Friday, September 11, 2026
Homeसाताराकेशर सुनील माने यांना सातारा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार

केशर सुनील माने यांना सातारा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव

माण : कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या कोल्हापूर विभागीय महिला आघाडीच्या अध्यक्ष केशर सुनील माने यांना सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने प्रदान करण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान मिळाल्याने शिक्षण क्षेत्रासह विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

केशर सुनील माने यांनी आपल्या शैक्षणिक सेवेदरम्यान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत अध्यापनामध्ये सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठीही सक्रिय भूमिका घेतली आहे.

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वाढ, विस्तार, प्रचार आणि प्रसारामध्ये त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग राहिला आहे. संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे तसेच संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या शैक्षणिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या पुरस्काराबद्दल सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. शिंदे मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन, शिक्षण सभापती तेजस्विनी कदम मॅडम, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी साहेब, माण पंचायत समिती सभापती विक्रम शिंगाडे साहेब, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे साहेब आणि गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे साहेब यांनी त्यांचे अभिनंदन केले.

तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटना कोल्हापूर विभागीय कार्याध्यक्ष संजय दिनकर खरात, संघटक प्रमुख उमेश गायकवाड, नेते दीपक माने, कोरेगावचे नेते दादासाहेब जगताप, धनसिंग सोनावणे, माण तालुकाध्यक्ष शैलेश बोराटे, कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, खजिनदार संतोष पवार, प्राथमिक शिक्षक संघाचे माण तालुकाध्यक्ष सुरज तुपे, प्राथमिक शिक्षक समितीचे माण तालुकाध्यक्ष सूर्यकांत दडस, शिक्षक भारतीचे माण तालुकाध्यक्ष रमेश शिंदे, निलेश घोरपडे आणि माणचे बळीराम विरकर यांच्यासह शिक्षक, सहकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केशर सुनील माने यांचे विशेष अभिनंदन केले.

आदर्श शिक्षक पुरस्कारामुळे त्यांच्या शैक्षणिक कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून, शिक्षक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments