Friday, June 26, 2026
Home Blog Page 13

भीम-फुले गीतकाव्य वाचन महोत्सवात आयु. भीमराव लोंढे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक

0
भीम-फुले गीतकाव्य वाचन महोत्सवात आयु. भीमराव लोंढे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक

भीम-फुले गीतकाव्य वाचन महोत्सवात आयु. भीमराव लोंढे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक

फलटण/पुणे प्रतिनिधी :  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘भीम-फुले गीतकाव्य आणि कविता वाचन महोत्सव’ स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत फलटण येथील भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु. भीमराव हरिबा लोंढे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहे.
महामानव महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी तसेच अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने विद्यापीठाच्या महाकवी वामनदादा कर्डक अध्यासनाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेतील प्रवेशिकांचे परीक्षण प्रा. डॉ. आनंद रत्नाकर आहिरे आणि श्रीमती सुजाता चंद्रकांत गायकवाड यांनी केले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.

आयु. भीमराव हरिबा लोंढे यांच्या या यशाबद्दल त्यांचे भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका, सातारा जिल्हा पूर्व, विविध सामाजिक, शैक्षणिक व बौद्ध धम्म क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

राजमाता अहिल्यादेवी होळकर : धार्मिकतेपलीकडील पराक्रमी नेतृत्व

0
राजमाता अहिल्यादेवी होळकर : धार्मिकतेपलीकडील पराक्रमी नेतृत्व

साहस Times :- भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत की ज्यांचे कार्य काळाच्या चौकटीत अडकून राहत नाही. राजमाता अहिल्यादेवी होळकर हे असेच एक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या नावाचा उल्लेख होताच अनेकांच्या मनात धार्मिक स्थळांच्या जीर्णोद्धाराचे कार्य उभे राहते. परंतु त्यांची ओळख केवळ धर्मकार्य करणाऱ्या राणीपुरती मर्यादित करणे म्हणजे त्यांच्या कर्तृत्वावर अन्याय ठरेल. त्या एक न्यायप्रिय राज्यकर्त्या, कुशल प्रशासक, धैर्यवान नेत्या आणि लोककल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या शासिका होत्या.
३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे त्यांचा जन्म झाला. वडील मानकोजी शिंदे हे गावचे पाटील होते. त्या काळात मुलींना शिक्षण देण्याची प्रथा फारशी नव्हती. मात्र मानकोजी शिंदे यांनी आपल्या कन्येला शिक्षण दिले. पुढे याच शिक्षणामुळे आणि त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित झाले.
मालव्याचे पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांनी त्यांच्या गुणवत्तेची दखल घेत त्यांचा विवाह पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी लावून दिला. विवाहानंतर त्या होळकर घराण्याचा भाग बनल्या. परंतु आयुष्याने त्यांच्यासमोर एकामागून एक कठीण आव्हाने उभी केली. १७५४ मध्ये कुंभेरच्या युद्धात पती खंडेराव यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सासरे मल्हारराव होळकर आणि पुत्र मालेराव यांचेही निधन झाले. या वैयक्तिक दुःखांनी खचून न जाता त्यांनी राज्यकारभाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.
त्या काळातील पुरुषप्रधान समाजात एका विधवा स्त्रीने राज्याचे नेतृत्व करणे ही अभूतपूर्व गोष्ट होती. अनेकांना हे मान्य नव्हते. मात्र अहिल्यादेवींनी आपल्या प्रशासनकौशल्याने, निर्णयक्षमतेने आणि लोकांच्या विश्वासाने हे आव्हान समर्थपणे पेलले. १७६७ ते १७९५ या कालखंडात त्यांनी मालवा राज्याचे यशस्वी नेतृत्व केले.
त्यांच्या राज्यकारभाराचा पाया न्याय आणि लोककल्याण हा होता. त्या नियमितपणे प्रजेच्या समस्या ऐकत आणि त्वरित न्याय देत. भ्रष्टाचार, अन्याय आणि मनमानीला त्यांनी कधीही प्रोत्साहन दिले नाही. त्यांच्या कारकिर्दीत व्यापार, शेती आणि उद्योगधंद्यांना चालना मिळाली. सुरक्षित व्यापारमार्ग, सक्षम प्रशासन आणि स्थिर अर्थव्यवस्था यांमुळे मालवा प्रदेश समृद्ध झाला.
इतिहासात त्यांचे नाव मुख्यतः लोककल्याणकारी कार्यांसाठी घेतले जाते; परंतु त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील पराक्रमी आणि लढवय्या पैलूचाही विचार तितकाच महत्त्वाचा आहे. त्या केवळ राजदरबारातील प्रशासक नव्हत्या, तर राज्याच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या लष्करी बाबींमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता.
ब्रिटिश इतिहासकार सर जॉन माल्कम यांनी आपल्या A Memoir of Central India या ग्रंथात अहिल्यादेवींच्या राज्यकारभाराचे विशेष कौतुक केले आहे. त्यांच्या मते, त्या अत्यंत संतुलित, दूरदर्शी आणि कठोर प्रसंगी ठाम भूमिका घेणाऱ्या राज्यकर्त्या होत्या. त्यांच्या नेतृत्वामुळे होळकर राज्याला स्थैर्य आणि प्रतिष्ठा लाभली.
मराठा इतिहासाचे अभ्यासक गोविंद सखाराम सरदेसाई यांनीदेखील अहिल्यादेवींच्या राजकीय परिपक्वतेचा गौरव केला आहे. तर इतिहासकार यदुनाथ सरकार यांनी त्यांच्या प्रशासनाला लोकाभिमुख आणि न्यायनिष्ठ म्हटले आहे. त्यांच्या मते, अहिल्यादेवींचे राज्य जनतेच्या विश्वासावर उभे होते.
अहिल्यादेवींनी सैन्यव्यवस्थेकडे विशेष लक्ष दिले. त्या घोडेस्वारी, शस्त्रविद्या आणि युद्धनीतीमध्ये निपुण होत्या. त्यांनी राज्याच्या संरक्षणासाठी सैन्य सक्षम केले आणि सीमावर्ती भागांमध्ये सुव्यवस्था राखली. त्यांच्या कारकिर्दीत दरोडेखोर आणि बंडखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली.
राघोबादादा अर्थात रघुनाथराव पेशव्यांशी संबंधित प्रसंग त्यांच्या धैर्याचे उत्कृष्ट उदाहरण मानला जातो. होळकर घराण्यावर संकट आलेले पाहून काही शक्तींनी राज्यकारभारात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अहिल्यादेवींनी स्पष्ट भूमिका घेत राज्याच्या स्वायत्ततेचे रक्षण करण्याची तयारी दर्शवली. आवश्यक पडल्यास स्वतः सैन्याचे नेतृत्व करण्याची त्यांची तयारी विरोधकांना विचार करायला भाग पाडणारी ठरली.
अहिल्यादेवींच्या व्यक्तिमत्त्वात करुणा आणि कठोरता यांचे सुंदर मिश्रण होते. सामान्य जनतेबाबत त्या अत्यंत संवेदनशील होत्या, तर राज्यहिताच्या बाबतीत तडजोड न करणाऱ्या होत्या. त्यामुळे त्यांना प्रजेचे प्रेम आणि सरदारांचा सन्मान मिळाला.
लोकाभिमुख विकास हे त्यांच्या कारभाराचे आणखी एक वैशिष्ट्य होते. त्यांनी रस्ते, विहिरी, तलाव, बाजारपेठा आणि सार्वजनिक सुविधा उभारल्या. या सुविधा केवळ पायाभूत विकासाचे उदाहरण नव्हत्या, तर त्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरल्या.
धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे योगदानही मोठे आहे. अनेक धार्मिक स्थळांच्या पुनर्बांधणीसाठी त्यांनी मदत केली. परंतु या कार्याकडे केवळ धार्मिकतेच्या चष्म्यातून पाहणे योग्य ठरणार नाही. त्या काळातील सामाजिक जीवनात अशी केंद्रे सांस्कृतिक आणि लोकजीवनाचा महत्त्वाचा भाग होती. त्यामुळे त्यांच्या या कार्याचे मूल्यांकन व्यापक सामाजिक संदर्भात करणे गरजेचे आहे.
आज अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी बोलताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा समतोल विचार करण्याची आवश्यकता आहे. त्या धार्मिक कार्य करणाऱ्या होत्या, हे जितके खरे आहे तितकेच त्या पराक्रमी, धैर्यवान आणि प्रभावी राज्यकर्त्या होत्या हेही तितकेच खरे आहे. त्यांनी प्रशासन, लोककल्याण, न्यायव्यवस्था आणि राज्यसंरक्षण या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले.
त्यांचे जीवन हे संकटांशी झुंज देणाऱ्या नेतृत्वाचे, स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचे आणि जनतेसाठी समर्पित शासनाचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करताना त्यांच्या कार्याचे सर्वंकष मूल्यमापन करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
भारतीय इतिहासातील या महान राजमातेला विनम्र अभिवादन!
आयु. सोमीनाथ घोरपडे
संस्कार सचिव, भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा (पूर्व)
मो. ९२८४६५८६९०

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील अतिक्रमण हटविण्याचे नगरपरिषदेचे आवाहन

0
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील अतिक्रमण हटविण्याचे नगरपरिषदेचे आवाहन

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील अतिक्रमण हटविण्याचे नगरपरिषदेचे आवाहन

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील अतिक्रमण हटविण्याचे नगरपरिषदेचे आवाहन
फलटण प्रतिनिधी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेकडून संबंधित मार्गांवरील नागरिक, व्यावसायिक व दुकानधारकांना अतिक्रमणे स्वखर्चाने हटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नगरपरिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या सार्वजनिक सूचनेनुसार, रस्त्यांच्या कडेला असलेली कच्ची-पक्की बांधकामे, अनधिकृत वाढीव बांधकामे तसेच व्यावसायिकांनी केलेली अतिक्रमणे तात्काळ हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा नगरपरिषद प्रशासनाकडून थेट कारवाई करण्यात येणार असून, त्या कारवाईदरम्यान होणाऱ्या नुकसानीस संबंधित व्यक्ती स्वतः जबाबदार राहतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
या मोहिमेत दुकानधारक, व्यावसायिक, टपरीधारक, हातगाडी चालक आदींनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अतिक्रमण हटविण्याची कारवाई पुढील मार्गांवर करण्यात येणार आहे :
गिरवी नाका ते श्रीमंत मालोजीराजे पुतळा
श्रीमंत मालोजीराजे पुतळा ते गजानन चौक
गजानन चौक ते पांचबत्ती चौक
पांचबत्ती चौक ते उबेश्वर चौक
उबेश्वर चौक ते जिंती नाका
डेक्कन चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नाना पाटील चौक
नाना पाटील चौक ते श्रीराम कारखाना
फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून अतिक्रमणे स्वखर्चाने हटवावीत, असे आवाहन केले आहे.

५४ वर्षांनंतरही ‘ते’ निळे वादळ तितक्याच जोमात; शाहीर राजेंद्र कांबळे यांचा पँथर चळवळीला सलाम

0
५४ वर्षांनंतरही ‘ते’ निळे वादळ तितक्याच जोमात; शाहीर राजेंद्र कांबळे यांचा पँथर चळवळीला सलाम

५४ वर्षांनंतरही ‘ते’ निळे वादळ तितक्याच जोमात; शाहीर राजेंद्र कांबळे यांचा पँथर चळवळीला सलाम

अकलूज : “२९ मे १९७२…! एक ठिणगी पेटली…! आणि जन्म झाला पँथरचा…! पँथर म्हणजे केवळ नाव नाही, तो आहे संघर्षाचा इतिहास…! अन्यायाविरुद्ध उभारलेला आवाज…! शोषितांच्या हक्कासाठी लढलेला लढा…!” अशा जाज्वल्य शब्दांत अकलूज येथील प्रसिद्ध शाहीर आणि पँथर चळवळीचे खंदे शिलेदार शाहीर राजेंद्र कांबळे (खुडूसकर) यांनी दलित पँथरच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या या सोशल मीडिया पोस्टने सध्या आंबेडकरी चळवळीत नवचैतन्य निर्माण केले असून, ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दलित पँथर ही संघटना केवळ एक चळवळ नव्हती, तर ती शोषित, वंचित आणि अन्यायग्रस्त समाजाच्या स्वाभिमानाची गर्जना होती. १९७२ च्या दशकात दलितांवरील अत्याचारांची मालिका वाढत असताना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेली तरुणाई रस्त्यावर उतरली आणि त्यातून “दलित पँथर” या ऐतिहासिक संघटनेचा जन्म झाला. या निळ्या वादळाने तत्कालीन सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेला हादरवून सोडले होते.

आपल्या पोस्टमध्ये शाहीर राजेंद्र कांबळे पुढे म्हणतात, “पँथर म्हणजे स्वाभिमान…! पँथर म्हणजे विद्रोह…! पँथर म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांची रस्त्यावर उतरलेली ताकद…! जिथे अन्याय दिसला तिथे पँथर उभा राहिला…! जिथे अत्याचार झाला तिथे पँथर गर्जला…!” त्यांच्या या शब्दांमधून पँथर चळवळीचा इतिहास, वेदना आणि संघर्ष यांचे वास्तव अधोरेखित होत आहे.

शाहीर राजेंद्र कांबळे हे स्वतः या चळवळीचे सक्रिय साक्षीदार आणि लढवय्ये राहिले आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे निकटवर्तीय आणि समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या डफाच्या ठेक्यावर आणि लेखणीच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच उपेक्षितांच्या वेदना, अन्यायाविरुद्धचा विद्रोह आणि सामाजिक समतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवला आहे. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेल्या भावना अनेकांच्या काळजाला भिडत आहेत.

आजच्या पिढीतही पँथरचा विचार जिवंत असल्याचे सांगताना ते म्हणतात, “आजही त्या निळ्या वादळाची ऊर्जा तरुणांच्या रक्तात धावते…! आजही पँथर म्हणजे न्याय, समता आणि बंधुत्वाची शपथ…! अभिमान आहे त्या चळवळीचा…! अभिमान आहे त्या लढ्याचा…! अभिमान आहे मी पँथर विचारांचा वारसदार असल्याचा…!”

दरम्यान, शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या या पोस्टला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असून, “जय भीम”, “जय पँथर”च्या घोषणांनी सोशल मीडिया निळामय झाला आहे. पँथर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह नव्या पिढीतील तरुणांकडूनही या पोस्टचे जोरदार स्वागत होत आहे.

सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट, फलटणच्या वतीने दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम

0
सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट, फलटणच्या वतीने दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम

सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट, फलटणच्या वतीने दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम

                                                                    फलटण : सामाजिक बांधिलकी जपत गेल्या तब्बल २० ते २२ वर्षांपासून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट, फलटण यांच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मा. नगरसेवक सनी सं. अहिवळे तसेच ट्रस्टच्या अध्यक्षा व नगरसेविका सौ. सुपर्णा सनी अहिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, समाजातील गरीब, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचे कार्य सातत्याने करण्यात येत आहे.
बुद्ध निवास येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध समस्या समजून घेऊन त्यांना मदतीचा हात देण्याचे काम ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधार मिळावा या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यापूर्वीही ट्रस्टच्या माध्यमातून आदर्श महिलांचा सन्मान, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप, शालेय विद्यार्थ्यांना बॅग, पुस्तके, वह्या, पेन वाटप, वृक्षारोपण, स्वच्छता अभियानांतर्गत डस्टबिन वाटप, पूरग्रस्तांना मदत तसेच कोरोना काळात अन्नदान असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत.
दि. ३१ मे २०२६, रोजी सायंकाळी ५.०० वाजता, बुद्ध निवास, फलटण येथे हा कार्यक्रम संपन्न होणार असून विद्यार्थ्यांनी नाव, इयत्ता व मोबाईल क्रमांक पाठवून नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन मा. खा. रणजितसिंह (दादा) नाईक निंबाळकर करणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सचिन पाटील साहेब असणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी भोसले, मा. अभिजीत भैया नाईक निंबाळकर, नगरसेविका सौ. सुपर्णा सनी अहिवळे, नगरसेवक श्री. सचिन अहिवळे, नगरसेविका सौ. मीना काकडे तसेच सर्व नगरसेवक व मंगळवार पेठेतील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
नोंदणी व संपर्कासाठी : 9960861186
9762419762
9309156688
9021121414
9850032176
9890673473
समस्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ॲडव्होकेट ऍक्ट १९६१ मध्ये व्यापक सुधारणा करा; येत्या संसदीय अधिवेशनात सुधारणा विधेयक सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

0
ॲडव्होकेट ऍक्ट १९६१ मध्ये व्यापक सुधारणा करा; येत्या संसदीय अधिवेशनात सुधारणा विधेयक सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

येत्या संसदीय अधिवेशनात ॲडव्होकेट ऍक्ट (सुधारित) कायदा सादर करून ॲडव्होकेट ऍक्ट, १९६१ मध्ये व्यापक घटनात्मक, सामाजिक, लोकशाही व प्रशासकीय सुधारणा तात्काळ करण्याबाबतची मागणी ॲड. कांचन धौडीराम खरात यांनी केली.

येत्या संसदीय अधिवेशनात ॲडव्होकेट ऍक्ट (सुधारित) कायदा सादर करून ॲडव्होकेट ऍक्ट, १९६१ मध्ये व्यापक घटनात्मक, सामाजिक, लोकशाही व प्रशासकीय सुधारणा तात्काळ करण्याबाबतची मागणी ॲड. कांचन धौडीराम खरात यांनी केली.

फलटण :- भारतातील न्यायव्यवस्था ही भारतीय संविधानाच्या मूलभूत रचनेचा अत्यंत महत्वाचा भाग असून वकील व्यवसाय हा न्यायदान व्यवस्थेचा अविभाज्य घटक आहे. ॲडव्होकेट ऍक्ट, १९६१ अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या बार कौन्सिल ऑफ इंडिया व विविध स्टेट बार कॉन्सिल्स या संस्था देशातील लाखो वकिलांचे प्रतिनिधित्व करतात. तथापि सध्याच्या कायदेशीर, प्रशासकीय व निवडणूक व्यवस्थेमध्ये लोकशाही प्रतिनिधित्व, सामाजिक समावेशकता, आर्थिक समानता, महिला सहभाग, ग्रामीण प्रतिनिधित्व व पारदर्शकतेचा गंभीर अभाव निर्माण झालेला आहे. सद्‌यस्थितीत बार कौन्सिल निवडणुका अत्यंत खर्चिक, केंद्रीकृत व प्रभावशाली गटांच्या नियंत्रणाखाली गेल्याची भावना देशातील वकिलांमध्ये निर्माण झाली असून ग्रामीण भागातील, नवोदित, आर्थिकदृष्ट्‌या दुर्बत, महिला, एस.सी. / एस.टी/ओबीसी, आदिवासी, अल्पसंख्याक व लहान जिल्ह्यातील वकिलांना प्रभावी प्रतिनिधित्व मिळण्यात गंभीर अडचणी येत आहेत. भारतीय संविधानातील कलम १४, १५, १६, १९ (१) (सी), ३८ व ३९ ए मधील समानता, सामाजिक न्याय, समान संधी व लोकशाही प्रतिनिधित्वाच्या तत्वांच्या अधीन राहून ॲडव्होकेट ऍक्ट, १९६१ मध्ये खालीलप्रमाणे व्यापक सुधारणा करण्यात याव्यात ही नम्र मागणी आहे:
प्रत्येक जिल्ह्यास किमान एक प्रतिनिधित्व देण्याची कायदेशीर सक्ती करण्यात यावी. जेणेकरून ग्रामीण व जिल्हास्तरीय बार असोसिएशन चे प्रश्न थेट मांडले जातील. राज्य बार कौन्सिल मधील निश्चित ‘२५ सदस्य” मर्यादा रद्द करून संबंधित राज्यातील जिल्हे, वकिलांची संख्या व भौगोलिक परिस्थितीनुसार सदस्यसंख्या निश्चित करण्यात यावी. बार कौन्सिल ऑफ इंडिया मध्ये प्रत्येक राज्यास न्याय्य प्रतिनिधित्व मिळण्यासाठी ॲडव्होकेटची संख्या, राज्याचा आकार, जिल्हे व सामाजिक विविधता याच्या आधारावर नवीन प्रतिनिधित्व प्रणाली लागू करण्यात यावी, महिलांसाठी किमान ३३% आरक्षण (५०% आरक्षण दिल्यास उत्तम) व स्वातंत्र महिला प्रतिनिधित्व अनिवार्य करण्यात यावे. एस.सी., एस.टी., ओबीसी, व्ही. जी.एन.टी. व इ.डब्ल्यू.एस. घटकांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्वाची तरतूद करण्यात यावी. युवा व नवोदित वकिलांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व व्यवस्था निर्माण करण्यात यावी. निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवारी शुल्क व प्रचार खर्च व इतर आर्थिक अटींवर कमाल मर्यादा कायदेशीर घालण्यात यावी. सर्व निवडणूक खर्चाचे स्वतंत्र लेखापरीक्षण व सार्वजनिक आर्थिक खुलासा अनिवार्य करण्यात यावा. बार कौन्सिल निवडणुका स्वतंत्र निवडणूक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली घेण्यात याव्यात. ई-नामांकन व जिल्हानिहाय मतदारसंघ प्रणाली लागू करण्यात यावी. सलग अनेक कार्यकाळांवर मर्यादा घालून नवीन नेतृत्वाला संधी देण्यात यावी. बार कौन्सिलच्या सर्व बैठका, ठराव, आर्थिक व्यवहार, वेल्फेअर फंड, निवडणूक निधी व शिस्तभंग कारवाईमध्ये पूर्ण पारदर्शकता अनिवार्य करण्यात यावी. ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील वकिलांसाठी विशेष कायदेशीर सहाय्य, प्रशिक्षण व प्रतिनिधित्व योजना लागू करण्यात याव्यात. नवोदित वकिलांसाठी किमान मानधन, विमा, निवृत्ती वेतन, आरोग्य सुरक्षा, सामाजिक सुरक्षा व प्रशिक्षण प्रणालीची कायदेशीर तरतूद करण्यात यावी. वकिलांच्या कल्याण निधीच्या वापरावर सार्वजनिक लेखापरीक्षण व माहिती अधिकार काय‌द्याअंतर्गत पूर्ण पारदर्शकता लागू करण्यात यावी. बार कौन्सिल निवडणूक प्रक्रियेमध्ये पैशाचा प्रभाव, गटबाजी, दबावतंत्र व अप्रत्यक्ष आर्थिक प्रभाव रोखण्यासाठी स्वातंत्र आचारसंहिता लागू करण्यात यावी. बार कौन्सिलच्या सर्व सदस्यांसाठी वार्षिक मालमता जाहीर करणे व हितसंबंध पारदर्शकता अनिवार्य करण्यात यावी. वकिलांच्या तक्रारींचे वेळबद्ध निवारण करण्यासाठी स्वातंत्र्य ग्रवियन्स रेडरेसल मेकॅनिझम स्थापन करण्यात यावा. ॲडव्होकेट ऍक्ट, १९६१ चे संपूर्ण पुनरावलोकन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत न्यायाधीश, वरिष्ठ वकील, महिला प्रतिनिधी, ग्रामीण बार असोसिएशन व सामाजिक न्याय क्षेत्रातील तज्ञ यांची राष्ट्रीय सुधारणा समिती स्थापन करण्यात यावी. देशातील सर्व वकिलांकडून सूचना व हरकती मागवून लोकशाही पद्धतीने सुधारणा प्रक्रिया राबविण्यात यावी. न्यायव्यवस्था ही केवळ शहरापुरते किंवा आर्थिकदृष्ट्या प्रभावशाली गटापूर्ती मर्यादित न राहता देशातील प्रत्येक जिल्हा, प्रत्येक समाजघटक व प्रत्येक वकिलापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून भारत सरकारने येत्या संसदीय अधिवेशनात ॲडव्होकेट ऍक्ट (सुधारणा) कायदा सादर करून ॲडव्होकेट ऍक्ट, १९६१ मध्ये आवश्यक दुरुस्ती तात्काळ करावी ही नम्र व तातडीची विनंती. न्यायव्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, सर्वसमावेशक व संविधानसुसंगत करण्यासाठी ही सुधारणा अत्यंत आवश्यक आहे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली त्यांच्यासोबत सहकारी ॲड. मल्हारी गाढवे, ॲड. रेश्मा पठाण, श्रीकांत गावडे, अमर खंदारे आणि सागर चव्हाण इ…

सोनिया चँरिटेबल ट्रस्ट, फलटणच्या वतीने दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम

0
सोनिया चँरिटेबल ट्रस्ट, फलटणच्या वतीने दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम

सोनिया चँरिटेबल ट्रस्ट, फलटणच्या वतीने दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम

सोनिया चँरिटेबल ट्रस्ट, फलटणच्या वतीने दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम
फलटण : सामाजिक बांधिलकी जपत गेल्या तब्बल २० ते २२ वर्षांपासून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या सोनिया चँरिटेबल ट्रस्ट, फलटण यांच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मा. नगरसेवक सनी अहिवळे व ट्रस्टच्या अध्यक्षा तथा नगरसेविका सुपर्णा सनी अहिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, समाजातील गरजू, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचे कार्य सातत्याने करण्यात येत आहे.
बुद्ध निवास येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना मदतीचा हात देण्याचे कार्य ट्रस्टमार्फत सुरू आहे. याआधीही ट्रस्टच्या माध्यमातून आदर्श महिलांचा सन्मान, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप, शालेय विद्यार्थ्यांना बॅग, पुस्तके, वह्या, पेन वाटप, वृक्षारोपण, स्वच्छता अभियानांतर्गत डस्टबिन वाटप, पूरग्रस्तांना मदत तसेच कोरोना काळात अन्नदान असे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत.
दि. ३१ मे २०२६ रोजी बुद्ध निवास, फलटण येथे दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न होणार असून, विद्यार्थ्यांनी नाव, इयत्ता व मोबाईल क्रमांकासह नोंदणी करून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक :
9960861186
9762419762
9309156688
9021121414
9850032176
9890673473
जयभीम… जयभारत!

श्रीमंत संजीवराजेंना आमदार करण्याची लोकभावना शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवू : मंत्री उदय सामंत

0
श्रीमंत संजीवराजेंना आमदार करण्याची लोकभावना शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवू : मंत्री उदय सामंत

श्रीमंत संजीवराजेंना आमदार करण्याची लोकभावना शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवू : मंत्री उदय सामंत

श्रीमंत संजीवराजेंना आमदार करण्याची लोकभावना शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवू : मंत्री उदय सामंत

फलटण : “अतिरिक्त एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांवर कोणतीही जबरदस्ती केली जाणार नाही. शेतकऱ्यांना योग्य आणि अपेक्षित मोबदला देऊनच एमआयडीसी उभारली जाईल,” अशी स्पष्ट ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
फलटण येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मॅग्नेशिया कंपनीच्या विस्तारासाठी येत्या महिनाभरात एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अतिरिक्त एमआयडीसी मंजुरीबाबत सकारात्मक हालचाली सुरू असल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.
लोकशाही भारत न्यूजने तीन महिन्यांपूर्वी अतिरिक्त एमआयडीसी संदर्भातील आश्वासनाची बातमी प्रसिद्ध केली होती. त्याच पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी या विषयावर पुन्हा भाष्य केले.
फलटण परिसरात पोटॅशियम परमॅग्नेट निर्मिती करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा कारखाना कार्यरत असून, पश्चिम महाराष्ट्र आता केवळ साखर उद्योगापुरता मर्यादित न राहता रासायनिक उद्योगांसाठीही ओळख निर्माण करत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना संघटनाबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले, “एका लोकसभा मतदारसंघात १६ हजार ५०० पदाधिकारी निर्माण करणारा शिवसेना हा एकमेव पक्ष ठरेल.” शाखाप्रमुख हा पक्षाचा कणा असून त्याने पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन त्यांनी केले. शाखाप्रमुख आणि त्यांच्या कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही शिवसेनेच्या शाखा रचनेतून प्रेरणा घेत पक्षविस्तार केल्याचा उल्लेख केला.
दरम्यान, भाषणादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी “श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना आमदार करा” अशा घोषणा दिल्या. त्यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले, “जे माझ्या हातात नाही त्याची जबाबदारी मी घेणार नाही. मात्र, आपली लोकभावना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मी आणि माजी खासदार राहुल शेवाळे स्वीकारत आहोत.”
या विधानानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, माजी खासदार राहुल शेवाळे, चंद्रहार पाटील आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि फलटण नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

