Thursday, June 25, 2026
Home Blog Page 12

साताऱ्यात शिंदेंच्या शिवसेनेत धुसफूस कायम! महेश शिंदे-शंभूराज देसाई वादाचा विधान परिषद निवडणुकी

0


Vidhan Parishad Election 2026: साताऱ्यातील शिवसेनेमध्ये (Shiv Sena) अंतर्गत धुसफुस अजूनही कायम असल्याचे चित्र असून, दोन बड्या नेत्यांमधील हा वाद आता थेट पक्षाचे मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दरबारात पोहोचला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळापासून आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यात तीव्र मतभेद समोर आले होते. हाच वाद आता आगामी विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर अधिक उफाळून आला असून, याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Vidhan Parishad Election 2026: काय आहे नेमका वाद?

जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान, शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी भाजपमधून (BJP) उभ्या असलेल्या त्यांच्या पत्नीच्या विजयासाठी पक्षाविरोधी भूमिका घेतल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला होता. तेव्हापासून महेश शिंदे आणि शंभूराज देसाई यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. या संपूर्ण वादानंतर फलटण (Phaltan) येथील सभेपूर्वी आमदार महेश शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या वादानंतरची ही या दोन्ही नेत्यांची पहिलीच भेट होती.

Vidhan Parishad Election 2026: उपमुख्यमंत्र्यांसमोर वाचला अन्यायाचा पाढा

या महत्त्वाच्या भेटीदरम्यान आमदार महेश शिंदे यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर वाचला. “मी कधीही पक्षाच्या किंवा तुमच्या विरोधात गेलो नाही आणि तसे कोणतेही वक्तव्य केले नाही,” अशी सफाई महेश शिंदे यांनी दिली. तसेच, “पालकमंत्री शंभूराज देसाई हे जाणीवपूर्वक माझ्याविरोधात राजकारण करत असून, तुम्हीच आता या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालावे,” अशी थेट मागणी त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली.

Vidhan Parishad Election 2026: महेश शिंदेंच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्र्यांचा कानाडोळा

आमदार महेश शिंदे यांनी तक्रार केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वादात पडणे टाळले. त्यांनी महेश शिंदेंच्या राजकीय तक्रारीकडे दुर्लक्ष करत केवळ त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मतदारसंघातील कामाकडे लक्ष देण्याचा सल्ला देत महेश शिंदेंच्या वक्तव्यावर कानाडोळा केला.

Vidhan Parishad Election 2026: उदय सामंतांची टीका 

उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सातारा जिल्ह्यातील फलटण येथे शिवसेनेची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आमदार महेश शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. उदय सामंत यांच्या या जाहीर टीकेमुळे साताऱ्यातील शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. साताऱ्यातील दोन्ही नेत्यांमधील मतमतांतरांमुळे आगामी विधान परिषद निवडणुकीत पक्षांतर्गत मोठ्या बंडाळीची किंवा मतफुटीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे साताऱ्यातील या राजकीय धुसफुसीचा फटका महायुतीला बसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Vidhan Parishad Election 2026:  निवडणूक कार्यक्रम जाहीर

अधिसूचना जारी : 25 मे

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून

अर्जाची छाननी : 2 जून

अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून

मतदान : 18 जून – स. 8 ते दु. 4.

मतमोजणी : 22 जून

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भंडाऱ्यात नाना पटोलेंना मोठा झटका; काँग्रेसच्या चार नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

आणखी वाचा



Source link

Satara Rain : साताऱ्यात पावसाचा कहर रस्त्यावर पाणीच पाणी ABP Majha

0



<p>Satara Rain : साताऱ्यात पावसाचा कहर रस्त्यावर पाणीच पाणी ABP Majha</p>



Source link

कर्तव्यनिष्ठ शिक्षक शिवाजी बनकर यांच्या सेवापूर्ती समारंभास मान्यवरांची उपस्थिती

0
कर्तव्यनिष्ठ शिक्षक शिवाजी बनकर यांच्या सेवापूर्ती समारंभास मान्यवरांची उपस्थिती

कर्तव्यनिष्ठ शिक्षक शिवाजी बनकर यांच्या सेवापूर्ती समारंभास मान्यवरांची उपस्थिती

फलटण प्रतिनिधी : मुधोजी हायस्कूलचे उपशिक्षक शिवाजी बनकर यांच्या सेवापूर्ती समारंभाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे आजी-माजी मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमास मुधोजी हायस्कूलचे माजी प्राचार्य येवले सर, माजी प्राचार्य रूपनवर सर, फलटण नगर परिषदेचे नगरसेवक विकास काकडे सर, प्राचार्य काकडे सर, माजी प्राचार्य सुधीर अहिवळे सर, प्राचार्य गगावणे सर तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, गावकरी आणि पाहुणे मंडळी उपस्थित होती.

शिवाजी बनकर यांनी आपल्या शैक्षणिक सेवेला आदरूड येथील शाळेतून उपशिक्षक म्हणून प्रारंभ केला. त्यानंतर म्हसवड तसेच फलटण येथील मुधोजी हायस्कूलमध्ये इंग्रजी व क्रीडा शिक्षक म्हणून त्यांनी अनेक वर्षे उल्लेखनीय सेवा बजावली. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, क्रीडाप्रेम, आत्मविश्वास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

त्यांच्या सेवाकाळात अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांशी असलेला त्यांचा जिव्हाळा, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि विद्यार्थीकेंद्री दृष्टिकोन याबद्दल उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमात शिवाजी बनकर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात बोलताना त्यांनी श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर व विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर या राजघराण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

तसेच आपल्या जीवनातील प्रेरणास्थान आणि गुरु असलेल्या मुधोजी हायस्कूलचे माजी प्राचार्य रूपनवर सर यांचे विशेष आभार त्यांनी मानले. प्राचार्य येवले सर, नगरसेवक विकास काकडे, सुधीर अहिवळे सर, उपस्थित सर्व आजी-माजी प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ यांचेही त्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तांबे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे बनकर यांनी विशेष आभार मानले. उपस्थितांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याला सलाम केला.

गारांसह जोरदार पाऊस; वडगाव निंबाळकरकरांना उष्णतेपासून दिलासा

0
गारांसह जोरदार पाऊस; वडगाव निंबाळकरकरांना उष्णतेपासून दिलासा

साहस टाइम्स प्रतिनिधी | वडगाव निंबाळकर
वडगाव निंबाळकर परिसरात सोमवारी दुपारनंतर गारांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. काही मिनिटांतच वातावरणात मोठा बदल झाला असून अवकाळी पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. मागील अनेक दिवसांपासून वाढलेल्या प्रचंड उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
दुपारच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही भागांत गारपीटही झाल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. फळबागा व पिकांचे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात तापमानात मोठी वाढ झाली होती. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
“उकाड्याने हैराण झालेल्या सर्वांनाच या पावसामुळे खूप आनंद झाला,” अशी प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने दिली.
दरम्यान, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी आयुष्य वेचणाऱ्या मुख्याध्यापक संजय जाधव यांचा गौरव

0
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी आयुष्य वेचणाऱ्या मुख्याध्यापक संजय जाधव यांचा गौरव

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी आयुष्य वेचणाऱ्या मुख्याध्यापक संजय जाधव यांचा गौरव

फलटण प्रतिनिधी :रावडी माध्यमिक विद्यालय, रावडी येथील मुख्याध्यापक  संजय जाधव यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय सेवा बजावत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या संजय जाधव यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, शाळा समिती सदस्य निकम सर, फलटण नगर परिषदेचे नगरसेवक विकास काकडे सर तसेच मुधोजी हायस्कूलचे माजी प्राचार्य सुधीर अहिवळे यांनी उपस्थित राहून श्री जाधव यांना शुभेच्छा दिल्या.
उपस्थित मान्यवरांनी श्री जाधव यांच्या प्रामाणिक सेवा, शिस्तप्रिय स्वभाव, विद्यार्थ्यांप्रती असलेले समर्पण आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा विशेष उल्लेख करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकाचा सन्मान करणे ही समाजासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमात श्री जाधव यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सेवानिवृत्तीनंतरचे त्यांचे आयुष्य आनंदी, निरोगी व समाधानकारक जावो, अशा शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या. कार्यक्रम प्रसंगी शिक्षक, नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

FDA च्या धडक कारवाया; माळशिरसमध्ये बेकायदा दूध डेअरी बंद, अकलूजात अडीच लाखांचे पामोलिन तेल जप्त

0
FDA च्या धडक कारवाया; माळशिरसमध्ये बेकायदा दूध डेअरी बंद, अकलूजात अडीच लाखांचे पामोलिन तेल जप्त

अकलूज : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळ, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ आणि परवान्याविना सुरू असलेल्या अन्न व्यवसायांविरोधातील कारवायांना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने दोन ठिकाणी धडक कारवाया करत बेकायदा दूध संकलन केंद्र बंद केले, तर अकलूज येथे अडीच लाख रुपयांहून अधिक किमतीचा संशयित पामोलिन तेलसाठा जप्त केला.
अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे यांनी पिसेवाडी (ता. माळशिरस) येथील मे. जय हनुमान भाईनाथ दूध संकलन व शीतकरण केंद्राची तपासणी केली असता संबंधित व्यवसाय अन्न व औषध प्रशासनाचा आवश्यक परवाना न घेता सुरू असल्याचे आढळले. संबंधित मालक गणेश काळे पाटील यांना यापूर्वी अनेकदा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून व्यवसाय सुरूच ठेवण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले.
तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत सुरक्षित अन्न पुरवठ्याशी संबंधित विविध नियमांचे उल्लंघन झाल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे प्रशासनाने संबंधित दूध डेअरीचा व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, दुसऱ्या कारवाईत अकलूज येथील जयकुमार दुलचंद दोशी यांच्या पेढीची तपासणी करण्यात आली. यावेळी कमी दर्जा अथवा लेबलदोष असल्याच्या संशयावरून तब्बल 997 किलो पामोलिन तेलाचा साठा जप्त करण्यात आला. जप्त मालाची अंदाजे किंमत 2 लाख 44 हजार 700 रुपये इतकी असून पुढील आदेश येईपर्यंत हा साठा विक्रेत्याच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
माळशिरस तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात भेसळयुक्त अन्नपदार्थ, निकृष्ट खाद्यतेल, दुग्धजन्य पदार्थांतील गैरप्रकार, गुटखा विक्री आणि परवान्याविना सुरू असलेल्या अन्न व्यवसायांबाबत अनेक वर्षांपासून तक्रारी होत आहेत. मात्र, संबंधित यंत्रणेकडून अपेक्षित प्रमाणात कारवाया होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
आता FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू झालेल्या मोहिमेमुळे स्थानिक प्रशासनही सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. माळशिरस तालुक्यातील या कारवायांचे सर्व स्तरांतून स्वागत होत असले तरी, केवळ दोन कारवायांवर समाधान न मानता जिल्ह्यातील इतर संशयित अन्न व्यवसाय, दूध डेअऱ्या, तेल विक्रेते आणि भेसळीच्या साखळ्यांवर सातत्याने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
ग्राहकांना सुरक्षित आणि निर्भेळ अन्न मिळण्यासाठी या मोहिमेचे व्यापक स्वरूपात रूपांतर होणे आवश्यक असल्याची भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

0
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

फलटण प्रतिनिधी : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरात आज मोठ्या उत्साहात अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे जाऊन अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
यावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. उपस्थित मान्यवरांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि आदर्श प्रशासनाच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले.
या कार्यक्रमास फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, नगरसेवक संदीप चोरमले, अशोकराव जाधव, सुदाम मांढरे, रोहित नागटिळे, सचिन अहिवळे, सौ. सुपर्णा अहिवळे, सौ. मीना काकडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव पोकळे, ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले, पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे तसेच युवा नेते तुकाराम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच फलटण शहरातील नागरिक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोकहितवादी कार्याला अभिवादन करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

कोरेगावात शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी; कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास गप्प बसणार नाही – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
कोरेगावात शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी; कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास गप्प बसणार नाही – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी :कोरेगाव तालुक्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना नाहक त्रास दिला जात असून जिल्ह्यातील सर्वात खालच्या पातळीचे राजकारण कोरेगावमध्ये सुरू असल्याचा गंभीर आरोप पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला. तसेच कोरेगावमध्ये राजाभाऊ बर्गे यांना ताकद देत संपूर्ण कार्यकारणीमध्ये बदल करण्यात येणार असून उद्योगमंत्री उदय सामंत आणि आपण स्वतः कोरेगावात विशेष लक्ष घालणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सातारा येथील हॉटेल लेक व्ह्यूमध्ये आयोजित कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, पक्षाचे सरचिटणीस तथा माजी खासदार राहुल शेवाळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, संपर्कप्रमुख शरद कणसे, रेश्माताई जगताप, राजाभाऊ बर्गे, पैलवान चंद्रहार पाटील, विजय जगदाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीलाच कोरेगाव मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले आमदार भाजपच्या वळचणीला गेल्याचा आरोप करत अनेक कार्यकर्त्यांनी आपली व्यथा मांडली. शिवसेनेच्या बीएलओ नियुक्तीनंतर मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकीचे फोन येत असल्याचा आरोप करण्यात आला.

तसेच पोलिस यंत्रणा पूर्णपणे आमदारांच्या बाजूने काम करत असून कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे, वारंवार तारखांना बोलावून दिवसभर पोलिस ठाण्यात बसवणे, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयांतील कामे मुद्दाम रखडवणे असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांसमोर मांडल्या.

वादात अडकत नसलेल्या शिवसैनिकांना जाणीवपूर्वक इतर कार्यकर्त्यांमार्फत वाद निर्माण करून केसेसमध्ये अडकवले जात असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. विजय जगदाळे यांना पक्षपद दिल्यानंतर त्यांच्या पत्नीची शासकीय नोकरीत विविध ठिकाणी बदली करून त्रास दिला जात असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, या सर्व तक्रारींबाबत आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे शंभूराज देसाई आणि उदय सामंत यांनी स्पष्ट केले. तसेच महिन्यातून एकदा आढावा बैठक घेतली जाणार असून पहिली बैठक कोरेगावमध्ये घेण्यात येणार असल्याचे सांगितले. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

“कोणत्याही शिवसैनिकाच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही आधी शिवसैनिक आहोत आणि नंतर मंत्री,” असा इशारा दोन्ही मंत्र्यांनी नाव न घेता आमदार महेश शिंदे यांना दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

भारतीय इतिहासातील लोकाभिमुख आणि पराक्रमी नेतृत्वाचे तेजस्वी उदाहरण : अहिल्यादेवी होळकर

0
भारतीय इतिहासातील लोकाभिमुख आणि पराक्रमी नेतृत्वाचे तेजस्वी उदाहरण : अहिल्यादेवी होळकर

राजमाता अहिल्यादेवी होळकर : धार्मिकतेपलीकडील पराक्रमी नेतृत्व

३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे गावचे पाटील होते. त्या काळात मुलींना शिक्षण देण्याची प्रथा फारशी नसतानाही त्यांनी आपल्या कन्येला शिक्षण दिले. याच शिक्षणामुळे अहिल्यादेवींमध्ये नेतृत्वगुण विकसित झाले.
मालव्याचे पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांनी त्यांच्या गुणवत्तेची दखल घेत त्यांचा विवाह पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी लावून दिला. विवाहानंतर त्या होळकर घराण्याचा भाग बनल्या. मात्र पुढील आयुष्यात त्यांना अनेक वैयक्तिक संकटांना सामोरे जावे लागले. १७५४ मध्ये कुंभेरच्या युद्धात पती खंडेराव यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सासरे मल्हारराव होळकर आणि पुत्र मालेराव यांचेही निधन झाले. या कठीण परिस्थितीतही त्यांनी खचून न जाता राज्यकारभाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.

पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत एका विधवा स्त्रीने राज्याचे नेतृत्व करणे ही त्या काळातील अत्यंत अभूतपूर्व घटना होती. अनेकांनी त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र अहिल्यादेवींनी आपल्या प्रशासनकौशल्याने, निर्णयक्षमतेने आणि प्रजेच्या विश्वासाने हे आव्हान समर्थपणे पेलले. १७६७ ते १७९५ या काळात त्यांनी मालवा राज्याचे यशस्वी नेतृत्व केले.

पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत एका विधवा स्त्रीने राज्याचे नेतृत्व करणे ही त्या काळातील अत्यंत अभूतपूर्व घटना होती. अनेकांनी त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र अहिल्यादेवींनी आपल्या प्रशासनकौशल्याने, निर्णयक्षमतेने आणि प्रजेच्या विश्वासाने हे आव्हान समर्थपणे पेलले. १७६७ ते १७९५ या काळात त्यांनी मालवा राज्याचे यशस्वी नेतृत्व केले.
त्यांच्या राज्यकारभाराचा केंद्रबिंदू न्याय आणि लोककल्याण हा होता. त्या नियमितपणे प्रजेच्या समस्या ऐकत आणि त्वरित न्याय देत. भ्रष्टाचार, अन्याय आणि मनमानीला त्यांनी कधीही थारा दिला नाही. त्यांच्या कारकिर्दीत व्यापार, शेती आणि उद्योगधंद्यांना चालना मिळाली. सुरक्षित व्यापारमार्ग, सक्षम प्रशासन आणि स्थिर अर्थव्यवस्था यांमुळे मालवा प्रदेश समृद्ध झाला.

इतिहासात त्यांचे नाव मुख्यतः लोककल्याणकारी कार्यांसाठी घेतले जाते; मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील पराक्रमी आणि लढवय्या पैलूचाही विचार तितकाच महत्त्वाचा आहे. त्या केवळ राजदरबारातील प्रशासक नव्हत्या, तर राज्याच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या लष्करी बाबींमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता.

ब्रिटिश इतिहासकार सर जॉन माल्कम यांनी आपल्या A Memoir of Central India या ग्रंथात अहिल्यादेवींच्या राज्यकारभाराचे विशेष कौतुक केले आहे. त्यांच्या मते त्या अत्यंत संतुलित, दूरदर्शी आणि कठीण प्रसंगी ठाम भूमिका घेणाऱ्या राज्यकर्त्या होत्या. त्यांच्या नेतृत्वामुळे होळकर राज्याला स्थैर्य आणि प्रतिष्ठा लाभली.
मराठा इतिहासाचे अभ्यासक गोविंद सखाराम सरदेसाई यांनीदेखील अहिल्यादेवींच्या राजकीय परिपक्वतेचा गौरव केला आहे. तर इतिहासकार यदुनाथ सरकार यांनी त्यांच्या प्रशासनाला लोकाभिमुख आणि न्यायनिष्ठ म्हटले आहे. त्यांच्या मते, अहिल्यादेवींचे राज्य जनतेच्या विश्वासावर उभे होते.

अहिल्यादेवींनी सैन्यव्यवस्थेकडे विशेष लक्ष दिले. त्या घोडेस्वारी, शस्त्रविद्या आणि युद्धनीतीमध्ये निपुण होत्या. त्यांनी राज्याच्या संरक्षणासाठी सैन्य सक्षम केले आणि सीमावर्ती भागांमध्ये सुव्यवस्था राखली. त्यांच्या कारकिर्दीत दरोडेखोर आणि बंडखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली.

राघोबादादा अर्थात रघुनाथराव पेशव्यांशी संबंधित प्रसंग त्यांच्या धैर्याचे उत्कृष्ट उदाहरण मानला जातो. होळकर घराण्यावर संकट आलेले पाहून काही शक्तींनी राज्यकारभारात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अहिल्यादेवींनी स्पष्ट भूमिका घेत राज्याच्या स्वायत्ततेचे रक्षण करण्याची तयारी दर्शवली. आवश्यक पडल्यास स्वतः सैन्याचे नेतृत्व करण्याची त्यांची तयारी विरोधकांना विचार करायला भाग पाडणारी ठरली.
अहिल्यादेवींच्या व्यक्तिमत्त्वात करुणा आणि कठोरता यांचे सुंदर मिश्रण होते. सामान्य जनतेबाबत त्या अत्यंत संवेदनशील होत्या, तर राज्यहिताच्या बाबतीत तडजोड न करणाऱ्या होत्या. त्यामुळे त्यांना प्रजेचे प्रेम आणि सरदारांचा सन्मान मिळाला.

लोकाभिमुख विकास हे त्यांच्या कारभाराचे आणखी एक वैशिष्ट्य होते. त्यांनी रस्ते, विहिरी, तलाव, बाजारपेठा आणि सार्वजनिक सुविधा उभारल्या. या सुविधा केवळ पायाभूत विकासाचे उदाहरण नव्हत्या, तर आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठीही महत्त्वपूर्ण ठरल्या.
धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे योगदानही मोठे आहे. अनेक धार्मिक स्थळांच्या पुनर्बांधणीसाठी त्यांनी मदत केली. मात्र त्यांच्या या कार्याकडे केवळ धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून पाहणे योग्य ठरणार नाही. त्या काळातील सामाजिक जीवनात अशी केंद्रे सांस्कृतिक आणि लोकजीवनाचा महत्त्वाचा भाग होती. त्यामुळे त्यांच्या या कार्याचे मूल्यांकन व्यापक सामाजिक संदर्भात करणे गरजेचे आहे.

आज राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी बोलताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा समतोल विचार करण्याची आवश्यकता आहे. त्या धार्मिक कार्य करणाऱ्या होत्या, हे जितके खरे आहे तितकेच त्या पराक्रमी, धैर्यवान आणि प्रभावी राज्यकर्त्या होत्या हेही तितकेच खरे आहे. त्यांनी प्रशासन, लोककल्याण, न्यायव्यवस्था आणि राज्यसंरक्षण या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले.
त्यांचे जीवन हे संकटांशी झुंज देणाऱ्या नेतृत्वाचे, स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचे आणि जनतेसाठी समर्पित शासनाचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करताना त्यांच्या कार्याचे सर्वंकष मूल्यमापन करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
भारतीय इतिहासातील या महान राजमातेला विनम्र अभिवादन!

आयु. सोमीनाथ घोरपडे
संस्कार सचिव, भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा (पूर्व)
मो. ९२८४६५८६९०

कराड पोलिसांची मोठी कारवाई, 95.78 ग्रॅम ड्रग्जसह 19 लाख रुपयांचं मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

0


Satara Crime News : सातारा जिल्ह्यातील कराड शहरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कराडमध्ये 95.78 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर 18 लाख 82 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कराड शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. 

सुमारे 18 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

सातारा जिल्ह्यातील कराड शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 95.78 ग्रॅम एमडी ड्रग्स हा अमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे 18 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एमडीदक्ष एक इनोव्हा कार आणि मोबाईल फोनचाही समावेश आहे.. पोलिसांच्या गुप्त माहितीच्या आधारे वांरुजी फाटा परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे कराड शहरातील अमली पदार्थांच्या अवैध नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

महाराष्ट्र हजारो कोटींच्या ड्रग्ज तस्करीचा अड्डा होत असताना तमिळनाडूत फक्त 3 दिवसांत अँटी ड्रग्ज टास्क फोर्सने तब्बल 3,246 जणांच्या मुसक्या आवळल्या,12,650 सराईतांची झाडाझडती

आणखी वाचा



Source link