरमधून मृतदेह वर आणला, आंबेनळी घाटातील रेस्क्यू मोहीमचे PHOTOs

आणखी वाचा



Source link

आसगावच्या प्रत्येक घरात रडण्याचा आवाज, आंबेनळी घाटात एकाच गल्लीतल्या 5 तरुणांचा मृत्यू, आख्खं ग

0


Raigad Accident Ambenali Ghat: रायगडच्या आंबेनळी घाटातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन पिळवटून  टाकणारी घटना समोर आली आहे. आंबेनळी घाटात भीषण अपघात (Road Accident news) होऊन स्कॉर्पिओ तब्बल 1200 फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आणि या भीषण अपघातात सातारा (Satara news) तालुक्यातील आसगाव गावातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे पाच जण एकाच गावातील एकाच रस्त्यावर राहणारे होते. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. गावातील प्रत्येक घरात सध्या रडण्याचे आवाज ऐकू येत आहेत. महिलांचा हंबरडा, नातेवाईकांचा आक्रोश आणि सुन्न झालेली गावकऱ्यांची मनस्थिती, हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक आहे. (Satara Latest news)
 
परंतु या गावातील गावकरी आणि या कुटुंबातील सदस्यांनी या झालेल्या घटनेमध्ये शासनाला जबाबदार आहेत. रस्त्याला संरक्षण कठडे नसल्यामुळे ही दुर्दैवी घटना झाल्याचे भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच पद्धतीने मृत्यू झालेल्या युवकांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार शासनाने द्यावा, अशी अपेक्षा देखील यावेळी बोलत असताना व्यक्त केली आहे. या दुर्घटनेत आठ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त युवकांमध्ये पाचजण युवक हे आसगाव, ता. सातारा, जि. सातारा येथील रहिवासी असून 2 युवक मर्ढे या गावातील असून 1 व्यक्ती हा पण खटाव येथील आहे.

मृतांमध्ये महेश अनिल पवार (वय 25), आदित्य अशोक साळुंखे (वय 21), रितेश राजेंद्र लोखंडे (वय 25), सुहास जितेंद्र लोखंडे (वय 20), अंश समीर चव्हाण (वय 18), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय 21), प्रवीण अभिमन्यू शिंगटे (वय 25) आणि संदीप काटकर (वय 35) यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

आंबेनळी घाटात नेमकं काय घडलं? (Ambenali Ghat Scorpio Accident)

स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात काल (24 मे) रात्री घडला. सातारा जिल्ह्यातील आसगाव येथील तरुण या स्कॉर्पिओ जीपने प्रवास करत होते. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार आंबेनळी घाटात थेट 1200 फूट खोल दरीत जाऊन कोसळली. यामध्ये गाडीतील आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी रात्री दोन वाजता दरीतून मृतदेह वर काढण्याचे काम सुरु झाले. मात्र, रात्रीच्या अंधारात बऱ्याच अडचणी येत होत्या. अखेर, सोमवारी सकाळी ट्रेकर्स आणि बचाव पथकांनी हे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यास सुरुवात केली. दोरीला स्ट्रेचर बांधून दरीतून एक-एक मृतदेह वर आणण्यात आला. हे सर्व मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत.

आणखी वाचा

Raigad Accident Ambenali Ghat: कार 800 फूट खोल दरीत, दोरीला बांधलेल्या पिवळ्या स्ट्रेचरमधून मृतदेह वर आणला, आंबेनळी घाटातील रेस्क्यू मोहीमचे PHOTOs

आंबेनळी घाटातील जीवघेणा वळसा, ‘याच’ टर्नवरुन स्कॉर्पिओ हजार फूट दरीत कोसळली, अपघाताची थरारक कारणे

आणखी वाचा



Source link

प्रबोधन, शिक्षण आणि धम्म चळवळीतील कार्यकर्ते सोमीनाथ घोरपडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

0
प्रबोधन, शिक्षण आणि धम्म चळवळीतील कार्यकर्ते सोमीनाथ घोरपडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

प्रबोधन, शिक्षण आणि धम्म चळवळीतील कार्यकर्ते सोमीनाथ घोरपडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

प्रबोधन, शिक्षण आणि धम्म चळवळीतील कार्यकर्ते सोमीनाथ घोरपडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
सातारा : भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव तथा कमला विद्या भवन शाळेचे विद्यार्थीप्रिय शिक्षक सोमीनाथ घोरपडे सर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत असून विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि धम्म चळवळीतील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा विशेष गौरव केला जात आहे.
फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा वारसा जपत समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने करणारे सोमीनाथ घोरपडे हे विद्यार्थ्यांमध्ये आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जातात. शिक्षण क्षेत्रात प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे.
धम्म चळवळ, सामाजिक जनजागृती आणि संघटनात्मक कार्यामध्ये स्वतःला झोकून देत त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. कामगार, विद्यार्थी आणि समाजातील वंचित घटकांसाठी सातत्याने कार्यरत राहून त्यांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या साध्या, मनमिळावू आणि कार्यतत्पर स्वभावामुळे समाजातील विविध स्तरांतील व्यक्तींशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत. त्यांच्या कार्याचा आदर्श अनेक युवक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त साहस Times तर्फे सोमीनाथ घोरपडे सर यांना निरोगी, आनंदी आणि यशस्वी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

वाईत वनविभागाची धडक कारवाई : घोरपड व वन्यजीव अवयव तस्करीप्रकरणी दोघांना अटक

0
वाईत वनविभागाची धडक कारवाई : घोरपड व वन्यजीव अवयव तस्करीप्रकरणी दोघांना अटक

वाईत वनविभागाची धडक कारवाई : घोरपड व वन्यजीव अवयव तस्करीप्रकरणी दोघांना अटक

वाईत वनविभागाची धडक कारवाई : घोरपड व वन्यजीव अवयव तस्करीप्रकरणी दोघांना अटक
वाई : वाई तालुक्यात वनविभागाने राबविलेल्या विशेष कारवाईत घोरपड व अन्य वन्यजीवांच्या अवयवांची अवैध तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची वनकोठडी सुनावली असून या कारवाईमुळे वन्यजीव अवयवांच्या बेकायदेशीर व्यापाराचे मोठे जाळे उघडकीस आले आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन), सातारा यांना २३ मे रोजी घोरपडीच्या अवयवांच्या विक्रीबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार वाई वनपरिक्षेत्रातील कर्मचारी तसेच सातारा फिरते पथक यांच्या संयुक्त पथकाने कोचळेवाडी हद्दीत वाई-तेमढे मार्गावरील एका हॉटेल परिसरात सापळा रचला.
संध्याकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या सुमारास संशयित मारुती सुझुकी वॅगनआर (एमएच १४ एचडब्ल्यू ०५०६) वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनातून घोरपडीच्या मानेपासून तोंडापर्यंतचा अवयव, नर घोरपडीचे चार जननेंद्रिय अवयव (हत्ताजोडी), वाघ अथवा बिबट्यासदृश प्राण्याचे नख तसेच समुद्री वन्यजीवांशी संबंधित ‘इंद्रजाल’ असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी महेश सूर्यकांत व्होनफडे (वय २६, रा. तांबवे, ता. माळशिरस) आणि रोहन गजानन कदम (वय २३, रा. तांबवे-भवानीनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या दोघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून रोख १५ हजार रुपये, दोन मोबाईल फोन तसेच तस्करीसाठी वापरण्यात आलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे.
दोघांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना वाई येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची वनकोठडी सुनावली असून पुढील तपास वाई वनपरिक्षेत्र अधिकारी करीत आहेत.
उपवनसंरक्षक अमोल सातपुते, विभागीय वनाधिकारी (दक्षता) संजय वाघमोडे आणि सहायक वनसंरक्षक प्रदीप रोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. वनपाल संग्राम मोरे, धोंडीबा बोडके तसेच वाई वनपरिक्षेत्र व फिरते पथकातील अधिकारी-कर्मचारी यांनी कारवाईत सक्रिय सहभाग घेतला. मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनीही महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

चेंदामेंदा झालेली स्कॉर्पिओ, पाच फूट अंतरावर मृतदेहांची रास, 1000 फूट खाली आंबेनळी घाटातील भयान

0


Ambenali Ghat Scorpio Accident: साताऱ्यातील आसगाव येथील तरूणांच्या स्कॉर्पिओ गाडीचा पोलादपुर आणि महाबळेश्वर दरम्यान असलेल्या आंबेनळी घाटात भीषण अपघात (Ambenali Ghat Scorpio Accident) झाला. या अपघातामध्ये एकूण 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. सदर स्कॉर्पिओ जीप सुमारे 1000  फुट खोल दरीत कोसळली. आसगावमधील हे तरूण कोकणात दापोली, हर्णे येथे फिरायला गेले होते. परतीच्या प्रवासात आज पहाटे हा अपघात झाला.

स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात काल (24 मे) रात्री घडला. सातारा जिल्ह्यातील आसगाव येथील तरुण या स्कॉर्पिओ जिपने प्रवास करत होते. आंबेनळी घाटातील एका तीव्र आणि धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दरीत कोसळली. घाटातील अंधार आणि दरीची खोली जास्त असल्याने अपघाताची भीषणता प्रचंड होती. याचदरम्यान, अपघात झालेल्या स्कॉर्पिओ गाडीचा पहिला फोटोही समोर आला आहे. पूर्णपणे स्कॉर्पिओचा चक्काचूर झाल्याचं दिसून येत आहे. तसेच स्कॉर्पिओच्या 5 फुटांच्या अंतरावर 4 मृतदेह पडले होते. आज सकाळी 10 वाजेपर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. (Ambenali Ghat Scorpio Accident)

अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू, सगळ्यांची नावं आली समोर- (Ambenali Ghat Scorpio Accident)

  1. महेश अनिल पवार (वय 25)
  2. आदित्य अशोक साळुंखे (वय 21)
  3. रितेश राजेंद्र लोखंडे (वय 25)
  4. सुहास जितेंद्र लोखंडे (वय 20)
  5. अंश समीर चव्हाण (वय 18) 
  6. उत्कर्ष आनंद शिंगटे (वय 21)
  7. अनिल अभिमन्यू शिंगटे (वय 25) 
  8. नितीन किसन नायकोंडे (वय 35) 

स्कॉर्पिओ 1000 फुट दरीत कोसळली- (Ambenali Ghat Scorpio Accident)

स्कॉर्पिओ गाडी खोल 1000 फुट दरीत कोसळल्यामुळे मृत प्रवाशांचे मृतदेह वर आणण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागत आहेत. पोलादपुर तहसिलदार घोरपडे, पोलीस निरिक्षक आनंद रेवडे, महाबळेश्वर ट्रेकर्स, सिस्केप रेस्क्यु टिम, कोलाड रेस्क्यु टिम, सह्याद्री ॲडव्हेंचर, आपदा मित्र आदी रेस्क्यु टीम घटना स्थळी दाखल झाल्या असून मध्यरात्री 3 वाजल्यापासून मदत कार्य सुरु केलं होतं.

आंबेनळी घाटात सातत्याने अपघात- (Ambenali Ghat Scorpio Accident)

सर्व तरुण फिरण्यासाठी 22,23 ,24 अशा दिवशी दापोली तालुक्यातील हर्णे परिसरात गेले होते. मात्र रात्री परतीच्या दिशेने निघत असताना सातारा आणि रायगड जिल्ह्याना जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दाभिल गावाजवळ एका मुख्य वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि स्कॉर्पिओ जीप 1000 फूट खोल दरीत कोसळली. आतापर्यंत 2 जणांचा मृतदेह हाती लागला असून उर्वरित मृतदेह शोधण्याचे काम बचाव यंत्रणेकडून सुरू आहे. रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर पोलिस ठाणे हद्दीत असणारा हा परिसर असून 28 जुलै 2018 रोजी याच परिसरात दापोली कृषिविद्यापीठमधील शिक्षकांच्या बसचा अपघात होऊन एकूण 33 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. अरुंद रस्ते, रखडलेले कामे, तुटलेले बरीगेट्स आणि अपुरी व्यवस्था यामुळे सातत्याने या घाटात अपघात होत आहेत. त्यामुळे प्रवासी आणि स्थानिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

आणखी वाचा



Source link

कामगार कल्याणासाठी झटणारे नेतृत्व : श्री संदीप कांबळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

0
कामगार कल्याणासाठी झटणारे नेतृत्व : श्री संदीप कांबळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

कामगार कल्याणासाठी झटणारे नेतृत्व : श्री संदीप कांबळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

फलटण : महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे केंद्रप्रमुख श्री संदीप कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्यरत राहून सामाजिक बांधिलकी जपणारे अधिकारी म्हणून श्री कांबळे यांची ओळख निर्माण झाली आहे.
कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात श्री कांबळे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामगार कुटुंबांना आधार देण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे विभागातील कर्मचारी, कामगार तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदर व्यक्त केला जातो.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, सहकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. आगामी काळातही त्यांच्या हातून समाजोपयोगी व लोकहिताची कार्ये घडत राहोत, उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.                                                      साहस Times तर्फे श्री संदीप कांबळे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!