पोलिस ठाण्यासमोरच अंधार; फलटणमध्ये नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

0
पोलिस ठाण्यासमोरच अंधार; फलटणमध्ये नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पोलिस ठाण्यासमोरच अंधार; फलटणमध्ये नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पोलिस ठाण्यासमोरच अंधार; फलटणमध्ये नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
फलटण : शहरात चेन स्नॅचिंग आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सातारा-फलटण रोडवरील विमानतळ परिसर अनेक दिवसांपासून अंधारात बुडाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या परिसरात पोलिस स्टेशन, न्यायालय तसेच वन विभागाची कार्यालये असतानाही स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत असल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पोलिस ठाण्यासमोरच अंधार असल्याने गुन्हेगारांना मोकळे मैदान मिळत आहे. संध्याकाळच्या वेळी या परिसरात शतपावलीसाठी येणारे जेष्ठ नागरिक, महिला वर्ग तसेच सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अंधारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे.
दरम्यान, सातारा-फलटण रोडवरील रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. या मार्गावरून दुचाकी व चारचाकी वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने अंधारात अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने अनेक वेळा किरकोळ अपघात होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
फलटण नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. तातडीने स्ट्रीट लाईट सुरू करून परिसर प्रकाशमान करावा तसेच वाहतुकीसाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

कालकथित जगुबाई तात्याबा भोसले यांचे अस्थि संकलन व पुण्यानुमोदन विधी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत संपन्न

0
कालकथित जगुबाई तात्याबा भोसले यांचे अस्थि संकलन व पुण्यानुमोदन विधी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत संपन्न

कालकथित जगुबाई तात्याबा भोसले यांचे अस्थि संकलन व पुण्यानुमोदन विधी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत संपन्न

दहिवडी : मौजे पाचवड येथील कालकथित जगुबाई तात्याबा भोसले यांचे दि. २५ मे २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अस्थि संकलन व पुण्यानुमोदन विधीचा कार्यक्रम आज बौद्ध धम्म संस्कार पद्धतीने संपन्न झाला. भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक तथा बौद्धाचार्य आयु. चंद्रकांत मोहिते यांनी हा विधी संपन्न केला.

यावेळी त्यांनी कालकथित जगुबाई तात्याबा भोसले यांच्या अस्थी नदी किंवा पाण्यात प्रवाहित न करता जमिनीत विसर्जित करून त्या ठिकाणी वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या कृतीचे उपस्थितांनी कौतुक केले. कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा, कर्मकांड किंवा अवैज्ञानिक प्रथांचे पालन न करता बौद्ध धम्मातील वैज्ञानिक व पर्यावरणपूरक विचारांचा जागर त्यांनी आपल्या कृतीतून केला.

यावेळी बौद्धाचार्य आयु. चंद्रकांत मोहिते यांनी कालकथित जगुबाई तात्याबा भोसले यांना विनम्र अभिवादन करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आज त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचा स्मृतिदिन असल्याने त्यांनी माता रमाई यांच्या त्यागमय जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

ते म्हणाले, “माता रमाई या खऱ्या अर्थाने त्यागमूर्ती होत्या. त्यांनी आयुष्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खंबीर साथ दिली. समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी स्वतःच्या संसारातील दुःख सहन केले. स्वतः लाकडाच्या मोळ्या व गवऱ्या विकून बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी हातभार लावला. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्या त्यागाचा आदर्श घेतला पाहिजे.”

या प्रसंगी भोसले परिवारातील नातेवाईक, ग्रामस्थ, धम्मबंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी विजय तात्याबा भोसले, दीपाली विजय भोसले, आरोही भोसले, काव्या भोसले, दिया भोसले, मनिषा बनसोडे, आशिष बनसोडे, ज्योती खरात, तुळशीराम रणदिवे, दिव्या रणदिवे व इतर उपस्थितांनी बुद्ध वंदना करून कालकथित जगुबाई तात्याबा भोसले यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.