विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी आयुष्य वेचणाऱ्या मुख्याध्यापक संजय जाधव यांचा गौरव

0
3
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी आयुष्य वेचणाऱ्या मुख्याध्यापक संजय जाधव यांचा गौरव

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी आयुष्य वेचणाऱ्या मुख्याध्यापक संजय जाधव यांचा गौरव

फलटण प्रतिनिधी :रावडी माध्यमिक विद्यालय, रावडी येथील मुख्याध्यापक  संजय जाधव यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय सेवा बजावत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या संजय जाधव यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, शाळा समिती सदस्य निकम सर, फलटण नगर परिषदेचे नगरसेवक विकास काकडे सर तसेच मुधोजी हायस्कूलचे माजी प्राचार्य सुधीर अहिवळे यांनी उपस्थित राहून श्री जाधव यांना शुभेच्छा दिल्या.
उपस्थित मान्यवरांनी श्री जाधव यांच्या प्रामाणिक सेवा, शिस्तप्रिय स्वभाव, विद्यार्थ्यांप्रती असलेले समर्पण आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा विशेष उल्लेख करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकाचा सन्मान करणे ही समाजासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमात श्री जाधव यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सेवानिवृत्तीनंतरचे त्यांचे आयुष्य आनंदी, निरोगी व समाधानकारक जावो, अशा शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या. कार्यक्रम प्रसंगी शिक्षक, नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.