Friday, September 11, 2026
Homeफलटणगारांसह जोरदार पाऊस; वडगाव निंबाळकरकरांना उष्णतेपासून दिलासा

गारांसह जोरदार पाऊस; वडगाव निंबाळकरकरांना उष्णतेपासून दिलासा

साहस टाइम्स प्रतिनिधी | वडगाव निंबाळकर
वडगाव निंबाळकर परिसरात सोमवारी दुपारनंतर गारांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. काही मिनिटांतच वातावरणात मोठा बदल झाला असून अवकाळी पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. मागील अनेक दिवसांपासून वाढलेल्या प्रचंड उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
दुपारच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही भागांत गारपीटही झाल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. फळबागा व पिकांचे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात तापमानात मोठी वाढ झाली होती. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
“उकाड्याने हैराण झालेल्या सर्वांनाच या पावसामुळे खूप आनंद झाला,” अशी प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने दिली.
दरम्यान, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments